Skip to main content

भारतामधील एका दिवसाच्या डे ट्रेडिंग 5 सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी (2022) (5 Best Cryptocurrencies For Day Trading In India 2022)

By एप्रिल 21, 2022मे 30th, 20226 minute read
Best cryptocurrencies for day trading in India (2021)-WazirX

नोंद: हा ब्लॉग बाह्य ब्लॉगरने लिहिला आहे.  या पोस्टमध्ये व्यक्त केलेले दृष्टीकोन आणि मते केवळ लेखकाची आहेत. 

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सीने जगभरात चांगलेच नाव कमावले आहे.  एलॉन मस्कच्या ट्विटर फीडपासून तुमच्या शाळेतील जिवलग मित्राच्या फेसबुक वॉलपर्यंत क्रिप्टो सर्वत्र दिसून येते.  आणि का नाही?  एल साल्वादोरमध्ये कायदेशीर टेंडर म्हणून बिटकॉइनचा समावेश केल्यामुळे   क्रिप्टोकरन्सी हे सरकारी चलनांना व्यवहार्य पर्याय म्हणून समोर आले आहे.

क्रिप्टोकरन्सीचे अत्यंत अस्थिर स्वरूप हे त्याची लोकप्रियता वाढण्याचे आणखी एक कारण आहे. अस्थिरतेमुळे क्रिप्टो हा अल्प-मुदतीच्या गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय आहे.  खरे तर, भारतातील वाढत्या क्रिप्टो मार्केटमध्ये अनेक व्यापारी डे ट्रेडिंगसाठी क्रिप्टोकरन्सींकडे वळत आहेत. त्यामुळे फारशी चर्चा न करता, भारतात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्रिप्टोकरन्सी बनण्याची क्षमता असलेल्या क्रिप्टोकरन्सींवर नजर टाकूया.  पण त्यापूर्वी, तुमचे क्रिप्टो आणि ट्रेडिंगचे कौशल्य धारदार करण्यासाठी महत्त्वाच्या संज्ञांविषयी तुमच्या ज्ञानात सुधारणा करूया. 

डे ट्रेडिंग म्हणजे काय? 

डे ट्रेडिंग ही ट्रेडिंगची एक पद्धत आहे, ज्यामध्ये व्यापारी वित्तीय साधन ज्या दिवशी खरेदी करतो त्याच दिवशी त्याची विक्री करतो.  हे धोरण स्टॉक मार्केटमध्येही वापरले जाते.  डे ट्रेडिंगमध्ये नफा कमावण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर केला जातो त्याला इंट्राडे धोरणे असे म्हणतात.  ते अस्थिर मार्केटमध्ये नफा कमावण्यात मदत करतात.  डे ट्रेडिंगमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांना स्पेक्युलेटर्स असे म्हणतात. 

Get WazirX News First

* indicates required

याचा बऱ्यापैकी फायदेशीर करिअर म्हणून विचार केला जात असला तरी, प्रथम डे ट्रेडिंग बरेच आव्हानात्मक असू शकते.  त्याच्या जोखीम क्षमतेमुळे त्याची अनेकदा जुगारासमान असल्याचे मानले जाते.  मात्र, यामध्ये चिंता करण्यासारखे काहीच नाही.  सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ मालमत्तेचे चांगले ज्ञान, काहीशी वस्तुनिष्ठता, स्वयं-शिस्त, आणि थोड्याशा नशिबाची गरज असते.  हे केवळ अस्थिरतेचा फायदा करून घेणे आहे!

डे ट्रेडिंगसाठी क्रिप्टोकरन्सी कशा निवडायच्या? 

क्रिप्टोकरन्सींमध्ये किंमतीची हालचाल तीन घटक निश्चित करतात.  त्या आहेत – अस्थिरता, प्रमाण आणि कॉइनची सध्याची ॲक्टिव्हिटी. डे ट्रेडिंगसाठी चांगले क्रिप्टो निश्चित करण्यासाठी आणि डे ट्रेडिंगसाठी क्रिप्टो कसे निवडायचे हे शिकण्यासाठी, तुम्ही या तीन बाबी विचारात घेणे आवशक आहे. 

अस्थिरता

हे  क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमधील दैनंदिन चढउतार दर्शवते. क्रिप्टो हा सामान्यतः अतिशय अस्थिर मार्केट आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे.  त्यामुळे तुम्ही 10% पासून ते 50% पर्यंत कितीही दराची अपेक्षा करू शकता — जितकी जास्त अस्थिरता तितका जास्त नफा.  मात्र, याचा अर्थ गुंतवणुकीमध्ये असलेली अधिक जास्त जोखीम याची जाणीवही असायला हवी.  

 क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या व्यापाऱ्याला वर जाणाऱ्या किंमत अस्थिरतेच्या मालमत्तेवर आपल्या पैशांचा सट्टा लावायचा असेल.  असे केल्यामुळे जेव्हा मालमत्तेच्या किंमतीमध्ये एकदम वाढ होते तेव्हा तुम्हाला चांगला नफा मिळण्याची सुनिश्चिती होईल.

2. प्रमाण

क्रिप्टोकरन्सीभोवती कोणत्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत ते निश्चित करण्यासाठी त्याचे प्रमाण जबाबदार असते. ती  क्रिप्टोकरन्सी पुरेसे लोक खरेदी करत किंवा विकत आहेत का हे प्रमाण निश्चित करते. अधिक ट्रेडिंग प्रमाण याचा अर्थ असा की अधिक लोक खरेदी करत आहेत आणि त्याच्या उलट.  अधिक प्रमाणामुळे तांत्रिक निर्देशक अधिक विश्वसनीयदेखील होते आणि किंमतीमध्ये अनपेक्षित उसळीची किंवा घसरणीची शक्यता कमी होते. 

3. सध्याच्या बातम्या

क्रिप्टोच्या सभोवताली सुरू असलेल्या चर्चांचा त्यावर खोलवर प्रभाव पडतो.  आणि कधीकधी, त्याच्याशी संबंधित नसलेल्या चर्चांचाही.  उदाहरण घ्या, एलॉन मस्कने शिबु जातीचे कुत्र्याचे पिल्लू विकत घेण्याची इच्छा ट्विट केली तेव्हा  शिब कॉइन्स ची वाढलेली किंमत.   क्रिप्टो गुंतवणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी, तुम्ही नेहमी सतर्क असायला हवे.  क्रिप्टोच्या संस्थांपकांविषयी भरपूर वाचणे, ते सोशल मीडियावर करत असलेल्या संभाषणाचा माग घेणे, आणि क्रिप्टोकरन्सीविषयी कोणतीही नवीन चर्चा पाहणे फायद्याचे ठरू शकते. यामुळे भारतामध्ये कोणती क्रिप्टोकरन्सी स्फोट घडवेल हे निश्चित करण्यास तुम्हाला मदत होईल. 

भारतातील डे ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी 

यामुळे आपण चर्चेच्या महत्त्वाच्या भागाकडे येतो.  संभाव्य क्रिप्टो मालमत्तांवर नजर टाकूया. 

#1 इथेरियम 

इथेरियम हे मार्केटमधील सर्वात लोकप्रिय अल्टकॉइन आहे.  इथेरियमला असलेली मागणी कधीही संपत नाही, जे त्याच्या 2021 मधील आकर्षक किंमत वाढीमधून दिसून आले.  हे क्रिप्टो क्षेत्रातील स्मार्ट काँट्रॅक्ट्स आणि डीअॅप्स मार्केटवर राज्य करते  ज्याची किंमत मागील वर्षी आश्चर्यजनक  425% नी वाढली . 

एवढेच नाही तर, इथेरियम चांगली अस्थिरता ऑफर करते आणि त्वरित लक्षणीय नफा मिळवण्याची उत्तम संधी देते.  विशेष म्हणजे, 2022 मध्ये ब्लॉकचेन ईटीएच-2 (ETH-2) प्रोटोकॉल स्वीकारण्यास सज्ज असताना इथेरियम या वर्षी मूलगामी बदलाच्या काठावर उभे आहे.  या अवलंबाला मिळणाऱ्या प्रतिकियेसंबंधी उद्योगात असलेल्या अज्ञानपणामुळे हे आधीच मार्केटमधील इथेरियमच्या अस्थिरतेला खतपाणी घालत आहे.  डे ट्रेडिंगसाठी क्रिप्टोकरन्सीचा शोध घेत असताना इथरियमवर ध्यान केंद्रित करण्याची या मुळे नक्कीच सबळ कारणे आहेत!

#2 मॅटिक (एमएटीआयसी/MATIC) 

मॅटिक (एमएटीआयसी/MATIC) ही या वर्षाच्या सर्वात आशादायक क्रिप्टोकरन्सींपैकी एक आहे.  त्याने 1 जानेवारी 2021 रोजी $0.01 पासून 2021 च्या अखेरीस $2.9 च्या स्तरापर्यंत!  त्याच्या किंमतीमध्ये मोठी झेप  पाहिली. आता, मॅटिक (एमआयटीआयसी/MATIC) ही डे ट्रेडिंगसाठी इतकी फायदेशीर निवड का आहे? अनेक पूर्वानुमान सेवांनी 2022 साठी आणि त्याहीनंतर  सुध्दा मॅटिकमध्ये (एमआयटीआयसी/MATIC) तेजीचा अंदाज वर्तवला आहे.  जानेवारी 2022 च्या अखेरीस, कॉइनमध्ये हळूहळू घसरण होत होती. 

आणि याच गोष्टीमुळे ती भारतातील संभाव्य सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी बनली आहे! इथेरियमच्या होऊ घातलेल्या श्रेणीवाढीच्या पार्श्वभूमीवर पॉलिगॉन या मॅटिकच्या ब्लॉकचेनभोवती असलेली गजबज वाढत आहे.  मंदीचे वातावरण दूर झाल्यानंतर या कॉइनची किंमत वाढेल.  तुमची डे ट्रेडिंगची स्थिती सुधारण्याकरिता मॅटिक विकत  घेण्या साठी वझिरएक्सला  भेट द्या. 

#3 सोलाना (एसओएल/SOL)

सोलाना 2021 मध्ये मुख्य प्रवाहातील क्रिप्टोकरन्सी झाली.  या क्रिप्टोच्या मार्केट कॅपिटायलाझेशनमुळे, याची 5 व्या सर्वात मोठ्या क्रिप्टो मालमत्तेच्या स्थानी प्रगती झाली व वर्षभरात सोलानाची 11,000% वाढ झाली! या क्रिप्टोचे जलद व्यवहार आणि कमी किंमत यामुळे त्याला अनेकदा ‘इथेरियम-किलर’ असे म्हणतात. 

या अतिशय गतीशील इतिहासामुळे तो डे ट्रेडिंगसाठी उपलब्ध सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सींमध्ये सामिल होतो. आणि याचे कारण हे आहे.  ब्लॉकचेनमध्ये नवनवीन प्रकल्प सामील होत असताना सोलाना इकोसिस्टीमची दररोज वाढ होत आहे.  एनएफटी व्यवहारांसाठी पेमेंट करण्यासाठी सोलाना हे सर्वाधिक मागणी असलेल्या क्रिप्टोकरन्सींपैकी एक आहे.  या सर्वांमुळे सोलानाची अस्थिरता आणखी वाढून ती भारतात डे ट्रेडिंगसाठी उत्कृष्ट क्रिप्टोकरन्सी होत आहे. 

#4 रिपल (एक्सआरपी/XRP)

सध्या ₹61.89 इतकी किंमत असलेले रिपल ही त्याच्या इतर समकक्षांच्या तुलनेत स्वस्त गुंतवणूक आहे. 2021 मध्ये या कॉइनच्या किंमतीमध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली तरी, या एकेकाळी सर्वांच्या आवडत्या क्रिप्टो मालमत्तेसाठी सर्व काही तितके वाईट नाही.  मार्केट सध्या रिपलसाठी मंद दिसत आहे, पण ही त्याच्यासाठी केवळ एक क्षणिक पीछेहाट असू शकते. 

या उद्योगातील तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, येत्या काही महिन्यांमध्ये रिपलची किंमत कमी होत राहील. हे रिपल आणि त्याच्या संस्थापकांविरोधातील एसईसी (SEC) खटल्यामुळे आहे.  हेच खरे आहे की, मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची भावनाच मालमत्तेची किंमत निश्चित करते.  क्रिप्टोकरन्सींनाही हाच नियम लागू होतो.  आणि अद्याप तरी ती रिपलच्या समर्थनार्थ नाही. 

मात्र, तज्ज्ञ असे सुचवतात की  2022-च्या मध्याला गोष्टी बदलतील. रिपल टीम एसईसीविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे आनंदी दिसत आहे, आणि याचा मार्केटच्या भावनेवर आधीच परिणाम होत आहे.  आघाडीच्या बँकांबरोबर केलेले नवीन करार हे रिपलच्या किंमतीचे मुख्य चालक घटक आहेत हे विसरता कामा नये.  उदाहरणार्थ, ऑगस्ट 2021 मध्ये, या भारताची सर्वात मोठी बँक,  एचडीएफसी बँक लिमिटेड  रिपलनेटमध्ये सहभागी झाली. आणि बँकिंग क्षेत्र या मालमत्तेच्या मागे उभे राहिले आहे.  रिपल हे भारतात क्रांती घडवणाऱ्या पुढील संभाव्य क्रिप्टोकरन्सींपैकी एक असू शकते. 

#5 बायनान्स कॉइन (बीएनबी/BNB) 

बायनान्स कॉइन हे मार्केटमधील सर्वात तिसरे मोठे कॉइन झाले आहे आणि त्याला उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचे – बायनान्सचे – समर्थन आहे.  जागतिक क्रिप्टो मार्केटमध्ये बायनान्सचे वर्चस्व असलेल्या अस्तित्वासह, बायनान्स कॉइन ही डे ट्रेडिंगसाठी एक सुरक्षित गुंतवणूक आहे.  आणि तसे का ते येथे दिले आहे. 

बायनान्स  गेमिंग आणि फार्मिंगच्या संदर्भात वाढत्या एनएफटी इंडस्ट्रीमध्ये भरपूर गुंतवणूक करत आहे. हे एक्सचेंज प्लॅटफॉर्म्स ऑफर करते, जिथे तुम्ही संपूर्ण क्रिप्टो उद्योगाचा भाग असलेल्या कोणत्याही उत्पादनाच्या ट्रेडिंगमध्ये सहभागी होऊ शकता.  हे याचे सूचक आहे की बीएनबीची (BNB) मागणी वाढत राहील.

या क्रिप्टोकरन्सीसह यशस्वी गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला सहयोगी क्रिप्टो एक्सचेंज बातम्यांशी संबंधित बातम्यांविषयी जागरूक राहावे लागेल.  कारण एक्सचेंजद्वारे केलेली कोणत्याही खेळीचा कॉइनच्या किंमतीवर लक्षणीय परिणाम होईल.  विशेष म्हणजे, हे कॉइन इथेरियमपेक्षा अधिक अस्थिरता दाखवते. 

भारतातील डे ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक कशी करायची? 

कुठे गुंतवणूक करायची हे आता तुम्हाला माहित आहे, तरीही ते कसे करायचे या एका प्रश्नाचे उत्तर अद्याप द्यायचे आहे.  

भारतामध्ये अजूनही क्रिप्टोकरन्सी  ट्रेडिंगसाठी प्रस्थापित रचनेचा अभाव आहे.  येथे क्रिप्टो एक्सचेंज तुमच्या मदतीसाठी येतात. तुमची सुरुवात करण्यासाठी अनेक एक्सचेंजचे युझर-फ्रेंडली इंटरफेस आहेत.  यापैकी एक आहे वझिरएक्स. खाते निर्माण करणे, तुमच्या केवायसी पूर्ण करणे, फंड्स जमा करणे, तुम्हाला गुंतवणूक करायची असलेली रक्कम आणि क्रिप्टो निवडणे एवढेच तुम्हाला करायचे आहे.  इतकेच!  प्लॅटफॉर्मवर दिलेल्या सर्व पॉलिसीज/धोरणे तुम्ही काळजीपूर्वक वाचल्या तर सर्वात उत्तम.  ते मागतील ती सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत हे सुनिश्चित करा.   

आणि त्यानंतर, तुम्हाला केवळ तुमच्या गुंतवणुकी करायच्या आहेत.  यापूर्वी हे कधीही इतके सोपे नव्हते! 

निष्कर्ष 

भारतात डे ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सींच्या ज्ञानासह, तुमच्या बजेट आणि जोखमीच्या आधारावर तुम्हाला ट्रेड करायची इच्छा असलेल्या क्रिप्टोकरन्सी तुम्ही निवडू शकता.    तुम्ही एका डे ट्रेडिंग क्रिप्टोमध्ये किती पैसे कमावू शकता यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही.   मात्र, तुम्हाला अधिक लक्षणीय नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल दाव्यावर ठेवण्याची गरज असेल.  या ठिकाणी तुम्हाला तुमची वस्तुनिष्ठता वापरावी लागेल आणि तुमच्या पसंतीचे क्रिप्टो तेवढ्या मूल्याचे आहे की नाही ते निश्चित करावे लागेल. क्रिप्टो उद्योग वाढत आहे आणि त्याची भरभराट होत आहे.  तुम्हाला केवळ ट्रेंड्सचा/ कल काय आहे याचा अभ्यास करण्याची आणि विश्वासाच्या आधारे गुंतवणूक करण्याची गरज आहे. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.
Shashank

Shashank is an ETH maximalist who bought his first crypto in 2013. He's also a digital marketing entrepreneur, a cosmology enthusiast, and DJ.

Leave a Reply