Table of Contents
कोणतीही कागदपत्रे, प्रक्रिया शुल्क, किंवा अगदी तुमचे घर किंवा कार तारण न ठेवताही तुम्हाला 5-15% इतक्या कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही त्याचा विचार कराल का? हो, जर तुमच्याकडे तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये पुरेशा क्रिप्टोकरन्सी असतील तर हे शक्य आहे.
क्रिप्टो कर्जचे कार्य आणि इतर संबंधित माहिती समजून घेऊया.
क्रिप्टो कर्ज समजून घेणे
एका व्यक्तीकडून क्रिप्टो मिळवणे आणि दुसऱ्या व्यक्तीला काही शुल्क आकारून ते कर्जाने देणे अशा पद्धतीने क्रिप्टो कर्ज काम करते. एका प्लॅटफॉर्मपासून दुसऱ्या प्लॅटफॉर्मपर्यंत, कर्ज देण्याचे मूलभूत तंत्र बदलते. नियंत्रित आणि विकेंद्रित प्लॅटफॉर्मवर क्रिप्टो कर्जसेवा उपलब्ध आहेत, पण मूलभूत संकल्पना त्याच आहे्त.
सहभागी होण्यासाठी तुम्ही कर्जदार असण्याची गरज नाही. तुमचे फंड्स हाताळणाऱ्या पूलमध्ये तुमच्या क्रिप्टोकरन्सी डिपॉझिट करून तुम्हाला निष्क्रिय उत्पन्न मिळू शकते आणि तुम्हाला व्याज कमावता येते. तुम्ही निवडलेल्या स्मार्ट काँट्रॅक्टच्या स्थैर्यावर अवलंबून तुम्ही तुमची रक्कम गमावण्याची साधारणतः कमी शक्यता असते.
क्रिप्टो कर्ज अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उदाहरण
समजा, तुमच्याकडे दहा बिटकॉइन आहेत आणि तुम्हाला तुमच्या बिटकॉइन गुंतवणुकींमधून स्थिर निष्क्रिय उत्पन्न कमवायचे आहे. तुम्ही हे 10 बिटकॉइन क्रिप्टो लेंडिंग प्लॅटफॉर्म वॉलेटमध्ये टाकू शकता आणि त्यांच्यावर महिन्याला किंवा आठवड्याला व्याज कमावू शकता. बिटकॉइन कर्जावरील व्याजदर 3% ते 7% इतके असतात, पण ते यूएसडी कॉइन, बायनान्स यूएसडी आणि इतर नियमित करन्सींसारख्या अधिक स्थिर मालमत्तांवर 17% इतके जास्त असू शकते.
क्रिप्टो कर्ज आणि इतर पीअर-टू-पीअर कर्जांचे इतर प्रकार यामधील फरक असा की कर्जदार त्यांचे क्रिप्टो तारण म्हणून वापरतात. परिणामी, कर्जाची परतफेड झाली नाही तर गुंतवणूकदार त्यांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी बिटकॉइन मालमत्ता विकू शकतात. मात्र, गुंतवणूक प्लॅटफॉर्मना अनेकदा 25-50% कर्ज क्रिप्टोकरन्सीमध्ये असावी लागतात आणि अनेकदा त्यांचे झालेले नुकसान भरून काढू शकतात आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होण्यापासून थांबवू शकतात.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्रिप्टो फायनान्सिंग तुमची क्रिप्टोकरन्सी विकण्यास तुम्हाला भाग न पाडता खरे पैसे (जसे की कॅनडियन डॉलर्स-सीएडी, युरो किंवा यूएसडी) कर्जाऊ घेऊ देते.
व्यावहारिक उदाहरण:
अलेक्सकडे यूएसडी 15,000 किंमतीचा एक बिटकॉइन आहे आणि त्याला 8% वार्षिक व्याज दरावर यूएसडी 5,000 च्या कर्जाची गरज आहे.
बेनकडे स्टेबल कॉइन्समध्ये यूएसडी 5,000 आहेत आणि तो 1 बिटकॉइनच्या बदल्यात 8% व्याज दराने अलेक्सला कर्ज म्हणून द्यायला तयार आहे.
एकदा अलेक्सने बेनचे यूएसडी 5,000 आणि व्याज चुकते केले की बेन अलेक्सला बिटकॉइन परत करेल. या व्यवहारासाठी एलटीव्ही (लोन टू व्हॅल्यू) 33.33% किंवा यूएसडी 5,000/ यूएसडी 15,000 इतके आहे.
अलेक्सने कर्जाची रक्कम परतफेड केली नाही तर बेन बिटकॉइन लिक्विडेट करू शकतो आणि उर्वरित शिल्लक परत करू शकतो.
क्रिप्टो कर्जामध्ये सातत्याने अतिरिक्त-तारण ठेवले जाते, ज्यामुळे ते पीअर-टू-पीअर सारख्या इतर कर्ज प्रकारांपेक्षा अधिक सुरक्षित होते.
क्रिप्टो कर्ज कसे काम करते?
धनको आणि ऋणको (सावकार आणि कर्जदार)क्रिप्टो कर्ज सुलभ करणाऱ्या त्रयस्थ पक्षाच्या मार्फत एकमेकांशी जोडलेले असतात. धनको (सावकार) हे क्रिप्टो कर्जामध्ये सहभागी होणारे प्रथम पक्ष असतात. ते मालमत्तेचे उत्पादन वाढवण्याची इच्छा असलेले क्रिप्टो शौकीन असू शकतात किंवा किंमत वाढण्याच्या अपेक्षेने क्रिप्टोकरन्सी धारण करणारे असू शकतात.
क्रिप्टो कर्ज प्लॅटफॉर्म हा दुसरा पक्ष असतो आणि या ठिकाणी कर्ज देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार होतो. अखेरीस, कर्जदार (ऋणको) हे या प्रक्रियेचे तृतीय पक्ष असतात, आणि त्यांना पैसे मिळतात. उदाहरणार्थ, ते रोख रकमेची गरज असलेले उपक्रम असू शकतात किंवा निधी शोधतअसलेल्या व्यक्ती असू शकतात.
क्रिप्टो कर्ज प्रक्रियेचे काही टप्पे आहेत:
- कर्जदार प्लॅटफॉर्मला भेट देतो आणि क्रिप्टोकरन्सी कर्जासाठी अर्ज करतो.
- प्लॅटफॉर्मने कर्जाची विनंती स्वीकारल्यानंतर लगेचच कर्जदार क्रिप्टो तारणावर सट्टा लावतो. कर्जदार जोपर्यंत संपूर्ण कर्जाची परतफेड करत नाही तोपर्यंत त्याला त्याचे स्टेक्स परत मिळवता येणार नाहीत.
- कर्जदार ताबडतोब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कर्जासाठी पैसे देईल, जी प्रक्रिया गुंतवणूकदारांना पाहता येणार नाही.
- गुंतवणूकदारांना व्याजाचे नियमित पेमेंट केले जाईल.
- कर्जदार संपूर्ण कर्जाची परतफेड करेल तेव्हा त्याला विनंती केलेले क्रिप्टो तारण प्राप्त होईल.
क्रिप्टोकरन्सी कर्ज देण्याच्या प्रत्येक साईटची स्वतःची भिन्न पद्धत असते, पण या पद्धतीने प्रक्रिया काम करते.
क्रिप्टो कर्जाचे फायदे
क्रिप्टो कर्जाच्या फायद्यांची यादी खालीलरप्रमाणे आहे:
- प्रक्रिया त्वरित आणि सरळसोट असतात.
कर्जदार तारण देऊ करेपर्यंत त्वरित कर्ज मिळवू शकतात. त्यामध्ये एवढेच आहे. त्याच्या जोडीला या तंत्राला पारंपरिक बँकिंगपेक्षा कमी वेळ लागतो आणि त्यासाठी लांबलचक प्रक्रियांची गरज नसते.
2. सावकार जास्त आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट-गुंतवणूकीवर परतावा)ची अपेक्षा करू शकतात.
बँकांमधील बचत खाती फारसा व्याजदर देत नाहीत. तुमचे पैसे तुम्ही दीर्घकाळ बँकेत ठेवले तर चलनवाढीमुळे त्याची किंमत कमी होईल. याच्या तुलनेत, क्रिप्टो कर्ज बँकांपेक्षा अधिक उत्तम व्याजदरांनी समान बचत पर्याय प्रदान करते.
3. व्यवहार शुल्क कमी असतात.
कर्ज देण्याच्या आणि घेण्याच्या क्रियांसाठी एकवेळ सेवा शुल्क वारंवार आकारले जाते. मात्र, ते नियमित बँकांनी आकारलेल्या शुल्कांपेक्षा स्वस्त असते.
4. क्रेडिट चेक (पत तपासणी) केले जात नाही.
सामान्यतः, क्रिप्टोकरन्सी साईट पत तपासणी न करता कर्जे देतात. कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्हाला केवळ तारणाची गरज असते. एकदा तुम्ही ते देऊ शकलात की तुम्हाला कर्ज मिळते.
क्रिप्टो कर्जाचे तोटे
क्रिप्टोकरन्सीमध्ये फायदे देण्याची क्षमता असली तरी, काही विशिष्ट तोट्यांविषयी जागरूक असावे लागते. आपण त्यापैकी काही खाली पाहणार आहोत:
- हॅकर्सच्या कारवाया
कर्ज देण्याची आणि घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन होत असल्यामुळे तुमची मालमत्ता हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे असुरक्षित असते. हॅकर्स स्मार्ट काँट्रॅक्टचा अॅक्सेस मिळवू शकतात किंवा वाईट पद्धतीने डिझाईन केलेल्या कोडचा फायदा घेऊ शकतात, परिणामी पैसे गमावले जातात.
2. लिक्विडेशन
यानंतर कर्जफेड करता येणार नाही इथपर्यंत तुमच्या तारणाचे मूल्य कमी होते तेव्हा्लिक्विडेशन होते. क्रिप्टो मार्केटचा अजिबात अंदाज करता येत नसल्यामुळे, तुमच्या तारणाचे मूल्य नाट्यमयरित्या कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे लोक्विडेशन करणे भाग पडते.
3. क्रिप्टो मार्केट अस्थिरता
सावकारांसाठी असलेला एक तोटा म्हणजे अस्थिरता. तुम्ही दिलेल्या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य कोसळू शकते, ज्यामुळे होणारा तोटा व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक असू शकतो.
अंतिम विचार
तुम्हाला पैशांची गरज असेल पण तुम्हाला तुमची क्रिप्टो मालमत्ता विकायची नसेल तर, क्रिप्टोवर कर्ज घेणे हा योग्य पर्याय असू शकतो. क्रिप्टो कर्जे अनेकदा कमी-किंमतीची आणि जलद असतात कारण त्यांना पत तपासणीची गरज नसते. जर तुमच्याकडे दीर्घकाळ राखावयाच्या डिजिटल मालमत्ता असतील तर क्रिप्टो व्याज खात्याच्या माध्यमातून ते भाड्याने देणे, ही त्यांचे मूल्य वाढवण्याची उत्कृष्ट पद्धत असू शकते.
मात्र, तुम्ही क्रिप्टो कर्जाच्या कोणत्याही बाजूने सहभागी होण्यापूर्वी, तुम्हाला धोक्यांची जाणीव असली पाहिजे, मुख्यतः तुमच्या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य नाट्यमयरित्या कमी झाले तर काय होईल याची. त्यामुळे, तुम्ही कोणत्याही स्वरूपात क्रिप्टो कर्जाचा विचार करत असाल तर तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी फायदे आणि तोट्यांचे मूल्यमापन केल्याची आणि तुमच्या इतर सर्व निवडींचे मूल्यमापन केल्याची सुनिश्चिती करा.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.