Skip to main content

नवशिके क्रिप्टो गुंतवणूकदार म्हणून माहिती असल्याच पाहिजेत अशा 5 टिप्स (आणि टाळावयाच्या 5 चुका) (5 Must-Know Tips As A Newbie Crypto Investors & 5 Mistakes To Avoid)

By एप्रिल 7, 2022जून 3rd, 20224 minute read
5 Must-Know Tips As A Newbie Crypto Investors

एक नवशिका क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदार म्हणून तुम्ही निःसंशयपणे स्वतःला पुढीलप्रमाणे प्रश्न विचारत असाल:

  • बिटकॉइनचा बुडबुडा फुटला का?
  • सुरुवात करण्यासाठी खूप उशीर झाला आहे का? आणि 
  • या सतत विकसित होणाऱ्या गुंतवणूक अवकाशात यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तम डावपेच कोणते आहेत?

तुम्ही या गोष्टींचा विचार करत असताना, तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केटच्या अस्थिरतेचे निरीक्षण केले असेलच. मात्र, क्रिप्टोकरन्शीशी संबंधित कोणतीही बातमी, मग त्याच्या बाजूची किंवा विरोधातील असो, आपल्याला माहित आहे की क्रिप्टोकरन्सी अजूनही जीवंत आहे, आणि क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक निर्वाणाकडे जाणारा मार्ग हा पूर्वी कधीही होता त्यापेक्षा अधिक आशादायक आहे. 

त्यामुळे तुम्ही क्रिप्टो गुंतवणुकीचा तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी, येथे तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही गुंतवणुकीपूर्वी विचारात घेऊ शकता.  येथे वाचा!

तुम्हाला क्रिप्टो संज्ञा आणि शब्दप्रयोग शिकायचे असतील तर येथे लहानसे मार्गदर्शन आहे. 

Get WazirX News First

* indicates required

क्रिप्टो गुंतवणूकदाराला माहिती असल्याच पाहिजेत अशा 5 टिप्स 

1. तुम्ही जितका तोटा सहन करू शकता तितकीच गुंतवणूक करा  

तुमच्या दीर्घ-कालीन वित्तीय स्थैर्यासाठी मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, एसआयपी, डेट फंड, विमे आणि आपत्कालीन निधी यांच्यामध्ये गुंतवणूक करा.  या सुरक्षिततेनंतर तुमच्याकडे पैसे शिल्लक राहिले तर तुम्ही नक्कीच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करू शकता कारण विपरित वित्तीय परिणाम न होताही हा पैसा गमावणे तुम्हाला परवडू शकते.

2. तुमचे संशोधन करा 

मित्र किंवा नातेवाईकांच्या सल्ल्यांच्या आधारे आंधळेपणाने गुंतवणूक करणे हा मार्ग सोपा आहे! मात्र हे लक्षात ठेवा की हा तुमचा पैसा आहे आणि ही गुंतवणूक बुडाली तर कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही. त्यामुळे, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये कोणताही पैसा गुंतवण्याआधी ते पूर्णपणे समजून घेणे श्रेयस्कर आहे.  आधी बिटकॉइन, इथेरियम, टिथर, पॉलिगॉन आणि इतर लोकप्रिय क्रिप्टोकरन्सींविषयी समजून घ्या.  त्यानंतर गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी त्यांच्या वापराची प्रकरणे आणि शक्यता जाणून घ्या.

3. विश्वसनीय आणि विश्वासपात्र एक्सचेंज निवडा.

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अनेकदा हॅक केले जातात किंवा गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.  त्यामुळे यशापयश सिद्ध केलेल्या मोठ्या एक्सचेंजवर खाते उघडण्याची आणि ते हॅक झाल्यास तुमच्याकडे विम्याचे संरक्षण असल्याची सुनिश्चिती करून घ्या.

4. तांत्रिक गोष्टींचा परिचय करून घ्या.

तुम्ही क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीबद्दल गंभीर असाल तर तुमचे  डिजिटल वॉलेट कसे डिझाईन करायचे किंवा तुमच्या फंडचे संरक्षण करण्यासाठी प्रतिष्ठित हार्ड वॉलेट कसे विकत घ्यायचे हे शिकून घेणे चांगले.  त्यानंतर तुमचे नैपुण्य वाढवण्यासाठी, लिक्विडिटी मायनिंग, स्टॅकिंग, विकेंद्रित पैसा आणि इतर बरेच काही शिकून घ्या.

5. घोटाळेबाजांपासून सावध राहा.

घोटाळेबाज नेहमीच गुंतवणूकदारांची फसवूक करण्यासाठी पद्धती शोधत असतात.  बनावट एअर ड्रॉप्स, पंप ॲन्ड डंप घोटाळे, आणि सोशल मीडियाच्या खात्यांवरून आलेले मेसेज टाळले पाहिजेत.  गुंतवणूकदारांना लुबाडण्यासाठी घोटाळेबाज फसव्या वेबसाईटचाही वापर करतात. 

तुमची माहिती सबमिट करण्यापूर्वी एक्सचेंजच्या यूआरएलची (URL) पुन्हा-पुन्हा तपासणी करून घ्या.  ट्रेडिंग ॲप्लिकेशन नेहमी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरसारख्या प्रतिष्ठित साईटवरून डाऊनलोड करा. सोशल मीडियावर इतर क्रिप्टो चाहते आणि प्रभावकर्त्यांशी जोडले जाणे फायद्याचे असते, पण कधीही त्यांच्या सल्ल्याने गुंतवणूक करू नका. 

गुंतवणूक करण्यापूर्वी या टिप्स लक्षात ठेवा आणि नेहमी सतर्क मोडवर असा. 

नवशिके क्रिप्टो गुंतवणूकदार म्हणून टाळावयाच्या 5 चुका  

क्रिप्टो व्यापारात तुमचा प्रवास सुरू करता, तेव्हा चुका करणे अटळ असते.  पण एक नवशिका गुंतवणूकदार म्हणून तुम्ही टाळू शकता अशा पाच चुकांची यादी आम्ही येथे दिलेली आहे.  त्या खाली पाहा:

1. केवळ कमी किंमतीच्या आधारावर गुंतवणूक करणे

कमी किंमत म्हणजे चांगला व्यवहार असेलच असे नाही.  मात्र, कधीकधी किंमती कमी असण्याची काही कारणे असतात! ज्या कॉइनच्या युझर्सची संख्या कमी होत आहे त्यावर लक्ष ठेवा. 

अनेकदा, विकासक एखादा प्रकल्प मध्येच सोडून देतात, आणि त्यामध्ये श्रेणीसुधारणा होत नाही, त्यामुळे क्रिप्टो असुरक्षित राहते. 

2. सर्व काही पणाला लावणे 

काही सल्लागार तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी शक्य तितका सट्टा लावण्याचा सल्ला देऊ शकतात.  पण, सावध राहा, तुम्ही दिवाळखोर होण्याच्या शक्यता आहेत.

तुमच्या गुंतवणुकीचा पैसा एका विशिष्ट टक्केवारीपर्यंतच-समजा, 5% किंवा 10% पर्यंत मर्यादित ठेवणे;  हा अधिक चांगला क्रिप्टो गुंतवणूक सल्ला असेल – आणि उर्वरित पैसा तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये ठेवू शकता, जो तुमच्यासाठी आपात्कालीन राखीव रोख म्हणून काम करेल. 

3. क्रिप्टोकरन्सी हा “सोपा पैसा” असतो यावर विश्वास ठेवणे. 

कोणत्याही वित्तीय व्यवहारात, मग तो स्टॉक्स असो, शेअर किंवा चांदी आणि सोने, व्यापार करून पैसे कमावणे साधे नसते.  पण दुर्दैवाने, क्रिप्टोकरन्सी त्याच कठीण परिस्थितीत आहे.

यापेक्षा वेगळा काही दावा करणारी व्यक्ती तुम्हाला क्रिप्टोविषयक चुका करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत असेल.

4. तुमच्या क्रिप्टो कीचा माग हरवणे 

 तुमची क्रिप्टोकरन्सी तुम्ही हार्डवेअर वॉलेटमध्ये ठेवली तर तुमची की विसरणे हे सेफ्टी डिपॉझिट बॉक्समध्ये किल्ल्या टाकण्यासारखे आहे. 

 तुमची की तुम्ही हरवली तर तुमच्या क्रिप्टोकरन्सी कायमच्या नाहीशा होतील.  लक्षात ठेवा!

5. लबाडांकडून फसवणे जाणे

प्रथम मोहित करणाऱ्या क्रिप्टो डीलपासून सावध राहा.  तुम्ही ज्यांच्यापासून सावध राहायला हवे अशा चार सामान्य क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांचे आम्ही वर्णन केले आहे:

  • क्लाउड मल्टीप्लायर्ससह घोटाळे

घोटाळेबाज अधूनमधून “गुंतवणूक संधी”सह ईमेल किंवा टेक्स्टच्या माध्यमातून पीडितांशी संपर्क साधतात.  ते एखाद्या विशिष्ट डिजिटल वॉलेटमध्ये पैसे जमा केलेल्या गुंतवणूकदारांना बिटकॉइनमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट किंवा तिप्पट परतावा देण्याचा दावा करतात.

लक्षात ठेवा: फुकट पैशांच्या ऑफर्सकडे नेहमी संशयाने पाहावे.

  • पंप आणि डंप 

गुन्हेगार अपवादात्मक लहान किंवा अज्ञात कॉइनच्या किंमती त्वरित फुगवू किंवा एकदम कमी करू शकतात, ज्याद्वारे काही वेळा त्यांचे मूल्य वाढू शकते. 

गुन्हेगार कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी धारण करू शकतात (ते सगळ्यांना उपलब्ध होण्यापूर्वी त्यापैकी बरेसचे प्री-मायनिंग करून).

मनात नि:शंक असलेले व्यापारी नफ्याचा काही भाग मिळवण्याच्या प्रयत्नात घाई करतात तेव्हा गुन्हेगार त्यांचे सर्व कॉइन्स विकण्यापूर्वी किंमती वाढण्याची वाट पाहतात, यामुळे किंमती कमी होतात.

ते अधिक किंमतीला विक्री करण्यापूर्वी सोशल मीडियावर मार्केटिंग करून त्याची किंमत फुगवू शकतात.

  • धोकादायक वॉलेट सॉफ्टवेअर 

प्रसिद्ध क्रिप्टो वॉलेट्स बरोबरच रहा.

गुगल प्ले किंवा ॲप स्टोअरमध्ये आढळलेली अर्धवट किंवा अज्ञात वॉलेट तुमच्या क्रिप्टो मालमत्ता चोरण्यासाठी धूर्त प्रोग्रामिंगचा वापर करू शकतात.

  • बनावट कॉइन्स

मार्केटमध्ये एवढ्या क्रिप्टोकरन्सी असताना कोणती खरी आणि कोणती नाही यात फरक करणे अशक्य असते. 

तुम्ही फसवी कॉइन्स विकत घेतलीत तर गुन्हेगार तुमची ओळख, आणि काहीघटनांत  तुमचा कष्टाने कमावलेला पैसा मिळवू शकतात.

कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवू नका; कॉइन्स विकत घेण्यापूर्वी तुम्हाला शक्य तितक्या सर्व स्रोतांकडून तुम्ही स्वतः त्यावर संशोधन करा.

मूलभूत आणि सर्वात महत्वाचा घटक

क्रिप्टोकरन्सी हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन आहे, आणि दिवसेंदिवस जागतिक क्रिप्टो समुदाय वाढत आहे. 2021 मध्ये जगाने क्रिप्टोकरन्सीमध्ये $3000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली.  दुसऱ्या बाजूला, क्रिप्टो हा सततच्या अस्थिरतेसह उच्च-जोखमीचा, उच्च-फलित देणारा गेम आहे.

तुम्ही तुमची गुंतवणूक विस्तारण्यासाठी स्वतःला मूलभूत गोष्टींविषयी शिक्षित करून घेणे आणि विकसित होणाऱ्या ट्रेंड्सबद्दल अद्ययावत राहणे महत्त्वाचे आहे.  गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशावर स्वायत्तता देणे ही क्रिप्टोची आकांक्षा आहे, पण त्यांनी अति प्रचाराच्या आधारावर गुंतवणूक टाळली पाहिजे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply