Table of Contents
प्रिय ट्राइब!
आपल्या क्रिप्टो प्रवासाचा एक भाग बनून आम्हाला आनंद होत आहे. कृपया खात्री बाळगा की तुम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास आम्ही WazirX येथे तुमच्यासाठी आहोत.तसेच, आमचे मार्गदर्शक वाचल्यानंतर तुम्हाला काही चिंता असल्यास, तुम्ही येथे नेहमी आमच्याशी संपर्क साधू शकता.
WazirX मार्गदर्शक
- WazirX वर अकाउंट कसे उघडायचे?
- WazirX वर KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
- WazirXवर बँक अकाउंट कसे जोडायचे आणि INR कसे जमा करायचे?
- तुमच्या WazirX वॉलेटमध्ये Mobikwik द्वारे INR कसे जमा करायचे?
- WazirX QuickBuy वैशिष्ट्याबरोबर क्रिप्टो कसे विकत घ्यावे?
- WazirX वर क्रिप्टो खरेदी आणि विक्री कसे करावे?
- WazirX वर क्रिप्टो कसे जमा करायचे आणि काढायचे?
- WazirX वर ट्रेडिंग फी कशी मोजली जाते?
- स्टॉप-लिमिट ऑर्डर कशी करावी?
- WazirX वर ट्रेडिंग रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा?
- WazirX P2P चा वापर कसा करावा?
- WazirX Convert Crypto Dust वैशिष्ट्य कसे वापरावे?
- WazirX रेफरल फीचरचे फायदे काय आहेत आणि ते कसे वापरावे?
- अधिकृत WazirX चॅनेल कोणते आहेत आणि WazirX सपोर्टबरोबर कसे संपर्क साधु शकतो?
ट्रेडिंग फी गणना
WazirX वर दोन प्रकारचे ट्रेड आहेत:
- स्पॉट ट्रेड: कॉईननुसार फी वितरणासाठी, कृपया येथे भेट द्या:https://wazirx.com/fees
- P2P: कोणतेही फी लागू नाही.
तुम्ही भरलेली प्रभावी ट्रेडिंग फी तुम्ही WazirX वर ठेवलेल्या WRX च्या रकमेवरून ठरवली जाईल.तुमच्याकडे जितके जास्त WRX असतील तितकी तुमची ट्रेडिंग फी कमी होईल. ट्रेडच्या वेळी तुमच्याWRX होल्डिंगच्या आधारावर, तुमच्या ट्रेडिंग फीचा दर खालीलप्रमाणे निर्धारित केला जाईल:
WRX होल्डिंगस | ट्रेडिंग फी देय |
0-10 WRX | 0.20% |
10-200 WRX | 0.17% |
200-1000 WRX | 0.15% |
>1000 WRX | 0.10% |
उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे WazirX वर 250 WRX आहेत आणि तुम्ही USDT मार्केटमध्ये 100 USDT किमतीचे BTC विकत घेता.या प्रकरणात, तुम्हाला या ऑर्डरवर 0.15% ट्रेडिंग फी भरावी लागेल, म्हणजे 0.15 USDT.
‘WRX सह ट्रेडिंग फी भरा’ हा पर्याय सक्षम/अक्षम कसा करायचा?
1 ली पायरी: अकाउंट सेटिंग्ज वर जा
मोबाईल:
वेब:
2 री पायरी: फी सेटिंग वर क्लिक करा
मोबाईल:
वेब:
3री पायरी: ‘WRX सह ट्रेडिंग फी भरा‘ सक्षम/अक्षम करण्यासाठी रेडिओ बटणावर क्लिक करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. ‘WRX सह ट्रेडिंग फी भरा‘ वैशिष्ट्य सक्षम केल्यानंतर, माझ्या ट्रेडिंग फीची गणना कशी केली
जाईल?
समजा तुम्ही BTC/USDT मार्केटमध्ये ट्रेड केला आणि या ट्रेडसाठी एकूण फी 2 USDT होते आणि 1 WRX ची चालू बाजार किंमत 1 USDT आहे.या परिस्थितीमध्ये, तुम्ही ट्रेडिंग फी म्हणून 2 WRX भरणार आहात.
2. “WRX सह ट्रेडिंग फी भरा” वैशिष्ट्य सक्षम केल्यानंतर, माझ्या अकाउंटमध्ये पुरेसे WRX नाही; काय होईल?
या प्रकरणात, तुम्ही ज्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहात त्यानुसार तुम्ही INR, USDT किंवा BTC मध्ये फी भराल.
3. अनलॉक शेड्यूलनुसार ट्रेडिंग फीसाठी मी WRX राखीव ठेवले आहे, तरीही मला हे वैशिष्ट्य सुरू करावे लागेल का?
हो, WRX, जर तुम्ही हा विकल्प सक्षम केला असेल तरच फी वापरली जाईल.
आपल्याकडे आणखी काही प्रश्न असल्यास, खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आमच्याबरोबर निः संकोचपणे संपर्क साधा. मदत करण्यास आम्हाला आनंद होईल.
हॅपी ट्रेडिंग!
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.