Skip to main content

क्रिप्टोवर आकारण्यात येणाऱ्या टीडीएसबद्दल (TDS) नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न (FAQ)

By जुलै 7, 2022जुलै 28th, 20222 minute read
FAQs on TDS on Crypto

तुम्हाला माहित असेल की भारत सरकारने अलिकडे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, क्रिप्टो व्यापारांवर या पुढे 1% टीडीएस आकारला जाईल. या तरतुदी 1 जुलै 2022 रोजी 00:00 वाजता भारतीय वेळेनुसार लागू होतील. WazirX मधील आम्ही, या यंत्रणेस समर्थन देण्यासाठी आमच्या सिस्टीम्स अद्ययावत केल्या आहेत. या तरतुदी तुमच्यावर कशा प्रकारे परिणाम करतील व या संदर्भात WazirX ने उचललेल्या पावलांबद्दल तुम्ही येथेजाणून घेऊ शकता.

अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा:

यात तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, तरीही नवीन टीडीएस नियमांबद्दल नेहमी विचारण्यात येणारे काही प्रश्न येथे देत आहोत:

प्रश्न 1: WazirX द्वारा क्रिप्टोची जेव्हा खरेदी किंवा विक्री केली जाते तेव्हा टीडीएसची कपात कोण करतील?

WazirX आवश्यक असेल ते सर्व करेल.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) स्पष्ट केले आहे की एका एक्स्चेंजद्वारा कोणीही क्रिप्टो खरेदी करत असेल (पी2पी व्यवहारांच्या संदर्भात देखील) तेव्हा एक्स्चेंजद्वारा, विभाग 194एस अंतर्गत कर कापला जाऊ शकतो. हे आता सोपे झाले आहे; तांत्रिकदृष्ट्या, एक खरेदीदार किंवा विक्रेता म्ह्णून तुम्हाला काहीही करायचे नाही. आवश्यक असलेले सर्व काही WazirX करेल.

Get WazirX News First

* indicates required

प्रश्न 2: क्रिप्टोवर कोणत्या दराने कराची कपात केली जाईल?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी येथे एक साधी तक्ता आहे:

​​

प्रश्न 3: 5% टीडीएस कोणासाठी लागू असेल व का?

आयकर कायदा 1961 च्या विभाग 206एबी नुसार, तुम्ही गेल्या 2 वर्षात त्याचा आयकर परतावा (इन्कम ट~ फाईल केला नसेल आणि याआधीच्या प्रत्येकी दोन वर्षात टीडीएसची (TDS) रक्कम रु 50,000 किंवा अधिक असेल तर क्रिप्टो संबंधित व्यवहारांसाठी कापण्यात येणाऱ्या टीडीएसचा (TDS) दर 5% असेल. 

प्रश्न 4: WazirX मध्ये, माझ्या व्यापारांवर कापण्यात आलेला कर मी कोठे पाहू शकेन?

WazirX मध्ये, टीडीएस म्हणून कापलेला दर तुम्ही ऑर्डर तपशील पृष्ठावर पाहू शकता. याशिवाय, तुमचा व्यवहार रिपोर्ट(ट्रेडिंग इपोर्ट) देखील 48 तासांनंतर टीडीएसचे तपशील दाखवेल. 

प्रश्न 5: मी कोणत्याही सरकारी पोर्टलवर टीडीएसचे तपशील पाहू शकेन का?

कापलेल्या कराचे तपशील तुमच्या फॉर्म 26 एएस मध्ये तुम्हाला सापडू शकतात (कर विभागाद्वारे जारी करण्यात येणारी संकलित वार्षिक कर स्टेटमेंट जी स्त्रोतावर कापण्यात येणाऱ्या -टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स- चे तपशील दाखवते) जेव्हा ते विभागाद्वारे अद्ययावत केले जातात. 

प्रश्न 6: इतर टीडीएससारखेच मी क्रिप्टो टीडीएसवर दावा करू शकतो/शकते का?

होय! संबंधित आर्थिक वर्षासाठी तुम्ही आयटीआर फाईल करता तेव्हा तुम्ही क्रिप्टो व्यापारावर कापलेल्या करावर दावा करू शकता.

प्रश्न 7: माझा तोटा होत असला तरीही कर कापला जाईल काय?

होय! तुम्हाला लाभ किंवा तोटा झाला तरीही लागू असेल तेथे खरेदी अथवा विक्री केलेल्या प्रत्येक क्रिप्टोवर टीडीएस कापला जाईल.

प्रश्न 8: विदेशी एक्स्चेंजेस, पी2पी साइट्स आणि DEXes वर मी व्यापार करत असलो/असले तरीही मला टीडीएस भरावा लागेल काय?

होय! तुम्हाला माहित असले पाहिजे की स्वत:हून टीडीएस न कापणाऱ्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजेसवर व्यवहार करणारे वापरकर्ते आपणहून कर भरण्यास जबाबदार आहेत. असे करण्यात असमर्थता म्हणजे देशात अस्तित्वात असणाऱ्या कर नियमांचे तुम्ही अनुपालन न करणे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply