Table of Contents
आम्ही Apple, Google, Tesla, Samsung, Facebook आणि इतर अनेक प्रख्यात कंपन्यांना स्वतःच्या योजनांमध्ये क्रिप्टोकरन्सींचा समावेश करताना पाहिले आहे. दि. 23 जून 2021 पर्यंत, जागतिक क्रिप्टो बाजार भांडवलीकरण आणि आकार $1.3 ट्रिलिअन आहे. भारतातदेखील क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेचा प्रचंड आणि स्फोटक विस्तार झाला आहे, अंदाजे 1 कोटी भारतीय लोकांची क्रिप्टोमध्ये गुंतवणूक आहे.
अनेकांसाठी ही डिजीटल नाणी दीर्घकालीन मूल्याचा संग्रह झाली आहेत. भारतात क्रिप्टोकरन्सी कशी विकत घ्यायची हा प्रश्न नवीन गुंतवणूकदारांना पडला आहे. क्रिप्टोकरन्सी भविष्यातील सर्वसामान्य नियम असेल असा विश्वास असणाऱ्या आणि या प्रक्रियेत उच्च परतावा मिळवण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी, आपल्या आर्थिक गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये जोडू शकाल अशा बारा क्रिप्टोकरन्सी येथे आहेत.
1. बिटकॉइन/Bitcoin (बीटीसी/BTC)
बिटकॉइन, बाजारपेठेतील ही पहिली क्रिप्टोकरन्सी 2008 मध्ये निर्माण करण्यात आली. बाजारपेठ भांडवलीकरणाच्या संदर्भात ही सर्वात प्रमुख क्रिप्टोकरन्सी आहे. एका वापरकर्त्याकडून दुसऱ्याला पियर-टु-पियर बिटकॉइन नेटवर्कच्या माध्यमातून विकेंद्रित डिजीटल चलन पाठवता येते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर संचलित, या क्रिप्टोकरन्सीने किंमतीत चढ-उतार पाहिले आहेत तरीही बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आहे. बाजारपेठेतील परिस्थितींचा परिणाम काहीही असला तरीही अस्तित्वात असेपर्यंत बिटकॉइनची उच्च तरलता व्यापाऱ्यांना फायदा करून देईल.
WazirX /वझिरएक्सच्या माध्यमातून भारतात बिटकॉइन कसे विकत घ्यायचे ते शिका.
2. Ethereum/इथेरियम (ETH)
इथेरियमच्या विकेंद्रित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मने स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि विकेंद्रित ॲप्लिकेशन, त्रयस्थ पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय डिझाइन आणि काम करू शकतात. इथेरियम हे नॉन-फंजिबल टोकन आणि प्रारंभिक कॉइन ऑफरिंग्ज यांच्या निर्मिती व अदलाबदलीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते. इथेरियमचे अग्रगण्य विकासक, विटालिक ब्युटरिन यांनी ते 2013 मध्ये सह-प्रस्तुत केले. यामुळे ते क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेतील सर्वात लहान वयाचे अब्जाधीश झाले. बिटकॉइननंतर, बाजार भांडवलीकरणाच्या संदर्भात इथेरियम ही दुसऱ्या स्थानावरील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे.
3. Litecoin/लाइटकॉइन (LTC)
लाइटकॉइन 2011 मध्ये सुरू करण्यात आले. बिटकॉइननंतर बाजारात येणाऱ्या पहिल्या क्रिप्टोकरन्सींपैकी ती एक होती. बिटकॉइनच्या सोन्याचे चांदीतील रूप असे अनेकदा संबोधले जाणारी ही क्रिप्टोकरन्सी, एमआयटी स्नातक आणि माजी अभियंता चार्ली ली याने निर्माण केली. लाइटकॉइन अनेक प्रकारे बिटकॉइनसमान असले तरीही त्याचा ब्लॉक जनरेशन रेट अधिक जलद असल्याने ते अधिक वेगवान व्यवहार पुष्टी अवधी देऊ करते. देयकाचा प्रकार म्हणूनदेखील लाइटकॉइनचा स्वीकार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे.
4. Cardano/कार्डानो (ADA)
स्मार्ट कॉन्ट्रॅक्टसाठी इथेरियमसारख्याच तत्सम प्रकारे क्रिप्टोकरन्सी नेटवर्कवर याची निर्मिती चाल्स हॉस्किन्सन यांनी केली ते इथेरियमच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते, ज्यांनी कार्डानो विकसित करण्यासाठी इथेरियम सोडले. 2017 मध्ये सुरू केलेले, ADA/एडीए हे न-नफा डिजीटल चलन आहे जे अवरबोरोज नावाच्या तंत्रज्ञानावर चालते.
5. Polkadot/पोल्काडॉट (DOT)
इथेरियमचे आणखी एक सहसंस्थापक, गेविन वुड यांनी रॉबर्ट हेबरमेयर आणि पीटर झाबान यांच्या सहयोगाने Polkadot/पोल्काडॉट निर्माण केले. पोल्काडॉटच्या नेटवर्कद्वारे विकेंद्रित ॲप, युटिलिटी आणि संस्था निर्माण करणे व ती जोडणे हे त्यांचे ध्येय आहे. याव्यतिरिक्त, अंतिम वापरकर्ता नियंत्रणासाठी ही वेबसाइट डेटा आणि ओळख सुरक्षित राखण्याची हमी देते.
6. Ripple/रिपल (XRP)
2012 मध्ये सुरू करण्यात आलेली, रिपल ही क्रिप्टोकरन्सी, देयक देवाणघेवाण प्रणाली आणि रिपलनेट नावाचे एक नेटवर्क आहे. याची निर्मिती डिजीटल देयकांसाठी करण्यात आलेली आहे आणि जागतिक देयकांची सुनिश्चिती करण्यासाठी अधिक वेगवान आणि कार्यक्षम मार्गाची ते खात्री देतात. XRP/एक्सआरपीच्या इतर वापरासाठी त्रयस्थ पक्षीय विकसनास ते परवानगी देतात. आपणास अधिक जाणून घ्यायचे असेल आणि रिपलमध्ये संभाव्य गुंतवणूक करायची असेल तर आपण रिपल कशा प्रकारे विकत घ्यायचे यावरील ब्लॉग वाचू शकता.
7. Uniswap/युनिस्वॅप (UNI)
स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे, युनिस्वॅपचा प्रोटोकॉल, इथेरियम ब्लॉकचेनवरील क्रिप्टोकरन्सींमधील स्वयंचलित व्यवहार करू देतो. याशिवाय, वर्धित वापरकर्ता नियंत्रणासाठी, याचे विकसन अवांछित मध्यस्थांपासून सुटका करण्याची खात्री देतात.
8. Dogecoin/डोजेकॉइन (DOGE)
बिली मार्कस आणि कॅक्सन पामर नावाच्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरना क्रिप्टोकरन्सीतील सट्टेबाजीची टर उडवायची होती. अशा प्रकारे त्यांनी ही मीम क्रिप्टोकरन्सी निर्माण केली. याची निर्मिती उपहासपर हेतूंसाठी केलेली असली तरीही, हे टोकन मूल्यवान गुंतवणूक बनू शकते. तसेच, डोजेकॉइन म्हणजे काय आणि भारतात डोजेकॉइन कशा प्रकारे खरेदी करता येते या वरील ब्लॉग आपण वाचू शकता.
9. Binance Coin/बायनन्स कॉइन (BNB)
बायनन्स कॉइन इथेरियम क्रिप्टोकरन्सीवर चालते. जगातील सर्वात मोठा क्रिप्टोकरन्सी देवाणघेवाण व्यासपीठ बायनन्सद्वारा बीएनबी टोकन सुरू करण्यात आले. बायनन्स एक्स्चेंजवर फी भरण्यासाठी सवलत टोकन म्हणून किंवा बायनन्स स्मार्ट चेनसंचलित करण्यासाठी (फ्युएल इन) ते वापरता येते.
10. WazirX coin/वझिरएक्स कॉइन(WRX)
वझिरएक्सच्या युटिलीटी टोकनला WRXअसे संबोधले जाते. 1 अब्ज (100 कोटी) WRX टोकन्सच्या प्रसारासाठी बायनन्स चेन (बायनन्सची ब्लॉकचेन) वापरण्यात येते. वझिरएक्स कॉइन्स खरेदी करून, वापरकर्ते वझिरएक्सच्या संग्रहास मदत करणे सुरू ठेवण्याबरोबरच बक्षिसेदेखील मिळवू शकतात. याशिवाय, फीमध्ये कपात आणि अधिक फायदे या सारखी प्रोत्साहने, कॉइनच्या सुरुवातीच्या वापरकर्त्यांना WRX देऊ करतात.
11. Bitcoin Cash/बिटकॉइन कॅश (BCH)
आल्टकॉइन्सच्या इतिहासात Bitcoin Cash/बिटकॉइन कॅश BCH/बीसीएच चेमहत्त्वाचे स्थान आहे ज्याने ऑगस्ट 2017 मध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात, बिटकॉइनच्या मूळ चेनमधील विभाजनामुळे केली. बिटकॉइन नेटवर्कमध्ये ब्लॉक्सच्या आकारावर 1 मेगाबाइटची (MB) ची मर्यादा असयामुळे, ब्लॉकचा आकार 1 एमबी पासून 8 एमबीवर वाढवण्यासाठी बीसीएच हार्डफोर्क लागू करण्यात आला ज्यामुळे ब्लॉक्सच्या आत अधिक व्यवहार ठेवता येतील. या मुळे व्यवहारांचा वेग देखील वाढेल.
12. Stellar/स्टेलर (XLM)
स्टेलरची स्थापना जेड मॅककालेब यांनी केली जे रिपर्र प्रोटोकॉलचे विकसक होते. मोठ्या व्यवहारांसाठी वित्त संस्थांना जोडून संस्थात्मक उपाय प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक मुक्त ब्लॉकचेन नेटवर्क आहे. या प्रणालीत कोणत्याही चलनांमधील सीमापार व्यवहार करता येतात. स्टेलरच्या चलनास Lumens/ल्युमेन्स (XLM) असे संबोधले जाते.
आपण वझिरएक्स का निवडावे?
वझीरएक्स हे हे भारतातील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे, ज्यात आपण Bitcoin/बिटकॉइन, Ethereum/इथेरियम, Ripple/रिपल, Litecoin/लाइटकॉइन, इ. सारख्या अनेक क्रिप्टो संपत्ती खरेदी, विक्री व त्यांचा व्यवहार करू शकता. Google Play Store, Apple App Store, Windows, व Mac OS हे आमच्या वेबसाइटवर उपलब्ध प्लॅटफॉर्म आहेत. वझिरएक्स हे अत्यंत सुरक्षित असून त्याचा अतिवेगवान केवायसी आहे, यावर प्रचंड वेगाने व्यवहार होतात, याचे डिझाइन साधे व व्यावहारिक असून याची ग्राहक सेवा अत्त्युत्कृष्ट आहे आणि यात आणखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. मग आपण नवीन गुंतवणूकदार असाल किंवा व्यावसायिक व्यापारी, वझिरएक्स आपल्यासाठी आहे
वझिरएक्सच्या ब्लॉगमधून आपण भारतात क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे विकत घ्यायची किंवा भारतीय रुपयांत व्यवहार असे करायचे हे आपण शिकू शकता