Table of Contents
गेल्या काही महिन्यांत बिटकॉइन, इथेरियम, टेथर इ. सारख्या क्रिप्टोकरन्सी सतत उच्च व नीच पातळ्या अनुभवत आहे, मॅटिक, एक भारतात तयार झालेली क्रिप्टोकरन्सी बऱ्याच काळ रडारवर आहे आणि क्रिप्टो अवकाशात त्याने प्रचंड मोठी जागा व्यापली आहे आणि अनेक जाणकार गुंतवणूकदार त्याच्या शोधात आहेत.
मॅटिक नेटवर्क (आताचे पॉलिगॉन) नावाने सन 2017 मध्ये मूलत: प्रथम प्रस्तुत केलेला हा प्लॅटफॉर्म इथेरियमच्या धर्तीवर डिझाइन केलेला अहे जो इतर विकेंद्रित ॲप निर्माण आणि विकसित करू शकतो.
हे स्तर 2 चे स्केलिंग निरसन आहे जे ऑफचेन गणनेसाठी साइड चेन वापरून स्केल्स मिळवते आणि त्याबरोबरच प्लाझ्मा फ्रेमवर्क व PoS (प्रुफ ऑफ स्टेक) प्रमाणीकरणकर्ते वापरून सुरक्षिततेची देखील खात्री करते.
हे अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण काही मूळ तत्त्वे आणि ते कसे काम करते याकडे पाहूया.
मॅटिक म्हणजे काय?
मॅटिक, आता पॉलिगॉन या नावाने ओळखले जाणारे एक इथेरियम टोकन आहे जे पॉलिगोनच्या कामकाजात वापरले जाते जे इथेरियम आधारित मल्टिचेन स्केलिंग निरसन आहे. मॅटिक नेटवर्क हे इथेरियम ब्लॉकचेन आणि इतर सानुकूल नेटवर्कमधील आंतर-कार्यक्षमता सुधारण्यासाठी सर्वात उत्तम नेटवर्क आहे आणि याच्या रहदारीमध्ये अलिकडच्या काळात लक्षणीय वाढ झालेली दिसून आली आहे.
कंपनीच्या किंमतीसंबंधी भाकितानुसार, मॅटिक टोकन सन 2028 पर्यंत $9.41 या पातळीवर पोहोचतील. फेब्रुवारीपासून, या नेटवर्कने स्वतःच्या बाजार भांडवलीकरणात दहापटीपेक्षा अधिक वाढ अनुभवली आहे, एनएफटी (नॉन-फंगिबल टोकन), गेमिंग आणि डीइएफआय (विकेंद्रित वित्त) यांमुळे हे शक्य झाले.
मॅटिक (पॉलिगॉन) टोकन म्हणजे काय?
इथेरियम आणि बिटकॉइन या त्याच्या प्रतिपक्षांच्या तुलनेत मॅटिक कॉइन किंवा पॉलीगॉन हे कंजेशन (कोंडी) मुळे वाढणाऱ्या खर्चाने बाधित होत नाही हे एक मुक्त स्त्रोत तंत्रज्ञान आहे जे त्याच्या विकासकांना साधने देते ज्याची त्यांना एकुलते एक नेटवर्क निर्माण करण्यासाठी किंवा स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा वापर करून साइडचेन प्राप्त करण्यासाठी गरज असते आनि सुरक्षितता इथेरियमच्या नेटवर्कने दिली जाते.
मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात, मॅटिकचे बाजार भांडवलीकरण $10 अब्जापेक्षा जास्त झाले आणि ते सध्या जगातील सर्वात वरच्या 25 क्रिप्टो टोकनपैकी एक आहे व कॉइनमार्केटकॅपनुसार याचे संपूर्ण डायल्युटेड बाजार भांडवलीकरण $10 अब्ज आहे.
या मार्चमध्ये मॅटिक करन्सीचा कॉइनबेसमध्ये व्यापार सुरू झाला आणि ते एक बहुमूल्य नेटवर्क बनले आहे कारण ते एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करू देते जिथे इथेरियम विकासक, अधिक स्वस्त आणि अधिक वेगाने इथेरियम ब्लॉकचेनवर त्यांची स्वत:ची ॲप रचू शकतात.
मॅटिक: मूळ
स्त्रोत: MATIC Founders / Coin Bureau
पॉलिगॉनची ही स्थानिक करन्सी – अनुराग अर्जुन, जयंती कनानी आणि संदीप नैलवाल या तीन भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांनी प्रस्थापित केली. हा स्टार्ट अप मुंबई स्थित आहे.
इथेरियमला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी काहींचे निरसन व उत्तर म्हणून हे विकसित करण्यात आले होते – म्हणजेच प्रचंड शुल्क, दर सेकंदास कमी व्यवहार (टीपीएस) आणि वापरकर्त्यास निकृष्ट अनुभव. हा द्वि-स्तरीय स्केलेबिलिटी प्लॅटफॉर्म मल्टिचेन पर्यावरण प्रणाली निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो म्हणजेच तो इथेरियन ब्लॉकचेन सानुकूल आहे.
सुरुवातीस, या प्रकल्पाचा प्रारंभ मॅटिक नेटवर्क म्हणून झाला परंतु याचे पॉलिगॉन या नवीन ब्रॅन्ड नावाने ओळखले जाऊ लागले. मूल्य आणि माहितीची देवघेव करू शकणारे विविध ब्लॉकचेन उपलब्ध करण्यासाठी हे डिझाइन करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर पहिल्या 15 क्रिप्टोकरन्सीमध्ये याने स्थान प्राप्त केले असले तरीही, मॅटिकच्या प्रस्थापकांच्या महत्त्वाकांक्षा आणखी मोठ्या आहेत आणि बिटकॉइन व इथेरियमच्या पाठोपाठ तिसरे स्थान प्राप्त करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
मॅटिकच्या लक्षणीय उदयामागे अनेक कारणे आहेत ज्यात त्या सभोवतालचे वाढते वलय, मार्क क्युबनची गुंतवणूक आणि गुगल बिगक्वेरीची घोषणा यांचा समावेश आहेत.
भारतात मॅटिक (पॉलिगॉन) कशा प्रकारे विकत घ्यावे?
मॅटिक नेटवर्कला (आता त्याला पॉलिगॉन म्हटले जाते) कॉइनबेस व बायनान्सचा पाठिंबा आहे. या स्तर दोनच्या स्केलिंग निरसनाचा उद्देश, अनेक ब्लॉकचेनवरील स्केलेबिलिटी समस्यांचे निरसन व माहिती देऊन क्रिप्टोकरन्सीची स्वीकार्यता वाढवणे हा आहे.
वझिरएक्स मॅटिकला सहाय्य करते.
वझिरएक्सवर मॅटिक(पॉलिगॉन) व्यापार उपलब्ध आहे. वझिरएक्स हा भारतातील सर्वात विश्वासपात्र बिटकॉइन व क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म आहे यात आपल्या श्रेणीतील सर्वात उत्तम सुरक्षितता, तीव्र गतीने केवायसी, अचाट वेगाचे व्यवहार आणि सर्व प्लॅटफॉर्मवर कार्यक्षम आणि सरळसोट डिझाइन उपलब्ध आहे.
मॅटिक एवढे आकर्षण का निर्माण करत आहे?
DeFi (विकेंद्रित वित्त, NFTs, DAOs (विकेंद्रित स्वायत्त संस्था), आणि DApps (विकेंद्रित ॲप्लिकेशन्स सारख्या क्रिप्टोकरन्सी मधीर अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात मॅटिक गुंतलेले आहे.
स्त्रोत: LunarCrush
क्रिप्टो बाजाराती गुंतवणूकदारांचे एकंदर मनोबल मॅटिकच्या वाढत्या स्वीकाराने वर जात आहे असे वाटते. लुनारक्रशने असे सांगितले आहे की सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मॅटिकचे वर्चस्व, मार्च ते एप्रिल दरम्यान 636% वाढले आहे ज्याचा अर्थ हा की आधीच्या तुलनेत कितीतरी पट अधिक लक्ष गुंतवणुकदार याच्याकडे देत आहेत.
व्हीतालिक ब्युटेरिनने भारतास, कोविड रिलिफ फंडास दिलेल्या देणगीच्या मॅटिकला लोकांच्या नजरेत येण्यास फायदा झाला आहे परंतु त्याच्या टोकनच्या मूल्याचे श्रेय या एकमेव घटनेस देता येणार नाही. किंबहुना, मेकर व युनिस्वॅप सारख्या DeFi ॲप्सच्या जगव्यापक उसळीमुळे ही वृद्धी होत आहे.
मॅटिकचे निरसन, विकेंद्रिकरण ॲप्सना मदत करणे आणि वापरकर्ते वेगाने व अधिक प्रभावीपणे मिळवणे या उद्देशाने बनवले आहे. गेम, बाजारपेठा आणि बरेच काही अशा साठी विविध ॲपमध्ये ते वापरण्यात येत आहे.
या शिवाय, त्याच्या कामाच्या आवाक्यातील वाढ आणि प्रत्यक्ष उपयोगासह स्वीकार व विस्तृत दृष्टी यांनी क्रिप्टोकरन्सीसाठी प्रचंड परिणाम साधला आहे.
मॅटिक: भविष्यातील क्षमता
मॅटिकची आजपर्यंतची अमर्याद वाढ काहीशी इथेरियम नेटवर्कच्या लोकप्रियतेत अचानक वाढ आणि त्याचा स्वीकार या मुळे झाली आहे. नेटवर्कमधील अधिक वेगवान आणि अधिक स्वस्त व्यवहार पर्यायाची उपलब्धता हा मॅटिकसाठी खूप मोठा लाभ आहे आणि त्याच्या किंमतीभोवताली सार्वजनिक अपेक्षेचा एक मोठा दृष्टीकोन आणि गाजावाजा निर्माण करतो.
2020-21 दरम्यान मॅटिक 10,0000 % वाढले आहे आणि सप्टेंबर 2021 मध्ये त्याची किंमत $1.15 आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत ते आणखी वाढेल असे विश्लेषकांचे भाकितआहे.
मॅटिकचे क्रिप्टो अवकाशातील शानदार यश हेच दर्शवते की क्रिप्टोकरन्सीतील अप्रतिम पाया व त्यासह नावन्यपूर्ण कल्पना व प्रत्यक्ष निरसने, मौल्यवान ग्राहक, विकसक आणि गुंतवणूकदारांना खरोखरच आकर्षित करतात आणि स्वत: व तंत्रज्ञान एकत्रपणे उत्पादकतेने वाढतात.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.