Skip to main content

क्रिप्टो पोर्टफोलियो कशा प्रकारे निर्माण करावा? (How to Build a Crypto Portfolio?)

By डिसेंबर 20, 2021डिसेंबर 21st, 20214 minute read

टीप: हा ब्लॉग एका बाहेरील ब्लॉगरने लिहिला आहे या पोस्टमध्ये व्यक्त केलेला दृष्टीकोन आणि मते फक्त लेखकाची आहेत.

बिटकॉइनची किंमत फक्त काही डॉलर होती तेव्हा त्याच्यावर पैज लावलेल्यांनी गेल्या काही वर्षात लक्षणीय नफा कमावला आहे. बाजारपेठ भांडवलीकरणाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, गत दशकातील सर्वात उत्तम कामगिरी करणारी संपत्ती बनली आहे आणि परिणामी योग्य वेळ गाठलेले आणि आपल्या सातोशीला कवटाळून बसलेले अनेक नवशिके कोट्याधीश आणि काही बाबतीत अब्जाधीश बनले.

सर्वोच्च उंची गाठत क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेचा विस्तार आणि समन्वय वेग निरंतर चालू असताना, त्यांचे पोर्टफोलियो अक्षरश: गगनापार नेणाऱ्या पुढील मोठ्या क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. प्रश्न एवढाच उरतो- भविष्यात उड्डाण करणारी क्रिप्टोकरन्सी आपण कशी शोधून काढू शकतो?

मूळ तत्त्वे

खरेदी-किंमत महत्त्वाची आहे

पुढील सर्वात मोठी घटना शोधत असताना टोकनची किंमत लक्षात ठेवा. कमी भांडवल असणाऱ्या सामान्य बिटकॉइन गुंतवणूकदारासाठी कमी किंमतीच्या क्रिप्टोकरन्सी आदर्श असू शकतील.

$5,000 ची गुंतवणूक आजच्या किंमतीप्रमाणे, बिटकॉइनचा एक लहान अंश किंवा एका नगाची किंमत एक डॉलरपेक्षा कमी असणारी हजारो कॉइन खरेदी करेल. कमी किंमतीची कॉइन पोर्टफोलियो विविधीकरणाचा उत्तम मार्ग आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

स्वीकारण्याच्या शक्यता

सन 2017 च्या शेवटच्या तिमाहीत, रिपलमध्ये लक्षणीय वाढ झाली. या वर्षी रिपलने मार खाल्ला असला तरीही, धोकादायक क्रिप्टोकरन्सी बाजाराबाहेर वापरण्याजोगे त्यात अजूनही बराच दम आहे. रिपलमध्ये अंतर्भूत सेटलमेंट प्रणाली सेंट्रल बॅंक व इतर वित्त संस्थाना आश्वस्त करते की ते घडेल.

Get WazirX News First

* indicates required

पॉलिगॉनबद्दलदेखील हेच म्हणता येईल. संपूर्ण क्रिप्टोकरन्सी उद्योगात भरपूर अंगिकरण भारतीय प्रकल्प पाहत आहे. इथेरियमच्या काही त्रुटींवर मात करण्यासाठी पॉलिगॉन एक नवीन साइडचेन मार्ग अवालंबत आहे ज्यात त्याचा थ्रुपुट, वापरकर्त्याचा वाईट अनुभव (वेग आणि विलंबित व्यवहार) आणि समुदाय नियंत्रणाचा अभाव यांचा समावेश आहे. अशा प्रकारे, त्याचे प्रतिस्पर्धी कमी असल्यामुळे त्याचा बराच गाजावाजा होत आहे.

आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक लाभ असणारी क्रिप्टोकरन्सी शोधणे (आणि अशा प्रकारे ती अधिक स्वीकृती असण्याची शक्यता) ही एक चाणाक्ष गुंतवणूक असू शकते.

लक्षात घेण्याचा घटक म्हणजे पुरवठा.

बहुतेक क्रिप्टोकरन्सीचा कमाल पुरवठा पूर्व-निश्चित असतो. मर्यादा गाठल्यानंतर आणखी टोकन निर्माण केली जात नाहीत, जे सामान्यत: मायनिंगचा वापर करून केले जाते.

मागणी स्थिर राहिली तर किंमत वर जाणे शक्य आहे परंतु पुरवठा मर्यादित आहे. कोणतीही क्रिप्टोकरन्सी विकत घेण्यापूर्वी, संपूर्ण पुरवठा आणि सध्याचा प्रवाह यांचे मूल्यांकन केले आहे याची खात्री करा.

किंमत व प्रमाण

क्रिप्टोकरन्सी व्यापाराच्या माहितीचे ऑनलाइन स्त्रोत सहज उपलब्ध आहेत. भविष्यात, वाढत्या किंमतीच्या डिजीटल करन्सी आणि व्यवहाराचे प्रमाण अधिक आकर्षक ठरतील.

वाढीव कल तसाच राहील याची कोणतीही हमी नसली तरीही गुंतवणूकदारांचे सर्वाधिक लक्ष डिजीटल करन्सी आकर्षित करत आहेत याचे ते चांगला निदर्शक आहे.

तुमचे स्वत:चे संशोधन करणे (डीवायओआर)

हे सर्व लक्षात घेता, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करू शकता. असे असल्यास, एकाच प्रकल्पात तुमचा सर्व पैसा ओतण्याऐवजी तुमच्या टोकन पोर्टफोलियोमध्ये तुम्ही विविधता राखली पाहिजे. तुमचा पोर्टफोलियो उत्तम प्रकारे संतुलित आहे याची खात्री करण्यासाठी तुमचे टोकन निवडण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग अवलंबला पाहिजे? लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी येथे देत आहोत:

टोकनची लोकप्रियता

तुम्ही क्रिप्टो जगतात नवीन असा वा नसा, बिटकॉइन किंवा इथरसारख्या सर्वप्रसिद्ध टोकनबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. आर्थिकदृष्ट्या ही सर्वात यशस्वी कॉइन आहेत आणि जवळजवळ प्रत्येक क्रिप्टो गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोत सापडतील. ही टोकन सामान्यतः लोकप्रिय आहेत कारण ती विशेषत: जुनी, अधिक विश्वासपात्र अशी “अधिक सुरक्षित” गुंतवणूक आहेत.

तुमच्या पोर्टफोलियोचा ते निःसंशय एक भाग असायला हवेत परंतु फक्त तेच नसावेत. जगभभरात बिटकॉइन आणि इथरच्या घोडदौडीने मथळे गाजवले असतील परंतु बाजारात खूप उत्तम कामगिरी केलेली अल्प-परिचित आल्टकॉइन भरपूर आहेत. तुमच्या पोर्टफोलियोचे विविधीकरण करण्याच्या हेतूने अल्प-परिचित संभाव्य क्षमता असणारी काही कॉइन शोधण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पैजा सुरक्षित करण्यासाठी क्रिप्टो-संलग्न फोरमना भेट द्या.

अंतर्भूत वापर क्षमता केस असणारी टोकन

अंतर्भूत वापर क्षमता असणाऱ्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे टोकनचा एक वर्ग जो तुमच्या पोर्टफोलियोत जोडण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. उदा काही क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन-आधारित उपक्रमांशी बांधलेल्या असतात, ज्या कालांतराने खेचण्याची क्षमता प्राप्त करतील असे भाकित केले जाते, याचा अर्थ असा सूचित केला जातो की कालांतराने त्यांचे मूल्य वाढू शकते. प्रत्येक प्रकल्प यशस्वी होतोच असे नाही परंतु त्यांच्या मूळ प्रकल्पांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून काही टोकन खरेदी करणे हा एक चांगला निर्णय आहे.

नवीन किंवा संभाव्य क्षमता असणारे उपक्रम शोधण्यासाठी क्रिप्टो-संबंधित नियतकालिके किंवा ब्लॉग या विशेषत: उपयुक्त जागा आहेत.

गतकाळातील बाजारपेठेतील कामगिरी

क्रिप्टोकरन्सी विकत घेण्यापूर्वी, त्यांची बाजारपेठेतील त्याआधीची कामगिरी तपासणे आवश्यक आहे. याचे कारण असे की हा डेटा कालांतराने त्याचे मूल्य वाढण्याची त्याची क्षमता दर्शवतो. बिटकॉइनसारख्या काही टोकनच्या बाबतीत बाजारपेठेत उच्च व नीच स्तर गाठल्याचे आढळले आहे आणि याचा परिणाम म्हणून ते सध्याच्या बाजारपेठेतील तोट्यातून जवळजवळ नक्कीच सावरतील. प्रारंभिक प्रस्तुतीनंतर अल्प काळातच त्याने उच्च बिंदू गाठला आणि त्यानंतर खूपच तीव्रपणे तो उतरला असे त्या टोकनचा इतिहास दर्शवत असेल तर ते एकदम-वर-आणि खाली असे संचलन आहे जे टाळलेलेच बरे.

हा नियम म्हणजे काळ्या दगडावरील रेघ नाही परंतु विकत घेण्यापूर्वी कॉइनचा भूतकाळातील इतिहास तपासला पाहिजे.

समुदायाचा निर्णय

क्रिप्टोंमधील गुंतवणुकीच्या संदर्भात तुमची समज एक व्यक्ती म्हणून मर्यादित असू शकते परंतु समुदायाचे तसे नाही. त्याविरुद्ध, क्रिप्टो गुंतवणुकीसंबंधी माहिती इंटरनेटवर ओथंबून वहात आहे ज्याच्या तुम्ही नक्कीच उपयोग केला पाहिजे.क्रिप्टोकरन्सी फोरम, टेलिग्राम समूह आणि सोशल मीडिया प्रोफाइलवर कोणती टोकन चर्चेत आहेत हे पाहण्यासाठी त्यांना भेट द्या. एका विशिष्ट करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही समुदायाचा सल्ला विचारू शकता आणि तुम्हाला जवळजवळ नेहमीच प्रतिसाद मिळेल. कोणत्याही परिस्थितीत क्रिप्टोकरन्सी हे समुदायाशी निगडित आहे आणि म्हणून त्याचा फायदा घ्या.

परंतु, तुमच्या क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच तुमची माहिती तुम्ही कोठून गोळा करत आहात ते तपासणे केव्हाही एक चाणाक्ष निर्णय असेल. सुरुवात करण्यासाठी प्रख्यात प्रभावशाली व्यक्ती आणि व्यापारी उपयुक्त ठरतील परंतु कोणतीही एक व्यक्ती नेहमीच बरोबर असते असे नाही.

निष्कर्ष

विशेषत: क्रिप्टोकरन्सीसारखी गोष्ट त्याच्याशी निगडित असताना, एक गुंतवणूक पोर्टफोलियो निर्माण करणे हे कधीही सोपे नसते. याच्या दिशादर्शनासाठी आणि सर्वात उत्तम टोकन निवडण्यासाठी धोरणे आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. गुंतवणुकीसाठी क्रिप्टो निवडताना, ख्याती ते अलिकडच्या वर्षातील यश, हे सर्व घटक लक्षात ठेवा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply