Skip to main content

क्रिप्टोची कर आकारणी (Taxation of Crypto)

By डिसेंबर 20, 2021डिसेंबर 21st, 20214 minute read
क्रिप्टोची कर आकारणी (Taxation of Crypto)

Note: This blog is written by an external blogger. The views and opinions expressed within this post belong solely to the author.

क्रिप्टो भारतात अजून बाल्यावस्थेत आहे. या कार्यक्षेत्रात नियमन कसे आणायचे याबद्दल धोरण आखणारे अजून विचार करत आहेत आणि त्याबरोबरच वापरकर्त्यांच्या संख्येवरून हे स्पष्ट होत आहे की क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यात भारतीय नागरिकांनी स्वारस्य दाखवले आहे.

भारतात क्रिप्टोकरन्सीचे अंदाजे 1 कोटी वापरकर्ता असून जागतिक स्तरावर ही संख्या 10 कोटी असेल.

Business Line (मार्च 2021)

म्हणूनच, नियमन आघाडीवर आणखी काही स्पष्टता येईपर्यंत, क्रिप्टोतील व्यवहारांवर कशा प्रकारे कर लावावा याचा विचार करूया? कर आकारणीच्या विषयावर आपण सखोल विचार करण्यापूर्वी, आपल्या देशात क्रिप्टोकडे कशा प्रकारे पाहिले जाते त्यावर आपण नजर टाकूया.

क्रिप्टोबद्दलचा दृष्टीकोन

आजमितीस, गुंतवणूकीसाठी व्यावहारिक संपत्ती प्रकार अशा दृष्टीने अनेक जण क्रिप्टोकडे पाहतात. त्याच्या कर आकारणीत, क्रिप्टोबद्दल त्याचे धारक आणि धोरण ठरवणाऱ्याचा दृष्टीकोन लक्षणीय भूमिका बजावतो. श्री. अनुराज सिंह ठाकूर (सूचना व प्रसारण मंत्री) यांनी देखील म्हटले आहे की “क्रिप्टोकरन्सी/संपत्तीच्या हस्तांतरणातून प्राप्त होणारा लाभ हा, त्याच्या धारणाच्या प्रकारानुसार, एका उत्पन्न शीर्षकांतर्गत करपात्र आहे.”

कर नियम काय सांगतात?

कर आकारणी 2 स्वरूपात असू शकते: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर आकारणीकरिता, सर्वात सुसंबद्ध नियम आयकर अधिनियम, 1961 हा आहे. प्रत्यक्ष कर आकारणीसाठी केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) अधिनियम, 2017 आणि त्याचे राज्य/केंद्रशसित प्रदेश सहभागी हा प्रचलित नियम आहे. यांचे तपशीलवार विश्लेषण करूया:

आयकर अधिनियमाच्या अंतर्गत क्रिप्टो

भारतीय कर आकारणीचा अभ्यास केलेले कोणीही तुम्हाला सांगेल की उत्पन्नाची पाच शीर्षके आहेत: वेतन, घर मालमत्ता, व्यवसाय (किंवा धंदा), भांडवली लाभ व इतर स्त्रोत. कोणत्याही कर नियमात ’क्रिप्टो’, किंवा ’क्रिप्टोकरन्सी’ या संज्ञांचा वापर केलेला नाही याची नोंद घ्यावी. गुंतवणूकीचा एक प्रकार म्हणून बहुतेक लोक क्रिप्टोकडे पहात असल्यामुळे, आयकर नियमातील भांडवली लाभ या पैलूचे आपण प्रथम विश्लेषण करूया. 

भांडवली लाभ:

आयकर अधिनियम, 1961 चा विभाग 45, भांडवली नफ्याचा आकारणी विभाग हा ’भाडवली संपत्ती’ च्या हस्तांतरणाद्वारे होणाऱ्या लाभ किंवा तोट्यावर कर आकारतो. त्याच्या ’भांडवली संपत्ती’च्या व्याख्येत विभाग 2(14) सांगतो की त्यात एका करपात्र व्यक्तीकडून धारण केलेली कोणत्याही प्रकारची संपत्ती, मग ती त्याच्या व्यवसायाशी किंवा धंद्याशी संलग्न असो वा नसो, समाविष्ट आहे”. करपात्रता निकषाचे हा समाधान करतो असे दिसत असल्याने, कराच्या गणनेस आपण सुरुवात करूया. 

भांडवली लाभाची गणना सामान्यत: खालील प्रकारे असेल:

विक्रीतील मोबदला
(-)केवळ विक्रीशी संबधित, झालेला पूर्ण खर्च
विक्रीतील एकूण मोबदला
(-)(अनुक्रमित) अधिग्रहणाचा खर्च
(-)(अनुक्रमित) सुधारणेचा खर्च
भांडवली लाभ
Sale Consideration
(-)Expenditure wholly incurred in connection with the sale
Net Sale Consideration
(-)(Indexed) Cost of Acquisition
(-)(Indexed) Cost of Improvement
Capital Gains

विक्रीशी संबंधित खर्च सामान्यत:, क्रिप्टो एक्स्चेंजद्वारे आकारलेल्या दलालीच्या स्वरूपात (असल्यास) असेल. क्रिप्टोच्या बाबतीत सुधारणेचा कोणताही खर्च असू शकत नाही. धारण अवधी 3 वर्षापेक्षा अधिक असेल तरच (दीर्घ-अवधी) निर्देशांकसूची तयार करण्याचा लाभ उपलब्ध असेल. लागू स्लॅबच्या दरांनुसार लघु-अवधी भांडवली लाभ कर आकारणीय असेल आणि दीर्घ-अवधी भांडवली लाभ कर निश्चित 20% दराने आकारणीय असेल.

खरेदी करण्याऐवजी तुम्ही क्रिफ्टो माइन केले असेल तर काय होईल? अधिग्रहणाचा खर्च स्पष्टपणे निर्धारित करण्याजोगा असेल काय? क्रिप्टोचे लाभप्रद मायनिंग करण्यासाठी बरेच हार्डवेअर, वीज, आणि इतर खर्च नक्कीच आवश्यक असतात. हे खर्च अधिग्रहणाच्या खर्चात समविष्ट करता येतील काय? अशा खर्चांची तुम्ही अचूक गणना करू शकता का? आदरणीय सर्वोच्च न्यायालय विरुद्ध बी.सी यांचा तर्क वापरायचा झाल्यास श्रीनिवास शेट्टी (1981), अधिग्रहणाचा खर्च अचूकपणे सुनिश्चित करता येण्याजोगा असला तरच विभाग 48 च्या तरतूदी (भांडवली लाभाची गणना) लागू करणे शक्य आहे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. क्रिप्टोच्या मायनिंगच्या बाबतीत अधिग्रहणाचा खर्च अचूकपणे सुनिश्चित करता येत नसल्याने, ते भांडवली लाभात आकारणीय नाहीत.

व्यवसाय:

वर उल्लेख केल्याप्रमाणे, क्रिप्टोचे मायनिंग लाभदायक रित्या करण्यासाठी, आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांत बरीच मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुम्ही अशी गुंतवणूक केली असेल तर, तुम्ही धारण केलेली क्रिप्टो ही केवळ एक प्रकारची गुंतवणूक आहे असे तरीही म्हणता येईल का? हे आपल्या पुढे दुसरा दृष्टीकोन सादर करते, म्हणजेच, करदाता क्रिप्टोची खरेदी व विक्री करण्याच्या (मायनिंग समाविष्ट) व्यवसायात गुंतलेला आहे. अशा व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न ’व्यवसाय किंवा धंद्यातून मिळणारे लाभ किंवा तोटा’ या शीर्षकाखाली आकारणीय असेल आणि याची गणना सहज व सोपी आहे – क्रिप्टो एक इन्व्हेंटरी म्हणून माना आणि कायद्याच्या सुसंबद्ध तरतूदींप्रमाणे तुमच्या व्यवसायाच्या एकूण लाभाची गणना करा. 

इतर स्त्रोत:

तुमचा क्रिप्टो पोर्टफोलिओ तुमची भांडवली संपत्ती किंवा तुमचा व्यवसाय आहे असे तुम्ही मानत नसले तरीही त्यातून तुम्ही कमावणारे उत्पन्न, उत्पन्नाच्या उरलेल्या शीर्षाकांतर्गत – “इतर स्त्रोतांपासून उत्पन्न” करपात्र ठरेल. लागू स्लॅब दरांनुसार कर आकारणीय असेल.

जीएसटी (GST) नियमांच्या संबंधांत क्रिप्टो

सीजीएसटी अधिनियम 9 चा आकारणी विभाग सांगतो की सर्व आंतरराज्यीय ’माल’ किंवा सेवा किंवा दोन्हीच्या ’पुरवठ्यांवर’ केंद्रीय जीएसटी आकारला जाईल. अशा प्रकारे क्रिप्टो-संलग्न व्यवहार, जीएसटीच्या अधिकार कक्षांतर्गत असण्याकरिता, त्याने ’माल’ किंवा ’सेवा’ यांचा ’पुरवठा’ करणे आवश्यक आहे. विभाग 7 अंतर्गत सीजीएसटी अधिनियम ’पुरवठा’ याची व्याख्या करतो, जो खालील घटकांवर आधारित आहे:

  • ’पुरवठा’ असणे आवश्यक आहे (यात विक्री, हस्तांतरण, परवाना, एक्स्चेंज, भाडे, लीज इ समाविष्ट आहेत)
  • त्यात करार असला पाहिजे ( मौखिक, लिखित, अव्यक्त, अभिप्रेत इ.)
  • एका मोबदल्यासाठी
  • एका व्यक्तीकडून
  • व्यवसाय वाढवण्यासाठी 

वर दिलेल्या सर्व निकषांची पूर्तता क्रिप्टोची खरेदी व विक्री करण्याची कृती करते. क्रिप्टो म्हणजे ’माल’, किंवा ’सेवा’ आहे का हे आता पाहायचे आहे. अधिनियमातील ’माल’ या संज्ञेत हे समाविष्ट आहे: “….पैसा व सेक्युरिटीज व्यतिरिक्त प्रत्येक प्रकारची सचल संपत्ती….” आणि ’सेवा’ या संज्ञेत हे समाविष्ट आहे: “…्माल, पैसा आणि सेक्युरिटीज व्यतिरिक्त सर्वकाही…”. अशा प्रकारे, सीजीएसाटी अधिनियम; 2017 अंतर्गत क्रिप्टो अंतर्भूत होईल. 

वरील तथ्यांच्या आधारे, क्रिप्टो व्यवहार जीएसटीसाठी उत्तरदायी आहेत. इतर सेवांसाठी वापरण्यात येणारा 18% उर्वरित कर दर हा लागू कर दर असेल. परंतु, रु 20 लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणारी व्यक्तीच जीएसटी नियमांतर्गत नोंदणी करण्यास उत्तरदायी आहे. 

क्रिप्टो मायनिंगचा प्रश्न तसाच उरतो. क्रिप्टो मायनिंग ही क्लीष्ट क्रिप्टोग्राफिक समीकरणे सोडवण्याची प्रक्रिया आहे ज्याची ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये क्रिप्टो व्यवहाराचे सत्यापन आणि प्रविष्टी करण्यात परिणती होते. मायनिंगसंबंधी अधिक माहिती येथे मिळू शकते.

म्हणून, येथे तुम्ही क्रिप्टो मायनिंगची सेवा प्रदान करत आहात आणि त्या सेवेकरिता ब्लॉकचेन नेटवर्ककडून पुरस्कार देखील प्राप्त करत आहात. जीएसटीस आकारणीय सेवेचा बाह्यगामी पुरवठा म्हणून याच्याकडे पाहता येऊ शकते. यासाठी मिळणारा मोबदला नक्कीच ‘अप्रत्यक्ष स्वरूपाचा’ असेल आणि अशा प्रकरणांतील पुरवठा मूल्यांचे गणन करण्यासाठी कायद्याने प्रक्रिया सुनिश्चित केल्या आहेत. 

पुढे जात

हे सुस्पष्ट आहे की #IndiaWantsCrypto. त्याच्या कर आकारणीबद्दल कायद्यात आणखी थोडी सुस्पष्टता देणे हा कदाचित पुढे जाण्याचा मार्ग असू शकतो. क्रिप्टो हा गुंतवणूकीचा एक मार्ग आहे हा सार्वजनिक दृष्टीकोन पाहू जाता, आय-कर नियमांतर्गत हाच दृष्टीकोन घेतला तर स्वत:चा विशेष कर आकारणी दर असलेली ही भांडवली संपत्ती आहे असे यास मानता येईल. याच प्रमाणे जीएसटी नियमांतर्गत, शेअर, डिबेंचर इ. सिक्युरिटींप्रमाणे क्रिप्टोदेखील मानता येईल. क्रिप्टोची फक्त खरेदी व विक्रीपर्यंत मर्यादित ठेवून त्याला जीएसटीच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर ठेवता येईल.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply