Table of Contents
2015 मध्ये सुरुवात झाल्यापासून, अल्टकॉइन अग्रणी – इथेरियमने क्रिप्टो जगतात मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले आहे. क्रिप्टो अवकाशात तुम्ही नवशिके असाल तर इथेरियम काय आहे व ते एवढे लोकप्रिय का आहे यासारखे प्रश्न नेहमीचे आहेत. ते एवढे मौल्यवान कसे काय होते, व एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून त्याची क्षमता काय आहे? आणि तुम्ही ते कसे खरेदी करू शकता?
इथेरियमचा विचार करताना खालील काही गोष्टी मनात येतात व तुम्हाला गुंतवणूक करण्याची इच्छा असणारी क्रिप्टोकरन्सी हीच आहे का? इथेरियम काय आहे व त्यापैकी काही तुम्हाला भारतात कशा प्रकारे मिळवता येतील यासाठी हे नवशिक्यांचे गाईड.
इथेरियम काय आहे?
इथर (ETH), व त्याच्या सॉलिडिटी या प्रोग्रॅमिंग भाषेसह, त्याची क्रिप्टोकरन्सी असलेला इथेरियम हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे.
इथर (ETH) हे नेटवर्क चालू ठेवणारे इंधन आहे. हे प्रत्येक इथेरियम नेटवर्क व्यवहारासाठी आवश्यक संगणन स्त्रोत तसेच व्यवहार शुल्क (याला गॅस शुल्क म्हणतात) भरण्यासाठी वापरले जाते. बिटकॉइन सारखेच इथर ही पियर-टु-पियर अशी क्रिप्टोकरन्सी आहे. इथरचा वापर व्यवहारांच्या पेमेंटव्यतिरिक्त, गॅस विकत घेण्यासाठी सुद्धा केला जातो जो इथेरियम नेटवर्कवरील कोणत्याही व्यवहाराच्या गणनाच्या पेमेंटसाठी आवश्यक आहे. बिटकॉइनच्या पुरवठ्यासारखा इथरचा मर्यादित नसतो आणि नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी आवश्यक किमान पातळीसाठी सामान्यत: लक्षात घेतले जाणारे पुरवठा वेळापत्रक हे इथेरियम समुदायाकडून ठरवले जाते.
इथेरियम कशा प्रकारे काम करते?
अन्य कोणत्याही क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच इथेरियम हे ब्लॉकचेन नेटवर्कवर आधारित आहे. ब्लॉकचेन हे विकेंद्रित, सत्यापन आणि सर्व व्यवहार रेकॉर्ड करणारे असे वितरित सार्वजनिक लेजर आहे.
ब्लॉकचेन व्यवहारांत, क्रिप्टोकरन्सीचा वापर नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यवहारांच्या सत्यापनासाठी केला जातो. “माइन” करण्यासाठी किं वा नेटवर्कवर प्रत्येक व्यवहाराचे सत्यापन करण्यासाठी क्लिष्ट गणितीय समीकणांची गणना करण्यासाठी वापरकर्ते संगणक वापरतात व प्रणालीच्या ब्लॉकचेनमध्ये अद्ययावत ब्लॉक जोडतात.या सत्यापन प्रक्रियेस कन्सेन्सस अल्गॉरिदम असे म्हणण्यात येते जो विशेषत: प्रुफ ऑफ वर्क कन्सेन्स अल्गॉरिदम आहे.
प्रोत्साहन म्हणून सहभागींना क्रिप्टोकरन्सी टोकन दिली जातात. इथेरियम प्रणाली ही टोकन इथर (ETH) म्हणून ओळखली जातात. इथर हे आभासी चलन आहे जे आर्थिक व्यवहार, गुंतवणुकी तसेच मूल्याचा संग्रह म्हणून वापरता येते. इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्कवर इथर ठेवता किंवा बदलता येते. ETH बाहेर हे नेटवर्क इतर अनेक सेवांची श्रेणी देऊ करते.
डेटाचा संग्रह करता येतो आणि इथेरियम नेटवर्कवर विकेंद्रित ॲप लागू करता येतात. डेटावर एकच व्यवसाय नियंत्रण करतो अशा Google किंवा Amazon च्या मालकीच्या किंवा त्यांच्याकडून नियंत्रित सर्व्हरपेक्षा इथेरियम ब्लॉकचेनवर लोक सॉफ्टवेअर होस्ट करू शकतात. कोणतेही नियमन करणारे अधिकारी नसल्यामुळे, वापरकर्त्यांचे त्यांच्या डेटावर संपूर्ण नियंत्रण असते व ॲपला त्यांचा पूर्ण ॲक्सेस असतो.
स्व-संचलित कॉन्ट्रॅक्ट ज्याना क्रिप्टो जगतात स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हटले जाते ती बहुधा इथर आणि इथेरियमच्या वापरासाठी सबळ कारणांपैकी एक असावेत. पारंपारिक कॉन्ट्रॅक्टमध्ये गरज भासते तशी यात वकिलांची गरज नाही: इथेरियम ब्लॉकचेनवर कॉन्ट्रॅक्ट कोडेड असते व ते स्वयं-संचलित होते आणि एकदा कॉन्ट्रॅक्टच्या अटींची पूर्तता झाली की ते योग्य पक्षास इथरचे वितरण करते.
इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हे एनएफटीचे संरचना घटक आहेत व ते शेकडॊ आर्थिक उत्पादने आणि सप्लाय चेन प्रक्रिया स्वयंचलित करू शकतात. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट वापरून विकेंद्रित एक्सचेंजेस (DEXs) व ऑटोमेटेड मार्केट मेकर्स (AMM) निर्माण करता येतात.
इथेरियम चांगली गुंतवणूक का आहे?
इथेरियमच्या भरभराटीच्या कामगिरीने पारंपारिक व संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांचेही लक्ष वेधले आहे. पारंपारिक गुंतवणुकींच्या तुलनेत, इथेरियमचे खालील लाभ आहेत:
- अस्थिरता: एकेकाळी हा पैलू नकारात्मक मानला जात होता पण चाणाक्ष गुंतवणूकदारांनी बाजारपेठेतील कल ओळखले आहेत व बाजारपेठेतील बुडबुड्यासारख्या दृष्टांतसम लाभांचा ते फायदा घेऊ शकतात हे त्यांनी जाणून घेतले आहे.
- तरलता: व्यापाराचे प्लॅटफॉर्म, एक्स्चेंज व ऑनलाइन दलाली यांच्या जागतिक प्रस्थापनेमुळे, इथेरियम हा बहुश: सर्वाधिक तरल गुंतवणूक संपत्तींपैकी एक बनले आहे. तुलनात्मकरित्या कमी आकारामुळे, तुम्ही फियॅट अथवा इतर क्रिप्टो संपत्तीत इथेरियमचा व्यापार करू शकता.
- चलनवाढीचा कमी धोका: इथेरियमचे विकेंद्रिकरण व 1.80 कोटींची इथेरियमची कमाल वार्षिक मर्यादा यामुळे फियॅटपेक्षा इटीएचची चलनवाढ कमी होते.
- विकेंद्रित वित्त: इथेरियमद्वारे आणलेली सर्वात मोठी उपलब्धी म्हणून गाजावाजा झालेल्या DeFi ने, आर्थिक जगतात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. काहीसा नवा सिद्धांत असलेला DeFi अवकाश गेल्या काही वर्षात प्रचंड वाढला आहे व अत्यंत उच्च दर्जाच्या नावीन्यपूर्ण पर्यावरण प्रणालीचा पाया रोवला गेला ज्याचे कारण होते dApps ना समर्थन देण्याची इथेरियमची क्षमता.
याशिवाय, इथेरियमचे प्रत्यक्ष जगातील ( वर्तमान आणि संभाव्य भविष्य) वापर असे आहेत:
मतदान प्रणाली
मतदान प्रणालींसाठी इथेरियमचा वापर केला जात आहे. मतदानाचे निकाल सार्वजनिक केले जातात ज्यामुळे मतदानातील अनियमिततांचे निर्मूलन होऊन पारदर्शक व न्याय्य लोकशाही प्रक्रियांची सुनिश्चिती होते.
बॅंकिंग प्रणाली
त्याच्या विकेंद्रित स्वरूपामुळे इथेरियम लवकरच बॅकिंग प्रणालीत स्वीकारलेदेखील जाऊ शकते ज्यामुळे हॅकर्ससाठी बेकायदेशीर प्रवेश मिळवणे कठीण बनू शकते. यात इथेरियम समर्थित नेटवर्कवर पेमेंटदेखील करता येतात. अशा प्रकारे, भविष्यात भरणा व पेमेंट करण्यासाठी इथेरियमचा वापर करण्याचा बॅंका विचार करू लागतील.
शिपिंग
इथेरियमच्या शिपिंगमधील वापरामुळे कार्गोचे ट्रॅकिंग करण्यास मदत होते व माल गहाळ होण्यास व त्याची नक्कल करण्यावर प्रतिबंध होतो. सप्लाय चेनमध्ये वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही आयटमसाठी इथेरियम एक उगमस्थान आणि ट्रॅकिंग संरचना देऊ करते.
करार
इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट वापरून कोणत्याही फेरफारांशिवाय करार जतन लागू करता येतात. विखुरलेले सहभागी आहेत, विवादांचा धोका आहे व डिजीटल कॉन्ट्रॅक्टची गरज आहे अशा एका क्षेत्रात स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्रस्थापित करण्यासाठी व त्यांच्यावर आधारित करार व व्यवहार डिजीटल पद्धतीने जतन करण्यासाठी इथेरियमचा वापर एक प्रणाली म्हणून करता येऊ शकतो.
विविध कारणांसाठी इथेरियमचा सभोवताली गुंतवणूकदार गराडा घालत आहेत ज्यात वाढती लोकप्रियता, वाढते चलनवाढ व त्याचा स्वीकार करणाऱ्या एन्स्चेंजची वाढती संख्या समाविष्ट आहेत. क्रिप्टो उद्योगात आणखी भरभराट होण्याची आणि अशा प्रकारे महान गुंतवणूक पर्याय बनण्याची मोठी क्षमता इथेरियममध्ये आहे.
तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असल्यास याआधी आम्ही येथे इथेरियमच्या ग्राहक वापरासंबंधी ब्लॉग प्रकाशित केले आहेत. परंतु, भारतात इथेरियममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या समोरील धोक्यांसंबंधी एका आर्थिक सल्लागाराशी चर्चा करण्याचा विचार करा. इथेरियमच्या भविष्यात तुम्हाला विश्वास असला तरीही, बाजारपेठेतील धोका व अस्थिरता लक्षात घेता, तुम्ही पैसा गमावल्यास ते तुम्हाला परवडेल याची खात्री करा.
भारतात इथेरियम कसे विकत घ्यावे?
तुम्ही भारतीय आहात व तुम्हाला भारतात इथेरियम विकत घ्यायचे असल्यास भारतीय रुपयांची जोडी हाताळणारे एखादे एक्स्चेंज तुम्हाला वापरा वे लागेल. कमी खर्च व अत्त्युत्कृष्ट सुरक्षिततेसह इथेरियम व भारतीय रुपयासारख्या क्रिप्टोकरन्सींचा व्यापार आणि रुपांतर करण्याच्या साध्या, विश्वासपात्र व उत्तम मार्गासाठी वझिरएक्स तपासून पाहा. खालील पायऱ्यांचे अनुसरण करून वझिरएक्सच्या माध्यमातून तुम्ही भारतात वझिरएक्स वर साइन अप करू शकता.
- वेब किंवा मोबाईल ॲप किंवा तुम्ही आधीच साइन अप केले असेल तर वझिरएक्सवर साइन अप करा.
- तुम्ही उल्लेख केलेल्या ईमेल पत्त्यावर एक सत्यापन मेल पाठवली जाईल.
- सत्यापन मेलमध्ये दिलेली लिंक काही मिनिटांसाठीच सक्रिय असेल, म्हणूनच शक्य तेवढ्या लगेच क्लिक करण्याची खात्री करा.
- ही लिंक तुमच्या इमेल पत्त्याची यशस्वी पडताळणी करेल.
- पुढील पाऊल आहे सुरक्षितता सेट अप करणे म्हणूनच तुमच्या गरजांशी अगदी जवळून जुळणारा पर्याय निवडा.
- तुम्ही सुरक्षितता सेट अप केल्यानंतर, तुम्हाला केवायसी प्रणाली पूर्ण करण्याचा किंवा न करण्याचा पर्याय देण्यात येईल.
- त्यानंतर, तुम्हाला फंड्स अँड ट्रान्सफर पृष्ठावर नेले जाईल.
- “फंड्स” निवडा व त्यानंतर “भारतीय रुपये जमा करा” निवडा. तुमच्या खात्यात जमा करा.
- स्क्रीनच्या वरच्या भागात, “एक्स्चेंज” निवडा.
- इटीएच/आयएनआर बाजारावरील “बाय” टॅब निवडा.
- तुम्हाला भारतीय रुपयामध्ये खर्च करायची किंवा तुम्हाला खरेदी करण्याची रक्कम प्रविष्ट करा.
- व्यवहाराचे विशिष्ट स्वरूप पडताळून पाहा व “इटीएच खरेदी करा” निवडा
निष्कर्ष
या मार्गदर्शनासह, भारतात इथेरियम खरेदी करण्याबद्दल तुम्हाला जाणणे आवश्यक आहे ते सर्व आम्ही तुम्हाला दिले आहे अशी आमची आशा आहे. क्रिप्टोकरन्सी व क्रिप्टो जगतातील अद्ययावत घडामोडींबद्दल तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असल्यास आमचा ब्लॉग जरूर वाचा. इथेरियम सारख्या क्रिप्टोकनसी अत्यंत अस्थिर व स्फोटक आहेत व त्या प्रचंड धोकादायक मानल्या जातात हे लक्षात ठेवा. हा लेख कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही परंतु इथेरियम काय देऊ करते व तुम्ही भारतात इथेरियम कशा प्रकारे खरेदी करू शकता याबद्दल गाईड आहे. कोणताही वित्तीय/गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही सखोल संशोधन करावे असा आग्रहाचा व तीव्र सल्ला आम्ही आपल्याला देत आहोत.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.