तुम्हाला प्रश्न पडला आहे का?- 5 वर्षांपूर्वी तुम्ही बीटीसीमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचे आजचे मूल्य काय असते? उलटपक्षी, ती रक्कम तुम्ही सोने, निफ्टी स्टॉक्स किंवा मुदत ठेवीत गुंतवली असती तर तुम्हाला त्या ऐवजी किती नफा किंवा तोटा झाला असता? तुम्ही याबद्दल एकदा देखील विचार केला असेल तर तुम्ही योग्य जागी आला आहात (आणि तुम्ही आला नसाल, तर तुम्ही हे पृष्ठ तपासले पाहिजे- तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल).
1 वर्षापूर्वी बीटीसीमध्ये गुंतवलेल्या रु 10,000 च्या रकमेने तुम्हाला आज 287.48% शुद्ध परतावा दिला असता! परंतु, मुदत ठेवीत गुंतवलेल्या त्याच रु.10,000 च्या रकमेने तुम्हाला जास्तीत जास्त 8-10% परतावा मिळाला असता.
क्रिप्टो हे संपत्तीचा नवीन वर्ग म्हणून उदयास येत आहेत. जगातील अधिकाधिक लोक त्यांच्या पोर्टफोलोयोत क्रिप्टोची जोड देण्याच्या विचारात आहेत. धारकांनी अभूतपूर्व वृद्धी पाहिली आहे. परंतु, नवशिक्यांनी मात्र त्यात पूर्णत: भाग घेण्यापूर्वी सखोल संशोधन करणे महत्त्वाचे आहे.
संपत्तीच्या (आता क्रिप्टोदेखील) कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गुंतवणुकीवर परतावा हे सामान्यत: वापरण्यात येणारे मेट्रिक असले तरीही गतकाळातील नोंददेखील विचारात घेतले पाहिजे. गतकाळातील कल व बाजाराचा अभ्यास केल्यानंतर, भावी गुंतवणूकदार लाभाबद्दल निर्णय घेऊ शकतो आणि व्यवहार्य जोखीम क्षमतेच्या आधारे सुजाण निर्णय घेऊ शकतो.
काळाची गरज समजून घेऊन, वझिरएक्स मधील आम्ही क्रिप्टो/बिटकॉइन पास्ट परफॉर्मन्स कॅलक्युलेटर (गत कामगिरी गणनयंत्र) प्रस्तुत केले आहे.
ते येथे वापरून पाहा!
क्रिप्टो/बिटकॉइन पास्ट परफॉर्मन्स कॅलक्युलेटरच्या (गत कामगिरी गणनयंत्र) वापराने, तुम्ही हे करू शकता:
- तुम्ही निवडलेल्या क्रिप्टोने गतकाळात कमावलेला परतावा पाहा,
- या परताव्यांची तुलना सोने, निफ्टी आणि स्थावर संपत्तीशी करा,
- आपोआप गणन केलेल्या (ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेटेड) शुद्ध परताव्याच्या आधारे तुमच्या गुंतवणूक निर्णयांचे विश्लेषण करा.
क्रिप्टो/बिटकॉइन पास्ट परफॉर्मन्स कॅलक्युलेटर (गत कामगिरी गणनयंत्र) कशा प्रकारे वापरायचा?
पायरी 1: तुमचा आवडता क्रिप्टो कॅल्क्युलेटर वर निवडा.
पायरी 2: तुम्ही करू शकला असता ती गुंतवणूक रक्कम प्रविष्ट करा.
पायरी 3: कालावधी निवडा (गत काळात गुंतवणूक करता आली असती तो अवधी निवडा).
पायरी 4: सोने, निफ्टी किंवा मुदत ठेव यांच्या तुलनेत क्रिप्टो देऊ शकणारा परतावा पाहा.
कृपया नोंद घ्या: गतकाळातील परतावा भविष्यातील परताव्यांची हमी देत नाही.
गुंतवणूक हा मोठा निर्णय आहे. होय! वझिरएक्स मध्ये रु 100 च्या गुंतवणूकीसह तुमचा क्रिप्टो प्रवास तुम्ही सुरू करू शकता परंतु आमच्या गुंतवणूकदारांनी सुजाण निर्णय घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. हे गत कामगिरी गणनयंत्र तुमची मदत करेल अशी आमची आशा आहे.
तुम्ही आमचा क्रिप्टो/बिटकॉइन आरओआय कॅल्क्युलेटर वापरून पाहू शकता आणि पुढील पायरी म्हणून भविष्यातील संभाव्य क्रिप्टो परताव्याचे मूल्यमापन करू शकता. गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.