Skip to main content

अंदाजपत्रक 2022 – ठळक वैशिष्ट्ये: क्रिप्टो उद्योगासाठी पुढील मार्ग (Budget 2022 – Highlights: A way forward for the Crypto Industry)

By फेब्रुवारी 2, 2022फेब्रुवारी 21st, 20222 minute read

क्रिप्टो व ब्लॉकचेनच्या दिशेने सकारात्मक दृष्टीकोन अखेरीस आता स्पष्टपणे दिसत आहे! क्रिप्टोच्या इतिहासात 1 फेब्रुवारी 2022 या दिवसाने आपले स्थान निश्चित केले आहे. क्रिप्टो क्षेत्र भारतात सरतेशेवटी कायदेसंमत होण्याच्या मार्गावर आहे. सरकारच्या सकारात्मक भुमिकेने उद्योगास बर्‍याच मोठ्या प्रमाणात वैधता प्रदान केली आहे. सरकार या वर बंदी आणण्याच्या विचारात नक्कीच नाही!

आपल्या अर्थमंत्र्यांनी सूचित केले आहे की क्रिप्टो ’आभासी डिजिटल संपत्ती’ या प्रकारात मोडतात आणि हा संपत्तीचा एक विशेष वर्ग आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्यास दुजोरा देतो की क्रिप्टो हे चलन नाही. त्याचबरोबर, आरबीआयद्वारा नियंत्रित एक नवीन डिजिटल चलन अस्तित्वात येण्याची अपेक्षा आहे. ब्लॉकचेनद्वारे कार्यान्वित डिजिटल रुपयाचे भारतात पदार्पण होईल ही खूप मोठी बातमी आहे. हे पाऊल क्रिप्टोचा स्वीकार करण्याच्या दिशेत मार्ग सुकर करेल आणि वेब 3.0 चे नाविन्यपूर्ण संशोधन आणि स्वीकार या बाबतीत भारतास अग्रस्थान प्राप्त करून देईल.

बहुतेक भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदार त्यांचे क्रिप्टोशी संबंधित उत्पन्न आयकर रिटर्न्समध्ये स्वतःहून जाहीर करत आहेत. आता कलम 115बीबीएच (आभासी डिजिटल संपत्तीपासून उत्पन्न) आणि 194एस (आभासी डिजिटल संपत्तीच्या हस्तांतरणावर देयक) यांच्यामुळे कर आकारणी आणि सरकारची स्वीकृती प्राप्त झाली आहे. साध्या शब्दात सांगायचे तर:

  • कलम 115बीबीएच: आर्थिक वर्ष 2022-23 पासून, क्रिप्टो आणि एनएफटीसारख्या आभासी डिजिटल संपत्तीच्या हस्तांतरणावर (विक्री मोबदला (वजा) मालकीचा खर्च) 30% सरळसोट कर आकारला जाईल.
  • कलमएस: 1 जुलै 2022 पासून, आभासी डिजिटल संपत्तीच्या हस्तांतरणाचा मोबदला म्हणून कोणतीही रक्कम (रोख किंवा वस्तू) देण्यास जबाबदार असणार्‍या व्यक्तीकडून 1% कर कापावा लागेल आणि या कराची रक्कम सरकारकडे जमा करावी लागेल (अटी लागू). या तरतूदीच्या अंमलबजावणीशी संबंधित अधिक तपशील अजून प्राप्त व्हायचे आहेत.
  • कलम 56: वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त, भेटवस्तू म्हणून प्राप्त झालेली आभासी डिजिटल संपत्ती जाहीर करावी लागेल आणि करासाठी सादर करावी लागेल (भेटवस्तू प्राप्तकर्त्याद्वारे) व यासाठी ’इतर स्त्रोतांपासून उत्पन्न’ हे कलम लागू असेल.

हे कायद्याचे संक्षिप्त आकलन असले तरीही सरकारकडून आणखी स्पष्टीकरण लवकरच अपेक्षित आहे. त्यादरम्यान, या घटनांवर क्रिप्टो बाजारपेठांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि BUY  बाजारात लक्षणीय वाढ झालेली आहे. 

याशिवाय अर्थमंत्र्यांनी याकडे देखील निर्देश केला आहे की 2022 चे अंदाजपत्रक तरुणांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करत आहे. एक उद्योग या नात्याने आणि सरकारने दिलेल्या स्वीकृतीमुळे आपण आत्मविश्वासाने असे म्हणू शकतो की क्रिप्टो क्षेत्रात नोकर्‍या निर्माण करण्याची आणि भारताच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेस सहाय्य करण्याची प्रचंड क्षमता आहे. क्रिप्टोमुळे आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादास (जीडीपी) खूप फायदा होईल! 

विचार करण्यायोग्य आणखी एक पैलू म्हणजे, अस्थिरतेमुळे आजवर मुख्य प्रवाहात नसणारे बहुसंख्य लोक, विशेषत: कॉर्पोरेट्स, आता क्रिप्टोमध्ये सहभागी होऊ शकतील. बाजारपेठेत काही अल्पकालीन त्रुटी निर्माण होणे नक्कीच अपेक्षित आहे. परंतु, याबद्दल यापुढे चिंता करण्याचे कारण नाही; अनेक अनुभवी आणि गंभीर गुंतवणूकदार यात पदार्पण करत आहेत हे आपल्याला दिसेल.

याशिवाय, WazirX  सारख्या एक्स्चेंजेसना पाठिंबा देणार्‍या अनेक बॅंका आणि वित्तीय भागीदार  यापुढे दिसून येतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. या परिस्थितीचा स्वीकार करणारी घोषणा अंदाजपत्रकात झाल्यामुळे, या भावी संपत्ती वर्गाच्या कायदेसंमत अंमलबजावणीची आम्ही आता प्रतिक्षा करत आहोत. ही तर नुकती सुरुवात आहे आणि शेवट नाही. अनेक सकारात्मक घटना संभाव्य आहेत आणि भविष्याच्या पोटात दडल्या आहेत. आम्ही पुढील प्रगती व वाटचालीची तुम्हाला बातमी देत राहू. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर आमच्या येथील सहाय्य टीमशी तुम्ही संपर्क करू शकता 

या विजयाबद्दल अभिनंदन!

या संपूर्ण प्रवासात आमची सदोदित साथ दिल्याबद्दल तुमचे आभार आणि #IndiaWantsCrypto 🇮🇳 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply