Table of Contents
तुम्हाला माहित आहे का?
गोव्याचे दरडोई उत्पन्न सर्व भारतीय राज्यामध्ये सर्वाधिक आहे, देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या तब्बल अडीचपट जास्त! त्याच्या जोडीला भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने गोवा हे भारतातील सर्वोत्तम जीवनमान असलेले राज्य अशी श्रेणी दिली आहे.
गोव्याने दुरून काम करणाऱ्या व्यावसायिक आणि उद्योजकांचा वाढता ओघ पाहिला आहे. अनेक घटकांमुळे गोवा हे यशस्वी पुढील पिढीचे वेब3 स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी आकर्षक केंद्र आहे. हे लक्षात ठेवून वझिरएक्स, बिल्डर्स ट्राईब, आणि अटल इनक्युबेशन सेंटर यांनी विशेषतः वेब3 स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी गोव्यात एक ब्लॉकचेन पार्क उभारण्यासाठी भागीदारी केली आहे.
कार्यक्रमाचे तपशील
सारांश: हा कार्यक्रम निवडलेल्या 40 स्टार्टअप्सना त्यांची वेब3 उत्पादने बाजारपेठेत नेण्यासाठी उत्कृष्ट उपाय करण्यात मदत करेल. पायाभूत सुविधा, धोरण समर्थन, मान्यता आणि प्रशिक्षण हे त्यासोबत येतात. उद्योजकांना एकत्र काम करण्यासाठी आसने उपलब्ध करून देणे हा या इनक्युबेशन सेंटरचा उद्देश आहे.
कोण नोंदणी करू शकते: नवीन पदवीधर, स्टार्टअप्स आणि ब्लॉकचेन विकासकांना अर्ज खुले आहेत.
स्थान आणि तारीख: हा उपक्रम 15 एप्रिल 2022 पासून अटल इनक्युबेशन सेंटर (एआयसी), गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम) येथे आयोजित केला जाईल.
नोंदणी कशी करायची: वर नमूद केल्याप्रमाणे, या कार्यक्रमात केवळ 40 विकासकांनाच सामावून घेता येईल. इच्छुक उद्योजकांनी स्वतःची नोंदणी येथे करावी.
ब्लॉकचेन पार्क असणे आवश्यक का आहे?
भारतात आधीच सर्वात मोठी ब्लॉकचेन विकासक इकोसिस्टीम आहे. मात्र, आता आपल्याला गरज आहे ती जोमदार वातावरणाची. त्यामुळे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या संधी आणि प्रतिभेचा फायदा करून घेणे आणि डीप-टेक ब्लॉकचेन स्टार्टअप्सना तांत्रिक ज्ञान, मान्यता आणि सरकारकडून धोरण समर्थनाने सज्ज करणे हा गोव्यामधील या ब्लॉकचेनचा उद्देश आहे. राज्याच्या अर्थकारणाला चालना देणे आणि नोकऱ्यांची निर्मिती करणे ही याची दीर्घकालीन दृष्टी आहे, तर ब्लॉकचेनशी संबंधित कोणताही विषय आल्यास गोव्याला प्रारूप राज्य करणे हे उद्दिष्ट आहे! वेब3 क्रांतीची ही केवळ सुरुवात आहे.
हा कार्यक्रम कसे काम करणार आहे?
वझिरएक्स आणि बिल्डर्स ट्राईबने, या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान समर्पित भांडवलासह उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी गुंतवणूक हेरले आहेत. कार्यक्रमाचा यशस्वी परिणाम साधणयासाठी एआयसी जीआयएम आवश्यक नियामक चौकट आणि धोरण समर्थनासह सहाय्य करतील; बिल्डर्स ट्राईब अॅक्सिलरेटर कार्यक्रम चालवतील आणि प्रभावी उपायांसाठी इकोसिस्टीम समर्थन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेत जाण्यासाठी सहाय्य प्रदान करतील. वझिरएक्स या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानांचे मौल्यवान चालक ओळखण्यासाठी उद्योजकांना सहाय्य करतील आणि त्यांना उपाययोजनांची उभारणी करण्यासाठी व्यावहारिक ज्ञान देतील. यामुळे स्टार्टअप्स आणि ब्लॉकचेन इकोसिस्टीमच्या वाढीला गती देण्यासाठी धोरणात्मक उपायांच्या विकासाची आणि धोरणात्मक चौकटीची निर्मितीची सुनिश्चिती होईल.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.