Table of Contents
बिटकॉइन वॉलेट हे, बिटकॉइनचा ’संग्रह’ करण्याची कार्यक्षमता देऊ करणारे बिगर-भौतिक, डिजीटल ॲप्लिकेशन प्रोग्रॅम मानले जातात. अर्थातच कोणतेही प्रत्यक्ष बिटकॉइन त्या विशिष्ट वॉलेटवर ’पाठवले’ जात नाहीत.
याऐवजी या वॉलेटना बिटकॉइन ब्लॉकचेन वरील विशिष्ट पत्त्यांपर्यंत पोहोच असते, ते यांची मूल्ये वाचू शकतात आणि त्या पत्त्याशी संलग्न बिटकॉइन मॅनिप्युलेट (प्राप्त करणे, पाठवणे इ.) करण्यासाठी कमांड पाठवू शकतात.
आमच्या चेकलिस्टमधील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा परिचय आम्ही या मार्गदर्शिकेत तुम्हाला करून देऊ ज्यांचा आढावा तुम्ही बिटकॉइन वॉलेट ठरवण्यापूर्वी घेतला पाहिजे. लक्षात असू द्या की एक सुजाण निर्णय घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी या फक्त काही शिफारसी आहेत.
शेवटी, वॉलेट आणि अर्थव्यवस्था यांच्यानुसार, गोष्टी नेहमीच बदलतात. परंतु, तुमची पूर्वतयारी व गृहपाठ तुम्ही पूर्ण केला पाहिजे असा आग्रहाचा सल्ला आम्ही देतो.
बिटकॉइन वॉलेट वापरण्याचे लाभ
1. त्वरित व्यवहार
त्वरित व्यवहाराची सुविधा देणाती अंगभूत प्रणाली असण्याचा फायदा आहे कारण त्यामुळे वेळ वाचतो आणि महत्त्वाच्या व्यवहारांदरम्यान वेळ समाप्त होण्याची शक्यता कमी होते.
2. सहजपणे प्राप्त होऊ शकते
कार्यक्षमतेच्या दृष्टीने, तुम्हाला खाजगी कींचा ॲक्सेस नसेल तर तुमच्या वॉलेटमधील बिटकॉइनवरतुमचे नियंत्रण नसेल. बिटकॉइन वॉलेट निवडताना ही महत्त्वाची व विचार करण्यासारखी बाब आहे.
तुमच्या बिटकॉइनवर तरीही तुमचे नियंत्रण असेल जर तुमच्याकडे खाजगी की असेल आणि कोणत्याही क्षणी त्यांना तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये आणि वॉलेटमधून बाहेर हस्तांतरित करू शकाल.
3.खात्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा युपीआय
तुमचे मोबाईल वॉलेट वापरून तुमच्या बिटकॉइन प्रिपेड व्हिसा/मास्टरकार्ड डेबिट कार्ड किंवा युपीआयला तुम्ही वित्तपुरवठा करू शकता ही वस्तुस्थिती अनेक लोकांना माहित नाही. त्यानंतर एका व्हिसा/मास्टरकार्ड रिटेलरकडे तुम्ही हे कार्ड स्वाइप करू शकता.
4. अत्याधुनिक तंत्रज्ञान
संपूर्ण बिटकॉइन नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी, अधिक प्रगत वॉलेट तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे बाजारपेठेत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत ज्यात लाभ कमावण्यासाठी, कामाच्या वॉलेट-निर्मिती पैलूवर व्यवसाय अधिक लक्ष देत आहेत.
भारतात बिटकॉइन वॉलेट कसे निवडावे?
क्रिप्टोकरन्सींचा व्यापार करणाऱ्या किंवा त्यांना धारण करणाऱ्या प्रत्येकाला बिटकॉइन नक्कीच निवडावे लागते जे त्याच्या किंवा तिच्या गरजांसाठी अधिक सुरक्षित व योग्य असेल. सर्वोत्कृष्ट बिटकॉइन वॉलेट हे पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट असले पाहिजे.
म्हणूनच एक बिटकॉइन वॉलेट, वापकर्त्यासाठी बिटकॉइनची देवाणघेवाण सोपी करते आणि बिटकॉइनच्या स्वामित्वाची भावना देते. बिटकॉइन पत्ते प्राप्त करण्यासाठी खाजगी कीसारखी महत्त्वाच्या माहितीची गरज या वॉलेटना असते.
एखादे विशिष्ट क्रिप्टो वॉलेट तिथे सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म देऊ करत आहे याची खात्री करण्यासाठी अनेक वैशिष्ट्यांची गरज असते – उदा सुरक्षितता, नेव्हिगेशनमधील सुलभता, जलद आणि समजण्यास सोपे इंटरफेस, पारदर्शकता आणि या शिवाय बरेच काही.
बिटकॉइन वॉलेटचे विविध प्रकार
हार्डवेअर वॉलेट (Hardware Wallet)
बिटकॉइनचा संग्रहाबद्दल बोलायचे झाले तर, वेग आणि गोपनीयता यांचे योग्य संतुलन हार्डवेअर वॉलेट देते. हार्डवेअर वॉलेटचा हेतू, हॅकरकडून तुमच्या खाजगी की हॅक होण्यापासून संरक्षण करणे हा आहे.
सॉफ्टवेअर वॉलेट (Software Wallet)
सॉफ्टवेअर वॉलेट ॲक्सेस करण्यास सोपी आणि सोयीस्कर असतात तर हार्डवेअर वॉलेट अधिक सुरक्षित असतात.
मोबाईल फोन वॉलेट (Mobile Phone Wallet)
स्मार्टफोनवर डाऊनलोड व माउंट करता येणाऱ्या वॉलेटना मोबाईल वॉलेट या नावाने ओळखले जाते. बिटकॉइन ॲक्सेस करण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी त्यांची मोबाईल उपकरणे वापरण्यात ग्राहकांना ही वॉलेट सक्षम बनवतात.
ही वॉलेट इंटरनेटवर निर्माण केलेली असल्याने वापरकर्त्यांनी ती सुरक्षित असल्याची खात्री केली पाहिजे. त्यांच्या मोबाईल वॉलेटनी क्यूआर कोड स्कॅन करून वापरकर्ते व्यवहार करू शकतात.
वेब वॉलेट (Web Wallet)
ऑनलाइन वॉलेट ही वेब वॉलेट या नावाने सुद्धा ओळखली जातात व ती इंटरनेट ब्राऊझरने ॲक्सेस केली जाऊ शकतात. या वॉलेटमध्ये तुमची बिटकॉइन तुम्ही संग्रहित करू नयेत अशी शिफारस करण्यात येते.
या वॉलेटवर हॅकरचा डोळा असतो कारण ती सायबर हल्ल्यांच्या बाबतीत असुरक्षित असतात. बिटकॉइनच्या व्यवस्थापनात ऑनलाइन वॉलेट वापरकर्त्यांना सक्षम करतात आणि व्यवहार पूर्ण करण्याचा हा सर्वात त्वरित मार्ग आहे.
कागदी/पेपर वॉलेट (Paper Wallets)
पेपर वॉलेट हा सर्वात उत्तम उपलब्ध पर्याय आहे कारण ते कागदाच्या छापील पानावर ठेवलेले असतात. कागदावरील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा खाजगी की इन्सर्ट करून बिटकॉइन हस्तांतरित करता येते.
ते सर्व्हर किंवा मोबाईल उपकरणात ठेवलेले नसल्याने त्यांचा दुरुपयोग करता येत आही किंवा ते ऑनलाइन चोरता येत नाही.
6 बिटकॉइन वॉलेटची वैशिष्ट्ये
- युजर इंटरफेस व ॲक्सेसिबिलिटी (प्रवेशयोग्यता)
एका सहजपणे नेव्हिगेशन करता येण्याची तसे पाहू जाता गरज आहे. स्मार्टफोनसाठी कोणत्या प्रकारच्या वापरकर्त्यासाठी बिटकॉइन वॉलेट उपलब्ध आहे मग तो नवशिक्या असो जी अनुभवी आणि वयाचा सुद्धा प्रश्न नाही.
- संचलन प्रणाली
iOS किंवा Android संचलन प्रणालीशी बिटकॉन वॉलेट सामान्यत: अनुरूप असतात. काम करण्यासाथी ते सोपे असले पाहिजे.
- सुरक्षितता सावधगिरी
सुरक्षित राहण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बिटकॉइन वॉलेट सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या घेते.
- बहु-चलन वि. एकल चलन
डिजीटल वॉलेट देऊ करणारी बहु-चलन आणि डिजीटल वॉलेट देऊ करणारे एकल चलन असे दोन्ही उपलब्ध आहेत. बहु-चलन बिटकॉइन वॉलेट विविध क्रिप्टोकरन्सी एकमेकात व्यवहार करण्याच्या संदर्भात अधिक लवचिक असतात.
- क्यूआर कोड स्कॅनर
नुसते क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही कार्यक्षमतेने आणि सहजपणे पैसे चुकते करू शकता. तुम्हाला देयक देखील त्वरितपणे व सातत्याने मिळेल.
- बहु-स्वाक्षरी सहाय्य
बहु-स्वाक्षरी वॉलेट म्हणजे अनेक कोपेयरकडून वापरले जाणारे वॉलेट वॉलेटच्या प्रकारानुसार, एका व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी लागणाऱ्या स्वाक्षऱ्या या वॉलेटच्या कोपेयरच्या संख्येपेक्षा कमी किंवा त्याच्या समान असतील.
वझिरएक्स (WazirX) हे भारतातील सर्वात उत्तम बिटकॉइन का आहे
भारतातील सर्वात उत्तम बिटकॉइन शोधायचे असेल तर दुसरा कोणताही विचार न करता निश्चितच ते वझिरएक्स असेल. देशातील सर्वात वरचा क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म वजीरएक्स आधीच आहे.
प्रचंड मोठ्या वापरकर्ता पायासह, व्यापार करण्यासाठी किंवा जतन करण्यासाठी क्रिप्टोकरन्सींची चांगली श्रेणी वझिरएक्स देऊ करते ज्यात अधिकृत WRX Token/डब्ल्युआरएक्स टोकन समाविष्ट आहे.
क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत तुम्ही नवखे असा की व्यावसायिक, बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सींमधील व्यापाराबद्दल तुम्ही उत्साही असाल तर वझिरएक्स ही बहुतेक तुमची सर्वात वरची निवड असेल.
सन 2017 मध्ये प्रस्थापित वझिरएक्स हे निश्चल शेट्टी व सिद्धार्थ मेनन यांची संकल्पना आहे. वझिरएक्स भारतातील सर्वात विश्वासपात्र बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सी असल्याचा दावा करते. जगातील पहिले ऑटो ऑर्डर मॅचिंग फियाट पीए2पी एक्स्चेंज देखील वझिरएक्सने निर्माण केले आहे.
ॲप म्हणूनदेखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे आणि त्याला बराच हवाहवासा बिटकॉइन वॉलेट पर्याय बनवण्यासाठी ही सर्व वैशिष्ट्ये एकत्र केलेली आहेत. याशिवाय, सन 2019 मध्ये बायनान्सने वझिरएक्सचे अधिग्रहण केले, आणि त्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणून ठेवले.
वझिरएक्सकडे एक पूर्णत: सुरक्षित व कायदेसंमत प्लॅटफॉर्म आहे याबद्दल आम्हाला आता बराच आत्मविश्वास आहे आणि बिटकॉइनचा व्यापार करण्यासाठी किंवा त्यांचे यजमानपद करण्यासाठी बिटकॉइन वॉलेट आहे, आता आपण खोलवर जाऊया.
बिटकॉइन वॉलेट म्हणून वझिरएक्सचे लाभ
- सर्वात उत्तम सुरक्षितता
सर्वात विश्वासपात्र आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म पुरवण्याच्या बाबतीत वझिरएक्स इतरांना्हून अधिक तेजाने झळाळते. वारंवार सुरक्षितता ऑडिटमध्ये गुंतवणूक करून देशातील खूप उच्चपणे सुरक्षित व्यापार प्लॅटफॉर्मवर स्थिर राहण्यासाठी वझिरएक्स सर्वकाही कृती करते.
यात अंगभूत 2-घटक अधिकृतीकरण आहे आणि अनेक सुरक्षितता मापदंडांवर यांच्या प्लॅटफॉर्मला उच्च रेटिंग प्राप्त झाले आहे.
- बिटकॉइनपलिकडे सर्वसमावेशक क्रिप्टोकरन्सी रेंज
वझिरएक्स हे उत्कृष्ट बिटकॉइन वॉलेट आहे परंतु ते बिटकॉइन (बीटीसी), इथेरियम (इटीएच), रिपल (एक्सआरपी), लाइटकॉइन (एलटीसी), डोजेकॉइन (डीओजीई), बायनान्स नाणे, इ सारख्या शंभरपेक्षा अधिक विविध व महान क्रिप्टो संपत्तीचे समर्थन करते.
अशा प्रकारे वापरकर्त्यांना निवडण्याचे व व्यापार करण्याचे अनेक पर्याय देते. अनेक क्रिप्टोकरन्सींची जोड यूएसडीटीशी केलेली आहे.
- वेगवान व्यवहार
दररोज लाखो व्यवहार वझिरएक्स हाताळते, त्याच्या विश्वासपात्र व मजबूत त्वरित ऑर्डर मॅचिंग इंजिन व पायाभूत सुविधा यासाठी आभारास पात्र आहेत. परंतु बिटकॉइन वॉलेटच्या दृष्टीकोनातून – भावना त्याच राहतात. जमा व काढणे त्वरित व विनात्रास आहेत.
- व्यापाराशी संलग्न प्रगत टूलची अॅक्सेसिबिलिटी (प्रवेशयोग्यता)
त्याच्या वापरकर्त्यांच्या अचूक गरजांची पूर्तता करणाऱ्या वझिरएक्सच्या तळमळीच्या आणि मेहनती टीमच्या महान प्रयत्नांमुळे, ट्रेडिंग व्ह्यूची चार्टिंग टूल आणि किंमतींचे विश्लेषण व नियंत्रण करण्यासाठी टूल यासह साध्या परंतु विस्मयजनक इन्फोग्रॅफिक्सद्वारे इतिहासापर्यंत पोहोच, या सारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये हा प्लॅटफॉर्म आणतो.
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर तुमच्या बिटकॉइन वॉलेटसह तुम्हाला एक परिपूर्ण एक्स्चेंज प्लॅटफॉर्म मिळण्यासारखे हे आहे.
- विविश प्लॅटफॉर्मवर उपलब्धता
तुमचा फोन, लॅपटॉप आणि अक्षरश: कुठूनही वापरकर्त्यासाठी सुलभ असणारे हे बिटकॉइन वॉलेट कुठूनही वापरता यावे. Web, iOS, Android, Windows, व Mac ॲप्लिकेशनसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर वझिरएक्स आपल्या सेवा देऊ करते आणि अशा प्रकारे अखंडपणे त्याच्या प्रचंड मोठ्या वापरकर्ता बेसला सेवा मिळेल याची खात्री करते.
- सोपे व साधे इंटरफेस
कोणत्याही महान बिटकॉइन वॉलेट किंवा क्रिप्टो वॉलेटचे लोकप्रियता ठरवण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी हे एक आहे. भारतातील एवढ्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेकडे पाहू गेल्यास, सहजपणे नेव्हिगेशन करता येईल अशा एका इंटरफेसची गरज स्पष्टपणे आहे.
बिटकॉइन वॉलेटने कोणत्याही प्रकारच्या वापरकर्त्याबरोबर काम केले आहे मग तो नवशिक्या असो वा प्रगत, वय वा लिंग काहीही असो. कोणालाही प्रिय होईल अशा त्यांच्या अद्भुत व त्वरित इंटरफेसद्वारे वझिरएक्सने याची काळजी घेतली आहे असे दिसते.
- त्वरित केवायसी प्रक्रिया
सर्वोत्तम परिचय अधिकृतीकरण प्रणाली हे सुनिश्चित करते की तुम्ही योग्य केवायसी प्रोटोकॉलचे पालन केले जाईल याची हमी देत, साइन अप करण्याच्या छोट्या कालावधीमध्ये तुमचे केवायसी पूर्ण करता. पडताळणी अवधी कमीत कमी राखण्यासाठी मजबुती अंतर्भूत करण्याचे ध्येय वझिरएक्स ठेवते.
- WRX टोकन
वझिरएक्सद्वारे देण्यात येणाऱ्या डब्ल्यूआरएक्स या युटिलिटी टोकनवर वझिरएक्सची पर्यावरण प्रणाली आधारित आहे. क्रिप्टो समुदायाचे संवर्धन करणे आणि नवीन ग्राहकांना प्रोत्साहन देणे यासाठी डब्ल्यूआरएक नाणी तयार करण्यात आली होती. डब्ल्यूआरएक्स नाण्याचा 100 कोटी नाण्यांचा मर्यादित पुरवठा आहे.
या सर्व अद्भुत वैशिष्ट्यांसह, भारतातील क्रिप्टोची आवड असलेल्या लोकांसाठी वझिरएक्स योग्य ते सर्व काही करत आहे. बिटकॉइन वॉलेट सोयिस्कर असून त्यात जनसामान्यांना आवडणारी व त्यांचे प्रेम असणारी अगणित वैशिष्ट्ये अंतर्भूत आहेत.
पोर्टफोलियोमध्ये वैविध्य आणण्यासाठी वझिरएक्स ही उत्तम निवड आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट बिटकॉइन वॉलेट बनण्यासाठी वझिरएक्सने निःसंशय उत्तम प्रयत्न केले आहेत.
वझिरएक्सच्या मदतीने बिटकॉइन वॉलेट कशा प्रकारे प्रस्थापित करायचे?
- वझिरएक्स वेबसाइटवर जा आणि साइन अप करा.
2. तुम्हाला एक पडताळणी मेल पाठवले जाईल.
3. पडताळणी मेलद्वारे पाठवलेली लिंक काही सेकंदासाठीच उपलब्ध राहील आणि म्हणूनच तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर तुम्ही लवकरात लवकर क्लिक कराल याची खात्री करा.
4. ही लिंक तुमच्या इमेल पत्त्याचे यशस्वी पडताळणी करेल.
5. पुढील पायरी आहे सुरक्षितता सेट अप करणे आणि म्हणूनच तुम्हाला सर्वात योग्य असणारा पर्याय निवडा.
6. सुरक्षितता सेट अप केल्यानंतर, केवायसी पद्धत पूर्ण करून किंवा न करता पुढे जाण्याचा पर्याय तुम्हाला मिळेल.
7. या नंतर तुम्हाला निधी व हस्तांतरण या पृष्ठावर नेले जाईल जिथे तुमच्या वॉलेटमध्ये बिटकॉइन जमा करण्याची तुम्हाला सुरुवात करायची आहे.
8. तुम्ही भारतीय रुपयात (INR) मध्ये देखील जमा करू शकता आणि त्यानंतर तुमच्या वझिरएक्स बिटकॉइन वॉलेटमध्ये बिटकॉइन खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.
9. व्वा! वझिरएक्सचा वापर करून तुमचे बिटकॉइन वॉलेट सेट अप झाले आहे!
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.