नमस्ते मित्रांनो! 🙏
वझिरएक्स आता सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
अनेक प्रोग्रॅमिंग भाषांद्वारे वझिरएक्सच्या सर्व्हरशी तुम्ही एपीआयद्वारे जोडले जाऊ शकता. वझिरएक्समधून डेटा काढता येतो व इतर बाह्य ॲप्लिकेशनशी देवाणघेवाण करता येते. तुमचे सध्याचे वॉलेट आणि व्यवहार डेटा तुम्ही पाहू शकता, व्यापार करू शकता आणि त्रयस्ध-पक्ष प्रोग्रॅममध्ये तुमचा पैसा तुम्ही जमा करू किंवा काढू शकता.
एपीआय की तयार करण्याची प्रक्रिया साधी असून ती फक्त 5 मिनिटांत पूर्ण करता येते.
वझिरएक्स एपीआयबद्दल अधिक तपशीलांसाठी कृपया येथील संदर्भ घ्या.
आपली स्वत:ची वझिरएक्स एपीआय की कशा प्रकारे तयार करता येते?
1. तुमच्या वझिरएक्स खात्यात लॉग इन केल्यानंतर, Account Settings > API Key Manager वर जा.
2. Create New Key वर क्लिक करा, तुमच्या एपीआय कीसाठी एक नाव प्रविष्ट करा आणि सुरक्षिततेची पडताळणी पूर्ण करा.
3. आता तुमची एपीआय की तयार झाली आहे.
कृपया तुमची गोपनीय की सुरक्षितपणे ठेवा कारण ती पुन्हा दाखवली जाणार नाही. ही की कोणाबरोबरही शेअर करू नका. तुमची गोपनीय की तुम्ही विसरलात तर तुम्हाला एपीआय की डिलिट करावी लागेल आणि नवीन तयार करावी लागेल. कृपया आयपी ॲक्सेस निर्बंधांची नोंद घ्या. अधिक सुरक्षिततेसाठी रेस्ट्रिक्ट ॲक्सेस टू ट्रस्टेट आयपी ओन्ली हा पर्याय तुम्ही निवडावा अशी आम्ही शिफारस करतो.
4. तुम्ही तुमचे एपीआय की ट्रेडिंग परमिशन अँड आयपी रेस्ट्रिक्शन गरजेनुसार संपादित तसेच अद्ययावत करू शकता, डिफॉल्टने त्या रीड ओन्ली आहेत. टॉगलवर क्लिक करून तुम्ही स्पॉट ट्रेडिंग सक्रिय करू शकता.
प्रगत व्यापारासाठी वझिरएक्स एपीआय वापरा आणि सर्वात अधिक तरलता असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या एक्स्चेंजचा पुरेपूर लाभ घ्या. संपूर्ण दस्तावेजीकरण येथे वाचा.
वझिरएक्स बातम्यासह येथे अद्ययावत रहा.
व्यापाराचा आनंद घ्या 🚀
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.