नमस्ते सहकार्यांनो!
2021 हे एक अद्भुत वर्ष होते! एनएफटीबद्दल मथळे झळकू लागले तेव्हापासून या वर्षात, जगभरात स्टॉक कसे विकत घ्यावेत याच्या तुलनेत बिटकॉइन कशी विकत घ्यावीत यासाठी गूगलवर अधिक सर्च (शोध) केले गेले. याच वर्षात अनेक देशांनी क्रिप्टो नियमने किंवा सीबीडीसींच्या दिशेने काम करण्यास सुरूवात केली.
या आनंददायक बातमीसह, सन 2021 मध्ये वझिरएक्सचा $4300 कोटीं USDचा, भारतातील सर्वोच्च विक्रमी व्यापार झाला; 2020 च्या तुलनेत ही 1735% वाढ आहे आणि हे तुमच्या बरोबर शेअर करण्यात मला प्रचंड रोमांचित वाटत आहे. साइन अप करणार्या वापरकर्त्यांच्या संख्येने लक्षणीय उसळी घेतली आणि या संख्येने 1 कोटीची रेषा ओलांडली.
आमच्या वापरकर्त्यांनी दाखवलेल्या प्रचंड स्वारस्याचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही वापरकर्ता सर्वेक्षण तसेच आमच्या प्लॅटफॉर्मवरील डेटाच्या कलाचेदेखील विश्लेषण केले. याने आम्हाला मिळालेले इनसाइट विस्मयकारक असून आम्ही ती “2021-क्रिप्टोचे वर्ष- ठळक मुद्दे आणि निरीक्षणे” या नावाच्या आमच्या रिपोर्टमध्ये शेअर केली आहे.
- प्रतिसादकर्त्यातील 51% जणांनी सर्वप्रथम मित्र आणि कुटुंबियांच्या शिफारसींच्या आधारावर क्रिप्टोमध्ये प्रवेश केल्याचे मान्य केले.
- एक्स्चेंजवर सर्वात अधिक व्यापार झालेले क्रिप्टो, बिटकॉइन (BTC), टेथर (USDT), शिबा इनु (SHIB), डोजेकॉइन (DOGE), वझिरएक्स टोकन (WRX), आणि मॅटिक (MATIC) हे होते.
- त्यांच्या आर्थिक गुंतवणूकीत, 10% पर्यंतचा हिस्सा क्रिप्टोचा असल्याचे 44% प्रतिसादकर्त्यांनी शेअर केले
- स्त्रियांनी बिटकॉनचा व्यापार जास्त केला तर पुरुषांनी शिबा इनुमध्ये अधिक व्यापार केला.
- प्रतिसादकर्त्यांतील 54% जणांनी शेअर केले की त्यांना क्रिप्टो अवकाशात करियर विकसित करण्यात स्वारस्य असेल आणि
- उद्योजकता, अर्थ आणि व्यवसाय विकास हे सर्वोच्च करियर पर्याय असतील.
- वझिरएक्स वापरकर्त्यांपैकी 82% जणांनी त्यांच्या क्रिप्टो गुंतवणूकीवर लाभ कमावला आहे (30 नोव्हेंबर 2021 पर्यंत)
यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, क्रिप्टोमधील व्यापार आणि गुंतवणूकीत लोकसंख्यानिहाय बदल दिसून आले तसेच वझिरएक्सच्या 66% वापरकर्त्यांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी होते. नवीन साइन अप करणार्या स्त्रियांच्या संख्येत 1009% वाढ झाली आणि या तुलनेत नवीन साइन अप करणार्या पुरुषांच्या संख्येत 829% वाढ नोंदवण्यात आली. वय आणि लिंग या व्यतिरिक्त महानगरे व स्तर-1 (टियर-1) नगरांच्या पलिकडे, या क्षेत्राच्या सहभागात कल दिसून आला. गुवाहाटी, कर्नाल, बरेली, यासारख्या लहान गावातील सहभागींच्या संख्येत 700% वाढ दिसून आली आणि अशा प्रकारे ग्रामीण आणि अर्ध-नागरी क्षेत्रातील लोकांच्या वाढत्या स्वारस्याचे संकेत मिळू लागले.
व्यापाराच्या संधीपलिकडे लाऊन, वझिरएक्स मार्केटप्लेसने, 962पेक्षा अधिक क्रियेटरना 12,600 एनएफटी मिंट करण्यास आणि सन 2021 मध्ये आतापर्यंत 262,896 डब्ल्युआरएक्स मूल्याहून अधिक (भारतीय चलनात ~रु 2.4 कोटी), संख्येत, त्यातील 5267 पेक्षा अधिक विकण्यात सक्षम केले आहे. सर्वात अधिक व्यापार होणार्या एनएफटींमध्ये The Mvmnt Collections/द मव्हमेन्ट कलेक्शन्स, Crypto Karadi Collections/क्रिप्टो कराडी कलेक्शन्स, Krypto Monks & MetaVassi Collection /क्रिप्टो मॉंक्स ॲड मेटावासी कलेक्शन, Abhishapes/अभिशेप्स–, Yash Shyte – Cyber Mythics/यश शाईट-सायबर मायथिक्स, Milanzart – Cyber Skull Force Collection/मिलनझार्ट-सायबर स्कल फोर्स कलेक्शन समाविष्ट आहेत.
क्रिप्टोचा स्वीकार करण्यात भारताची उत्क्रांती होत आहे. इथेरियम, सोलाना, कार्डानो यासारखी लोकप्रिय आल्टकॉइन आणि 2 स्तरांच्या सोल्यूशनच्या ॲप्लिकेशनमध्ये नावीन्यपूर्ण संशोधनाकडे रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदार अपेक्षेने पाहत आहेत. या शिवाय मेटाव्हर्स ॲप प्रमुख प्रवाहात आल्याने, DeFi/डेफाय, NFTs/एनएफटी, GameFi/गेमफाय सारख्या ॲप्लिकेशनच्या प्रवाहाची वझिरएक्स अपेक्षा करत आहे जिथे वापरकर्ते स्वत:च्या डेटाची मालकी करू शकतील आणि आभासी अर्थव्यवस्थेत पैसा कमावू शकतील. या वृद्धीच्या क्षमतेचा एका Nasscom report/नॅसकॉम अहवालात देखील उल्लेख केला आहे व भारतातील क्रिप्टो बाजारपेठ दुप्पट वाढेल व सन 2030 पर्यंत 80,000+ नोकर्या निर्माण करण्याची त्यात क्षमता आहे असे नमूद करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी संपूर्ण अहवाल येथे पाहा.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.