Table of Contents
या काळात आणि दिवसांत क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक करण्याच्या शक्यतांचा तुम्ही विचारच केला नाही असे होऊ शकत नाही. सन 2020 साली अलिकडील क्रिप्टोची प्रचंड वाढ सुरू झाली असली आणि महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था मोडकळीस आली असली तरीही कल अजूनही मजबूत असून क्रिप्टो आज एक वर्षानंतरही वाढतच आहे. प्रसारमाध्यमे आणि शासनाच्या नियमनांच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे सामान्य जनता क्रिप्टोकरन्सीकडे उपहासाने पाहत असली तरीही आता त्यात सुधारणा होत आहे. क्रिप्टोकरन्सींबद्दल फक्त तंत्रज्ञान परिचित आणि उत्साही लोकांनाच समजू शकते असे आता राहिले नाही. सोशल मिडिया ते तुमची नोकरी ते तुमचे कुटुंब ते मित्र, आणि या दरम्यान अनेक जागी क्रिप्टोचे वेड आता सगळीकडे आहे.
कारण, त्यांच्या प्रस्तुतीनंतर क्रिप्टोकरन्सींनी लांबचा पल्ला गाठला आहे आणि ते सन 2021 चे सर्वात लोकप्रिय निवड झाले आहेत. क्रिप्टो बाजारपेठा, अल्प काळातच त्यांच्या स्वरुपानुसार, कमीत कमी जोखीम आणि अविश्वसनीय परतावा देऊ करतात. प्रचलित केंद्रीकृत वित्त सेवा आणि उत्पादने यांच्यावर तुम्ही नजर टाकली तर क्रिप्टोकरन्सीकडून मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य व इतर फायदे यांची तुलना नाही. अशा प्रकारच्या फायदेशीर सिद्धांतामुळे, क्रिप्टोकरन्सींच्या विविध प्रकारात लाखो व्यक्तींनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे ही आश्चर्याची गोष्ट नाही. यात सर्वात लोकप्रिय असलेले बिटकॉइनपासून इतरांपर्यंत अल्टकॉइन जसे की इथेरियम, डोजेकॉइन, कार्डानो व इतर आहेत.
बिटकॉइन क्रिप्टो बाजारपेठेचे नेतृत्व करत असताना बाजारपेठेचे भांडवलीकरण आणि किंमतीची कामगिरी या बाबतील इतर अल्टकॉइनची कामगिरीदेखील चांगली आहे. हल्लीच्या दिवसांमध्ये, रिपल (एक्सआरपी) ही क्रिप्टो बाजारपेठेतील सर्वात मोठी अपूर्व घटना आहे.
भारतात तुम्ही रिपल कशा प्रकारे खरेदी करू शकता यासह तुम्हाला रिपलबद्दल जे जाणून घेणे आवश्यक आहे ते येथे देत आहोत.
रिपल (XRP) महणजे काय?
यूएसस्थित कंपनीद्वारे निर्मित आणि विकसित रिपल लॅब्ज एक्सआरपी या हे प्रत्यक्ष वेळेतील सकल समझोता प्रणाली, चलन विनिमय आणि पैसे भरण्याचे नेटवर्क आहे. रिपल आणि एक्सआरपी या संज्ञा एकमेकांबद्दल वापरल्या जातात परंतु प्रत्यक्षात मात्र रिपल हे कंपनीचे नाव आणि एक्सआरपी अंतर्निहित नेटवर्क आहे. याविरुद्ध, रिपल लॅब्जच्या उत्पादनांसाठी एक्सआरपी ही स्थानिक क्रिप्टोकरन्सी आहे.
रिपल मूलत: स्वत:ची जाहिरात जागतिक पेमेंट नेटवर्क म्हणून करते आणि त्यांचे ग्राहक प्रमुख बँका आणि वित्त संस्था आहेत आणि 3-5 सेकंदांपेक्षा अधिक काळ न लागणारे विविध चलनातील तत्काळ समझोते करण्यासाठी रिपलच्या उत्पादनात एक्सआरपी वापरले जाते. व्यवहारांचे सत्यापन करण्याकरिता ब्लॉकचेन मायनिंग वापरण्याऐवजी, रिपल नेटवर्क एक एकमेव वितरित कन्सेन्सस पद्धत वापरते ज्यात व्यवहाराची वैधता सत्यापित करण्यासाठी सहभाग घेतलेले नोड एक मतदान करवतात. आणि यामुळेच, एका केंद्रीय अधिकरणाच्या गरजेशिवाय, रिपल जवळजवळ लगेच पुष्टीकरण देऊ शकते.
त्यानंतर, एक्सआरपी विकेंद्रित राहते आणि वेग व विश्वासार्हतेच्या बाबतीत त्याच्या अनेक प्रतिस्पर्धकांना मागे टाकते. याशिवाय, एक्सआरपी व्यवहारांचे, कोणत्याही प्रुफ ऑफ वर्कची गरज न भासता, मायनिंगसाठी लागणाऱ्या ऊर्जेची बचत करून, वेगाने निरसन करता येते. एक्सआरपी कन्सेन्सस प्रणाली किमान ऊर्जा खर्च करते ज्यामुळे ते प्रचंड ऊर्जा वापरणाऱ्या बिटकॉइनपेक्षा खूपच अधिक पर्यावरण-अनुकूल बनते. जगभरातील 150 पेक्षा अधिक प्रमाणीकरणकर्त्यांच्या विकेंद्रित नेटवर्कद्वारा संचलित एक्सआरपी देखील खूप स्केलेबल आहे आणि आठवड्यातील सातही दिवस, दिवसातील सर्व 24 तास, दर सेकंदास 1,500 व्यवहार हाताळू शकते, जो व्हिसा पेमेंटएवढा आऊटपुट आहे.साधारण याच वेळेस, एक्सआरपी ही बाजारपेठ भांडवलीकरणाच्या बाबतीत सहावी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिचा व्यापार $1.14 या मूल्यावर होतो. रिपलची भारतातील किंमत ₹88.9997 आहे. भारतात क्रिप्टोकरन्सीच्या पदार्पणानंतर इच्छुक गुंतवणूकदारांना निवडण्यासाठी भरपूर क्रिप्टो एक्स्चेंज आहेत. रिपल ऑनलाइन खरेदी करण्यासाठी तुम्ही सर्वात उत्तम प्लॅटफॉर्म शोधत असाल तर वझिरएक्स तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट निवड आहे.
भारतात रिपल विकत घेण्यासाठी वझिरएक्स ही सर्वात उत्तम खरेदी का आहे
भारताचे सर्वात मोठे आणि विश्वासपात्र क्रिप्टो एक्स्चेंजपैकी एक असणाऱ्या वझिरएक्सकडे त्याला सर्वोत्कृष्ट बनवणारी महत्त्वाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उत्कृष्ट दर्जाची सुरक्षितता, त्वरित केवायसी पद्धती आणि वेगवान व्यवहार, अनेक प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचता येण्याची सुलभता, साधे व दिशानिर्देश करण्यास सोपे इंटरफेस आणि क्रिप्टो हे भविष्य आहे याविषयी सकारात्मकतेने या प्लॅटफॉर्म ब्लॉकचेनवर तळमळीने विश्वास ठेवणाऱ्यांच्या टीमने उभारल्याचे तथ्य ही या प्लॅटफॉर्मची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतात वझिरएक्स ही केवळ एक उत्तम खरेदी नाही – ते बिटकॉइन, इथेरियम, पॉलिगॉन (आधीचे मॅटिक नेटवर्क) यासारख्या इतर अनेक क्रिप्टोकरन्सींसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्मदेखील आहे.
याशिवाय, डब्ल्यूआरएक्स टोकन नावाने ओळखले जाणारे त्याचे स्वत:चे युटिलिटी टोकनदेखील या प्लॅटफॉर्मकडे आहे. डब्ल्यूआरएक्स टोकनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे प्लॅटफॉर्मच्या निर्मितीत मदत करण्यासाठी वझिरएक्सच्या समुदायास गुंतवणे.भारतात तुम्ही रिपल कशा प्रकारे खरेदी करू शकता हे आता आपण पाहूया.
वझिरएक्स वापरून रिपल ऑनलाइन खरेदी करा.
वझिरएक्समधून रिपल ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, प्रथम तुम्ही प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे याची खात्री केली पाहिजे. तुम्ही याबाबत परिचित नसाल तर खालील पायऱ्यांचे पालन करा.
- खाते उघडा
- गुगल प्ले स्टोअर/Google Play Store किंवा ॲप स्टोअर/App Store मधून वझिरएक्स ॲप डाऊनलोड करा किंवा वझिरएक्स वेबसाइटला भेट द्या.
- तुमचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड भरून प्लॅटफॉर्मवर साइन अप करा.
- पुढे, तुमच्या ईमेल पत्त्याचे सत्यापन करा.
- तुमचे खाते सुरक्षित करा
- प्रमाणीकरण ॲप किंवा मोबाइल एसएमएस वापरून तुमचे खाते तुम्ही सुरक्षित करू शकता. ही प्रक्रिया सोडून पुढे जाण्याचा पर्यायदेखील तुमच्याकडे आहे परंतु स्वत:च्या सुरक्षिततेसाठी 2- घटक प्रमाणीकरण वापरून तुमचे खाते सुरक्षित करावे अशी शिफारस केली जाते.
- केवायसीचे सत्यापन करा
- पुढील पायरी आहे केवायसी सत्यापन जे क्रिप्टो व्यापाराकरिता महत्त्वाचे पाऊल आहे. वझिरएक्स अत्यंत उच्च दर्जाच्या सत्यापन प्रणाली देऊ करते ज्या शक्य तितक्या अधिक वेगाने तुमच्या केवायसीवर प्रक्रिया करतात आणि अशा प्रकारे एका अखंड व्यापार अनुभवासाठी तुमच्या प्रवेशाची प्रक्रिया त्वरेने करते.
- पैसे जमा करा
- पुढची पायरी आहे प्लॅटफॉर्मवर तुमचे पैसे जमा करणे. भारतीय रुपयात किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये तुमचे पैसे तुम्ही जमा करू शकता.
- भारतीय रुपये जमा करण्यासाठी, खाते क्रमांक, बँकेचे नाव, आयएफएससी कोड व इतर सुसंगत तपशील सादर करा. युपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएससारख्या विविध भरणा पद्धतींद्वारे तुमच्या वझिरएक्स खात्यात तुमच्या बॅंक खात्यातून तुम्ही भारतीय रुपयात पैसे सहजपणे भरू शकता.
- तुमच्या वॉलेट (किंवा इतर एक्स्चेंजमधून देखील) क्रिप्टोकरन्सी निधी जमा करणे ही देखील सोपी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागत नाही. यासाठी, सर्वप्रथम तुमच्या वझिरएक्स वॉलेटवर जा आणि तुमच्या डिपॉझिटचा पत्ता मिळवा. यानंतर, तुमच्या क्रिप्टोकरन्सींचे हस्तांतरण करण्यासाठी, तुमच्या इतर वॉलेटमधील ’सेंड ॲड्रेस’ विभागातील पत्ता नुसता शेअर करा.
- एक्सआरपी (XRP) खरेदी करा.
- तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये एकदा तुम्ही पैसे जमा केले की तुम्ही आता तयार झाला आहात. वझिरएक्स एक्स्चेंजला भेट द्या अणि भारतातील रिपलची सध्याची किंमत पाहण्यासाठी “एक्सआरपी/INR” निवडा.
- “बाय” आणि “सेल” हे दाखवणाऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला खरेदी करायचे आहेत त्या एक्सआरपीची भारतीय रुपयातील रक्कम भरा, “बाय” बटनावर क्लिक करा आणि एकदा ऑर्डर पूर्ण झाली की तुमच्या वॉलेटमध्ये एक्सआरपी हस्तांतरित होण्याची प्रतीक्षा करा.
कोणताही त्रास न होता रिपल ऑनलाइन खरेदी करण्यासाठी बस एवढेच करायचे आहे वझिरएक्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.