Skip to main content

भारतात शिबा इनु कॉइन कसे विकत घ्यावे? (How To Buy Shiba Inu Coin (SHIB) In India)

By नोव्हेंबर 11, 2021डिसेंबर 22nd, 20214 minute read
भारतात शिबा इनु कॉइन कसे विकत घ्यावे? (How To Buy Shiba Inu Coin (SHIB) In India)

गेल्या आठवड्यात एका मीम-आधारित क्रिप्टोकरन्सीची प्रचंड वाढ झाली. होय, तुम्ही बरोबर ऐकले! मीम-आधारित या शतकातील उद्योगावर खरोखरच कल्पनांचे शासन आहे असे म्हणूया. अशा बदलांसह, ही क्रिप्टोकरन्सी व त्याची भविष्यातील क्षमता याबद्दल चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे. 

तुम्ही अजून अंदाज केला नसेल तर – आम्ही शिबा इनु कॉइनबद्दल बोलत आहोत. शिबा टोकन या नावानेदेखील ओळखले जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीने त्याच्या मूल्यात 35% वाढ पाहिली. क्रिप्टोकरन्सींच्या कॉइनबेस यादीत याचे नाव जोडल्याबरोबर हे झाले. 

या टोकनची डोजेकॉइन मारक म्हणूनदेखील प्रशंसा होत असून ते बाजारपेठ भांडवलीकरणाच्या बाबतीत सर्वात वरच्या 100 कॉइनपैकी ते एक आहे. एवढ्या थोड्या काळात अशा मोठ्या महत्त्वामुळे या कॉइनचे दर, त्याचे तपशील आणि त्याचा होणारा प्रभाव याबद्दल जाणून घेणे आवश्यक ठरते. 

शिबा इनु कॉइन म्हणजे काय?

संपूर्ण मूळ सिद्धांतापासून सुरुवात करूया. शिबा टोकन ही ऑगस्ट 2020 मध्ये रयोशी नावाच्या अज्ञात व्यक्तीद्वारा निर्माण केलेली विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी आहे.

या करन्सीचे नाव “शिबा इनु” या जपानी कुत्र्याच्या जातीच्या नावावर आधारित अनून त्याचे चित्र डॉगकॉइनच्या चिन्हावर होते. डोजेकॉइन व शिबा इनु हे दोन्ही एक विनोद म्हणून सुरू झाले परंतु पुढे काय झाले याची कल्पना करता का? या शतकातील पिढीने या विनोदाचा थोडा विपर्यासच केला.

शिबा इनु हे इथेरियम ब्लॉकचेनवर निर्मित इआरसी-20 अल्टकॉइन आहे. या टोकनच्या श्वेतपत्रात असे म्हटले जाते की विविध पुरवठ्यांसह तीन टोकनची पर्यावरणव्यवस्था स्थापित करण्याची त्याची इच्छा आहे. शिबास्वॅप मध्ये वापरात असणारी इतर दोन टोकन म्हणजे लीश व बोन आहेत. एक क्वाड्रिलियन (एकावर 15 शून्ये) च्या संपूर्ण संग्रहासह या फाऊंडेशनचे चलन म्हणून शिबा इनु काम करते. या टोकनसाठी जबाबदार टीमने शिबास्वॅप नावाचे विकेंद्रित एक्सचेंज देखील निर्माण केलेले आहे ज्याद्वारे वापरकर्ते खणू शकतात, घाई करू शकतात आणि आणू शकतात. या संज्ञा तरलता, स्टेक कॉइन आणि कॉइन पुनर्प्राप्त करणे यासाठी वापरण्यात येतात. 

Get WazirX News First

* indicates required

हे अजूनही स्पष्ट झाले नसेल तर, शिबातील बहुतेक संज्ञा कुत्र्याशी काहीतरी संबंधित आहेत. एलॉन मस्कच्या ट्विटर फीड आणि अनेक मीम-उत्साही गुंतवणूकदारांमुळे क्रिप्टो बाजारपेठ अनेकदा कुत्र्याच्या खुराड्यासारखी वाटते. या क्रिप्टोकरन्सीच्या सिद्धांताप्रमाणे आणि नावाप्रमाणे, त्याचे दरदेखील अनेक अचानक व विचित्र कारणावर अवलंबून राहिले होते. उदा: शिबु पिल्लू ठेवण्याची इच्छा एलन मस्कने व्यक्त केली तेव्हा कॉइनची किंमत 300% ने गगनाला जाऊन भिडली. त्याचप्रमाणे 13 मे 2021 रोजी व्हितालिक ब्युटेरिन या रशियन-कॅनेडियन प्रोग्रामर आणि लेखकाने इंडिया कोव्हिड-क्रिप्टो रिलिफ फंडाला 50 ट्रिलियन शिबा टोकन दान दिले. 

शिबा इनु कॉइन इतके लोकप्रिय का आहे?

डोजेकॉइननंतर लोकप्रियता मिळवणाऱ्या अनेक पाळीव प्राण्यांच्या नावाच्या कॉइनपैकी शिबा टोकन एक आहेत. डोजेकॉइन ही एक व्यंगात्मक करन्सी होती. संपूर्णपणे न समजून घेता लोक क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे विकत घेतात हे दाखवण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांपेक्षा अधिक जास्त बाजार भांडवलीकरण असणाऱ्या या करन्सीचे काही कार्यच नव्हते हे उपहासपर आहे. साध्या शब्दांत, शिबा इनु एवढी चांगली कामगिरी करत असल्याचे कारण म्हणजे फोमो-फियर ऑफ मिसिंग आऊटचा (आपण काहीतरी मुकत तर नाही याची भिती) या शतकातील सिद्धांत.

डोजेकॉइनच्या वादळास जे गुंतवणूकदार मुकले ते आता पुढच्या डोजेकॉनची वाट पाहत आहेत. फक्त याच एका कारणामुळे क्रिप्टोकरन्सी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. परंतु, डोजेकॉइन व शिबा इनु कॉइनमधील एक मोठा फरक म्हणजे शिबास्वॅपची उपस्थिती. विकेंद्रित एक्सचेंजची उपस्थिती, एसएचआयबीला विकेंद्रित वित्त पर्यावरण प्रणालीचा इथेरियमवर भाग बनवते. गेनिंग यील्ड आणि स्वॅपिंग टोकन यासारखे एक्सचेंजचे काही पैलू वापरकर्ते वापरू शकतात. या अशा कार्यप्रणाली आहेत ज्या डोजेकॉइनवर संमत नव्हत्या.

भारतात शिबु कॉइनची किंमत काय आहे?

25 ऑक्टोबर 2021 रोजी शिब ते भारतीय रुपयाचा दर ₹ 0.003090 आहे. येथे नमूद करण्यासारखे आहे की शिबा कॉइन ही प्रचंड अस्थिर व स्फोटक क्रिप्टोकरन्सी आहे. 

भारतात शिबा इनु कॉइन विकत घेण्याची पद्धत.

शिबा इनु कॉइन सूचिबद्ध करणारे फारसे एक्सचेंज प्लॅटफॉर्म भारतात नाहीत. भारतीय रुपयांत व्यापार करण्याकरिता क्रिप्टोकरन्सी सूचिबद्ध करण्यात वझिरएक्स अग्रणी झाले. तो भारतातील अग्रणी व्यापार प्लॅटफॉर्मपैकी एक आहे आणि वझिरएक्स ॲप वापरून तुम्ही शिब कशा प्रकारे खरेदी करू शकता ते येथे दिले आहे.

  1. वैध ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर वापरून साइन अप करा.
wazirx signup
  1. आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे दाखल करून केवायसी पूर्ण करा.
Wazirx app verification signup
  1. तुमचे बॅंक खाते लिंक करा किंवा तुमच्या वझिरएक्स खात्यात पैसे जमा करण्याच्या विविध पद्धती निवडा.
wazirx app adding fund
  1. क्विक बाय किंवा खरेदी करा/विका पर्यायातून शिबा इनु खरेदी करा.
buy shiba inu india wazirx app
  1. तुमची ऑर्डर द्या. एकदा तुमच्या ऑर्डरवर प्रक्रिया झाली की तुमच्या वझिरएक्स वॉलेटमध्ये क्रिप्टो दिसेल.

शिबा इनु कॉइनचे भारतातील भविष्य 

सध्याचे वातावरण गंभीर असले तरीही, शिबा टोकनसाठी भविष्याच्या गर्भात सकारात्मक बातमी आहे. पुढील तीन महिन्यात आपल्या किंमतीत 30% वाढ पाहण्यास शिबु इनु कॉइन सज्ज आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत त्याची किंमत अशी असेल की तुम्ही आज गुंतवणूक केली तर काही विश्लेषकांनुसार तुम्ही 90% परतावा कमावू शकाल. 

या वाईट इतिहासातून बाहेर पडत शिबा कॉइन दाखवत आहे की काही बेफाम घोडेदौड आता जवळच आहे. तसेच, अलिकडच्याच काळात शिबा टोकनने काही भक्कम दर प्रदर्शित केले आहेत. या संख्यावारीकडे पाहून, शिब आशाजनक भविष्याचे आश्वासन देत आहे. 

निष्कर्ष   

सध्या, चांगले दिवस मुकले त्यांना शिबु इनु कॉइन बेफान घोडेदौड देऊ करत आहे. Fxstreet.com ने एका विश्लेषणात दाखवल्याप्रमाणे, शिबा इनुच्या किंमतीची हालचाल खूपच तप्त असल्याने अल्प-अवधी दुरुस्त्या स्वाभाविक आहेत. सध्याच्या थंड काळाचा, सहभागी होण्यासाठी आणि लाभ मिळवण्यासाठी गुंतवणूकदार उपयोग करू शकतात. स्पष्ट दिसत आहे त्याप्रमाणे, शिबा इनु कॉइन बरेच काही देऊ शकते.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply