
नमस्ते मित्रांनो!
आमच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर आमच्या वापरकर्त्यांना सर्वोत्कृष्ट अनुभव देण्याच्या उद्देशाने वझिरएक्समधील आम्ही सर्वांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. म्हणूनच, वापरकर्त्यांच्या गरजा व पसंती मनात ठेवून, वझिरएक्स ॲपवरच तुमच्या आवडत्या कॉइन्स/टोकन्स साठी तुम्ही ’प्राइस अलर्ट्स/किंमतीचे अलर्ट्स’ सक्षम करू शकता!
’प्राइस अलर्ट’ वैशिष्ट्य वझिरएक्सवर कशा प्रकारे काम करते?
हे फक्त एकदाच करावे लागते! तुमच्या वझिरएक्स ॲपवर प्राइस अलर्ट्स सक्षम करण्यासाठी तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे:
पायरी 1: वझिरएक्स ॲप उघडा आणि तुमच्या ’अकाऊंट सेटिंग्ज’ वर जा.
पायरी 2: नोटिफिकेशन्स वर क्लिक करा.
पायरी 3: ’प्राइस अलर्ट्स’ विभागात तुम्हाला ज्या कॉइन्ससाठी प्राइस अलर्ट्स सक्षम करायची आहेत ती निवडा. तुम्ही ’आवडती कॉइन्स’ आणि/किंवा ’लोकप्रिय कॉइन्स’ निवडू शकता.
येथे, ‘आवडती कॉइन्स’ म्हणजे अशी कॉइन्स जी तुमच्या आवडत्या यादीत स्वत: जोडली आहेत. तुमच्या पसंतीची क्रिप्टो (कोणत्याही मार्केटमधील) च्या बाजूला असलेल्या चिन्हावर टॅप करून तुम्ही हे करू शकता. लोकप्रिय कॉइन्स म्हणजे अशी जी वझिरएक्सने मार्केटच्या मागणीनुसार जोडली आहेत.
पायरी 4 : अलर्टची फ्रिक्वेनसी/वारंवारता सेट करा. येथे तुम्हाला निवडण्याचे 3 पर्याय आहेत:
- किंमतीत मोठे बदल
- किंमतीत मध्यम बदल
- किंमतीत लहान बदल
तुमच्या पसंतीनुसार, केव्हा अलर्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता
बस्स, एवढेच! तुमच्या निवडीच्या आधारे, तुमच्या आवडत्या क्रिप्टोच्या किंमतीतील फरकांबद्दल प्रत्यक्ष त्या वेळेवर (रियल-टाइम) तुम्हाला अलर्ट्स प्राप्त होतील.
या वैशिष्ट्याचा तुम्ही पुरेपूर वापर कराल अशी आमची आशा आहे. खालील कॉमेंट्समध्ये तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कळवा.
जय हिंद!🇮🇳
