Table of Contents
अनेकदा “इथेरियम संहारक” असे नामकरण झालेला, सोलाना हा खुला-स्त्रोत, वेब-स्केल ब्लॉकचेन प्रोटोकॉल आहे ज्यामुळे विकसक विकेंद्रित ॲप आणि बाजारपेठा निर्माण करू शकतात. सोलानाचे वेगवान, सुरक्षित, सेन्सॉर-प्रतिरोधक आर्किटेक्चर त्याला मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाण्यासाठी परिपूर्ण प्लॅटफॉर्म करते. क्रिप्टो बाजारपेठेच्या हे लक्षात आलेले दिसते – त्याच्या – एसओएल – टोकनने भरारी घेतली – जुलैमध्ये खालच्या $23 वरून सप्टेंबरच्या पूर्वार्धात $195 वर. दोन महिन्यांच्या आत 8 पटीपेक्षा अधिक परतावा!
एवढा गाजावाजा कशाचा आहे? सोलाना इतकी वर भरारी का घेत आहे?
सोलाना: खोलवर बुडी
सोलानाचे वापरकर्ते हजारो नोडमध्ये अखंडपणे व्यवहार करू शकतील असे प्रगत संगणकीय तंत्रज्ञान वापरणारे हे वितरण नेटवर्क आहे. त्याची मजबूत नेटवर्क कामगिरी त्याला, दर सेकंदाला 50,000 पेक्षा अधिक व्यवहार हाताळता येण्याचा दावा करणारी जगातील सर्वात वेगवान ब्लॉकचेन होते. थ्रुपुट सुधारण्यासाठी सोलाना प्रुफ ऑफ स्टेक (PoS) व प्रुफ ऑफ हिस्टरी (PoH) कन्सेन्सस यंत्रणा वापरते.
आजवर, प्रुफ ऑफ वर्क (PoW) हे वितरित लेजरवर कन्सेन्सस प्राप्त करण्यासाठी एक गृहित यंत्रणा बनली आहे ज्यात क्रिप्टोग्राफिक समस्या सोडवण्यासाथी त्यांचे गणन सामर्थ्य वापरून मायनj एकमेकांशी स्पर्धा करतात. ही समस्या सोडवणारा पहिल्या मायनरला त्याबद्दल बक्षीस मिळते.
ही प्रक्रिया खूप ऊर्जा खर्च करत असल्याने व अधिक गणन सामर्थ्याची गरज असल्याने, प्रुफ ऑफ स्टेक(PoS) नावाची एक नवीन आणि अधिक कार्यक्षम पद्धत उदयास आली. या कन्सेन्सस मॉडेलमध्ये, एक व्यक्ती किती मोठी स्टेक धारण करते यावर एक नवीन ब्लॉक वैध ठरण्याची शक्यता ठरवली जाते. येथे, कॉलॅटरल म्हणून मायनर आपले टोकन सामोरे ठेवतो. त्याच्या बदल्यात, त्याच्या स्टेकच्या प्रमाणात त्याला टोकनवर अधिकार प्राप्त होतो.
सन 2017 मध्ये आनातोली याकोव्हेन्कोने सोलानावर एक श्वेतपत्र प्रकाशित केले ज्यात विकेंद्रित नेटवर्क स्वयंचलितपणे व्यवहार करू शकतील अशा एका नवीन टाइमकीपिंग पद्धतीचे वर्णन केले होते. दोन घटनांतील गेलेला वेळ क्रिप्टोग्राफिक पद्धतीने सत्यापित करण्याच्या या नवीन मद्धतीस प्रुफ ऑफ हिस्टरी (PoH) असे म्हटले जाते. या नवीन पद्धतीचे विवरण करणारी ती श्वेतपत्रिका पहिली होती.
सोलानाने टॉवर बीएफटी अल्गोरिदमची देखील अंमलबजावणी केली जी PoH मधून संपूर्ण नेटवर्कमध्ये वैश्विक काल स्त्रोत लागू करते आणि या मुळे ब्लॉकचेनमधील सर्व व्यवहारांचे कायम सामान्य नोंद निर्माण होते. सोलानाचे टॉवर BFT (बायझेन्टाइन फॉल्ट टॉलरन्स) अल्गोरिदम खालील समस्यांचे देखील निराकरण करते:
- क्लस्टरमधील प्रचंड बहुसंख्येद्वारा काही फोर्क कदाचित स्वीकारले जाणार नाहीत आणि अशा फोर्कना मत देण्यापासून मतदारांनी पुनर्प्राप्ती केली पाहिजे.
- विविध मतदारांकडून काही फोर्क मत देण्यायोग्य असू शकतात आणि प्रत्येक मतदार मत देण्यायोग्य फोर्कचा वेगळा संच पाहू शकतो. सरतेशेवटी निवडलेले फोर्क क्लस्टरसाठी केंद्रिभूत झाले पाहिजेत.
- पुरस्कार-आधारित मतांना एक संलग्न धोका असतो. ते किती धोका पत्करू शकतात याचा अंदाज घेण्याची क्षमता मतदारांमध्ये असली पाहिजे.
- रोलबॅकचा खर्च मोजता येण्याजोगा असला पाहिजे. सातत्याच्या काही मापनीय प्रकारावर अवलंबून राहणाऱ्या ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे आहे.
- विविध नोडमध्ये ASIC वेग वेगवेगळे आहेत आणि क्लस्टरच्या उर्वरित भागांपेक्षा खूपच जास्त असणारे प्रुफ ऑफ हिस्टरी ASIC आक्रमक वापरू शकतात. प्रुफ ऑफ हिस्टरी ASIC तील वेगातील परिवर्तनशीलतेचा गैरफायदा घेणाऱ्या आक्रमणास कन्सेन्ससचे रोधक असणे आवश्यक आहे.
एक लोकप्रिय मल्टिचेन इंटरऑपरेबिलिटी प्लॅटफॉर्म अशा लूम नेटवर्कचा सह-उपक्रम म्हणून सोलाना लॅब्जची मूलत: स्थापना करण्यात आली होती. आधीच्या नावाशी गैरसमज टाळण्यासाठी सन 2019 मध्ये सोलाना लॅब्ज म्हणून त्याचा नवीन ब्रॅंड बनवण्यात अला. मार्च 2020 मध्ये कंपनीचा बीटा मेननेट प्रस्तुत करण्यात आला.
सोलानाची घोडेदौड का चालू आहे?
तुम्ही बारकाईने पाहता तेव्हा ते बरेच स्पष्ट होते. सोलाना जी नावीन्यपूर्ण संशोधने देते ती गुंतवणूकदारासाठी खूप आनंददायक असतात.
सोलाना ही पहिली वेब-स्केल ब्लॉकचेन आहे जी अधिक वेगाने व्यवहार नोंदवण्यासाठी PoH व टॉवर BFT वापरते. सध्या. बिटकॉइन दर सेकंदात 5 ते 7 व्यवहार हाताळते (TPS), व इथेरियम 25 TPS. यांच्या तुलनेत, सोलाना 50k वेगाचा अभिमान बाळगते ज्यामुळे तो इथेरियमचा अधिक चांगला पर्याय होते. सोलानाचा सरासरी ब्लॉक अवधी 600 मिलीसेकंद आहे – ब्लॉकचेनवर एक नवीन ब्लॉक निर्माण करण्यासाठी लागणारा हा वेळ आहे.
त्यांचा उच्च-कामगिरी प्रोटोकॉल, क्रांतिकारक काळ रेकॉर्डिंग आर्किटेक्चरची अंमलबजावणी आणि इतर ब्लॉकचेनच्या तुलनेत अधिक कार्यक्षम कन्सेन्सस मॉडेलद्वारे स्केलेबिलिटी आणि वेगाच्या समस्या सोडवण्याचे सोलानाचे उद्दिष्ट आहे. सोलानास हे जगातील सर्वात वेगवान स्तर-1 नेटवर्क बनवते. विकेंद्रीकरण, सुरक्षितता आणि स्केलेबिलिटी- विकेंद्रीकरण नेटवर्कच्या या तिन्ही गुणधर्मांसाठी पात्र ठरून ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील तिन्ही समस्या सोडवणे हे सोलानाचे अंतिम उद्दिष्ट आहे. सोलानाची महत्त्वाची आठ नावीन्यपूर्ण संशोधने हे साध्य करतात.
त्यास उठून दाखवणारी महत्त्वाची आठ नावीन्यपूर्ण संशोधने खाली दिली आहेत.
- प्रुफ ऑफ हिस्टरी (PoH)
PoH ही कन्सेन्सस यंत्रणा नाही: त्या ऐवजी हे एक क्रिप्टोग्राफिक घड्याळ आहे ज्या द्वारे एकमेकांशी संवाद न साधता एका कालक्रमावर सहमत होण्यासाठी नोडना सक्षम करते. प्रत्येक नोडचे स्वत:चे क्रिप्टोग्राफिक घड्याळ असल्याने हे शक्य होते.
- टॉवर BFT
सोलानाचे टॉवर BFT हे एक प्रगत व्यावहारिक बायझेन्टाइन फॉल्ट टॉलरन्स (pBFT) अल्गोरिदम आहे जे PoH सह अखंडपणे काम करते. नोडमधील अनेक संदेशांतून न जाता सहमती मिळव्ण्यासाठी क्रिप्टोग्राफिक घड्याळाचा फायदा घेऊन ते आपला वेग प्राप्त करते.
- टर्बाईन
हा एक ब्लॉक प्रोपगेशन प्रोटोकॉल आहे जो डेटांचे लहान भाग करतो ज्यामुळे नोडसाठी हे सोपे होते. या मुळे प्रक्रियेची शक्ती आणि नेटवर्कचा व्यवहाराचा एकंदर वेग वाढतात.
- गल्फ स्ट्रीम/आखात प्रवाह
सोलानास 50,000 TPS पर्यंत पोहोचण्यासाठी गल्फ स्ट्रीम हा मेमपूल-रहित व्यवहार फॉरवर्डिंग प्रोटोकॉल आहे. त्यामुळे नेटवर्क प्रमीणकरणर्ते वेळेआधी व्यवहार पूर्ण करू शकतात आणि अशा प्रकारे वेग वाढतो.
- सीलेव्हल
सीलेव्हल हे समांतर व्यवहार इंजिन असून ते एकाच चेनवर एकाच वेळी डेटावर प्रक्रिया करते. ते सोलानास GPUs व SSDs वर आडव्या पातळीवर स्केल करण्यास सक्षम बनवते.
- पाईपलाइनिंग
प्रक्रियेसाठी एका वेगळ्या हार्डवेअरला इनपुट डेटाचा स्ट्रीम असाईन करण्याच्या प्रक्रियेस पाइपलाइनिंग असे म्हणण्यात येते. प्रमीणकरण इष्टतमीकरणासाठी ते व्यवहार प्रक्रिया एकक म्हणून आम करते.
- क्लाऊडब्रेक
खात्यांचा मागोवा ठेवण्यासाठी ठेवलेली मेमरी, आकार आणि ॲक्सेस वेगांसाठी लगेच अडचण होते. एसएसडीच्या कॉन्फिगरेशनमध्ये पसरलेल्या एकाच वेळेस वाचन व लेखनासाठी सानुकूल केलेले स्टेट आर्किटेक्चर म्हणजे क्लाऊडब्रेक.
- अर्कायव्हर्स
ब्लॉकचेन नेटवर्कवर डेटा संग्रहण केल्याने ते त्वरेने प्राथमिक केंद्रीकरण व्हेक्टर बनू शकते. हे अगदी पहिली विकेंद्रीकरणाची कल्पना मोडकळीस आणते आणि म्हणून अर्कायव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोडच्या नेटवर्कवर सोलानाच्या व्हॅलिडेटर्सकडून डेटा संग्रहण काढून घेतला जातो.
सोलाना स्थानिक टोकन – SOL
बहुतेक स्मार्ट टोकन प्लॅटफॉर्मप्रमाणेच, सर्व ऑन-चेन व्यवहारांची पेमेंट करण्यासाठी त्यांचे गॅस टोकन म्हणून सोलाना एसओएलचा वापर करते. सप्टेंबर 2021 मधील स्थितीप्रमाणे, इथेरियमचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी मानल्या गेलेले एसओएल सातव्या क्रमांकावर आहे, दहा सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सींच्या शिडीवर त्याने स्थान ग्रहण केले आहे. इथेरियम देखील प्रुफ ऑफ स्टेक मॉडेलइथेरियम 2.0वर स्थलांतर करत आहे हे लक्षात घेता, अशा तंत्रज्ञानात बाजारपेठेचे स्वारस्य वाढत आहे आणि सोलाना आता त्या आघाडीवर आहे हे नक्कीच उपयुक्त आहे, या मोठ्या स्थलांतराचा लाभ घेत ते एसओएलला आकाशात पाठवत आहे!
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.