Skip to main content

क्रिप्टोसंबंधित, टाळावा असा सर्वात वाईट सल्ला (The Worst Crypto Advice to Avoid)

By एप्रिल 15, 2022एप्रिल 19th, 20224 minute read

क्रिप्टो जगात तुम्ही नवशिके असा किंवा पारंगत, एखाददुसर्‍या वेळेस तुम्हाला काही तोटे झालेले असतीलच. हा शिकण्याचा अविभाज्य घटक आहे परंतु लक्षणीय प्रमाणात तोटा सहन न करता तुम्ही शिकू शकलात तर?  क्रिप्टो करन्सी किंवा इतर ब्लॉकचेन संपत्तीचा व्यापार करताना काय करू नये याचे उदाहरण म्हणून क्रिप्टोतील काही सर्वात वाईट सल्ल्यांकडे आपण पाहूया

सर्वात उच्च स्तरावर असताना खरेदी

वर असताना किंवा सर्वोच्च स्तर/एटीच- ATH (ऑल टाइम हाय)वर असताना कॉइन खरेदी करणे ही घोडचूक असून त्याचा परिणाम नक्कीच तोट्यात होईल.  तुम्हा किंमती वाढताना पाहिल्या आणि आपण या संधीस मुकणार/फियर ऑफ मिसिंग आऊट (एफओएमओ/फोमो)ची भावना वाटली किंवा ज्यांच्या कडे आधीच ते कॉइन आहे अशांचे सांगणे तुम्हाला पटले -आणि तुम्हाला खरेदी करण्यास देखील सांगितले, तेव्हा हे घडू शकते.  जेव्हा किंमत कोसळते, तेव्हा तुमचा तोटा किमान 30 ते 40% टक्क्यापर्यंत देखील सहज जाऊ शकतो.  सर्वात वरचा स्तर कोणता हे तुम्हाला माहित नसू शकते अन नक्कीच हे शक्य आहे परंतु कोणत्याही सक्षम गुंतवणूक सल्ल्यानेपैसा कमावणे व पैसा गमावणे या पैकी पैसा न गमावण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

या चूक निस्तरण्यासाठी, तुम्ही करू शकाल अशा काही गोष्टी येथे आहेत:

  • WazirX सारख्या एक्स्चेंजवर असणारे कॉइनचे आर्थिक चार्ट्स उघडा.
  • सध्याची खूप वाढलेली किंमत टिकणार आहे का याची खात्री करा. किंमतीची कर्व्ह पॅरॅबोलिक असली तर ती वाढ नैसर्गिक असण्याची शक्यता फार कमी आहे आणि ते कॉइन पुन्हा एटीच स्तरावर पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे.  
  • सरळ रेषीय/लिनियर किंमत वाढीच्या बाबतीत, तुमचा तोटा कमीत कमी करण्याची थोडीशी आशा अजूनही असू शकते आणि लाभ देखील होऊ शकतो. विकण्यासाठी स्वीकार्य किंमत तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही फक्त वाट पहायची व चार्ट्स तपासत रहायचे आहे. 

अर्थात हे सांगतो तेवढे सोपे नाही. चार्ट्स अरोखर समजण्यासाठी, तुम्हाला कदाचित वझिरएक्स ब्लॉग/   WazirX blog वर जावे लागेल आणि क्रिप्टोच्या तांत्रिक विश्लेषणाबद्दल वाचावे लागेल.

via WazirX

मायक्रो-कॅप कॉइन्सची खरेदी

ते खूपचा स्वस्त आहे किंवा एखाद्या व्यक्ती किंवा समूहाकडून प्रशस्तीप्राप्त आहे म्हणून एखादे कॉइन खरेदी करणे ही बाळबोध चूक आहे. या प्रकारातील बहुतेक कॉइन्स निरुपयोगी तरी असतात किंवा त्यांचा मर्यादित उपयोग असतो किंवा अगदी उत्तम परिस्थितीत देखील -त्यांनी आपली क्षमता अजून सिध्द केलेली नसते. ही चूक टाळण्यासाठी या टोकनच्या किंमतीऐवजी त्याचे मार्केट कॅप शोधा. क्रिप्टोची किंमत किती वाढू शकते हे त्याचे मार्केट कॅपच ठरवते.  

Get WazirX News First

* indicates required

वाढीच्या बाबतीत क्रिप्टोची क्षमता किती आहे हे कसे तपासावे याची तुम्हाला खात्री नसेल  तर त्याच कॉइन प्रकारातील इतर कॉइन्स तपासा आणि त्याची स्थिती काय आहे हे पाहण्याकरिता त्यांच्या दैनंदिन व्यापाराचा आकार, मार्केट कॅप आणि ऑनलाइन सहभाग यांची तुलना करा. 

प्रशस्तीच्या आधारे कॉइन विकत घेणे

फक्त एखाद्या सार्वजनिक व्यक्तीकडून प्रचार होत आहे म्हणून तुम्ही एका क्रिप्टोकरन्सी मध्ये कधीही गुंतवणूक करू नये. मार्केटला होणार्‍या पुरवठ्याच्या एका मोठ्या भागाची मालकी त्यांची असण्याची बरीच शक्यता असू शकते. त्यांच्या मालकीचे कॉइन बर्‍याच लोकांनी खरेदी केले तर सार्वजनिक व्यक्ती त्यांच्या कॉइन्सच्या किंमती फुगवून व जाहिरात करून, वाढवून विकण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि बराचसा नफा कमावू शकतात आणि या व्यवहारात नियमित गुंतवणूकदारांचा खूप तोटा होऊ शकतो .

प्रसिध्द लोकांकडून फुगवून व जाहिरात केली जाणारी सर्व कॉइन्स टाळा कारण चांगली कामगिरी करण्यासाठी उच्च दर्ज्याच्या कॉइन्सना जाहिरातीची गरज नसते.  खरेदी करण्यापूर्वी कॉइनचे श्वेतपत्र/माहितीपत्र व कामगिरी बद्दल वाचण्याची सवय केव्हाही चांगली आणि ही सवय  होणार्‍या फसवेगिरीचे सावज बनण्यापासून तुम्हाला वाचवते. 

सोशल मिडिया/समाज माध्यमाच्या आधारे एक कॉइन खरेदी करणे

कधीही तुम्ही कदाचित न ऐकलेल्या किंवा त्यांच्या वापराबद्दलच्या अत्यंत वाईट प्रकाराचे वर्णन करणारी जाहिरात करणारी अनेक पाने रेडिट, ट्विटर आणि इन्स्टाग्रॅमवर भरली आहेत. तुम्ही बराच काळ ती राखून ठेवली तर त्यांच्या किंमती ’गगनास भिडतील’ अशी वक्तव्ये देखील अनेकदा करतात. एखाद्या कॉइनची फसवी जाहिरात करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस त्याच्या विकसकाकडून पैसे तरी दिले जातात किंवा त्याने त्या कॉइनमध्ये खूप पैसा व वेळ गुंतवलेला असतो हे लक्षात असू द्या आणि याची परिणिती त्याच्या बाजूने अवास्तव पूर्वग्रह निर्माण होतो.  

सोशल मिडियावरील अशा प्रकारच्या गाजावाजास बळी न पडू नये म्हणून डीवायओआर/DYOR किंवा डु युवर ओन रिसर्च/Do Your Own Research(स्वत: संशोधन करा) . कोणत्याही कॉइनमध्ये भविष्यात चांगली क्षमता आहे का  की नवशिक्यांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारे हे कपटी प्रलोभन आहे हे जाणून घेण्यासाठी स्वत: संशोधन करणे हा हमखास उपाय आहे.

मार्केट कोसळण्याची अपेक्षा असल्याने विक्री करणे

काही वेळा अनुभवी व्यापारी देखील या चुकीस बळी पडतात. इक्विटी व क्रिप्टो या दोन्ही अर्थव्यवस्थेत मार्केट कोसळण्याची भिती सदोदित असते. मार्केटचे कोसळणे कायम तसेच रहात नाही ही गोष्ट लोक नेहमी विसरतात.  लगेच किंवा काही वेळाने किंमती फुगतात. अशा परिस्थितीत टिकून राहणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. किंवा किमान पक्षी तळाच्या किंमतीवर विकू नये.  

आपल्या सर्वांना माहित आहे की मार्केटचा अंदाज घेणे कठीण आहे. युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यामुळे प्रचंड प्रमाणात मार्केट कोसळण्याची भिती व्यक्त केली जात होती. दुसर्‍याच दिवशी ही भिती फोल ठरली कारण खाली जाण्याऐवजी  मार्केट्स प्रत्यक्षात वधारली

बेधडक प्रवेश करणे

पोर्टफोलियोत वैविध्य नसणे आणि सर्व पैसा एकाच कॉइनमध्ये गुंतवणे ही सर्वात मोठी चूक ठरते. हे फक्त  क्वचितच एका वेळी यशस्वी झाले तरी, असे नेहमीच घडत नाही आणि ही अत्यंत वाईट कल्पना आहे. एकाच कॉइनमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करणे ही मोठी जोखिम आहे आणि एक लहानसा खळगा तुमच्या नफ्याचा मोठा हिस्सा गिळंकृत करू शकते.   

हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या पोर्टफोलियोत वैविध्य आणणे. क्रिप्टो पोर्टफोलियोमध्ये वैविध्य आणणे हा चाणाक्ष मार्ग आहे आणि कोणतेही एक क्रिप्टो खाली गेले तर तुमचा तोटा कमी करण्यात याची मदत होते.

निष्कर्ष

“क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना न करायच्या गोष्टीं”ची यादी पाहिल्यानंतर, ते कितीही काळ व्यापार करत असले तरीही, क्रिप्टो व्यापारी ज्या सामान्य चुका करतो त्याबद्दल तुम्ही थोडे अधिक जागरूक व्हाल अशी आशा आहे.  या माहितीसह सुसज्ज होऊन तुम्ही यानंतर कोणत्या कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात?

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply