WazirX P2P (पीअर टू पीअर) गुंतवणूकदारांना त्यांचे फियाट क्रिप्टोमध्ये (आणि याच्या उलट) ताबडतोब रुपांतरित करण्यात मदत करते. हे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्याच बरोबर सुरक्षित व कायदेशीर तसेच 24×7 उपलब्ध असते!! WazirX P2P कसे वापरायचे हे जाणून घेण्यासाठी, आमचा ब्लॉग येथे वाचा.
युझर्स नेहमी विचारतात ते प्रश्न येथे दिले आहेत. तुम्हाला काही शंका असतील तर ही पोस्ट त्या दूर करेल याबद्दल मला खात्री आहे.
प्रश्न 1: WazirX P2P ला केवळ यूएसडीटी (USDT) का आहे?
यूएसडीटी (USDT) हे स्थिर कॉइन आहे. व्यवहार साधा ठेवण्यासाठी आणि उच्च तरलता सुनिश्चित करण्यासाठी केवळ यूएसडीटीला (USDT) समर्थन दिले जाते.
प्रश्न 2: WazirX P2P कोण वापरू शकतात?
भारतीय केवायसी (KYC) असलेले युझर्स WazirX वरील P2P वैशिष्ट्य वापरू शकतात.
प्रश्न 3: मला विक्रेत्याचे बँक तपशील पाहता येत नाहीत आणि ट्रेड 10 मिनिटांमध्ये आपोआप रद्द होत आहे. काय करावे?
येथे तुम्ही आधी पेमेंटचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुमचा ट्रेड जुळल्यावर “येस, आय विल पे” पर्यायावर क्लिक करा. तुम्ही “येस, आय विल पे”वर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला विक्रेत्याचे बँक तपशील दिसतील. या तपशीलांच्या आधारावर तुम्ही पेमेंटसह पुढे जाऊ शकता.
प्रश्न 4: मला विक्रेत्याच्या बँक खात्यात फंड्स हस्तांतरित करता येत नाहीत कारण तपशील चुकीचे आहेत/ अयशस्वी होत आहे/ बँकिंगच्या समस्या/ नेटवर्क समस्या.
तुम्हाला ऑर्डर रद्द करण्यासाठी आणि दंड माफ करण्यासाठी चॅटच्या माध्यमातून आमच्या सहाय्यक टीमपर्यंत पोहोचावे लागेल. सहाय्यक टीम तुम्हाला खरेखुरे अपयश प्रमाणित करण्यासाठी स्क्रीनशॉट्स/पुरावे शेअर करायला सांगेल. पर्यायाने, एकदा ट्रेड आपोआप रद्द झाला की (वेळ संपल्यावर) तुम्हाला दंडाचा ईमेल मिळेल. तुम्ही योग्य पुराव्यासह या ईमेलला उत्तर देऊ शकता. खात्री पटली तर आमची टीम दंड मागे घेईल.
प्रश्न 5: तुम्ही पेमेंट केले पण ‘आय हॅव पेड’वर क्लिक करायचे विसरलात तर काय करायचे?
‘रेझ डिस्प्युट/विवाद उपस्थित करा’ पर्यायावर क्लिक करण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे असतील. एकदा तुम्ही वाद उपस्थित केलात की, तुम्हाला आमच्या डिस्प्युट टीमकडून तातडीने पेमेंटचा पुरावा देण्याची विनंती करणारा ईमेल येईल. त्यानंतर पुढील 15 मिनिटांच्या आत, ईमेलमध्ये नमूद केलेल्या सूचनांचे पालन करत, कृपया चॅटच्या माध्यमातून आमच्या सहाय्यक टीमशी संपर्क साधा. त्यानंतर डिस्प्युट टीम इतर तपशीलांसह तुमच्या पेमेंट पुराव्याचे पुनरावलोकन करेल आणि तुमच्या वादावर अंतिम निर्णय घेईल. डिस्प्युट टीमचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो आणि तो मागे घेता येत नाही.
कृपया नोंद घ्या: आमची मल्टी-चेक फुल-प्रूफ/बहु-चाचणी त्रुटी मुक्त प्रक्रिया आहे, जी विवादाचे पुनरावलोकन करताना संपूर्ण अचुकतेची सुनिश्चिती करते.
प्रश्न 6: खरेदीदार ट्रेडची पुष्टी करण्याऐवजी ट्रेड रद्द करतो तेव्हा WazirX P2P वर व्यवहार अयशस्वी झाला तर (फंडांची) पुनर्प्राप्ती कशी होते?
खरेदीदार पेमेंट करतो आणि त्यानंतर व्यवहार रद्द करतो, तेव्हा आम्ही खरेदीदाराच्या व्यवहाराचे तपशील विक्रेत्याबरोबर शेअर करतो आणि त्यांना खरेदीदाराला पेमेंट परत करायला सांगतो. खरेदीदाराला त्याचे फंड्स परत मिळतील याची सुनिश्चिती करण्यासाठी, आम्ही विक्रेत्याचे फंड आणि/किंवा खाते लॉक करतो आणि पेमेंट पुराव्यासह सर्व माहिती ईमेल करतो. आम्ही 24 तासातून एकदा याप्रमाणे विक्रेत्याला एकूण 3 स्मरणपत्रे पाठवतो. 3 ऱ्या आणि अंतिम स्मरणपत्रानंतर, आम्ही फंडाच्या पुनर्प्राप्तीची प्रक्रिया करतो, ज्याला 13 व्यवसाय दिवसापर्यंत कालावधी लागतो (मात्र जेव्हा फंड्स उपलब्ध असतात तेव्हाच हे काम करते).
प्रश्न 7: पेमेंट केल्यानंतरही माझा ट्रेड डिस्प्युट/विवादामध्ये हलवला आहे; काय करावे?
तुमचा ट्रेड अनेक कारणांमुळे डिस्प्युटमध्ये हलवला जाऊ शकतो. या बाबतीत, तुम्ही पेमेंटच्या पुराव्यासह आमच्या सहाय्यक टीमशी चॅटच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. तुमचे फंड्स सुरक्षित राहतील याची खात्री बाळगा.
प्रश्न 8: मी एक विक्रेता/खरेदीदार आहे, आणि मला अज्ञात विक्रेते/खरेदीदारांशी ऑटो-मॅट व्हायचे नाही. काय करावे?
जर तुम्हाला विशेष कोणाबरोबर तुमच्या क्रिप्टोंचा व्यापार करायला आवडणार असेल, तर तुम्ही त्यांचे XID पहिल्या पायरीतच जोडू शकता. XID हे युझरनेमसारखे काम करते! यामुळे, विक्रेता/खरेदीदार तुमच्या पसंतीचा असेल, आणि त्या विशिष्ट व्यवहारादरम्यान तुम्ही इतर कोणाबरोबरही मॅच होणार नाही.
प्रश्न 9: मी एका दिवसात किती संख्येने/मूल्याचे P2P व्यवहार करू शकतो यावर काही दैनंदिन मर्यादा आहे का?
नाही! तुम्ही एका दिवसात WazirX वर कितीही P2P व्यवहार करू शकता. मात्र, तुमच्या बँकेच्या काही विशिष्ट मर्यादा असू शकतात, ज्यांचे तुम्हाला पालन करावे लागेल.
प्रश्न 10: मी एक खरेदीदार आहे. पेमेंट केल्यानंतर, माझा व्यवहार ‘प्रोसेसिंग’मध्ये अडकला आहे. मी काय करावे? फंड वजा झाले आहेत की नाहीत ते मला माहित नाही.
तुम्ही पेमेंट करता पण पेमेंटची स्थिती ‘प्रोसेसिंग’ अशी दाखवते, तेव्हा तुम्ही वझिरएक्स वर ‘येस, आय हॅव पेड’वर क्लिक करू शकता आणि पेमेंट (प्रोसेसिंग) चा पुरावा जोडू शकता आणि विक्रेत्याने पेमेंट प्राप्त झाल्याची पुष्टी करण्याची प्रतीक्षा करू शकता. जर विक्रेत्याला पेमेंट प्राप्त झाले तर व्यवहार पुढे जाईल. जर पेमेंट रद्द झाले तर, तुम्ही आमच्या सहाय्यक टीमशी चॅटच्या माध्यमातून संपर्क साधू शकता, आणि आम्ही तुमच्यासाठी ऑर्डर रद्द करू आणि ही खरीखुरी त्रुटी असल्यामुळे दंडदेखील परत करू.
अधिक चांगला आढावा घेण्यासाठी, WazirX द्वारे P2P वरील हा व्हिडिओ पाहा.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.