Table of Contents
नमस्ते मित्रांनो! 🙏
Merit Circle WazirX वर सूचीबद्ध करण्यात आले आहे आणि तुम्ही यूएसडीटी (USDT) बाजारपेठेत एमसी खरेदी, विक्री, व्यापार करू शकता.
एमसी/यूएसडीटी (MC/USDT) WazirX वर लाईव्ह ट्रेडिंग होत आहे! हे शेअर करा
एमसी जमा करणे आणि काढून घेणे याबद्दल काय?
Merit Circle हा आमच्या रॅपिड लिस्टिंग इनिशिएटिव्हचा भाग आहे. त्यामुळे आपण एमसीच्या (MC) ठेवी बायनान्सद्वारे WazirX वर जमा करणे शक्य करून त्याचे ट्रेडिंग सुरू करू.
त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे?
- जमा — तुम्ही एमसी (MC) बायनान्स वॉलेटमधून वझिरएक्सवर जमा करू शकता.
- ट्रेडिंग — तुम्ही आमच्या यूएसडीटी (USDT) बाजारपेठेत एमसी (MC) खरेदी, विक्री, व्यापार करू शकता, ते तुमच्या “फंड्स” मध्ये दिसून येईल.
- काढून घेणे — तुम्हाला एमसी (MC) सूचीबद्ध केल्यानंतर काही दिवसांनंतर काढून घेता येतील.
MC बद्दल
Merit Circle ही जिंकण्यासाठी खेळा (प्ले-टू-अर्न) अर्थव्यवस्था विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी विकेंद्रित स्वायत्त संस्था आहे. जिथे वापरकर्त्यांना स्वतःला आवडणाऱ्या खेळाकडे केवळ छंद म्हणून न पाहता त्यांना ते खेळ खेळून पैसे कमावता येतील अशा प्रकारच्या गेम प्लेचे नवीन युग निर्माण करण्याची या प्रकल्पाची इच्छा आहे. हा प्रकल्प 04 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झाला, पण तो जुलै 2021 पासून विकसित होत होता. मेरिट सर्कल सध्या अॅक्सी इन्फिनिटीला — सर्वाधिक व्हॉल्यूम ट्रेड होणाऱ्या सर्वात लोकप्रिय मॉन्स्टर-बॅटलिंग प्ले-टू-अर्न गेमला — समर्थन देते.
- ट्रेडिंग मूल्य (लिहिण्याच्या वेळी): $2.26 यूएसडी
- जागतिक मार्केट कॅप (लिहिण्याच्या वेळी): $98,202,264 यूएसडी
- जागतिक ट्रेडिंग व्हॉल्यूम (लिहिण्याच्या वेळी): $54,267,784 यूएसडी
- खेळता पुरवठा: 42,592,000.00 एमसी (MC)
- एकूण पुरवठा: 1,000,000,000 एमसी (MC)
तुमच्या मित्रांसोबर हे शेअर करा
ट्रेडिंगचा आनंद घ्या! 🚀
जोखमीचा इशारा: क्रिप्टो व्यापार उच्च बाजारपेठ जोखमीच्या अधीन आहे. नवीन सूचीबद्ध केलेल्या टोकन्सचे ट्रेडिंग करताना कृपया तुम्ही पुरेसे जोखीम मूल्यमापन केले असल्याची खात्री करा, कारण ते अनेकदा उच्च किंमत अस्थिरतेच्या अधीन असतात. वझिरएक्स उच्च-गुणवत्तेची कॉइन्स निवडण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण तुमच्या व्यापार नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.