Table of Contents
प्राइड मंथ लवकरच संपणार आहे. LGBTQ+ समुदायाचे दृढ समर्थक म्हणून उदयास येण्यासाठी एनएफटी (NFT) उद्यमाने कोणताही प्रयत्न शिल्लक ठेवलेला नाही.
परंतु प्रश्न हा आहे: LGBTQ+ एनएफटी (NFT) कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला खरोखरच प्राइड मंथची वाट पाहण्याची गरज होती का? आपण संपूर्ण वर्षभर त्यांना समर्थन द्यायला नको का? हा प्राइड मंथ असल्यामुळे, तुम्ही पाठिंबा देऊ शकाल अशा काही LGBTQ+ एनएफटी (NFT) कलाकारांच्या सूची आम्ही एकत्र केल्या आहेत. आपण त्या पाहूया.
एनएफटी (NFT) उद्यम आणि LGBTQ+ समुदाय
एनएफटी (NFT) उद्यमाने LGBTQ+ समुदायासह सर्व पार्श्वभूमीच्या कलाकारांना एक सर्वसमावेशक वातावरण देण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल प्रसंशा मिळवली आहे. असे असून ही LGBTQ+एनएफटी (NFT) कलाकारांचे या क्षेत्रात खूप कमी प्रतिनिधित्व आहे ही खेदाची गोष्ट आहे. हा फक्त काही तरुण मुलांचा समूह आहे ही सध्याची प्रतिमा दूर सारून या उद्यमाने बराच दूरचा पल्ला गाठला आहे. या वातावरणात सध्याच्या LGBTQ+ कलाकारांना पाठिंबा आणि नवोदितांना संधी उपलब्ध करून देण्याची जबबादीर संपूर्ण एनएफटी (NFT) समुदायाची आहे.
म्हणूनच, ही मोहीम सुरू करण्यासाठी, तुम्ही पाठिंबा देऊ शकता असे प्राइड मंथचे 10 LGBTQ+ एनएफटी (NFT) कलाकार कोण आहेत ते आपण पाहूया.
- सॅम ऑगस्ट एन्जी – देबलून्स (TheyBalloons)
देबलून्स (TheyBalloons) या नावाने देखील ओळखले जाणारे डिजिटल संकल्पनात्मक कलाकार सॅम ऑगस्ट एन्जी हे स्वत:ची ओळख नॉन-बायनरी अशी करून देतात. हे लंडन स्थित कलाकार, वेब3 मधील नियो-एक्प्रेशनिझम पुन:संशोधित करण्यासाठी ग्लिच-आर्ट्स, 3डी आणि चैतन्यपूर्ण छटांचा वापर करतात.
मेटाव्ह्रर्स मधील सर्वात मोठी प्राइड परेड, क्वीयर फ्रेन्सची सह-स्थापना देबलून्सने (TheyBalloons) केली होती. एनएफटी (NFT) समुदायात समावेश आणि भिन्नतेस प्रोत्साहन देणे हा मार्च 2022 मध्ये रिलीज झालेल्या या कलेक्शनमधील 10,000 क्वियर फ्रॉग्सचा हेतू होता.
2. झॅक क्रेविट – म्युझियम ऑफ क्वियर
झॅक क्रेविट हे दीर्घ काळापासून LGBTQ+ समूहाचे समर्थक आहेत. दहा वर्षांहून अधिक काळापासून ते स्वतःच्या समलिंगी समुदायाच्या अनेक भिन्न समस्या सोडवण्यासाठी आणि निधी उभारण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या कलेत त्यांच्या सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही, प्रत्यक्ष अनुभवांचे प्रतिबिंब आणि समलिंगी पुरस्काराबद्दल त्यांचे प्रेम उमटते.
न्यूयॉर्क शहरातील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्सच्या फोटो ॲन्ड व्हिडिओ विभागात, जोसेफ मैडा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेविट हे प्राध्यापक आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी कृती, साहस, समुदाय आणि सृजनात्मक विकास याची जाणीव विकसित करावी अशी त्यांची इच्छा आहे.
3. टालिया रोसा अब्रो
टालिया रोसा अब्रो या ग्राफिक डिझायनर आणि डिजिटल आर्टिस्ट आहेत, त्या 2डी आणि 3 डी आर्ट तसेच डिझाइन्स आणि ब्रॅन्ड आयडेन्टिटीज निर्माण करण्यात पारंगत आहेत. त्या ट्रान्स-लॅटिना कलाकार आणि रुनिक ग्लोरी एनएफटी (NFT) प्रकल्पाच्या कला निर्देशिका आहेत. तसेच त्या फॉरेस्ट हार्ट प्रकल्प या समुदाय-संचलित ऑनलाइन व्हिडिओ गेम प्रकल्पाच्या निर्मात्या आणि संस्थापिकादेखील आहेत.
4. डायना सिंक्लेयर – हर स्टोरी डीएओ (DAO)
न्यूजर्सी/न्यूयॉर्क सिटी येथील डायना सिंक्लेर या ब्लॅक क्वियर फोटोग्राफर आणि कलाकार आहेत ज्या आयडेन्टिटीचे अन्वेषण आणि अभिव्यक्ती यांवर लक्ष केंद्रित करतात. डायना या भिन्नतेस प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एनएफटी (NFT) उद्यमात थोर प्रवर्तक आहेत. त्यांना मिळणारे समर्थन वाढत आहे आणि त्यांच्या कलात्मक कारकीर्दीबरोबरच जगावर त्याचा प्रभाव पडला आहे.
आपल्या कलाकृतींत क्वीयर, ट्रान्स आणि ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर यांचा समावेश करण्याचा किंवा या समस्यांना पाठिंबा देणारे इतर उपक्रम सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे अलिकडेच त्यांनी @herstorydao, या डीएओची (DAO) सहस्थापना केली, मेटाव्हर्समध्ये अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या घटकांची कला व संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि त्यांचा उत्सव साजरा करणे हे या डीएओचे (DAO) उद्दिष्ट आहे.
5. डॉ. ब्रिटनी जोन्स – क्वियर फ्रेन्ड्स एनएफटी (NFT)
क्वियर फ्रेन्ड्स एनएफटी (NFT) प्रकल्प डॉ. ब्रिटनी जोन्स यांनी द्वारे विकसित, व्यवस्थापित व सह-प्रस्थापित केला. जोन्स या द्विलिंगी सागरी जीवशास्त्रज्ञ असून त्या विविध खेळ खेळतात आणि डॉल्फिन संभाषणाच्या अध्ययनातील तज्ज्ञ आहेत. यापूर्वी त्या तरुण मुलींना विज्ञान व स्टीम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, आर्ट्स आणि मॅथ्स/विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि गणित) हे विषय डिजिटल आर्टच्या माध्यमातून शिकवत असत.
6. पापीकॅन्डल्झ – द क्रिप्टोकॅन्डल्झ (PapiCandlez – The CryptoCandlez)
पापीकॅन्डल्झ (PapiCandlez) – हे समलिंगी इलस्ट्रेटर आणि ॲनिमेटर लॉस एंजेलिस येथे स्थित आहेत. त्यांनी ओपनसीवर (OpenSea) नुकताच दक्रिप्टोकॅंडल्झ (TheCryptoCandlez ) हा संग्रह रिलीज केला. या संग्रहात विविध आकर्षक स्वरूपातील एकूण 103 मेणबत्त्यांचा समावेश आहे.
7. जेस्सी सोलैल
जेस्सी सोलैल हे 2डी व 3 डी कलाकार आहेत ज्यांनी क्रिप्टोमधील त्यांच्या कारकीर्दीत 17 अद्वितीय एनएफटी (NFTs) विकले आहेत. जेस्सी जे करताक त्यांना ते “डिजिटल थेरपी” असे म्हणतात. आमच्यासाठी त्यांच्या मनात काय आहे याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत ते आता कारण एनएफटी (NFT) समुदायाचा महत्त्वाचा भाग झाले आहेत.
8. स्टेसी ए बुहलर – अग्ली बर्ट्स ॲंड बेटीज/Ugly Berts & Bettys
स्टेसी ए बुहलर या लॉस एंजेल्स स्थित फॅशन फोटोग्राफर आणि एनएफटी (NFT) कलाकार आहेत ज्या स्वतःच्या कामाचे वर्णन “आरामदायक, आनंददायक, मित्रत्वाचे आणि सर्वांना सहजप्राप्य” असे करतात. त्यांनी अग्ली एनएफ्टींची (NFTs) स्थापना केली, ज्यात अग्ली बेटीज आणि अग्ली बर्ट्स समाविष्ट आहेत. त्यांचा वैयक्तिक अनुभवानुसार, तुमची वेषभूषा आवडत नाही असे त्यांना सांगणारे पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या संग्रहासाठी प्रेरक ठरले.
मालिकेतील प्रत्येक एनएफटी (NFT) स्टेसी द्वारा डिजिटल माध्यमातून हाताने पेंट देखील करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे वर्णन असे आहे-
“हा एनएफटी (NFT) संग्रह मॉडेल भिन्नता आणि LGTBQ+ अधिकार आणि फॅशन उद्यमातील संपर्क यावर आधारित आहे”.
9. कॅथरिना (केट द कर्स्ड/Kate The Cursed)-ॲजेंडाओ/aGENDAdao
कॅथेरिना “केट द कर्स्ड” जेसेक या 23 वर्षाच्या न्यूयॉर्क येथील ट्रान्सजेंडर स्त्री आहेत कॅथेरिना या व्हिज्युअल कलाकार आहेत ज्या भविष्यासाठी सकारात्मक, सौंदर्यपूर्ण नॉस्टॅल्जिक निर्माण करण्यासाठी जुने कॅथोड रे टेलिव्हिजन्स आणि समकालीन आणि ऐतिहासिक डिजिटल सामग्री वापरतात.
10. वंशिका ध्यानी – द देसी दुल्हन क्लब
वंशिका ध्यानी या आशियन, द्विलिंगी आणि न्यूरोडायव्हर्जंट कलाकार आहेत. बालविवाह, हुंडाबळी, प्रतिष्ठेच्या नावावर हत्या आणि स्त्रीभ्रूणहत्या या दक्षिण अशियातील घटनांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी देसी दुल्हन क्लब एनएफटी (NFT) संग्रहाची स्थापना केली.
त्यांनी हा उपक्रम आपल्या आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केला, त्यांचा वयाच्या 13 व्या वर्षी विवाह करण्यात आला होता. या व्यतिरिक्त, “देसी दुल्हन” याच मालिकेत, दक्षिण आशियात स्त्रियांना कशा प्रकारे चूप केले जाते याचे प्रतिक म्हणून शिवलेले ओठ दर्शवले आहेत. या विपरित, यातील डोळे “हेडलाइट समोर आलेल्या हरिणासारखे” आहेत जे “घाबरलेले व कावरेबावरे” रूप दर्शवतात
ध्यानींच्या म्हणण्याप्रमाणे, या संग्रहाचा उद्देश महिलांच्या उत्थान, सक्षमीकरण आणि शिक्षणासाठी व्यक्तींना दक्षिण आशियातील युनिसेफचे स्वयंसेवक बनण्याठी प्रेरित करणे हा आहे.
मुख्य मुद्दा
या लेखात फक्त काहीच एनएफटी (NFT) कलाकारदाखवण्यात आले आहेत, तर संपूर्ण जगभरात इतर अनेक विस्मयकारक कलाकार आहेत. याव्यतिरिक्त, या प्राइड मंथ व बियाँड मध्ये तुम्ही विविध LGBTQ+ एनएफटी (NFT) कलाकारांना पाठिंबा देऊ शकता. म्हणूनच, कशाचीही वाट पाहू नका, पुढे या आणि तुमचे प्रेम व पाठिंबा दाखवा!
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.