क्रिप्टोवर टीडीएस (TDS) सोपे करण्यात आले

By जून 24, 2022ऑगस्ट 10th, 20224 minute read
TDS on Crypto Simplified

वित्त विधेयक 2022 ने व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सच्या (VDA) हस्तांतरणासाठी चुकत्या केलेल्या कोणत्याही मोबदल्यावर 1% टीडीएस (TDS) आकारण्यासाठी, आयकर कायदा, 1961 मध्ये 194 एस नावाचा एक नवा विभाग सादर करण्यात आला आहे. साध्या शब्दात, जेव्हा तुम्ही कोणतेही क्रिप्टो (क्रिप्टोस VDA मानले जाते) खरेदी करता तेव्हा टीडीएस (TDS) म्हणून तुम्हाला अथवा (या व्यवहारास सुविधा पुरवणाऱ्या एक्स्चेंजला) व्यवहाराच्या मूल्यातून 1% रक्कम वजा आणि स्थगित करावी लागेल. ही रोखून धरलेली केलेली रक्कम नंतर सरकारकडे जमा करावी लागेल.

आणखी तपशीलात जाण्यापूर्वी, तुमच्यासाठी येथे एक चांगली बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) स्पष्ट केले आहे की एका एक्स्चेंजद्वारा कोणीही क्रिप्टो खरेदी करत असेल (पी2पी व्यवहारांच्या संदर्भात देखील) तेव्हा एक्स्चेंजकडून विभाग 194एस अंतर्गत कर कापला जाऊ शकतो. 

हे आता सोपे झाले आहे: तांत्रिक दृष्ट्या, एक खरेदीदार किंवा विक्रेता म्ह्णून तुम्हाला काहीही करायचे नाही. आवश्यक असलेले सर्व काही WazirX करेल. तथापि, ही प्रक्रिया निर्विघ्न करण्यासाठी तुमचे समर्थन अपेक्षित आहे. WazirX मधील आम्ही, या यंत्रणेस समर्थन देण्यासाठी आमच्या प्रणाली अपग्रेड करत आहोत आणि याबद्दल तुम्हाला अवगत करू.

या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेताना तुमच्या मदतीसाठी येथे काही स्पष्टीकरणे सोदाहरण दिलेली आहेत.

 •  1 July 2022पासून लागू टीडीएस (TDS) तरतुदी. 1 जुलै 2022 पूर्वी पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यापारांवर या तरतुदींचा परिणाम होणार नाही. या तरतुदींनुसार, अन्य क्रिप्टो संपत्तीच्या बदल्यात जिथे एक क्रिप्टो संपत्ती एक्सचेंज करण्यात आलेली असेल तिथे INR मध्ये टीडीएस (TDS) कापण्यात येईल.

कृपया नोंद घ्या : तुम्ही 1 जुलै 2022 पूर्वी ऑर्डर्स दिलेल्या आहेत परंतु 1 जुलै 2022 नंतर व्यापार झाला असेल तर टीडीएस (TDS) लागू होईल.

 • INR वापरून क्रिप्टो खरेदी करणाऱ्या खरेदीदाराकडून कोणताही टीडीएस (TDS) कापण्यात यणार नाही, तर क्रिप्टो संपत्तीचा विक्रेता टीडीएस (TDS) चुकता करण्यासाठी जबाबदार असेल. तथापि, दुसऱ्या क्रिप्टो संपत्तीद्वारा जेव्हा क्रिप्टो संपत्ती खरेदी केली जाते , म्हणजेच एका क्रिप्टोच्या बदल्यात दुसऱ्या क्रिप्टोचा व्यापार केला तर उभय बाजूंनी टीडीएस (TDS) चुकता करावा लागेल. 
 • लागू असेल तेव्हा, प्राप्त व्हायचे INR किंवा क्रिप्टो रकमेतून 1% टीडीएस (TDS) कापण्यात येईल. तथापि, आयकर कायदा 1961 च्या विभाग 206एबी अंतर्गत, वापरकर्त्याने गेल्या 2 वर्षात त्याचा आयकर परतावा फाईल केला नसेल आणि याआधीच्या प्रत्येकी दोन वर्षात टीडीएसची (TDS) रक्कम रु 50,000 किंवा अधिक असेल तर कापला जाण्याचा टीडीएस (TDS) (क्रिप्टो संबंधित व्यवहारांसाठी) 5% दराने असेल. हे सोपे करण्यासाठी, या ब्लॉगच्या उर्वरित जागी, आम्ही टीडीएसचा (TDS) दर 1% वापरू,
 • जमा केलेला टीडीएस (TDS) आयकर विभागास INR च्या स्वरूपात भरायचा आहे. यासाठी, क्रिप्टोच्या स्वरूपात गोळा केलेला कोणताही टीडीएस (TDS) INR मध्ये रुपांतरित करायचा आहे. परिवर्तन सोपे करणासाठी व प्राइस स्लिपेज कमी करण्यासाठी, क्रिप्टो ते क्रिप्टो व्यवहारांच्या बाबतीत, क्रिप्टो संपत्तीच्या कोट (किंवा प्राथमिक) मध्ये दोन्ही पक्षांचा टीडीएस (TDS) कापला पाहिजे. WazirX मार्केट्स मध्ये 4 कोट ॲसेट्स आहेत – आयएनआर (INR), यूएसडीटी (USDT), बीटीसी (BTC) आणि डब्ल्यूआरएक्स (WRX). उदाहरणार्थ, खालील मार्केट्समध्ये: MATIC-BTC, ETH-BTC, आणि ADA-BTC, बीटीसी (BTC) ही कोट क्रिप्टो संपत्ती आहे आणि म्हणून या मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या खरेदीदार आणि विक्रेता या दोघांचाही टीडीएस (TDS) बीटीसी (BTC) मध्ये कापला जाईल.
 • उदाहरणे:
 • आयएनाअर मार्केट्स: 1 बीटीसी (BTC) हा 100 INR मध्ये ट्रेड केला गेला. बीटीसी (BTC) विक्रेत्यास 99 INR (1% टीडीएस (TDS) कपातीनंतर) मिळतात बीटीसी (BTC) खरेदीदारास 1 बीटीसी (BTC) मिळतो (कोणताही टीडीएस (TDS) कापला जात नाही)
 • क्रिप्टो-क्रिप्टो मार्केट्स: 1 बीटीसी (BTC) 10 इटीएच (ETH)ला (ETH) विकला जातो. 1.01 बीटीसी (BTC) चुकते करून (1% टीडीएस (TDS) जोडल्यानंतर) बीटीसी (BTC) विक्रेत्यास 10 इटीएच (ETH) मिळतात. बीटीसी (BTC) खरेदीदारास 0.99 बीटीसी (BTC) (1% टीडीएस (TDS) कपातीनंतर) मिळतात.
 • पी2पी व्यापारांत: यूएसडीटी (USDT) विक्री ऑर्डर देण्यापूर्वी 1% टीडीएस (TDS) कापला पाहिजे. पी2पी यूएसडीटी (USDT) खरेदीदाराने कोणताही टीडीएस (TDS) चुकता करणे गरजेचे नाही.
 • उदाहरणे:
 • 100 यूएसडीटी (USDT) विकण्याची ऑर्डर विक्रेता देतो. 1% टीडीएस (TDS) कपातीनंतर, 99 यूएसडीटी (USDT) साठी एक विक्री ऑर्डर दिली जाईल. खरेदीदार 99 यूएसडीटी (USDT) चुकते करेल आणि खरेदीदाराकडून विक्रेत्याच्या बॅंक खात्यात त्या नुसार INR हस्तांतरित केले जातील.
 • संपूर्ण 99 युएसडी टी यशस्वीपणे विकले गेले नाहीत तर फक्त विकल्या गेलेल्या राशीच्या प्रमाणातच 1% टीडीएस (TDS) कापला जाईल व ऑर्डर रद्द झाल्यानंतर टीडीएस (TDS) साठी लॉक केलेला 1 यूएसडीटी (USDT), विक्रेत्यास परत केला जाईल.
 • एक्चेंजद्वारा आकारण्यात आलेला जीएसटी/आकार वगळल्यानंतर देय ’निव्वळ’ मोबदल्यावर टीडीएस (TDS)ची गणना केली जाईल. 
 • क्रिप्टोमध्ये जमा केलेला कोणताही टीडीएस (TDS) वेळोवेळी INR मध्ये रुपांतरित केला जाईल आणि त्या संबंधित व्यापारांच्या बाबतीत प्राप्त INR मूल्य अद्ययावत केले जाईल.
 • व्यवहार आणखी पारदर्शक बनवण्यासाठी, व्यापार पूर्ण होताक्षणी ऑर्डर तपशील पृष्ठावर कापण्यात आलेला टीडीएस (TDS) निर्दिष्ट केला जाईल. कोणत्याही क्रिप्टो संपत्तीच्या स्वरूपात टीडीएस (TDS) कापला गेला आहे अशा प्रकरणांत, कापण्यात आलेल्या टीडीएस (TDS)चे सुसंगत INR मूल्य, 48 तासांनंतर व्यापार रिपोर्टमध्ये मिळू शकते.
 • एका ब्रोकर प्लॅटफॉर्मने WazirX वर केलेल्या व्यापाराच्या बाबतीत टीडीएस (TDS) लागू होणार नाही जर ब्रोकर स्वत:स टीडीएस (TDS) कापत असेल आणि हे निर्दिष्ट करण्याचा त्याचा WazirX समवेत योग्य करार असेल.

कृपया नोंद घ्या : सातत्य आणि लागू करण्यात सोपे असावे या उद्देशाने, आर्थिक वर्षात व्यापाराचा आकार कितीही असला तरीही सर्व वापरकर्त्यांसाठी, क्रिप्टो व्यापारांवर कर कापण्यासाठी वर वर्णन केलेला मार्ग लागू होईल.

सारांश

आम्हाला आशा आहे की टीडीएस (TDS) यंत्रणा समजून घेण्यात या लेखाची तुम्हाला मदत झाली असेल. तुमचा प्रवास अविरत होण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आणखी वाचन आणि शिकण्याची सामग्री शेअर करत राहू. तुम्हाला काही प्रश्न असतील, तर खालील कमेंट विभागात ते टाकण्यात संकोच बाळ्गू नका.

नेहमीप्रमाणेच आम्हाला समर्थन देणे चालू ठेवा.

व्यापाराचा आनंद लुटा!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply