Table of Contents
रोचक तथ्य: ब्लॉकचेन 2008 मध्ये पहिल्यांदा लाईव्ह झाली तेव्हा मायनिंगचे बक्षीस 50 बिटकॉईन (BTC) होते. त्यामध्ये 2,10,000 ब्लॉकची भर पडेपर्यंत हा पेआऊट बदलला नाही, त्यानंतर त्याचे दुभाजन झाले (निम्मे झाले). पुढील 2,10,000 ब्लॉकची भर पडल्यानंतर, या प्रक्रियेची पुनरावृत्ती करण्यात आली. याला बिटकॉईनचे दुभाजन असे म्हणतात.
बिटकॉईनचे दुभाजन ही दर चार वर्षांनी घडणारी सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक आहे आणि बिटकॉईन इकोसिस्टीममध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर त्याचे परिणाम होतात. आतापर्यंत तीन वेळा बिटकॉईन दुभाजनाचे प्रसंग आले आहेत (2012, 2016 आणि 2020 मध्ये), प्रत्येक वेळेला त्याची जोरदार चर्चा झाली. बिटकॉईन दुभाजन हा एकंदर पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी आभासी चलनाच्या प्रोग्रामिंगचा भाग आहे.
मात्र, बिटकॉईन दुभाजन म्हणजे नेमके काय आणि ते कसे काम करते यावर लक्ष केंद्रित करूया. याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी ते कसे काम करते हे शोधावे लागेल. चिंता करू नका; तुम्ही बिटकॉईनविषयी येथे वाचू शकता.
बिटकॉईनचे दुभाजन म्हणजे काय आहे?
बिटकॉईन नेटवर्क दर दहा मिनिटांनी नवीन बिटकॉईन्स तयार करत असते. अस्तित्वात आल्यानंतरची पहिली चार वर्षे दर दहा मिनिटांनी जारी केलेल्या नवीन बिटकॉईन्सची संख्या 50 इतकी होती. ही संख्या दर चार वर्षांनी निम्मी केली जाते. जेव्हा पैशाचे निम्म्यामध्ये विभाजन केले जाते, तेव्हा त्याला “दुभाजन” असे म्हणतात.
दर 10 मिनिटांनी जारी केलेल्या नवीन बिटकॉईन्सची संख्या 2012 मध्ये 50 पासून 2013 मध्ये 25 इतकी कमी झाली. ती 2016 मध्ये आणखी कमी होऊन 25 ची 12.5 इतकी झाली. त्याच्या जोडीला 2016 मध्ये 12.5 असलेले बक्षीस सर्वात अलिकडे म्हणजे 11 मे 2020 रोजी झालेल्या दुभाजनामध्ये प्रति ब्लॉक 6.25 इतके कमी झाले.
2024 मधील दुभाजनानंतर हे बक्षीस 6.25 बीटीसीवरून घसरून 3.125 बीटीसी इतके कमी होईल.
पुढील बीटीसी दुभाजनामध्ये काय होणार आहे?
बहुसंख्य गुंतवणूकदारांचे भाकित असे आहे की बिटकॉईनचे मूल्य वाढेल आणि आता व 2024 मधील त्याचे चौथे दुभाजन यादरम्यान वेगाने वाढेल. हे त्याच्या ऐतिहासिक कामगिरीवर आणि पहिल्या 3 दुभाजनांच्या परिणामावर आधारलेले आहे. या दोन्ही घडामोडींच्या वेळी बिटकॉईनच्या मूल्याने आकाशाला गवसणी घातली आहे.
2012 मधील पहिल्या दुभाजनानंतर एका वर्षाच्या आत बिटकॉईनची किंमत $12 वरून $1,150 पेक्षा जास्त इतकी वाढली होती. 2016 मध्ये दुसऱ्या दुभाजनाने बिटकॉईनची किंमत $20,000 पेक्षा अधिक वाढली आणि नंतर $3,200 इतकी कमी झाली आणि 2020 मध्ये बिटकॉईनची किंमत $8,787 वरून वाढून $54,276 इतकी झाली, ही जवळपास 517% वाढ होती.
दर 10 मिनिटांनी नवीन बिटकॉईन्स माईन केले जातात हे लक्षात घेता, पुढील दुभाजन 2024 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे, त्यावेळी मायनरचे पेआऊट 3.125 बीटीसी इतके कमी होईल. गुंतवणूकदार आणि बिटकॉईनच्या व्यापाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, दुभाजनामुळे – कॉईन/टोकनसाठी अनेकदा लक्षणीय अस्थिरता आणि अशांतता निर्माण होते.
जरी आतापर्यंत दुभाजनाच्या घटनांनंतर किंमतींमध्ये लक्षणीय बदल झाले असले तरीही, दुभाजनानंतर, आणि त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये आणि महिन्यांमध्ये काय होईल याचे नेमके भाकित कोणालाही करता येत नाही हे वास्तव आहे.
बिटकॉईन किंमतींवर दुभाजनाचा परिणाम
बिटकॉईनचे 2009 मध्ये आगमन झाल्यापासून त्याची किंमत हळूहळू आणि मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यावेळी त्याचा व्यापार सेंट किंवा डॉलर्समध्ये होत असे, तेव्हापासून एप्रिल 2021 पर्यंत एका बिटकॉईनची किंमत $63,000 पेक्षा अधिक झाली आहे. ही वाढ प्रचंड आहे.
दुभाजनाने ब्लॉक बक्षीस मायनर्सचा (किंवा बिटकॉईन निर्मात्यांचा) खर्च दुप्पट होत असल्यामुळे, मायनर खर्च सहन करत असल्याने किंमतींवरदेखील लाभदायक प्रभाव असणे आवश्यक आहे, आणि तो भरून काढण्यासाठी; ते त्यांची विक्री किंमत वाढवतात.
प्रायोगिक संशोधनानुसार, बिटकॉईनचे प्रत्यक्ष दुभाजन होण्यापूर्वी, अनेकदा कित्येक महिने आधीच दुभाजनाच्या अपेक्षेने बिटकॉईनच्या किंमती वाढण्याकडे कल असतो.
मुख्य मुद्दा
बिटकॉईनच्या दुभाजनाने सामान्यपणे क्रिप्टोकरन्सीच्या नेटवर्कमध्ये किंमत चलनवाढ होते आणि नवीन बिटकॉईन चलनात जारी करण्याचा वेग निम्म्याने कमी करते. बक्षीस योजना 2140 पर्यंत सुरू ठेवली जाणार आहे, त्यावेळी बिटकॉईनचे 2.1 कोटींची निर्दिष्ट मर्यादा साध्य केली जाईल. त्यापाठोपाठ मायनर्सना शुल्क देऊन प्रक्रिया व्यवहाराची भरपाई केली जाईल. बिटकॉईनच्या दुभाजनाचे नेटवर्कसाठी महत्त्वाचे परिणाम होतात. किंमतीमध्ये चढउतार अपेक्षित असताना काही स्वतंत्र मायनर आणि लहान कंपन्या मायनिंग वातावरणातून बाहेर पडू शकतात किंवा मोठ्या कंपन्या त्यांना खरेदी करू शकतात, त्यामुळे मायनर्ससाठी रँकिंगचे केंद्रीकरण घडून येईल. त्यामुळे पुढे काय होईल त्याची प्रतीक्षा करूया आणि पाहूया.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.