Skip to main content

भारतात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचारात घेण्याच्या 4 आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी (Top 4 Cryptocurrencies To Consider In India For Long Term Investments)

By एप्रिल 26, 2022मे 28th, 20225 minute read
Top Cryptocurrency To Consider For Long Term Investments - WazirX

टीप: हा ब्लॉग बाह्य ब्लॉगरने लिहिला आहे. या पोस्टमध्ये व्यक्त केलेले दृष्टीकोन आणि मते केवळ लेखकाची आहेत.

क्रिप्टोकरन्सींनी भारतात नक्कीच वादळ उठवले आहे आणि आता ते थांबवता येणार नाही. अल्प-दीर्घकालीन नफा किंवा दीर्घकाळ धारण करण्यासाठी प्रत्येकजण क्रिप्टोच्या व्यवहारात हिरीरीने प्रवेश करत आहे, आणि त्याचा मुख्य प्रवाहात स्वीकार होण्यासाठी त्याला चालना देत आहे. या बरोबरच, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये कर कायदे लागू केल्यामुळे देशात क्रिप्टोच्या भवितव्याबद्दल असलेली साशंकता काहीशी दूर झाली आहे. क्रिप्टो आता चलनात राहणार आहेत आणि ते गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत.

अल्पकालीन क्रिप्टो व्यापाऱ्यांनी जलद नफा कमावला आहे आणि त्या बरोबरच दीर्घकालीन क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकीचे धोरण अधिक उत्तम आहे असे मानले जाते.याचे कारण असे की क्रिप्टो संपत्ती सामान्यत: काही आवर्तनांचे/सायकल्सचे अनुसरण करतात आणि कालांतराने चक्रगतीने वाढत जातात आणि अशा प्रकारे त्यांची मूल्यवृद्धी होते. क्रिप्टो मार्केट्समधील अस्थिरतेच्या तीव्र लाटा असूनही प्रचंड परताव्याच्या क्षमतेनेअनेक गुंतवणूकदारांना या क्षेत्रातील प्रलोभनाने आकर्षित केले आहे.

दीर्घ कालावधीकरिता क्रिप्टोकरन्सींमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि सर्वोत्कृष्ट दीर्घकालीन क्रिप्टो पोर्टफोलिओसाठी कोणत्या आघाडीच्या क्रिपटोकरन्सीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे या विचाराने तुम्ही गोंधळून गेले असाल तर आम्ही तुम्हाल मदत करू शकतो. म्हणूनच, एक दीर्घकालीन गुंतवणूक धोरण म्हणून भारतात खरेदी करण्याजोगे कोणते क्रिप्टो आहे या बद्दल तुम्ही संभ्रमात असाल तर आम्ही येथे 4 आघाडीचे पर्याय सुचवत आहोत:

1. बिटकॉइन (बीटीसी/BTC)

बिटकॉइन ही सर्वात आघाडीचे व सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी असून ती दीर्घकालीन क्रिप्टो गुंतवणुकीसाठी नि:संशयपणे आघाडीची निवड आहे. बिटकॉइनच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण म्हणजे, त्याच्या 2.10 कोटींच्या मर्यादित पुरवठ्यामुळे कालांतरात या क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यात वाढ होईल असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. डॉलर किंवा पाउंडसारखा मर्यादित पुरवठा असणाऱ्या सरकारी चलनांच्या हे अगदी विरुद्ध आहे. सरकारी चलने जसजशी दुर्बळ होतील तसतसे बिटकॉइनच्या मूल्यात वाढ होईल असा बहुतेक गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.

सातोशी नाकामोटो हे टोपणनाव वापरून एका व्यक्तीने अथवा व्यक्तींच्या समूहाने सन 2099 मध्ये निर्मित हे बिटकॉइन (बीटीसी) ही पहिली क्रिप्टोकरन्सी असून त्याला अनेकदा डिजिटल सोने असे म्हटले जाते. बीटीसी हे प्रभावशाली क्रिप्टो देखील असून त्याला क्रिप्टो क्षेत्राचा सलामीवीर म्हणून संबोधण्यामागे सबळ कारण आहे- त्याची किंमत, मार्केट भांडवलीकरण/कॅपिटलायझेशन आणि याचे प्रमाण इतर क्रिप्टोच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणत अधिक आहेत. आज मार्केटमध्यी हजारो विविध क्रिप्टोकरन्सी उपलब्ध असूनही एकूण क्रिप्टोकरन्सी मार्केट भांडवलीकरणात बिटकॉइनचा वाटा अजूनही जवळजवळ 40% आहे. यामुळे 2022 च्या दीर्घकालीन क्रिप्टो गुंतवणूकींसाठी हे फायदेशीर ठरते. 

Get WazirX News First

* indicates required

एका दशकापूर्वी साधारण प्रति कॉइन $0.0008 ते $0.08 या किंमतीपासून या बिटकॉइनची किंमत नोव्हेंबर 2021 मध्ये सुमारे $69,000 या आजवरच्या उच्चांकावर पोहोचली. बिटकॉइनची अस्थिरता हा सर्वात प्रमुख जोखीम घटक असूनही, अस्थिरतेमुळे प्रचंड नफा कमावण्याच्या त्याच्या क्षमतेने ते एवढे लोकप्रिय झाले आहे. अनेक विश्लेषकांचा असा अंदाज आहे की बीटीसीची किंमत संपूर्ण 2022 दरम्यान वाढून $80,000 ते $100,000 इतकी होईल, त्यानंतर सन 2025 च्या सुमारास $250,000 इतकी होईल आणि या दशकाच्या अखेरीस ती प्रति बिटकॉइन $50 लाख इतकी प्रचंड असेल.

2. इथेरियम (इटीएच/ETH)

किंमत आणि मार्केट कॅप, या दोन्हीच्या बाबतीत केवळ बिटकॉइनच्या लागोपाठ दुसरे असलेले  इथेरियम ही अनेकांसाठी अत्यंत पसंतीची क्रिप्टो गुंतवणूक आहे. चलनात लोकप्रिय असलेली क्रिप्टो संपत्ती असण्याबरोबरच, इथेरियम त्याच्या क्रांतिकारक नेटवर्कसाठी देखील प्रसिद्ध आहे ज्यात ईआरसी-20 या क्रिप्टोकरन्सी स्टॅन्डर्डद्वारा विकासक त्यांची क्रिप्टोकरन्सी निर्माण करू शकतात. विविध क्रिप्टोकरन्सी निर्माण करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याबरोबरच, इथेरियमवर विकेंद्रित स्मार्ट कॉन्ट्रॅक्टसदेखील कार्यान्वित करता येतात. डिफाय (विकेंद्रित वित्त) आणि एनएफटी (नॉन फंजिबल टोकन्स) हे इथेरियमचे मूल्य इतक्या वर्षांत वाढवणाऱ्या आणखी काही संकल्पना आहेत. 

सन 2021 च्या उत्तरार्धात इथेरियमने $4800 हा सर्वकालीन उच्चांक गाठला आणि सन 2022 ची सुरुवात $3600 ने केली.  गेल्या वर्षी इथेरियमने 160% वाढ नोंदवली आणि या वर्षी तो $6,500 इतकी उंची गाठेल अशी अपेक्षा आहे. सर्वोत्तम दीर्घकालीन क्रिप्टो पोर्टफोलियोच्या निवडीसाठी हा अनिवार्य मालमत्ता होतो.

आधी चर्चा केल्याप्रमाणे, सन 2021 च्या एनएफटी तेजीच्या काळात व्यवहाराचे प्रमुख माध्यम म्हणून इथेरियमने भूमिका निभावली. यामुळे ही जगभरातील गुंतवणूकदारांसाठी आधीच हवीहवीशी गुंतवणूक झाली आहे. या बरोबरच, इथेरियम समुदायात सन 2022 चे एक विशेष स्थान आहे. याच वर्षी त्याची सर्वात अधिक प्रतीक्षा असलेले ईटीएच-2 सुधारित आवृत्ती इथेरियम सादर करेल अशी अपेक्षा आहे. यामुळे त्याचा वेग आणि कार्यक्षमता वाढेल आणि नेटवर्कमध्ये सामोरे जावे लागणाऱ्या स्केलेबिलिटीच्या आव्हानांचे निराकरण होईल. यशस्वी सुधारणेनंतर इथेरियमच्या किंमती आणखी उंची गाठतील असे विश्लेषकांचे भाकित आहे. 

3. कार्डानो (एडीए/ADA)

इथेरियमचे सह-संस्थापक चार्ल्स हॉस्किन्सन यांनी विकसित कार्डानो हा ओपन सोर्स आणि विकेंद्रित सार्वजनिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे जो प्रुफ-ऑफ-स्टेकच्या प्रमाणीकरणाच्या त्वरित स्वीकारणासाठी उल्लेखित आहे. अलिकडील काळातील मोठ्या मार्केट लाभाच्या फलस्वरूप आणि बिटकॉइनपेक्षा अधिक पर्यावरण-पूरक मानल्या गेलेल्या त्याच्या ऊर्जा-कार्यक्षम प्रक्रियांमुळे कार्डानोने (एडा) विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.

एडा ही कार्डानोची अंतर्गत क्रिप्टोकरन्सी आहे जी पीअर-टु-पीअर व्यवहार सुलभ करते.  एडा कदाचित बिटकॉइन व इथेरियमबरोबर स्पर्धा करू शकत नसेल पण सन 2021 मध्ये एडामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आजवरचा उच्चांक गाठत एडाची 14,000% ने वाढ झाली. म्हणूनच, सन 2022 मध्ये दीर्घ कालावधीसाठी भारतात कोणते क्रिप्टो विकत घ्यावे याबद्दल तुम्ही तर्कवितर्क करत असाल तर एडा हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. 

एनएफटी क्षेत्रात कार्डानो हे लोकप्रिय क्रिप्टोंपैकी एक असून ते 2022 मध्ये इंडस्ट्रीमध्ये आपली मुळे आणखी दृढ करेल अशी अपेक्षा आहे. एडा नेटवर्क्सने गेल्या वर्षी सह्या केलेल्या प्रमुख भागीदाऱ्यांच्या मॅच्युरेशनबरोबरच हे घडेल. इकॉनॉमी फोरकास्टच्या  अंदाजानुसार एडा सन 2022 मध्ये $7.70 वर, 2023 मध्ये $8.93 वर आणि 2025च्या अखेरीस $15 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 

4. बायनान्स कॉइन (बीएनबी/BNB)

बायनान्स कॉइन हे नेटिव्ह टोकन असून ते बायनान्स या सर्वात लोकप्रिय एक्स्चेंजपैकी एक आहे. प्लॅटफॉर्मवर शुल्क भरण्यासाठी तसेच व्यापारासाठी बायनान्स ग्राहकांकडून बीएनबीचा वापर केला जातो. गेल्या वर्षापासून, बीएनबीने मार्केट भांडवलीकरणाच्या बाबतीत सर्वात उच्च अशा 5 क्रिप्टोकरन्सींमध्ये कायमस्वरूपी स्थान पटकावले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मार्केट कॅपमध्ये ते तिसऱ्या/चौथ्या स्थानावर प्रभावीपणे टिकून आहे. यामुळे सन 2022 च्या दीर्घकालीन क्रिप्टो गुंतवणूकींसाठी हे सर्वात चांगल्यापैकी एक ठरते. 

बीएनबीची स्थापना 2017 मध्ये झाली आणि सध्या ते ईआरसी20 इथेरियमवर चालते. या कॉइनचे फ्रेमवर्क कौशल्याने डिझाइन केलेले असून ते प्रबल आणि अचूक अल्गोरिदमनी समर्थित आहे. या प्लॅटफॉर्मवर शुल्क भरण्याबरोबरच, बायनान्स स्मार्ट चेन (बीएससी), ट्रस्ट वॉलेट, बायनान्स संशोधन आणि बायनान्स अकादमी यासारख्या बायनान्सच्या विविध सेवा आणि उत्पादने प्राप्त करण्यासाठी बीएनबी वापरता येते. या सेवांची लोकप्रियता येत्या वर्षांत बीएनबीच्या उज्ज्वल भविष्याकडे दिशानिर्देश करते.

सन 2021 मध्ये बीएनबीने जवळपास $690 चा सर्वकालीन उच्चांक गाठला.  Capital.comच्या म्हणण्यानुसार, सन 2024 मध्ये हे कॉइन $820 वर, 2026 मध्ये $2,300 वर आणि 2030 मध्ये $11,000 पर्यंत पोहोचेल.

वझिरएक्सच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक करा.

तुम्ही क्रिप्टोमध्ये नवशिके किंवा पारंगत गुंतवणूकदार असाल, जर तुम्हाला सन 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट क्रिप्टो गुंतवणूकीबद्दल संभ्रम असेल तर वझिरएक्स हे तुमच्यासाठी योग्य स्थान आहे. भारताच्या सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासनीय क्रिप्टो एक्स्चेंजपैकी एक असलेले वझिरएक्स 250+ क्रिप्टोकरन्सींमध्ये उपस्थित आहे ज्यात बीटीसी/BTCईटीएच/ETHएडा/ADA, आणि  बीएनबीसारख्या आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी समाविष्ट आहेत आणि ते विद्युतवेगाने व्यवहाराबरोबरच प्रभावी सुरक्षित वैशिष्ट्ये आणि केवायसी प्रणाली यासारख्या सुविधा प्रदान करते.
वझिरएक्सवर व्यापार सुरू करण्यासाठ  येथेक्लिक करून एक्स्चेंजला भेट द्या.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.
Shashank

Shashank is an ETH maximalist who bought his first crypto in 2013. He's also a digital marketing entrepreneur, a cosmology enthusiast, and DJ.

Leave a Reply