Skip to main content

क्रिप्टोकरन्सीच्या जन्माची सखोल माहिती (A dive into the birth of a Cryptocurrency)

By डिसेंबर 21, 20213 minute read

नोट: हा ब्लॉग एका बाहेरील ब्लॉगरने लिहिला आहे. या पोस्टमध्ये व्यक्त केलेली मते व दृष्टीकोन पूर्णत: लेखकाचे आहेत. 

हल्ली, बर्‍याच लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये स्वारस्य आहे. क्रिप्टोकरन्सीमधील स्वारस्याने अभूतपूर्व उंची गाठली आहे, मग त्याचे कारण लोकप्रिय टोकनमागील तंत्रज्ञानचे कुतुहल असू शकते किंवा त्यांचा लाभ घेण्याची सरळसाधी इच्छा असू शकते. 

पारंपारिक स्टॉक्स आपण ज्याप्रकारे विकत घेतो व विकतो त्याचप्रमाणे आपल्यातील अनेकजण क्रिप्टोकरन्सीची लाभासाठी खरेदी-विक्री करतात, परंतु ते थोडेसे वेगळे आहेत. तुम्ही स्टॉक्स विकत घेता, तेव्हा एका कंपनीचा एक अंश तुम्ही विकत घेता परंतु क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही चलनाचे एक माध्यम धारण करता आणि तुम्ही एका आयसीओमध्ये भाग घेत नाही तोवर तुम्ही ’कंपनी’ विकत घेत नसता. याव्यतिरिक्त, ब्लॉकचेनच्या विकेंद्रित स्वरूपामुळे क्रिप्टोचे स्टॉक्सइतके नियमन झालेले नाही. आणि याच कारणामुळे त्याच्याबद्दलचा रस वाढला आहे. 

परंतु, इथर आणि बिटकॉइनच्या अंतर्गत कार्यप्रणालीबद्दलचे कुतुहल या स्वारस्यास पूरक आहे. आपल्यापैकी अनेकांना क्रिप्टोकरन्सीच्या उगमाबद्दल विशेष कुतुहल आहे. क्रिप्टोकरन्सी केवळ डिजीटल वास्तवात अस्तित्वात असते आणि एका केंद्रीय बँकेने जारी केलेली नाही हे लक्षात घेता, बिटकॉइनचा उगम कुठून होतो व ते कसे काम करते याचा तंत्रज्ञानाशी संबंध नसणार्‍या लोकांना अर्थबोध होणे कठीण होऊ शकते.

Get WazirX News First

* indicates required

वझिरएक्स क्लिष्ट असूनही आपल्याला वाटते तेवढी त्याची अंतर्गत कार्यपद्धती जटिल नाही. 

क्रिप्टोकरन्सी कशा तयार केल्या जातात?

तुम्ही ब्लॉकचेनशी संबंधित साहित्य वाचले असेल, तर तुम्ही “मायनिंग” या शब्दाशी नक्कीच परिचित असाल. क्रिप्टो उद्यमात “मायनिंग” ही संज्ञा वारंवार वापरली जाते कारण क्रिप्टोकरन्सींच्या वितरणाची ती पद्धत आहे. 

लक्षात ठेवण्याची एक गोष्ट म्हणजे सर्व क्रिप्टोकरन्सी या ब्लॉकचेनवर निर्मित असतात आणि सर्व क्रिप्टोकरन्सी व्यवहार ब्लॉकचेनवर घडतात. ब्लॉकचेनवर कोणताही व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी त्याची प्रथम विनंती झालेली असली पाहिजे किंवा त्याचा प्रारंभ झाला पाहिजे. प्रमाणीकरण ही पुष्टी करण्याची प्रक्रिया असून प्रभावीपणे काम करण्याकरिता, एका ब्लॉकचेन नेटवर्कसाठी (उदा. बिटकॉइन नेटवर्क) ती नियमितपणे केलीच पाहिजे. 

हे प्रमाणीकरण संगणकांच्या नेटवर्कद्वारा केली जातात आणि त्यांचे संगणक व्यवहारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी जे त्यांचे संगणक देतात त्यांना नेटवर्कचे स्थानिक टोकन देऊन बक्षीस दिले जाते. अशा प्रकारच्या क्रियेस मायनिंग म्हणतात. 

परंतु, मायनिंगची पद्धत बदलते आणि हे करण्यासाठी ब्लॉकचेनच्या दोन प्रणाली उपलब्ध आहेत: प्रुफ-ऑफ-वर्क आणि प्रुफ-ऑफ-स्टेक. प्रमाणीकरण कशा प्रकारे केले जाते हा त्यातील फरक आहे. प्रुफ-ऑफ-वर्क मधील प्रमाणीकरणकर्त्यांनी क्लिष्ट गणितीय कोडे सोडवण्यासाठी त्यांचे संगणक वापरलेच पाहिजेत. 

मायनिंग प्रक्रियेत सहभागी लोकांना, एकदा एका व्यवहारांच्या (एक ब्लॉक) समुदायाचे प्रमाणीकरण झाले की त्यांना पूर्वनिश्चित संख्येची टोकन देऊन बक्षीस दिले जाते. आणि अशा प्रकारे आणखी कॉइन/टोकन बाजारात आणली जातात. खूप जास्त ऊर्जा वापरणार्‍या प्रुफ-ऑफ-वर्क प्रणालीचे बिटकॉइन नेटवर्क हे एक उदाहरण आहे. 

क्लिष्ट गणितीय कोडे सोडवण्याचा निर्णय घेणारे, प्रुफ-ऑफ-स्टेकमधील प्रमाणीकरणकर्ते एवढेच लोक नाहीत. त्याऐवजी आधीच त्यांच्याकडे किती टोकन आहेत याच्या आधारे प्रमाणीकरणकर्ते निवडले जातात; म्हणजे त्या नेटवर्कमध्ये त्यांचा किती हितसंबंध आहे. तसेच प्रुफ-ऑफ-वर्क पद्धतीच्या तुलनेत, प्रुफ-ऑफ-स्टेक पद्धत खूप कमी ऊर्जा खर्च करते, याच्या उदाहरणात पोल्काडॉट, एओसिओ आणि कार्डानि समाविष्ट आहेत, इथेरियमच्या या सिस्टीमवर स्थानांतर केल्याने त्याचा सद्य ऊर्जा खप 95% पर्यंत कमी होणार आहे. 

क्रिप्टोची किंमत कशी ठरवली जाते? 

हल्ली हजारो क्रिप्टोकनसी चलनात आहेत परंतु काहींचे मूल्य लाखो डॉलर्स आहे तर इतर काही डॉलरमागे फक्त काही पेनीज इतक्या कमी किंमतीच्या आहेत. याचे कारण काय आहे? आणि काही क्रिप्टोकरन्सी इतरांपेक्षा अधिक मूल्यवान का आहेत? 

मायनिंगद्वारे माइन झालेली सर्व बिटकॉइन मायनर स्वत:कडे ठेवत नाहीत (किंवा हे इतर कॉइनच्या बाबतीत देखील तसेच आहे). त्या ऐवजी प्लॅटफॉर्म आणि साइट एक्स्चेंज करण्यासाठी अनेक कॉइन विकली जातात आणि अशा प्रकारे ती बाजारपेठेत पसरतात. सामान्य जनतेस ते टोकन कोणत्या किंमतीस विकले जाईल हे अनेक निकषांच्या आधारे ठरवले जाते. 

या शिवाय मायनिंगच्या खर्चाचा प्रश्न देखील आहे. मायनिंग साधने आणि वीज यांचा खर्च निभावला पाहिजे एवढ्या तरी पुरेशा रकमेत प्रुफ-ऑफ-वर्क टोकन विकली पाहिजेत. परंतु, क्रिप्टोकरन्सीची किंमत ठरवताना मागणी व पुरवठा हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. 

काही झाले तरी, काही लोकांसाठी क्रिप्टोकरन्सी म्हणजे पैसा आहे आणि पैशाचे मूल्य काढले जाते. डोजेकॉइनचेच उदाहारण घ्या ना, त्याच्या आयुष्याच्या मोठ्या काळात एक नगण्य क्रिप्टोकरन्सी म्हणून ते खितपत पडले होते. परंतु, एलॉन मस्कने या टोकनबद्दल ट्विट केल्यानंतर याचे मूल्य गगनास जाऊन भिडले. 

सर्वाधिक वापरण्यात येणार्‍या बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत अनेक कारणांनी चढ-उतार होतो. त्याच्या मर्यादित पुरवठ्यामुळे, दर अर्धीकरण/हाविंगनुसार (प्रत्येक ब्लॉकसाठी वितरित होणार्‍या टोकनच्या संख्येत घट) त्याची किंमत वाढते. बिटकॉइनची मागणी वाढवणारी कोणतीही घटना प्रत्येक वेळी घडते तेव्हा दीर्घकाळापासून प्रस्थापित पुरवठा व मागणीच्या नियमास अनुसरून त्याची किंमत वाढते.

निष्कर्ष

आपल्यापैकी बहुतेक जण क्रिप्टोकरन्सीच्या क्रियेशी अपरिचित असू शकतात परंतु त्याची अंतर्गत कार्यप्रणाली आणि मूळ तत्वे यांचे सहजपणे वर्णन करता येते, ज्यामुळे हा नावीन्यपूर्ण सिद्धांत आणखी चांगल्या प्रकारे आत्मसात होतो.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply