Skip to main content

ADA आकाश भेदून पुढे जात आहे (ADA to the Moon)

By डिसेंबर 20, 2021डिसेंबर 22nd, 20214 minute read
एडीए आकाश भेदून पुढे जात आहे (ADA to the Moon)

टीप: हा ब्लॉग बाहेरील ब्लॉगरने लिहिला आहे या पोस्टमध्ये व्यक्त केलेला दृष्टीकोन आणि मते फक्त लेखकाची आहेत

कार्डानोमध्ये खोलवर संशोधन – एवढा गाजावाजा कशासाठी?

क्रिप्टोकरन्सीचा काही काळ मागोवा घेत असणाऱ्या प्रत्येकास ठाऊक आहे की हा उद्योग फक्त बिटकॉन आणि इथेरियम पर्यंत मर्यादित नाही. अनेक वर्षांपासून अनेक विभिन्न क्रिप्टोकरन्सींचा उदय झाला आहे, प्रत्येकाच्या वापराचे एक विशिष्ट प्रकरण आहे, काही नक्कल करण्याचे ध्येय ठेवत असताना, आणि बिटकॉइन व इथेरियम जे देऊ करतात त्यात देखील काही सुधारणा करतात. एक असा उपक्रम म्हणजे कार्डानो ब्लॉकचेन, जे नुकतीच जगातील तिसऱ्या स्थानावरील सर्वात मोठे आभासी चलन झाले आहे ज्याचा विकेंद्रित वित्ताच्या होणाऱ्या वाढीतून नेटवर्क विकासक फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात.

आरंभ

इथेरियमच्या सह-संस्थापकांतील एक असणाऱ्या चार्ल्स हॉस्किन्सनने सुरुवातीच्या काळात एका अधिक मानकीकृत आणि मापनीय ब्लॉकचेनची गरज ओळखली होती. त्याच्या गणितशास्त्रातील नैपुण्याच्या आधारे, ब्लॉकचेनची रचना करण्याच्या अधिक शास्त्रशुद्ध पद्धतींचा हॉस्किन्सनने विचार करण्यास सुरुवात केली. या काळात हॉस्किन्सनने जेरेमी वुड, इथेरियममधील माजी सहकाऱ्याशी, ज्याचे आधीपासून वापरात असणाऱ्या ब्लॉकचेन व स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक चांगला असणाऱ्याची रचना करण्याचे त्याचे ध्येय होते. ते एकत्र आले आणि त्यांनी सध्याच्या स्वरूपातील कार्डानोचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.

कार्डानोची महत्त्वाची मूळ तत्त्वे आणि स्मार्ट तंत्रज्ञानामागील बुद्धिमत्ता हॉस्किन्सन आणि वुडची असली तरी ते कार्डानो ब्लॉकचेनचे नियंत्रण किंवा संचलन करत नाहीत. 

 कार्डानो फाऊंडेशन बाजारपेठेस मदत करण्यासाठी आणि ब्लॉकचेनच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी संपूर्ण प्रकल्पात न-नफा ताबेदार संस्था मह्णून काम करते. त्या दरम्यान, IOHK/आयओएचके ही– सन 2015 मध्ये हॉस्किन्सन आणि वुड द्वारा प्रस्थापित संशोधन व विकास कंपनी असून तिने कार्डानो ब्लॉकचेनच्या डिझाइन व अभियांत्रिकीसाठी मदत केली आहे. याव्यतिरिक्त, Embargo/एम्बार्गो देखील अस्तित्वात आहे, जे कार्डानोला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्या आर्थिक विकासात मदत देण्यासाठी एक मोठी निधी पुरवठा संस्था म्हणून काम करते. 

आता आपण प्रत्यक्ष प्रकल्पाबद्दल जाणून घेऊया.

कार्डानो काय आहे आणि प्रत्येकजण त्याबद्दल का बोलत आहे?

त्याच्या कॉन्सेन्सस यंत्रणा आणि एक विशिष्ट व वेगळ्या बहु-स्तरीय डिझाइनमध्ये, गणितीय सिद्धांत वापरून इतर ब्लॉकचेन्सच्या तुलनेत, कार्डानो स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करते. इथेरियमच्या निर्मितीत मदत केलेल्या टीमच्या मदतीने, कार्डानो हे क्रिप्टोकरन्सी निरसनांची पुढील पिढी आहे असा अनेकांचा विश्वास आहे.

Get WazirX News First

* indicates required

इतर क्रिप्टोकरन्सींसारखेच, मूल्य जतन करण्यासाठी तसेच हस्तांतरण व देयके प्राप्त करण्यासाठी वापरता येऊ शकणारे डिजीटल टोकन म्हणजे कार्डानो (एडीए) हे आहे. विकेंद्रित ॲप व प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी तेव्हा कदाचित वापरल्या गेलेल्या इथेरियमसारखेच, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट निर्माण करण्यासाठी कार्डानोची ब्लॉकचेन देखील वापरता येते. याशिवाय, व्यवसाय व वित्त क्षेत्रात, रोख कमी दराने व वेगाने हस्तांतरित व प्राप्त करण्याच्या क्षमतेचे, दूरगामी परिणाम आहेत.

कार्डानो स्वत:चा संदर्भ तिसऱ्या पिढीची ब्लॉकचेन असा देते. इथरम आणि बिटकॉनला (BTC) सहन कराव्या लागणाऱ्या मापनीयता आणि इतर अडचणींचे निरसन करणे हे त्यांचे ध्येय आहे. अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानावर आणखी निरसनांची निर्मिती करण्यापेक्षा, त्यांनी जमिनीपासून सुरुवात केली आणि एक संपूर्ण नवीन ब्लॉकचेन निर्माण केली.

हे नेटवर्क अवरबोरोस कॉन्सेन्सस यंत्रणेवर अवलंबून आहे जे विशेषत: निर्मित, प्रुफ-ऑफ-स्टेक (PoS/पीओएस) आधारित ब्लॉकचेन पर्यावरण प्रणाली (इकोसिस्टीम) आहे. या कॉन्सेन्सस पद्धतीत, निरंतर, सहजपणे व सुरक्षितपणे एडीए हस्तांतरित व प्राप्त करता येते आणि त्याचबरोबर कार्डानो ब्लॉकचेनवरील स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती होते. त्याच बरोबर, एक पीओएस कॉन्सेन्सस यंत्रणा या नात्याने, त्यांच्या एडीए नेटवर्कशी नेटवर्कचा दावा लावणाऱ्या व नेटवर्क कॉन्सेन्ससला योगदान करणाऱ्या टोकनधारकांना, अवरबोरोस पुरस्कार देते.

तथापि, नेटवर्कने अद्याप स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्रस्तुत केलेले नाहीत याची नोंद घेतली जावी. अशा प्रकारे, नियोजित “आलोंझो” अपडेटच्या अपेक्षेत, जे 12 सप्टेंबर रोजी प्रकाशित होईल, एडीएचे गुंतवणूकदार, कार्डानोचे मूल्य वरच्या दिशेस संप्रेरित करत आहेत. आलोंझो अपडेटमुळे विकेंद्रित वित्त बाजारपेठेत (डिसेंट्रलाइझ्ड फायनान्स-डेफाय-DeFi) एक अस्सल सहभागी या नात्याने कार्डानो स्वत:स प्रस्थापित करू शकेल, जे ब्लॉकचेनला स्मार्ट-कॉन्ट्रॅक्ट क्षमता प्रस्तुत करेल. परंतु जे दिसून येते त्या पलिकडे आणखी बरेच काही आहे.

महान उद्दिष्टासाठी जागतिकीकरण

वित्त तंत्रज्ञानाचाआपण विचार केल्यास, आफ्रिकन देशांनी पारंपारिकतेने लवकर अंगीकार केला आहे. संपूर्ण खंडांत, उदयोन्मुख तंत्रज्ञान महत्त्वाच्या निरसनांच्या अग्रस्थानी आहे या वर्षाच्या पूर्वार्धात, इतिहासातील सर्वात मोठा ब्लॉकचेन उपक्रम म्हणून मानण्यात येणाऱ्याचा भाग या नात्याने स्थानिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्याच्या हेतूने, ब्लॉकचेन-आधारित प्रणाली विकसित करण्याकरिता इथियोपियाच्या सरकाराबरोबर सहकार्याची आयओएचेके ने घोषणा केली.

स्त्रोत: The New York Times.

तेव्हापासून, ही संस्था देशात प्रत्यक्ष अस्तित्व प्रस्थापित करत आहे, आदिस अबाबा या राजधानीत कार्यालय उघडत आहे आणि उच्च-स्तरावरील ब्लॉकचेन आयडी प्रकल्पावर काम सुरू करत आहे, जो जानेवारी 2022 मध्ये गो-लाइव्ह होण्याची अपेक्षा आहे. 

या कराराचा भाग या नात्याने संपूर्ण इथियोपियातील विद्यार्थ्यांना डिजीटल ओळख (DID/डीआयडी) देण्यात येईल. त्यांच्या शिक्षणादरम्यानच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल सर्व माहिती या मेटाडेटा मध्ये समाविष्ट आहे. हे अटाला प्रिझ्म तंत्रज्ञानाचा वापर करते जे कार्डानो ब्लॉकचेनशी संलग्न आहे.

ही प्रणाली नावीन्यपूर्ण आहे कारण ती विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याची नोंद करते. उदाहरणार्थ, त्याच्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत गणितात अत्त्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या परंतु त्याच्या अंतिम पेपरमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या आवडीच्या विद्यापीठात प्रवेश नाकारला जाऊ शकतो. विद्यार्थ्याच्या भविष्यावर अशा परिस्थितीचे सामान्यत: दूरगामी परिणाम होतात. 

या एकदाच आघात करणाऱ्या पद्धतीची जागा, डीआयडीसह त्यांच्या कौशल्याच्या सर्वसमावेशक मूल्यांकनाने घेतली जाते. ही पद्धत धोकाबाजी किंवा फसवाफसवी यापासून संरक्षण देते. ब्लॉकचेनची रचना त्यास अपरिवर्तनीय आणि सर्वांना मुक्तपणे प्राप्य बनवते.

एवढेच नाही. टांझानिया व इथियोपिया यांना महत्त्वाच्या सेवा देण्यासाठी वर्ल्ड मोबाईल ग्रूप सह त्यांनी सहयोग देखील केला आहे. अक्षय ऊर्जेचा वापर करून टांजानियाला शाश्वत इंटरनेट प्रदान करण्यासाठी कंपन्या सहयोग करत आहेत. कार्डानो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित कमी खर्चाचे नेटवर्क नोड्स पुरवण्यासाठी ते सहयोग करतील.

इंटरनेट प्राप्त करण्यासाठी स्थानिक रिलेज म्हणून हे नेटवर्क नोड काम करतील. सभासदांना इथियोपियन आयडेंटिफिकेशन सोल्युशन देखील प्राप्त करता येईल. शाळेत या निरसनाऐवजी, डिजीटल बॅंकिंग सारख्या सेवा ते प्राप्त करू शकतील (कारण कार्डानोने लागू केलेल्या प्लॅटफॉर्मच्या वापराची इतर अनेक कारणे आहेत).

आफ्रिकेत ते यशस्वी झाल्यास कार्डानोची क्षमता अमर्याद आहे. भविष्यात, संभाव्य वापरकर्त्यांची गणना लाखोंमध्ये नाही तर करोडोंमध्ये केली जाईल. गत पाच वर्षांत कार्डानोच्या निर्मात्यांनी प्रकल्पाप्रती त्यांचे समर्पण सिद्ध केले आहे, कारण ते नायजेरिया, रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेसह आफ्रिकेतील अनेक देशात ते गेले आहेत.

हॉस्किन्सनची आफ्रिका खंडासाठी दूरदृष्टी बऱ्याच प्रमाणात, देशाकडून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकृत होईल या विश्वासावर आधारित आहे विकसनशील देशात इच्छा अधिक प्रबळ आहे असा त्याचा विश्वास आहे आणि त्या मुळे अशा प्रकारच्या सुधारणांकरिता ती सर्वात उत्तम स्थाने होतात.

निष्कर्ष

आपण सर्वसमावेशक दृष्टीकोन घेत असलो तर कार्डानोबद्दल अलिकडच्या काळातील गाजावाजा नक्कीच न्याय्य आहे. हा प्रकल्प बरेच काही देऊ शकतो आणि प्रत्यक्ष जीवनातील परिणाम हितचिंतकांना अगोदरच दिसून आले आहेत जे प्रकल्पाच्या विश्वासार्हतेस जोड देतात.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply