Skip to main content

DeFi विरुद्ध CeFi: फरक काय आहे? (DeFi Vs CeFi: What’s The Difference)

By मार्च 4, 2022मार्च 17th, 20225 minute read

क्रिप्टोकरन्सींनी जगाला विकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या नमुन्याची ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ओळख करून दिली. क्रिप्टोकरन्सी पर्यायी चलन आणि व्यापार करता येण्याजोगी मालमत्ता ह्या दोन्हीच्या उद्दिष्टांची सेवा प्रदान करतात तर ब्लॉकचेननी तिला सर्वांसाठी उपलब्ध असणे शक्य केलेले आहे. ह्या ब्लॉकचेनच्या विविध सेवा देण्याच्या क्षमतेने सद्यस्थितीमधील आर्थिक उद्योगाला तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास प्रवृत्त करून तिच्याभोवती केंद्रित झालेल्या आर्थिक सेवांचे जग तयार केले आहे. 

आता हे क्रिप्टोकरन्सींच्या आणि ब्लॉकचेनच्या आर्थिक सेवांचे जग हे व्यापकपणे दोन श्रेणींमध्ये विभागता येईल. त्या आहेत विकेंद्रित अर्थव्यवस्था (DeFi) आणि केंद्रित अर्थव्यवस्था (CeFi).ह्या दोन्ही श्रेणी सारखेच उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करतात, त्या दोन्हींमध्ये उद्दिष्ट गाठण्यासाठी अवलंबलेल्या मार्गामध्ये फरक पडतो. आपण त्यांच्या व्याख्येने सुरुवात करूया. 

DeFi म्हणजे काय?

विकेंद्रित अर्थव्यवस्था, संक्षिप्त स्वरूपामध्ये DeFi, व्यापार, कर्ज, डेरिव्हेटीव्ह आणि अशा तऱ्हेच्या आर्थिक सेवा मिळवण्यासाठी विकेंद्रित नेटवर्कच्या वापराकडे निर्देश करते. DeFi कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या स्वरूपातील मध्यस्थाला सहभागी करून घेत नाही. त्याऐवजी प्रणाली चलाख करार आणि तत्सम प्रोटोकॉलवर काम करते जे मध्यस्थ व्यक्तीच्या गुंतण्याशिवाय सेवांचे दोन पक्षांमध्ये आदानप्रदान होण्यास परवानगी देतात. 

एकथोडक्यातटीप:चलाखकरारहाब्लॉकचेननेटवर्कमधीलस्वतःकार्यांवितहोणाराप्रोग्रॅमेबलकोडअसूनजेव्हात्याच्यामूलभूतमान्यकेलेल्यासूचनांचेपालनहोते तेव्हा तो कार्यांवित होतो. 

विशेष म्हणजे DeFi चे कार्य हे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनच्या अंतर्भूत वैशिष्ट्यानुसार आहे जे विकेंद्रित होण्याचे वैशिष्ट्य आहे. DeFi बँका आणि आर्थिक संस्थांची गरज नाहीशी करते आणि फक्त एखाद्या व्यक्तीने ब्लॉकचेनचे नेटवर्क उपलब्ध करून घेण्याची आणि मग त्याच्या फंड्सनी त्याला हवे ते करण्याची गरज असते. 

CeFi म्हणजे काय?

केंद्रित अर्थव्यवस्था, संक्षिप्तपणे CeFi, ही सध्याच्या आर्थिक उद्योगासारखीच आहे, जिथे एक संस्था किंवा एखादा मध्यस्थ व्यापार, कर्ज, देवाणघेवाण आणि ह्यासारख्या इतर आर्थिक सेवा सुलभ करतो जो बहुशा प्रक्रियेमधील केंद्रीय निर्णय असतो. 

Get WazirX News First

* indicates required

संबंधित संस्था इंटरफेस, आधार देते आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करते. क्रिप्टोच्या जगामध्ये क्रिप्टोकरन्सीचा विनिमय ही CeFi संस्थेचे उदाहरण आहे जिथे ग्राहक एक्सचेंजवर तिच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करतो. तर खऱ्या जगामधील आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांप्रमाणेच वापरकर्ता एका केंद्रीय संस्थेला त्याला इच्छित असलेल्या सेवा मिळण्यासाठी त्याचे पैसे वापरायची परवानगी देतो.

DeFi विरुद्ध CeFi समजणे 

ह्या वादाशी संबंधीत बारकावे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे प्रथम दोन्ही DeFi आणि CeFi च्या फायद्यांची प्रथम चर्चा करणे, आणि त्यापाठोपाठ त्यांच्या तोट्यांची चर्चा करणे. पण ह्यामुळे आपण दोन्ही आर्थिक श्रेणींचे एका विशिष्ट निकषावर एकाच वेळेस मूल्यमापन करण्याची संधी गमावतो. पुढील चर्चेच्या दरम्यान आपण दोन्ही म्हणजे DeFi आणि CeFi ह्या क्षेत्रांनी प्रस्तुत केलेले कल आणि सेवांचे ढोबळ मानाने विश्लेषण करू. दोन्हीपैकी एकामध्ये मोडणाऱ्या काही आर्थिक संस्थांमध्ये यादी केलेल्या वैशिष्ट्यांबाबत फरक असू शकतो. पण चर्चेच्या व्याप्तीसाठी दोन्ही क्षेत्रांमधील लोकप्रिय कलांची चर्चा केली आहे.

पुढे दोन्ही सेवांचे जे कोष्टक महत्त्वाचे आहे त्यावर मूल्यमापन दिलेले आहे:

#1 पैशांची उपलब्धता

CeFi ह्या तत्वानुसार काम करते की वापरकर्त्याला त्याचे पैसे CeFi संस्थेकडे पाठवण्याची गरज असते. वापरकर्ता ह्या पैशांचा वापर निर्देशित पण वस्तुतः हाताळत असते. घेतल्या जाणाऱ्या जाणाऱ्या आणि व्यापार केला जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सींच्या बाबत देखील असेच होते. संस्था तिच्या वॉलेटमध्ये क्रिप्टो साठवते आणि वापरकर्त्याकडे ते उपलब्धत नसते. 

ह्याऐवजी DeFi वापरकर्त्याला त्याला आवडेल तसे त्याचे पैसे वापरायची .क्षमता देते. वापरकर्त्याने फक्त DeFi नेटवर्क उपलब्ध करून घेण्याची गरज असते जे वापरकर्त्याला ओळखीसाठी एक अनुक्रमांक देते. एकदा नेटवर्कवर आल्यानंतर वापरकर्ता पैसे नेटवर्क आधारभूत असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतो. 

#2 उपलब्धतता

CeFi ला वापरकर्त्याने एका KYC प्रक्रियेमधून गेल्यांनतर वैयक्तिक माहिती देऊन एक्सचेंजवर नोंदणी करणे गरजेचे असते. अशा प्रकारे संस्था एखाद्या ग्राहकाला त्यांच्या सेवा देण्यास नकार देऊ शकतात. DeFi वापरकर्त्यांची ओळख कोणतीही असली तरी आणि तो कुणाकडूनही आला तरी त्याची लगेच नोंदणी करते (मूलभूत अटींच्या अधीन राहून). 

#3 युझर इंटरफेस

प्रमुख आर्थिक संस्था आणि मंडळांमध्ये CeFi क्षेत्राचा समावेश होत असल्याने त्या ग्राहकास जास्तीत जास्त आधारभूत होण्यासाठी वापरकर्त्यास सोपा असणारा आणि काम करण्यास सोपा असणारा इंटरफेस प्रदान करतात. बहुतांश DeFi नेटवर्क्समध्ये ह्या वैशिष्ट्याचा अभाव आढळतो आणि त्यामुळे सुरुवातीला वापर करताना ती थोडीशी गुंतागुंतीची वाटू शकतात. 

#4 ग्राहक सेवा

CeFi हे स्पर्धात्मक जग आहे ज्यामध्ये प्रत्येक एक्सचेंज आणि संस्था ग्राहकांना आकर्षित करायचा प्रयत्न करत असतात. अशा तऱ्हेने ह्या क्षेत्राने देऊ प्रदान केलेली ग्राहकांची काळजी घेणारी सेवा ही निर्दोष असते ज्यामध्ये विशेष खात्यांची ग्राहकांच्या काळजीकडे कल असण्याबाबत नेमणूक केलेली असते. परत DeFi ही स्वतंत्र नेटवर्क्स असतात आणि बहुशा त्यांच्यामध्ये ग्राहकांसाठी आधारभूत सेवा नसते. 

#5 पारदर्शकता

DeFi विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार काम करते. म्हणून मागील व्यवहारांपासून, ते सध्याचे सदस्य आणि इतर महत्वाची माहिती ही सार्वजनिकरित्या खंतावणीमध्ये उपलब्ध असते. तर दुसरीकडे CeFi संस्था ह्या पडद्याआड काम करतात आणि केवळ व्यापार सुकर करतात. 

#6 Fiat रूपांतरण

Fiat रूपांतरण हे CeFi संस्थांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एखादी व्यक्ती तिचे पैसे क्रिप्टोतून आणि क्रिप्टोमध्ये विशिष्ट संस्थांमधून रूपांतरित करू शकते. DeFi नेटवर्क्स त्यांच्या सदस्यांना अशा प्रकारची सोय देत नाहीत. 

#7 नवीन बदलांची व्याप्ती

CeFi च्या सेवांबाबत जास्त काही नवीन बदल करण्यासारखे नाहीये. पण ब्लॉकचेन अजूनही सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये असल्याने, ज्यामध्ये मोठे बदल घडणारी प्रगती नेहमी घडत असते, DeFi नेटवर्क्स रोमांचित करणाऱ्या वेगाने स्वतःस वरच्या सुधारित पातळीवर नेतात. ह्यामुळे वापरकर्त्यांना जास्त स्वयंचलित फायदे मिळतात

#8 क्रॉसचेन सेवा

जिथे एखादी व्यक्ती क्रिप्टोकरन्सी किंवा टोकनचा दुसरी क्रिप्टोकरन्सी किंवा टोकनबरोबर समान प्लॅटफॉर्मवर व्यापार करू शकते तिथे CeFi क्रॉसचेन सेवा सुकर करते. उदाहरणार्थ Bitcoin किंवा Litecoin किंवा त्याच्या उलट.

पण बहुतांश DeFi नेटवर्क्स अशा पद्धतीच्या व्यापाराला साहाय्य करू शकत नाहीत. केवळ काहीच ‘ अॅटमिक क्रॉसचेन स्वॅप्स’ सारखे प्रोटोकॉल वापरतात जे एका क्रिप्टो मालमत्तेचा दुसऱ्याबरोबर विनिमय करू शकतात. पण ह्या स्वॅपसाठी कोडींगची गरज असते जे कधी कधी गुंतागुंतीचे होऊ शकते. 

#9 संभाव्य धोके

CeFi च्या बाबतीत महत्त्वाचा धोका म्हणजे एखाद्या दुःस्वप्नाप्रमाणे एक्सचेंज किंवा संस्थांचे हॅकिंग होणे. एक्सचेंज आणि तत्सम प्रदानकर्ते सहसा त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आधुनिक सुरक्षा उपायांची तयारी ठेवतात तरीही एक्सचेंजमध्ये चोरी बातम्या दर दोन महिन्यांनी येतच असतात. 

दुसरीकडे DeFi प्रणालीचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे खुद्द नेटवर्क. कोडच्या कोणत्याही ओळींमधील एखादा दोष किंवा बग हा वापरकर्त्याच्या मालमत्तेशी जुळवून घेऊ शकतो. 

मग कोण अधिक चांगले आहे?

दुर्दैवाने ह्यास कोणतेही एक सोपे उत्तर नाही. इथे व्यापाऱ्यानी स्वतःच्या गरजा तपासणे गरजेचे असते जेणेकरून ते कोणत्या वैशिष्ट्याना जास्त महत्त्व देतात ह्याची खात्री होऊ शकेल. जर तुमच्या पैशांवरील नियंत्रण जाणे हा मुख्य मुद्दा असेल तर DeFi चर्चेच्या अग्रस्थानी येते. पण मध्यस्थ संस्थांना पैसे पाठवणे ह्या कृतीमध्ये लाखो लोक दर रोज व्यापार करताना घेतात. म्हणून ह्या गोष्टीच्या बाबतीत जास्त काळजी असण्याचे कारण नाही. तसेच, जर fiat रूपांतरण किंवा क्रॉस-चेन व्यवहार हे जर तुमच्या क्रिप्टोकरन्सीचा महत्त्वाचा भाग असेल तर CeFi स्वतःला बाजारामधील जास्त विश्वासार्ह पर्याय म्हणून सादर करते. पुन्हा, वर चर्चिल्याप्रमाणे, अॅटमिक क्रॉस-चेन स्वॅप्स हे DeFi इकोसिस्टीममध्ये ह्या सेवा सुकर करू शकतात. तुम्ही सलगपणे क्रॉस-चेन सेवांचा लाभ घेण्यासाठी योग्य DeFi नेटवर्क शोधू शकता

कदाचित दीर्घकाळामध्ये एक मिश्र स्वरूपाची ब्लॉकचेन प्रणाली उद्भवू शकते जी ह्या दोन्ही आर्थिक सेवा क्षेत्रांचे फायदे एकत्र करू शकेल. पण आत्ता ते सत्यापासून दूर आहे. त्यामुळे हा एका सेवेला डावलून दुसरीला निवडण्याचा गोंधळ तुमचा व्यापार थांबवू देऊ नका. दोन्ही सेवा अनुभवून बघा आणि मग ठरवा की तुमच्या गरजा आणि मागण्या ह्यांच्याशी जास्त सुसंगत कोण आहे. 


पुढे एक WazirX वर सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शिका दिलेली आहे. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply