Skip to main content

डमींसाठी डीईएक्स (DEX for Dummies)

By डिसेंबर 20, 2021डिसेंबर 21st, 20214 minute read
डमींसाठी डीईएक्स (DEX for Dummies)

Note: This blog is written by an external blogger. The views and opinions expressed within this post belong solely to the author.

क्रिप्टो हा अनेक वर्षांपासून, जगातील शीघ्र गतीने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. सध्या अंदाजे 2000 क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत यापैकी अनेकांना खूप आशादायक आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा आधार आहे. तरीही, या संपत्तीची हाताळणी करणारे सर्वाधिक आणि प्राप्त करण्याजोगे मार्ग म्हणजे केंद्रीकृत प्लॅटफॉर्म आहेत.

या परिस्थितीमुळे, विकेंद्रित एक्सचेंज (DEX) प्लॅटफॉर्ममधील सुधारणा झपाट्याने वाढत आहेत. विकेंद्रित एक्सचेंज (DEXes) केंद्रीकृत एक्सचेंज (CEXes) पेक्षा अधिक चांगल्या सुरक्षेची हमी देत असल्यामुळे अधिक लोकप्रियता मिळवत आहेत. या संदर्भात युनिस्वॅप हे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.

परंतु, विकेंद्रित एक्सचेंजबद्दल अधिक समजून घेण्यासाठी, विकेंद्रीकरण म्हणजे प्रत्यक्षात काय आहे इथून आपण सुरुवात करूया.

विकेंद्रीकरण (Decentralization) म्हणजे काय?

Source: P2P Foundation

Get WazirX News First

* indicates required

हल्ली आपण विकेंद्रीकरणाबद्दल बरेच काही ऐकतो. परंतु त्याचा खराखुरा अर्थ काय आहे? वरील चित्रे नेटवर्क आर्किटेक्चरचे तीन विविध प्रकार दर्शवतात. या आकृतीतील नेटवर्क कोणत्याही वास्तव जगातील नेटवर्क प्रतिबिंबित करू शकतात, उदा: सामाजिक नातेसंबंध, संगणक नेटवर्क, आणि अर्थातच आर्थिक व्यवहार हे इतर गोष्टींत समाविष्ट आहेत. प्रत्येक नोड ( ज्याला पियर असे देखील म्हणण्यात येते) ही एक स्वयंपूर्ण एन्टिटी आहे (उदा, समाजातील व्यक्ती, संगणक नेटवर्कमधील संगणक, जैविक प्रणालीतील एक पेशी). प्रत्येक लिंकने दोन नोडमधील कनेक्शन दाखवायचे आहे. समाजात, उदा: मित्र असणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये एक नातेसंबंध आहे. एका संगणकाचे दोन नोड जोडले जातात जे एकमेकांशी थेट संभाषण करतात.

डावीकडील आकृती एक पूर्णत: केंद्रीभूत संस्था दर्शवते. मध्यभागी असणाऱ्या नोडद्वारे सर्व नोड एकमेकांशी देवघेव करतात. CEXes मध्ये, उदा: स्वत: एक्सचेंजद्वारा व्यवस्थापित केंद्रीय सर्व्हरमधून सर्व व्यवहार मार्गीकृत केले जातात.

मधल्या आकृतीत एक संकरित प्रणाली दाखवण्यात आली आहे. हब म्हणून काम करणारे अनेक नोड सिस्टीममध्ये आहेत. या हबद्वारे नोडमधील संभाषण गेले पाहिजेत. ऑर्डर जुळवणे व लिक्विडिटी पुरवठा यासाठी असे दृष्टीकोन नवनवीन DEXes द्वारे वापरले जातात ( उदा: 0x व KyberNetwork). उदा: 0x मध्ये, ऑर्डर मॅचिंग हब म्हणून काम करणाऱ्या मर्यादित संख्येच्या स्तरांमधून गेलेच पाहिजे. दरम्यान, KyberNetwork आपल्या कृती लिक्विडिटी केंद्रे म्हणून राखून ठेवतात. 

उजवीकडील प्रतिमा पूर्णपणे विकेंद्रित प्रणाली दर्शवते. प्रत्येक नोड इतर नोडच्या छोट्या संख्येशी जोडलेला असतो आणि नेटवर्कमध्ये समान सदस्य म्हणून काम करतो. सर्वात डावीकडे दर्शवलेल्या प्रतिमेसारखे केंद्रीकृत एन्टिटी नसतात, तसेच मध्यभागासारखी हबही नसतात. आदर्शपणे सर्व कार्यक्षमतांसाठी अशी उद्दिष्टे DEXes ने पूर्ण केली पाहिजेत ज्यात ऑर्डर जुळवणे, व्यवहार समझोता आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.

DEX (विकेंद्रित एक्सचेंज) म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे वेगळे असते?

सर्वात मूळ अर्थाप्रमाणे, विकेंद्रित एक्सचेंज एक नवीन प्रकारची जोड्या जुळवणारी सेवा देऊ करते, निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी एका मध्यस्थ संस्थेची गरज न भासता व्यापारी क्रिप्टोकरन्सीच्या ऑर्डर देऊ आणि त्यांचा व्यापार करू शकतात. 

स्वतः अंमलबजावणी करणाऱ्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टवर विसंबून राहिल्याने, केंद्रीकृत क्रिप्टो एक्सचेंजच्या तुलनेत, विशेषत: लक्षणीय कमी किंमतीत, ही विकेंद्रित गतिशील प्रणाली त्वरित व्यापार शक्य करते. 

केंद्रीकृत एक्चेंजेसमध्ये ग्राहकांना ठेवी जमा कराव्या लागतात व त्यानंतर एक आयओयू (ज्याचा अर्थ “मी तुमचे देणे लागतो” हा असून याचा संदर्भ एका अनौपचारिक दस्तऐवजाशी आहे ज्यात एका पक्षास दुसऱ्या पक्षाच्या देण्याची पावती दिलेली असते) जारी करावी लागते, ज्याची एक्सचेंजवर मुक्तपणे देवाणघेवाण केली जाते. ग्राहक पैसे काढण्याची विनंती करतो, तेव्हा या आयओयूचे परिवर्तन क्रिप्टोकरन्सीत होते व ती लाभार्थी मालकाला वितरीत केली जाते. 

याशिवाय, त्यांच्या ग्राहकांची क्रिप्टो संपत्ती, केंद्रीकृत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ठेवतात, ज्यात खरेदीदार व विक्रेता या दोघांचाही समावेश असू शकतो आणि ते निधी प्राप्त करण्याच्या खाजगी कींचे (keys) नियंत्रण करतात.

आपण विकेंद्रित एक्सचेंज का वापरावे?

नवशिक्यांसाठी, त्यांच्या क्रिप्टो संपत्तीवर संपूर्ण नियंत्रण असले पाहिजे अशी इच्छा असणऱ्या गोपनीयतेसाठी जागरूक वापरकर्त्यांसाठी, तुमच्या खाजगी की ठेवण्याची क्षमता हे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. केंद्रीय एक्सचेंज मॉडेलमध्ये, एक एन्टिटी वापरकर्त्याच्या खाजगी कींची देखभाल करते आणि व्यापार सक्षम करते. दुसऱ्या बाजूला, विकेंद्रित एक्चेंजमुळे वापरकर्ते, त्यांच्या खाजगी की आणि पैसा यांवर नियंत्रण ठेवून त्याबरोबरच, एका वितरित लेजरवर क्रिप्टोकरन्सींचा व्यापार करू शकतात.

दुसरे म्हणजे, केंद्रीकृत एक्सचेंजच्या तुलनेत विकेंद्रित एक्सचेंजचे शुल्क खूपच कमी असते व काही बाबतीत शून्य असते. ऑटोमेटेड मार्केट मेकर्स नावाच्या नावीन्यपूर्ण शोधाद्वारे, विकेंद्रित एक्सचेंजमुळे खर्च खूपच कमी होऊ शकतो (एएमएम). 

पारंपारिक व्यापार पुस्तकाची जागा लिक्विडिटी पूल घेतात जे एएमएम वापरताना एका ट्रेडिंग पेअरमध्ये दोन्ही क्रिप्टो संपत्तीकरिता पूर्व-निधीपुरवठा झालेले असतात. ही लिक्विडिटी नेटवर्क वापरकर्त्यांच्या नेटवर्कद्वारे दिली जाते जे, ते स्टेक इन करतात त्या लिक्विडिटी पूलच्या टक्केवारीवर अवलंबून, व्यापार शुल्काद्वारे त्यांच्या ठेवींवर निष्क्रिय उत्पन्न कमावू शकतात.

आज, प्रत्येक केंद्रीकृत एक्सचेंज क्रिप्टो कस्टोडियल सर्व्हिस म्हणून काम करते. याचा अर्थ हा की ते वापरकर्त्यांची क्रिप्टो संपत्ती हाताळतात आणि एका जागी क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात साठवलेली असल्यामुळे केंद्रीकृत एक्सचेंजना हल्ला होण्याचा धोका असतो. विकेंद्रित एक्सचेंज निधी धारण करत नसल्यामुळे, अशा हल्लेखोरांचे ती लक्ष्य बनत नाहीत.

डीइएक्सच्या संपूर्ण वापरकर्ता बेसवर या मालकीचे वितरण झालेले असते, ज्यामुळे हल्ले अधिक महाग, कमी मोबदल्याचे आणि खूपच अधिक कठीण होतात. निधीचे संपूर्ण व्यवस्थापन वैयक्तिक वापरकर्ते करत असल्याने, मध्यस्थाच्या अभावाचा असाही अर्थ होतो की, बहुतेक डीइएक्सना विरुद्ध पक्षाकडून कमी धोका आहे कारण त्यांच्या निधीवर वैयक्तिक वापरकर्त्यांची पूर्ण मालकी आहे ज्यामुळे वैयक्तिक क्रिप्टो व्यापाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार प्राप्त होतो.

विकेंद्रित एक्सचेंजचे अनेक नावीन्यपूर्ण फायदे असले तरी त्यांच्या काही त्रुटीदेखील आहेत.

जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारपेठांसाठी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ही लिक्विडिटीसाठी आवश्यक स्त्रोत आहे जो दैनंदिन व्यापार कार्यासाठी लाखो डॉलरना आधार देतो. भूतकाळात तुम्ही क्रिप्टोकरन्सी विकत घेतल्या असतील तर नक्कीच तुम्ही ते वझिरेक्स किंवा बायनान्ससारख्य़ा एक्सचेंजमधून केले असेल.

या शिवाय, अप्रशिक्षित व्यक्तीला डीइएक्स खूप किचकट वाटू शकते. त्याबरोबरच, वापरकर्त्याने त्याच्या/तिच्या खाजगी कींचे नीट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, ज्यामध्ये अनेक वापरकर्त्यांचा बराचसा वेळ जाऊ शकतो आणि अधिक खर्च करावा लागू शकतो. म्हणूनच, डीइएक्सचा विचार केला तर त्यात प्रवेश करण्यासाठी एक बौद्धिक अडथळा आहे असे समजले जाऊ शकते. 

तथापि, निरंतर नावीन्यपूर्ण शोधांसाठी क्रिप्टोकरन्सी सुपरिचित आहे आणि अगदी लवकरच, कुठेतरी एखाद्या परिचित/अपरिचित स्टार्ट-अप द्वारे निर्मित वापरकर्त्यास अनुकूल असा प्लॅटफॉर्म उदयास येईल.

विकेंद्रीकरण हे मुख्य़ तत्त्व असणाऱ्या एक्चेंजेसची एक नवीन पिढी लोकप्रिय होत आहे आणि क्रिप्टो जगाचे लक्ष वेधत आहे. स्क्वेअर व ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनीदेखील नुकतेच त्यांच्या 56 लाख सोशल मीडिया फॉलोअरसमोर विधान केले आहे की ते एका क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित एक्सचेंज (बीटीसी) वर काम करत आहेत.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply