Skip to main content

क्रिप्टो वॉलेट्सचे वेगवेगळे प्रकार (Different Kinds of Crypto Wallets)

By एप्रिल 5, 2022जून 3rd, 20225 minute read
Different Kinds of Crypto Wallets

क्रिप्टोकरन्सीला जगभरात मान्यता मिळाली आहे, आणि त्याची लोकप्रियता वाढतच आहे. ते स्टॉक एक्सचेंज यंत्रणेसारखेच मानले जाते.  तुम्ही क्रिप्टो एक्सचेंजमधून तुमच्या क्रिप्टोकरन्सी काढून घेऊ शकता आणि त्या बाह्य वॉलेटमध्ये ठेवू शकता, तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये तुमच्या स्टॉकबरोबर जे करता अगदी तसेच.

क्रिप्टो व्यवहार नियमितपणे  हाताळत असताना क्रिप्टो वॉलेटचे प्रकार जाणून घेणे ही देखील आवश्यक पायरी आहे.  सर्वोत्तम क्रिप्टो वॉलेट निवडल्यामुळे तुमचा क्रिप्टोकरन्सी पोर्टफोलिओ स्टोअर करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे सोपे होते (आणि कदाचित अधिक आनंददायक सुद्धा).

या लेखामध्ये, उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या क्रिप्टो वॉलेट्सचा आढावा घेऊया. 

क्रिप्टो वॉलेट म्हणजे काय?

“निरनिराळ्या प्रकारचे क्रिप्टो वॉलेट्स” जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आधी ते समजून घेतले पाहिजेत. 

सर्वात आधी, क्रिप्टोकरन्सीची मालकी असणे ही नियमित पैशांची मालकी असण्यापेक्षा वेगळे आहे. क्रिप्टोकरन्सी हा कोड्सचा संग्रह असतो जो मूर्त स्वरूपात अस्तित्वात नसतो आणि एकमेव पत्त्यांसह ब्लॉकचेनवर उपलब्ध असतो.

यामध्ये दोन की असतात, सार्वजनिक की आणि खासगी की, ज्या तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ट्रान्झॅक्शन्स आणि डीलिंग्जमध्ये मदत करतात.  सार्वजनिक की ही इतर युझर्सना क्रिप्टो मालमत्तेच्या हस्तांतरणात मदत करण्यासाठी वापरली जाते आणि खासगी की ही त्याचवेळी त्या मालमत्ता वॉलेटमध्ये अनलॉक करण्यासाठी वापरली जाते.

Get WazirX News First

* indicates required

क्रिप्टो वॉलेट हे तुमचे फंड्स सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या नेहमीच्या वॉलेटसारखेच असते.  याच्या तुलनेत, निरनिराळ्या प्रकारचे क्रिप्टो वॉलेट हे नियमित वॉलेटपेक्षा जास्त सुरक्षितता प्रदान करतात. प्रत्यक्षात, क्रिप्टो वॉलेटमध्ये कधीही वास्तव कॉइन नसतात; ते केवळ क्रिप्टो मालमत्तेच्या की सुरक्षित ठेवण्याची खात्री देतात.  व्यक्तींना फंड्सशी जोडण्यासाठी असलेली माहिती आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे कदाचित क्रिप्टो वॉलेटमध्ये स्टोअर केले जाऊ शकते. 

क्रिप्टो वॉलेटमधील सार्वजनिक आणि खासगी कींचे महत्त्व

आपण क्रिप्टो वॉलेटच्या प्रकारांविषयी शिकण्यापूर्वी, खासगी आणि सार्वजनिक कीज या क्रिप्टो वॉलेटशी कशा प्रकारे संबंधित असतात ते पाहूया.  तुम्ही क्रिप्टो वॉलेट प्रस्थापित करता तेव्हा, तुम्हाला तुमच्या वॉलेटशी लिंक केलेली एक खासगी की आणि एक सार्वजनिक की दिली जाईल.   एक उदाहरण म्हणून, तुमचे ईमेल विचारात घ्या.  तुम्हाला ज्याच्याकडून ईमेल मिळावे असे वाटते त्याला तुम्ही तुमचा ईमेल पत्ता देता. 

मात्र, तुम्ही तुमचा ईमेल पत्ता शेअर केल्यामुळे त्याचा अर्थ असा होत नाही की इतरांना तुमच्या अकाउंटवरून ईमेल पाठवण्याची परवानगी दिली जाईल.  एखाद्याला तसे करण्यासाठी तुमच्या ईमेल अकाउंटचा पासवर्ड माहित असणे आवश्यक असेल.  सार्वजनिक की आणि खासगी की याच प्रकारे क्रिप्टो वॉलेट्समध्ये वापरल्या जातता. 

सार्वजनिक की ईमेल पत्त्यासारखी काम करते जी कोणाबरोबरही शेअर करता येते.  जेव्हा तुम्ही तुमच्या वॉलेटला कोणाकडून तरी रोख रक्कम स्वीकारायला लावता तेव्हा ती तयार केली जाते. 

खासगी की हे एक संरक्षित गुपित असते. ते तुमच्या पासवर्डसारखे असते, जे हॅक होता कामा नये आणि दुसऱ्या कोणाबरोबरही शेअर करता कामा नये.  तुम्ही ही खासगी की वापरून तुमचे पैसे खर्च करता.  कोणाला तुमच्या खासगी कीचा ॲक्सेस मिळाला तर, तुमचे खाते हॅक होण्याची, आणि तुम्ही तुमचे सर्व बिटकॉइन डिपॉझिट्स गमावण्याची मोठी शक्यता असते.  

क्रिप्टो वॉलेटची वैशिष्ट्ये 

येथे क्रिप्टो वॉलेटच्या वैशिष्ट्यांचा त्वरित आढावा घेतला आहे: 

  • वापरण्यास सोपे: हे इतर कोणत्याही सॉफ्टवेअरसारखे किंवा तुम्ही दररोज वापरत असलेल्या वॉलेटसारखे काम करते.
  • अतिशय सुरक्षित: हा केवळ तुमची खासगी की सुरक्षित ठेवण्याचा मुद्दा आहे.
  • रियल टाईम/ खऱ्या वेळेत सीमापार व्यवहारांना अनुमती देते: हे कोणत्याही मध्यस्थांविना अडथळा-मुक्त आहेत.
  • कमी व्यवहार खर्च: नियमित बँकांशी तुलना केल्यास, व्यवहार शुल्क हे लक्षणीयरित्या कमी आहे.
  • अनेक क्रिप्टोकरन्सींच्या व्यवहारांना अनुमती देते: यामुळे चलन रूपांतरण (करन्सी कन्व्हर्जन्स) सोपे होते.

निरनिराळ्या प्रकारचे क्रिप्टो वॉलेट

दोन प्रकारचे क्रिप्टो वॉलेट्स आहेत, प्रत्येकाचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. ते आहेत:

  • हॉट वॉलेट
  • कोल्ड वॉलेट

हॉट वॉलेट्स म्हणजे असे वॉलेट्स जे कोणत्या तरी प्रकारे इंटरनेटशी जोडलेले असतात.  दुसऱ्या बाजूला, कोल्ड वॉलेट्स म्हणजे भौतिक वॉलेट्स, जे इंटरनेटशी जोडलेले नसतात.

हॉट वॉलेट्स हे कोल्ड वॉलेट्सपेक्षा अधिक लवचिक असतात पण ते कमी सुरक्षित असतात.  हॉट वॉलेट्स डिजिटल असल्यामुळे, तुम्ही प्रवासात असताना ते तुम्हाला तुमच्या रकमेशी ॲक्सेस करण्याची परवानगी देते.  दुसऱ्या बाजूला, ते डिजिटल असल्यामुळे कोणत्या तरी मार्गाने असुरक्षित असतात.

कोल्ड वॉलेट्स इंटरनेटशी जोडलेले नसल्यामुळे ते सहसा अधिक सुरक्षित असतात.  कोल्ड वॉलेटमधून पैसे गमावण्यासाठी ते प्रत्यक्षात काढून घ्यावे लागतील  मात्र, या पातळीच्या संरक्षणामुळे प्रवास करताना रोख रकमेची देवाणघेवाण करणे अधिक आव्हानात्मक होते.

लक्षणीय बिटकॉइन होल्डिंग्ज असलेल्यांसाठी कोल्ड आणि हॉट वॉलेट्सचे मिश्रण हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.  कोल्ड वॉलेट बहुसंख्य मालमत्तांचे संरक्षण करू शकते, तर हॉट वॉलेट अधिक लवचिकता प्रदान करू शकते.

हायब्रीड धोरण तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी नुकसान देऊ शकते: सुरक्षा आणि लवचिकता.  उदाहरणार्थ, तुम्हाला विशिष्ट प्रकारचे हॉट किंवा कोल्ड वॉलेट निवडून तुम्हाला तुमची सुरक्षितता अधिक चांगल्या प्रकारे कस्टमाईज करता येऊ शकते.

हॉट आणि कोल्ड या दोन्ही श्रेणींच्या वॉलेटचे निरनिराळ्या प्रकारचे क्रिप्टो वॉलेट्स असतात. मात्र, आपल्याकडे तीन प्राथमिक प्रकार आहेत: 

  • सॉफ्टवेअर वॉलेट्स,
  • हार्डवेअर वॉलेट्स, आणि
  • कागदी वॉलेट्स.

सॉफ्टवेअर वॉलेट्स

ते इंटरनेटला जोडलेले असल्यामुळे, बहुसंख्या सॉफ्टवेअर वॉलेट्सची वर्गवारी हॉट वॉलेट्स अशी केली जाते. वेब वॉलेट्स, डेस्कटॉप वॉलेट्स, आणि मोबाईल वॉलेट्स हे सॉफ्टवेअर वॉलेट्सचे तीन सर्वाधिक प्रचलित प्रकार आहेत.

1. वेब वॉलेट्स: 

वेब वॉलेट्सचा ॲक्सेस मिळवण्यासाठी वेब ब्राऊजरचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर किंवा फोनवर कोणतेही विशेष सॉफ्टवेअर डाऊनलोड करायची गरज नसते, कारण तुम्ही ब्राऊजरद्वारे त्यांचा ॲक्सेस मिळवू शकता.

ब्राऊजर ॲक्सेसचा अर्थ असाही होतो की जोपर्यंत तुमच्याकडे तुमचा पासवर्ड आणि वेब ब्राऊजर असलेले उपकरण असेल तोपर्यंत तुम्ही कुठूनही तुमच्या क्रिप्टोचे व्यवस्थापन करू शकता.

मात्र, वेब वॉलेटमध्ये तुमच्या क्रिप्टोच्या कीची मालकी वारंवार वेबसाईटकडे असते.  या कारणामुळे, तुमचे तुमच्या क्रिप्टोकरन्सींवर काहीसे कमी नियंत्रण असेल.

2. डेस्कटॉप वॉलेट्स:

डेस्कटॉप वॉलेटसाठी तुमच्या कम्प्युटरवर प्रोग्राम इन्स्टॉल करणे आवश्यक असते.  पुढे, तुम्ही तुमच्या कीज स्टोअर करण्यासाठी प्रोग्राम वापरून एक डेटा फाईल तयार कराल.  अखेरीस तुम्हाला कींचा ॲक्सेस मिळवण्यासाठी, तुम्हाला पासवर्ड प्रस्थापित करावा लागेल.

डेस्कटॉप वॉलेट वापरण्याचा एक फायदा असा की तुमचे तुमच्या कीवर नियंत्रण असते.   मात्र, तुमचा कम्प्युटर व्हायरसमुक्त आणि मालवेअरमुक्त असण्याची हमी असणे सर्वात चांगले कारण तुमच्या कीची मालकी तुमच्याकडे असेल.  तुमचा पासवर्ड न विसरणेही अतिशय महत्त्वाचे आहे.

तुम्ही डेस्कटॉप वॉलेटची निवड केली तर डेटा फाईलची कॉपी तयार करा आणि ती इतरत्र सेव्ह करा.  त्यानंतर तुम्ही तुमच्या कम्प्युटरपासून दूर असलात तरी किंवा तो क्रॅश झाला तरी तुम्हाला तुमच्या फंड्सचा ॲक्सेस मिळवता येईल.

3. मोबाईल वॉलेट्स:

मोबाईल वॉलेट्स हे डेस्कटॉप वॉलेट्सप्रमाणेच काम करतात.  वॉलेट हे स्मार्टफोन ॲप्लिकेशन असते हा यातील मुख्य फरक असतो.

तुम्हाला फंड्सचा व्यापार करायचा असेल तेव्हा तुम्ही कुठे जाऊ शकता याचे मोबाईल वॉलेट तुम्हाला अतिरिक्त स्वातंत्र्य देते.  ते तुम्हाला क्यूआर कोडची सुविधा देतात ज्यामुळे क्रिप्टोकरन्सीची खरेदी आणि विक्री करणे तुमच्यासाठी अधिक सोपे होते. 

मोबाईल वॉलेट्स अधिक स्वातंत्र्य देतात, पण त्यांच्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांचीही गरज असते.  उदाहरणार्थ, तुमची क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईल वॉलेट्स व्हायरस-मुक्त असायला हवेत. त्याबरोबरच, तुमचा फोन हरवण्याचे टाळण्यासाठी तुम्ही जास्त दक्षता बाळगली तर त्याचाही फायदा होईल.

हार्डवेअर वॉलेट्स

तुमच्या की सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर करण्याऐवजी हार्डवेअर वॉलेटचा वापर करून भौतिक उपकरणात स्टोअर केल्या जातात.  बहुसंख्य हार्डवेअर वॉलेट्स हे फ्लॅश ड्राईव्हप्रमाणेच काम करतात.  यूएसबी ड्राईव्ह त्यांना कम्प्युटरशी किंवा इतर उपकरणाशी जोडू शकतात.

हा हार्डवेअर वॉलेटच्या सर्वात महत्त्वपूर्ण फायद्यांपैकी एक आहे.  तो इंटरनेटशी जोडलेला नसतो, त्यामुळे सुरक्षिततेचा लक्षणीय धोका दूर होते.  तुम्ही तुमचे डिव्हाइस हरवले तर तुमच्या क्रिप्टोचा ॲक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही हार्डवेअर वॉलेट वापरून सीड फ्रेज स्थापित करता.

ट्रान्झॅक्शन्स निर्माण करताना तुमची खासगी की कधीही तुमचे डिव्हाइस सोडून जाणार नाही.   गॅजेट ट्रान्झॅक्शन/ पेमेंट माहिती विचारते आणि त्यानंतर डेटा तपासते.  त्यामुळे या प्रकारे तुमची खासगी की तुमचे उपकरण सोडून जाणार नाही.

सॉफ्टवेअर वॉलेट्सशी तुलना केली असता, हार्डवेअर वॉलेट्स अधिक सुरक्षित आहेत.  आणि निःसंशयपणे ते अधिक महग आहेत.  त्यामुळे भरपूर प्रमाणात क्रिप्टोकरन्सी असलेल्या लोकांना किंवा ज्यांना आपल्या मालमत्ता दीर्घकाळ ठेवायच्या आहेत अशा ते मोठ्या प्रमाणात सुचवले जातात.

कागदी वॉलेट्स

कागदी वॉलेट हा कोल्ड वॉलेटचा एक प्रकार आहे जो कागदाच्या तावापासून तयार केलेला असतो.  तुम्हाला तुमचे बिटकॉइन मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती या कागदामध्ये असते.

कोल्ड वॉलेट्स अधिक विश्वसनीय असले तरी, कागदी वॉलेटच्या स्वरूपामुळे ते असुरक्षित बनते. जर तुम्ही तुमचा कागद हरवला तर, तुम्ही तुमचे पैसेही गमावाल.  

कागदी वॉलेटची आणखी एक उणीव म्हणजे त्याची अंशतः रक्कम ट्रान्समिट करण्याची असमर्थता. वर्कअराउंड अस्तित्वात असतात, पण ते वेळखाऊ असू शकतात. या उणीवांमुळे कागदी वॉलेट्सना सामान्यतः पसंती दिली जात नाही. 

मूलभूत आणि सर्वात महत्वाचा घटक

जेव्हा तुम्ही बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सींशी व्यवहार करता तेव्हा क्रिप्टो वॉलेट्स हे महत्त्वाचा भाग असतात.  कारण ते फंड्स ट्रान्सफर आणि रिसिव्ह करण्यासाठी ब्लॉकचेन नेटवर्कला समर्थ करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या महत्त्वाच्या भागांपैकी एक असतात.  मात्र, प्रत्येक वॉलेट प्रकाराचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात, त्यामुळे रकमेचा व्यवहार करण्यापूर्वी ते कसे काम करतात ते समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply