जगभरातील क्रिप्टो-मित्र देश क्रिप्टो नियमनांना कशा प्रकारे हाताळतात? (How are crypto-friendly nations around the globe approaching Crypto regulations?)

By फेब्रुवारी 20, 2022फेब्रुवारी 23rd, 20226 minute read

टीप: हा ब्लॉग एका बाह्य ब्लॉगरने लिहिला आहे. या पोस्टमध्ये व्यक्त केलेले दृष्टीकोन व अभिप्राय पूर्णत: लेखकाचे आहेत. 

एका अस्थिर व जुगारवजा गुंतवणूकीपासून एका पोर्ट्फोलियोतील वैविध्यपूर्ण होल्डिंग/धारण असे त्याचे स्थित्यंतर होत असताना क्रिप्टोकरन्सीचे कशा प्रकारे नियमन केले जावे या बद्दल जगभरातील सरकारे असहमत आहेत.आज जगाच्या बहुतेक प्रदेशात, उत्कृष्ट कारणांमुळे हे क्षेत्र भरभराट करत आहे. व्यवहार करण्याच्या सोप्यात सोप्या मार्गांपैकी हा एक आहे आणि तो लवचिकता देखील देऊ करतो. या पेक्षा ही चांगले म्हणजे वैयक्तिक सबलीकरणाचे एक नवीन स्वरूप तो देतो जे आकर्षकच नव्हे तर गतीमान देखील आहे. आणखी अनेक कारणांसाठी डिजिटल संपत्ती प्रचंड विकास करत आहे. ती मुद्रास्फिती विरुध्द संरक्षण देते, ते किफायतशीर आहे आणि पैसे भरण्याचा देखील एक सुरक्षित मार्ग आहे. या पेक्षाही अधिक लक्षणीय म्हणजे हा एक खाजगी मार्ग आहे जो स्व-अनुशासित आणि व्यवस्थापित आहे. 

एकादा देश क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात किती मित्रत्वपूर्ण आहे याचा विचार करतो, तेव्हा तो देश त्याचे किती नियमन करतो व त्यावर कर लावतो हे पाहून त्याच्या मित्रत्वाचा विचार करतो. ते मनात ठेवून, तथाकथित “क्रिप्टो मित्र” देश क्रिप्टो विधीविधानाचा प्रश्न कशा प्रकारे हाताळत आहेत याची आपण चाचणी करूया. 

माल्टा

भूमध्यातील बेट असणारा हा लहनसा देश, क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांसाठी स्वागतोत्सुक देश म्हणूनच नेहमी याच्याकडे पाहिले गेले आहे. त्यांच्या उदार मनामुळे या देशात अनेक क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजेस आणि बिटकॉइन प्रकल्पांची मुख्य कार्यालये या देशात आहेत. 

Get WazirX News First

* indicates required

क्रिप्टो-लक्षकेंद्रित उद्यमांसाठी देखील स्ट्र्रॅटेजिक रित्या देखील माल्टा तर्कसंगत असण्याची आणखी काही कारणे आहेत. माल्टा हा युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे. याचा अर्थ असा की माल्टा मध्ये स्थित कार्यविधी असणारे क्रिप्टो प्रकल्प उर्वरित युरोपियन युनियन मध्ये मुक्तपणे संचलन करू शकतात. क्रिप्टोचे नियमन करण्याबद्दलचा या देशाची सौम्य भूमिका टीकेविना राहिली नाही. द फायनॅन्शियल टास्क फोर्स (एफएटीएफ)/ आर्थिक कार्य कृती बळ हा एक आंतरराष्ट्रीय धोरण-निर्माण गट असून यात ३९ सदस्य देश आहेत. माल्टा चिंतेबद्दल त्यांनी आवाज उठवला आहे. एफएटीएफ ने एक बंद दरवाजातील मिटिंग बोलावली आणि माल्टाच्या सीमेतून आलेल्या क्रिप्टोकरन्सीतील आरोपित 6000 कोटी युरो/60 बिलियन युरो ($7120 कोटी/($71.2 बिलियन) रकमेबद्दल मोठ्याने इशारा देण्यात आला. त्याचा वापर गुन्हेगारी कामासाठी वापरण्यात आला किंवा तसा संशय असल्याबद्दलही कोणतेही रिपोर्ट्स नव्हते. मार्गदर्शन देण्यासाठी नियमन प्राधिकरणाच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत. या लहानशा भूमध्य बेटात अधिक नियम कदाचित येईल किंवा येणार देखील नाही. या दरम्यान, इयुचे सदस्य नसणार्‍या देशांतील उच्चभ्रू गुंतवणूकदार त्यांचा 15 लाख युरो ($10.78 ) च्या नागरिकत्व प्रस्ताव आणि क्रिप्टोबद्दल सौम्य भूमिका या साठी त्याचा विचार करणे चालू ठेवतील. 

स्विट्झरलॅंड

स्विट्झरलॅंड अनेक गोष्टींसाठी प्रख्यात आहे. उच्च गोपनीयता आणि किमान जोखिम ही स्विस बॅंकिंग मापदंडाची ओळख आहे आणि आर्थिक विश्वात ती सुपरिचित आहे. आणि परिणामस्वरूप, या देशात क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी देखील सौम्य नियम आहेत यात आश्चर्य नाही. 

परंतु, क्षेत्राची कॅन्टन्समध्ये विभागणी झाल्यामुळे काय शक्य आहे व काय नाही यावर लक्षणीय स्वरूपात प्रभाव पडतो. स्विट्झरलॅंडमध्ये विविध कॅंटन्सच्या क्रिप्टोकरन्सी नियमन कायदेसंलग्न मापदंडांत फरक असू शकतो व यात 26 राज्ये आणि फेडरल क्षेत्रे आहेत. 

एका स्विस कॅन्टन मध्ये क्रिप्टोकरन्सीवर कर लावला जाऊ शकतो परंतु दुसर्‍यात नाही. कर केव्हा लादायचा या बद्दल प्रत्येक कॅन्टनचे स्वत:चे निकष ससू शकतात. झुरिकमध्ये चल खाजगी संपत्तीवरील कर सवलतीमुळे, देशाच्या आय करातून बिटकॉन आणि इतर क्रिप्टोकरन्सी वगळल्या जाऊ शकतात. परंतु त्या विरुध्द, मायनिंग लाभ नियमित आय कर पात्र आहेत. बर्न मध्ये हे नियम अधिक कडक आहेत आणि मायनिंग व व्यापार यांना सामान्य नियुक्ती मोबदला मानले जाते. झुरिकमधील भांडवली लाभ लुचर्नमध्ये कराच्या सवलतीस पात्र आहेत जे कॅन्टनच्या धोरणाच्या अधिक जवळ आहे. 

युरोपियन युनियन

युरोपियन युनियन (इयु) च्या बहुतेक भागात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे परंतु एक्स्चेंज अनुशासन सदस्य राज्यानुसार बदलते. या दरम्यान, इयु अंतर्गत कर 0% ते 50% इतक्या लक्षणीय स्वरूपात बदलतात. नजीकच्या काळात इयु च्या पाचव्या व सहाव्या ॲन्टी मनी लॉडरिंग डायरेक्टिव्ह्ज (एस ए एम एल डी व 6ए एम एल डी) लागू करण्यात आले आहेत जे केवायसी/सीएफटी मापदंड आणि मानांकित रिपोर्टिंग गरजांना सुदृढ बनवतात. सप्टेंबर 2020 मध्ये क्रिप्टो-असेट्स रेग्युलेशन/क्रिप्टो संपत्ती-नियमन मध्ये बाजारपेठेचा प्रस्ताव युरोपियन कमिशनने ठेवला- ही संरचना ग्राहक संरक्षण सुदृढ करते, क्रिप्टो उद्योग वर्तणूक स्पष्ट करते आणि नवीन परवाना आवश्यकता उपलब्ध करून देते 

पोर्तुगालl

आज, जगातील सर्वात अधिक क्रिप्टो-मित्र असे काही देश तुम्ही शोधत असाल तर पोर्तुगालचे स्थान नक्कीच वरचे असेल. पोर्तुगाल मध्ये क्रिप्टोकरन्सी कर-मुक्त आहे आणि अनेक क्रिप्टो व्यापार्‍यांनी या देशात अगोदरच दुसरे निवासस्थान प्रस्थापित केले आहे. पोर्तुगालमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल बरेच स्वारस्य आहे. एप्रिल 2020 मध्ये डिजिटलायझेशनास उत्तेजन देण्यासाठी पोर्तुगालने “डिजिटल ट्रान्झिशनल ॲक्शन प्लॅन/डिजिटल स्थित्यंतरणीय कृती योजना” चा आरंभ केला. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे या स्ट्रॅटिजीमुळे कॉर्पोरेट नवसंशोधन आणि डिजिटल परिवर्तन यांचे संवर्धन होईल. या व्यतिरिक्त, या कृती योजनेत ब्लॉकचेन व इतर फिल्ड प्रयोगांना मदत करण्यासाठी “टेक्नॉलॉजिकल फ्री झोन्स/तंत्रज्ञानविषयक मुक्त क्षेत्रे” यांच्या प्रस्थापनेचे आवाहन केले आहे. 

कॅनडा

सर्वसामान्यत:, क्रिप्टोकनसीच्या बाबतीत कॅनेडियन नियमकांनी पूर्वसक्रीय वृत्तीचा अंगिकार केला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये, बिटकॉइन एक्स्चेंजमध्ये-व्यापार केलेला फंड/एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (इटीएफ) ला स्वीकृती देणारा तो पहिला झाला होता. या व्यतिरिक्त, कॅनेडियन सेक्युरिटीज ॲडमिनिस्ट्रेटर्स (सीएसए) आणि द इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्री रेग्य्लेटरी ऑर्गनायझेशन ऑफ कॅनडा (आयआयआरओसी) यांनी सांगितले आहे की क्रिप्टोकरन्सी व्यापार प्लॅटफॉर्म्स आणि डीलर्स यांनी कॅनडा क्षेत्रीय अधिकरणात आपले नाव नोंदवलेच पाहिजे. या शिवाय, क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकीस धन सेवा व्यवसाय/मनी सर्व्हिस बिझिनेसेस (एमएसमबी ज) म्हणून कॅनडा ऒळखते आणि त्यांनी कॅनेडियन फायनॅन्शियल ट्रॅन्स्झॅक्शन्स ॲन्ड रिपोर्ट्स अनॅलिसिस सेंटर (एफआयएनटीआरएसी) येथे नोंदणी करणे गरजेचे आहे. इतर वस्तूंप्रमाणे क्रिप्टोखरन्सीज वर देखील कॅनडा कर आकारते.

इस्टोनिया

क्रिप्टोकरन्सीच्या जगात आपले वेगळे भव्य नाव कोरण्याची इस्टोनियाची दुर्दम्य इच्छा आहे. क्रिप्टोकरन्सी स्टार्टअपच्या संदर्भात युरोपमध्ये अत्यंत सक्रीय देशांपैकी एक आहे आणि येथे क्रिप्टोकरसीजची लोकप्रियता डिजिटल यशोगाथा अशा इस्टोनियाच्या ख्यातीशी साजेशी आहे. बाजारपेठेचा विस्तार होत आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानासहित कोणत्याही निराकरणात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार तयार आहेत. इस्टोनियामध्ये, इतर कंपनी गतिविधींप्रमाणेच, बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर कर आकारण्यात येतो- वितरित न करण्यात आलेल्या नफ्यावर कोणताही कॉर्पोरेट आयकर नाही. 

याच प्रमाणे इस्टोनियाचे बॅंकिंग क्षेत्र देखील क्रिप्टोवर-लक्ष केंद्रित बनत आहे. उदा: इस्टोनियातील एलएचव्ही बॅंक ही ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणारी इस्टोनियातील पहिली वित्त संस्था बनली. या शिवाय, या संस्थेने सायबर वॉलेट ॲप्लिकेशन सादर केले, हे एक ब्लॉकचेन-आधारित वॉलेट असून ते वापरकर्त्यांना खर्‍याखुर्‍या युरोजचे डिजिटल प्रतिनिधित्व/रेप्रेझेंटेशन संप्रेषण/ट्रॅन्स्मिट करू देते.

सिंगापूर

दक्षिण आशियातील विख्यात वित्त-तंत्रज्ञान म्हणून सिंगापूर ओळखले जाते. सिंगापूरची केंद्रिय बॅंक, द मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर आपले कथन मांडते की नवीन संशोधनास कुंठित करू नये आणि त्याच बरोबर मनी लॉंडरिंग तसेच इतर अवैध कारभार रोखण्यासाठी क्रिप्टोकरन्सी पर्यावरण प्रणाली कठोरपणे नियंत्रित केली पाहिजे. 

सिंगापूर मध्ये भांडवली लाभ कर नाही. व्यक्ती व कॉर्पोरेशनच्या मालकीतील क्रिप्टोकरन्सी धनावर कर लावला जात नाही. परंतु, सिंगापूरमध्ये व्यवसाय इन्कॉर्पोरेटेड स्वरूपाचा आहे आणि क्रिप्टो व्यापार मध्ये कार्यरत आहे किंवा क्रिप्टो पेमेंट्सचा स्वीकार करते, कॉर्पोरेशन आयकरास पात्र आहे. 

जर्मनी

क्रिप्टोकरन्सी करनिर्धारणाच्या बाबतीत जर्मनीची भूमिका वेगळी आहे. देशात वैयक्तिक गुंतवणूकीस पसंती दिली जाते, तो बिटकॉइनकडे खाजगी धन म्हणून पाहतो, चलन, संपत्ती किंवा स्टॉक म्हणून नाही. बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सीज, एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवल्या असतील तर त्या जर्मनी मध्ये कर-मुक्त आहेत. विक्री किंवा खरेदीवर त्या वॅट साठी पात्र नाहीत. 

तुम्ही पैशाचे रोख किंवा अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये परिवर्तन एका वर्षाच्या आत केले व त्यापासून होणारा €600 पेक्षा कमी असेल तर तो नफा कर-मुक्त आहे.

लक्शमबर्ग

क्रिप्टोकरन्सी हे विनिमयाचे वैध चलन आहे असा लक्समबर्गचा दृष्टीकोन आहे. देशांतर्गत क्रिप्टोकरन्सीजचा व्यवहार किंवा वापर करण्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत. लक्समबर्गमध्ये क्रिप्टोकरन्सीजसाठी स्पष्ट नियमन नसले तरीही या विधीविधानाच्या बाबतीत सरकारचा कल सामान्यत: प्रगतीशील राहिला आहे. 

लक्समबर्गमधील क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजेसचे नियमन सामान्यत: सीएसएसएफ द्वारा केले जाते आणि त्यांनी इतर वित्त संस्थांप्रमाणेच त्याच कायद्यांचे पालन केलेच पाहिजे.

आज, क्रिप्टोकरन्सी प्रगतीच्या बाबतीत अद्यतन राहण्यास आणि त्यांना हाताळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय प्रस्थापित करण्यासाठी देश सज्ज आहे. 

नेदरलॅंड्स

क्रिप्टोकरन्सीजच्या बाबतीत नेदरर्लॅंड्सचा दृष्टीकोन उदार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासात मदत करण्याची त्यात क्षमता आहे असा अधिकार्‍यांचा विश्वास आहे. क्रिप्टोकरन्सीजचा वापर करण्याविरुध्द नेदरलॅंड्सद्वारा कोणतीही तीव्र नियंत्रणे नसल्यामुळे कोणतीही काळजी न करता तेथील व्यक्ती त्यांचा वापर करतात. ते फायनॅन्शियल टास्क फोर्स (एफएटीएफ)/आर्थिक कृती बळ च्या आवश्यकतांचे ते पालन करतात. 

नेदरलॅंड्समध्ये, क्रिप्टोकरन्सीचे नियमन द डच नॅशनल बॅंक (डीएनबी) द्वारा केले जाते. 

भारत

भारताची काय स्थिती आहे?

विविध देश क्रिप्टोकरन्सीजचे नियमन विविध प्रकारे करतात परंतु भारत हा आजपर्यंत क्रिप्टोकरन्सीजचा सर्वाधिक विरोध करणार्‍यांपैकी एक देश बनला अहे असे म्हणणे रास्त ठरेल. क्रिप्टो विधिविधानात सरकार काय सादत करणार आहे या बाबतीत माध्यमांच्या स्त्रोतानुसार, ही स्थिती व भूमिका फारशी बदलणार नाही. 

क्रिप्टोकरन्सीजच्या बाबतीत भारताने आजपर्यंत खबरदारीचा पवित्रा कायम ठेवला आहे आणि आरबीआय त्यांच्यावर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिबंध दूर केल्यानंतर देखील, केंद्रिय बॅंकेची भूमिका तशीच राहिली आहे. या बरोबरच, भारत सरकार, क्रिप्टोकरन्सीजचे कठोर नियमन आणि त्याचबरोबर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरास पाठिंबा देणे या दुहेरी स्ट्रॅटेजीचा पाठलाग करत आहे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply