Skip to main content

भारतामध्ये सुशीस्वॅप(SUSHI) कसे खरेदी करावे? (How to Buy Sushiswap (SUSHI) in India?)

By एप्रिल 19, 2022मे 30th, 20225 minute read
How to buy Sushiswap (SUSHI) in India

डिफायच्या (DeFi) स्पेसमध्ये युनीस्वॅप (Uniswap) हा व्यापाराचे मोठे प्रमाण असलेला प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे. पण तो लोकप्रिय असूनही  नियमांच्या विकासाच्या दिशेच्या बाबतीत युनिस्वॅप  त्याच्या वापरकर्त्यांना फारसे बोलू देत नाही ह्या तथ्यामुळे क्रिप्टो जगामधले लोक निराश झाले आहेत. पण, सुशीस्वॅप हा युनिस्वॅप चा एक फोर्क आहे जो स्थानिक क्रिप्टो सुशी  मालकांना नेटवर्क गव्हर्नन्स मध्ये सहभागी होऊ देतो.  

$4.5 बिलियनच्या वर टीव्हीएल (TVL) सह सुशीस्वॅप हे डिफाय (DeFi) जगामधील अग्रगण्य एएमएम्स (AMMs) (ऑटोमेटेड मार्केट मार्कर/स्वयंचलित बाजार निर्माता)) पैकी एक आहे. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सुशीस्वॅप बद्दल माहीत असायला हवे ते सर्व काही देत आहोत तसेच  भारतात सुशी खरेदी करण्यापूर्वी सुशीस्वॅपच्या किमतीचा तपशील देत आहोत.  

तुम्हाला सुशीस्वॅपबद्दल माहीत असायला पाहिजे ते सर्व काही

सुशीस्वॅपची स्थापना 2020 मध्ये शेफ नोमी असे  टोपणनाव असलेल्यांनी केली होती. सुशीस्वॅपच्या निर्मितीमध्ये आणखीन दोन टोपणनावे असलेले सह- संस्थापक होते ज्यांचे नाव सुशीस्वॅप आणि झिरोएक्समाकी- ज्याला केवळ माकी असेही म्हणतात. ह्या तिघांविषयी किंवा त्यांच्या युनिस्वॅप  मधून बाहेर पडण्याच्या कारणांविषयी फार थोडे माहीत असले तरी ते सुशीस्वॅप चा प्रकल्पाचा विकास आणि व्यवसाय हाताळणारे आणि प्लॅटफॉर्मच्या कोडचे प्रमुखही होते. 

सुशीस्वॅप ऑटोमेटेड मार्केट मेकिंग मॉडेल किंवा DEX(डीइएक्स)-डिसेंट्रलाइझ्ड एक्सचेंज प्रोटोकॉलचा अंगीकार करते. म्हणून, प्लॅटफॉर्मवर कोणतेही ऑर्डर बुक नाही; क्रिप्टो खरेदी आणि विक्रीची कामे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे आणि किमती एका अल्गोरिदमद्वारे ठरवल्या जातात.

Get WazirX News First

* indicates required

जरी सुशीस्वॅप हे मूलभूतरित्या  युनिस्वॅप(Uniswap)च्या, बेसकोडवर बनवलेले असले तरी त्या दोघांमध्ये काही विशिष्ट फरक आहेत. म्हणजे सुशीस्वॅप पुलमधील सगळ्या लिक्विडीटी प्रदानकर्त्यांना सुशी(SUSHI) टोकन्स दिली जातात जी गव्हर्नन्स टोकन म्हणून दुप्पट होतात. त्याचप्रमाणे,  सुशी च्या धारकांना त्यांनी प्लॅटफॉर्मवर लिक्विडिटी देणे थांबवले तरीही त्यांना ते मिळणे चालू राहू शकते.  

सुशीस्वॅप कसे काम करते?

सुशीस्वॅप  वापरकर्त्यांना निरनिराळ्या क्रिप्टोकरन्सीज आणि विक्री करण्यासाठी अनेक लिक्विडिटी पूल्स वापरते; उदाहरणार्थ सुशीस्वॅप वर एक युएसडीटी/इटीएच (USDT/ETH) पूल आहे ज्याचे उद्दिष्ट युएसडीटी आणि इटीएचची समान किमतीची कॉईन्स बाळगणे आहे. एलपीज (LPs) किंवा लिक्विडिटी प्रोव्हायडर्स हे ह्या पूल्समध्ये दोन (किंवा अधिक) क्रिप्टो मालमत्ता एका स्मार्ट करारामध्ये बद्ध करून हातभार लावू शकतात. 

खरेदीदार एखाद्या लिक्विडिटी पूलमध्ये साठवलेल्या क्रिप्टोच्याऐवजी त्यांच्या क्रिप्टो बदली करू शकतात. स्मार्ट काँट्रॅक्टसना खरेदीदार व्यापार करू इच्छिणारी टोकन्स मिळतात आणि आवश्यक असलेली टोकन्सच्या इतकी रक्कम परत पाठवतात, हे करताना सातत्याने लिक्विडीटी पूलमधील क्रिप्टो टोकन्सचा समतोल राखतात.  

लिक्विडिटी प्रदान करणार्यांना त्यांच्या जमेमुळे सुशीस्वॅप  प्लॅटफॉर्मला बक्षीस म्हणून मिळणाऱ्या शुल्काचा एक भाग मिळतो त्याचप्रमाणे सुशीबार (SushiBar) हे सुशीस्वॅप वरील एक अप्लिकेशन आहे जे वापरकर्त्यांना एक्ससुशी(xSUSHI) टोकन मिळवण्यासाठी त्यांच्या सुशी (SUSHI) वापरू देते. जे त्यांना एक्सचेंजने साठवलेल्या पूर्ण व्यापरशुल्कावर 0.05% बक्षीस मिळवू देते. 

आता तुम्हाला सुशीस्वॅप  चे कार्य कसे चालते ह्याची मूलभूत कल्पना असल्या कारणाने, तुम्ही सुशी किमतीच्या तपशिलांमध्ये शिरण्यापूर्वी  सुशी  खरेदी  का केले पाहिजे, त्याचप्रमाणे भारतामध्ये प्राप्त करण्याच्या प्रक्रियेबाबत  पाहूया. 

सुशी का खरेदी करावे?

सुशीस्वॅपची   स्थानिक सुशी   क्रिप्टो ही इआरसी- 20 (ERC-20) कॉईन आहे आणि त्याचा एकूण 2500 लाख टोकन्सचा पुरवठा आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत नवीन सुशी  कॉईन्स दर ब्लॉकला 100 टोकन्स अशा स्थिर दराने मिंट केली जात होती.  त्याचा खेळता पुरवठा एकूण पुरवठाच्या 50% पर्यंत पोहोचला आहे ज्याची संख्या सुमारे 1270 लाख खेळती कॉइन्स इतका आहे.

सुशी  क्रिप्टो अनेक कारणांमुळे उपयुक्त आहे. सुरुवात करणाऱ्यांसाठी, सुशीस्वॅप नेटवर्कचे आणि ते वापरण्यासाठी त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. जे वापरकर्ते सुशी  विकत घेतील त्यांना प्लॅटफॉर्म गव्हर्नन्समध्ये भाग घेता येईल आणि त्याच्या पुढील विकासाबद्दल चर्चा करणाऱ्या प्रस्तावांबद्दल मतदान करता येईल. वस्तुतः, कोणीही  सुशीस्वॅप  एक एसआयपी (SIP)  किंवा सुशीस्वॅप   सुधारणा प्रस्ताव सादर करू शकतो ज्याबद्दल इतर सुशी धारक मतदान करू शकतात.  

शेवटी सुशी धारक एक्ससुशी (xSUSHI) पूलमध्ये ही कॉईन्स देऊन प्लॅटफॉर्म शुल्काचा एक भाग मिळवू शकतात. तर मूलभूतरित्या सुशीस्वॅप   कम्युनिटीकडे प्लॅटफॉर्मची मालकी आहे आणि तिला भविष्यातील विकासाच्या बाबतीत आणि नियम ज्या पद्धतीने पाळले गेले पाहिजेत त्याबाबत केवळ सुशी (SUSHI) कॉईन्स घेऊन खरोखर बोलण्याची संधी मिळते. 

भारतामध्ये सुशी कसे खरेदी करावे?

WazirX ने अगोदरच स्वतःला उच्च क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून सुस्थापित केले आहे.  सुशी ते देऊ करत असलेल्या अनेक आल्टकॉइन पैकी एक आहे आणि म्हणून तुम्ही WazirX मार्फत पुढील सोप्या पायऱ्यांचे अनुकरण करून  भारतामध्ये सुशी   खरेदी  करू शकता:

  1. वझिरेक्स(WazirX)  वर साइन अप करा.

सुरुवात करण्यासाठी, तुम्ही वझिरेक्स  वर  येथे क्लिक करून एक खाते उघडू शकता.

Sign Up on WazirX 
  1. आवश्यक असलेला तपशील भरा.

तुमचा ईमेल पत्ता भरा आणि एक सुरक्षित पासवर्ड निवडा. 

choose a secure password
  1. ईमेल पडताळणी आणि खात्याच्या सुरक्षिततेची योजना

समाविष्ट केलेला ईमेल पत्ता पडताळून खाते तयार करण्यासाठी पुढे जा, तुमच्या ईमेल पत्त्यावर पाठवलेल्या पडताळणी लिंकवर क्लिक करून खाते तयार करण्यासाठी पुढे जा. नंतर, तुमच्या खात्याची सुरक्षेची खात्री करण्यासाठी वझिरेक्स  तुम्हाला खालील प्रतिमेमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोन पर्याय देऊ शकते. पर्याय निवडताना हे लक्षात की ऑथेंटिकेटर ऍप हे मोबाईल एसएमएस (SMS) पेक्षा जास्त सुरक्षित आहे कारण विलंबित पावती किंवा सिम कार्ड हॅक हा धोका आहे.

Email Verification and Account Security Setup
  1. तुमचा देश निवडा आणि केवायसी (KYC) पूर्ण करा.

तुम्ही तुमचा देश निवडल्यावर तुम्ही केवायसी (KYC) प्रक्रिया पार पाडण्याची शिफारस केली जात आहे कारण केवायसी (KYC) पूर्ण केल्याशिवाय तुम्ही पिअर-टू-पिअर व्यापार करू शकणार नाही आणि पैसे काढू शकणार नाही. 

तुमचा देश निवडून केवायसी (KYC)पूर्ण करा.

  1. आधार किंवा तत्सम कागदपत्रावर दिसते त्याप्रमाणे तुमचे पूर्ण नाव,
  2. आधार किंवा तत्सम कागदपत्रावर नमूद केल्याप्रमाणे तुमची जन्मतारीख,
  3. आधार किंवा तत्सम कागदपत्रावर दिसतो तसा तुमचा पत्ता
  4. कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत,
  5. आणि शेवटी, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक सेल्फी. 

आणि तुम्ही तुमचे खाते उघडलेले आहे! 24 ते 48 तासामध्ये बहुश: तुमचे खाते प्रमाणित केले जाते.

  1. आता तुमच्या वझिरेक्स  खात्यामध्ये पैसे पाठवा.

तुम्ही तुमचे बँक खाते तुमच्या वझिरेक्स  खात्याशी जोडल्यानंतर तुम्ही तुमच्या वझिरेक्स  वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. प्लॅटफॉर्म आयएमपीएस(IMPS), यूपीआय(UPI), आरटीजीएस(RTGS), आणि एनईएफटी(NEFT) वापरून आयएनआर(INR) मध्ये ठेवी स्वीकारतो. तुम्ही कमीत कमी Rs. 100 तुमच्या वझिरेक्स  खात्यामध्ये जमा करू शकता आणि त्याला कमाल मर्यादा नाही.

पैसे जमा करण्यासाठी तुमच्या वझिरेक्स  खात्यामध्ये लॉगइन करा आणि पुढील प्रतिमेमध्ये दिसत असल्याप्रमाणे “फंड्ज‍”(“Funds”) निवडा. नंतर केवळ “रुपी(आयएनआर)” “Rupee (INR)” आणि नंतर “डिपॉझिट” (“Deposit”) वर क्लिक करा. 

Now Transfer Funds to Your WazirX Account
  1. सुशी ची भारतामधली क्रिप्टो किंमत तपासून वझिरेक्स  वर सुशी  खरेदी करा

तुम्ही सुशी WazirX मार्फत खरेदी करू शकता. केवळ तुमच्या WazirX खात्यामध्ये लॉग इन करा आणि “एक्सचेंज” पर्यायांमधून INR निवडा. तुम्हाला सगळ्या क्रिप्टोज भारतीय रुपयाशी  जोडलेल्या एका स्पॉट मार्केटकडे रिडायरेक्ट केले जाईल. स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला सर्व किमतीचा तक्ता,ऑर्डर बुक डेटा, आणि एक ऑर्डर इनपुट फॉर्म दिसेल. 

सुशी इथे खरेदी करा.

बाय ऑर्डर फॉर्म भरणे आणि “बाय सुशी” (“Buy SUSHI”) वर क्लिक करण्याआधी भारतामधली सुशी क्रिप्टो किंमत नक्की पहा. खालील प्रतिमेमध्ये दाखवलेल्या BTC ऑर्डर फॉर्मप्रमाणेच फॉर्म दिसला पाहिजे.

ऑर्डरची कार्यवाही होण्यास थोडा वेळ लागेल. पण ऑर्डर पूर्ण होताच तुमच्या वझिरेक्स  वॉलेटमध्ये तुम्ही खरेदी केलेली सुशी कॉईन्स मिळतील.

Buy SUSHI on WazirX after Checking SUSHI Crypto Price in India

सुशीस्वॅपचे भविष्य कसे दिसते?

मार्केटमध्ये नुकताच 2020 मध्ये प्रवेश केला असला तरी सुशीस्वॅपचे  बाजारमूल्य 2022 च्या सुरुवातीला जवळजवळ $5450 लाख आहे. सुशीस्वॅपची किंमत 13 मार्च 2021रोजी $23.38 ह्या सार्वकालीन उच्चांकास पोहोचली. जरी  2021 मध्ये कॉईन अगदी उच्च निकालावर संपले नाही तरी तज्ज्ञांनी सुशी  क्रिप्टोच्या भविष्याबद्दल अत्यंत आशादायक भावना व्यक्त केल्या आहेत. 

अल्गोरिदम-आधारित अंदाज फोरकास्टिंग साइट  वॉलेट इन्व्हेस्टरनुसार, सुशीची   किंमत जानेवारी 2023च्या सुरुवातीपर्यंत $8.4 पर्यंत जाऊ शकते आणि आतापासून पाच वर्षात $25 च्याजवळ जाऊ शकते. तर दुसरीकडे, डिजिटल कॉईन  असे सुचवते की सुशीस्वॅप  ची 2022 मध्ये सरासरी किंमत $6 असू शकते, 2025 पर्यंत सुमारे $10 आणि 2029 पर्यंत $18.18 पर्यंत असू शकते. 

 युनिस्वॅप  फोर्क असूनही, सुशीस्वॅप  एएमएम   मॉडेलमध्ये कम्युनिटी गव्हर्नन्सच्या जास्त मोठ्या आवाक्यासह नवीन वैशिष्ट्ये आणते. नुकत्याच समाविष्ट झालेल्या शोयू नावाचे  एनएफटी  प्लॅटफॉर्म  – जे सुशी कम्युनिटीच्या एका सदस्याने सुचवले होते- सुशीस्वॅप  तिची नावीन्यपूर्णता आणि सतत सुधारणा करण्याची वचनबद्धता दर्शवते. सुशीस्वॅप  सारख्या प्लॅटफॉर्म्ससह डिफायचे   भविष्य खरोखरच उज्वल दिसत आहे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply