Skip to main content

भारतामध्ये Tether (USDT)कॉइन कसे खरेदी करावे (How to Buy Tether (USDT) Coin in India)

By एप्रिल 21, 2022मे 28th, 20224 minute read
how to buy tether (usdt) coin in India

टीथर (युएसडीटी) हे एक स्टेबलकॉइन आहे ज्याच्या  टोकन्सना खेळते राहण्यामध्ये तेवढ्याच संख्येच्या युएस डॉलर्सचा आधार आहे आणि त्याची किंमत $1.00 आहे.  टीथर टोकन्स, ज्यांची निर्मिती क्रिप्टो एक्सचेंज बिटफायनेक्सने (BitFinex) केली आणि युएसडीटी   चिन्हाच्या खाली व्यापार केला ती टीथर नेटवर्कची स्थानिक टोकन्स आहेत.

मूलभूतरित्या स्टेबलकॉइन्स ही एक प्रकारची  क्रिप्टोकरन्सी  आहे ज्यांचा उद्देश संदर्भ मालमत्ता किंवा तिचे डेरिव्हेटिव्हज करणाऱ्या  कोलॅटरलायझेशन किंवा अल्गोरिदमिक प्रणालीद्वारे स्थिर किंमत देणे हा आहे. त्यांची एखाद्या युएस डॉलर्स सारख्या करन्सीबरोबर किंवा सोन्यासारख्या वस्तूच्या किमतीशी सांगड घातली जाऊ शकते. स्टेबलकॉइन्स  बरेच वेळा पारंपरिक फियाट करन्सीज मिरर करतात ज्या एका नियुक्त केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवलेल्या असतात उदाहरणार्थ डॉलर,युरो किंवा जपानी येन. त्या केवळ अंदाजे केलेल्या गुंतवणुकी म्हणून वापरण्यापेक्षा विनिमयाचे माध्यम आणि संपत्तीच्या साठवणुकीचे माध्यम म्हणून वापरल्या जाऊ शकतात.

क्रिप्टोशी मोठ्या प्रमाणामध्ये जोखीम निगडित असल्यामुळे अनेक संस्था डिजिटल करन्सी एक्सचेंजन्जने व्यवसाय करणे टाळतात. इथेच स्टेबलकॉइन्स प्रवेश करतात. क्रिप्टोकरन्सीला जास्त जोखमीच्या गुंतवणुकीपेक्षा मूल्याचे भांडार म्हणून काम करू दिल्याने स्टेबलकॉइन्स क्रिप्टो क्षेत्रामधील तीव्र अस्थिरतेचे मुद्दे नाहीसे करण्यासाठी प्रयत्न करतात.  अस्थिर क्रिप्टोकरन्सी बाजारामध्ये, जिथे रोख रक्कम आणि  बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीची अदलाबदल कठीण असते, तिथे स्टेबलकॉइन्स लिक्विडिटी देतात.

टीथर हे आतापर्यंत युएस डॉलरशी जोडलेल्या निरनिराळ्या स्टेबलकॉइन्सपैकी सगळ्यात प्रसिद्ध आहे क्रिप्टोकरन्सीचे व्यापारी वारंवार टीथर हे क्रिप्टोकरन्सीज खरेदी करताना युएस डॉलरच्या ऐवजी वापरतात. ह्यामुळे त्यांना क्रिप्टोच्या जास्त प्रमाणामधल्या  अस्थिर मार्केटच्या काळामध्ये जास्त स्थिर मालमत्तेचा आधार घेण्याची संधी देतात. टीथर ची किंमत ही डॉलरशी जोडण्यासाठी तयार केल्यापासून ही बहुधा $1 असते. इतर क्रिप्टोकरन्सीजच्या उलट, ज्यांच्या किमतीमध्ये बदल होतात, टीथरच्या किमती बहुधा स्थिर असतात.

Get WazirX News First

* indicates required

ह्याची नोंद घेणे गरजेचे आहे की त्यांचे 1:1 गुणोत्तर असूनही स्टेबलकॉइन्समध्ये थोड्या प्रमाणात चढउतार होऊ शकतात. तरीही, बहुतांश वेळेस, स्टेबलकॉइनच्या किमतीमधील बदल सुमारे 1 ते 3 सेंट्स इतकाच असतो. हे बहुतांशी लिक्विडिटी आणि पुरवठा आणि मागणीमधील चढउतारामुळे होते ज्यावर व्यवहाराचे प्रमाण, बाजारामधील अस्थिरता आणि व्यापाराचे प्रमाण ह्याचा प्रभाव असतो.

एप्रिल 2022 च्या मध्यावर युएसडीटी ही मार्केट कॅपिटलायझेशन/बाजार भांडवलीकरणानुसार तिसरी सगळ्यात मोठी  क्रिप्टोकरन्सी  आहे जिचे मूल्य $8207 कोटी  पेक्षा जास्त आहे. 

टीथर ही योग्य गुंतवणूक आहे का?   

भूतकाळामध्ये जरी अनेक वादांनी वेढले असले तरी टीथर  ही तुलनेने स्थिर क्रिप्टोकरन्सी राहिलेली आहे.. त्याने अनेक वर्षांमध्ये अनेक प्रतिस्पर्ध्यांना तोंड दिले असले तरी टीथर सगळ्यात जास्ती वापरले जाणारे स्टेबलकॉइन आहे. ते अनेक फायदे प्रदान करते, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असा हे की आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे ते गुंतवणूकदारांना इतर क्रिप्टोकरन्सीजची टोकाची अस्थिरता टाळण्यासाठी मदत करते. किंमत युएसडीटी  मध्ये बदलण्यामुळे, व्यापारी  क्रिप्टोकरन्सीजची किंमत एकदम पडण्याचा सामना करण्याची जोखीम कमी करू शकतात.

टीथर सारख्या स्टेबलकॉइन्सनी इतर कोणतीही क्रिप्टोकरन्सीचा टीथरबरोबर विनिमय करणे सोपे आणि जलद केलेले आहे, तर क्रिप्टोकरन्सी रोख रकमेमध्ये बदलण्याला काही दिवस लागतात आणि त्या व्यवहारास पैसे पडतात. हे केवळ एक्सचेंज प्लॅटफॉर्म्सना लिक्विडिटी आणि गुंतवणूकदारांना निःशुल्क बाहेर पडण्याच्या योजनाच देत नाही तर पोर्टफोलिओची लवचिकता आणि स्थिरतादेखील वाढवते. टीथर क्रिप्टो खरेदी सोपी कारण्यासाठी आदर्श आहे कारण बहुतांश लोक अस्थिरतेमुळे बिटकॉइन किंवा इथेरिअमवर अवलंबून राहणे टाळतात.

टीथरला भूतकाळामध्ये $1 च्या खाली जाऊन आणि नंतर वर येऊनही तिची किंमत टिकवणे शक्य झाले आहे कारण ती एका जुळणाऱ्या फियाट करन्सी फंडशी जोडली गेलेली आहे आणि तिला टीथरच्या रिझर्व्हचे पाठबळ आहे. हे सगळे घटक टीथर  गुंतवणूक योग्य करतात. 

भारतामध्ये आयएनआर(INR)मध्ये युएसडीटी  कशी विकत घ्यावी?

जर तुम्ही  भारतामध्ये आयएनआर मध्ये एसडीटी  खरेदी कशी करावी ह्याचा शोध घेत असाल, तर वझिरेक्सच्या शिवाय कोठेही पाहू नका जे भारताचे सगळ्यात विश्वासार्ह आणि आघाडीचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. युएसडीटी  ते आयएनआर(INR) रूपांतरण दरांसह वझिरेक्स  तुम्हाला भारतामध्ये  काही सोप्या पायर्यांनी युएसडीटी  खरेदी करू देते. 

वझिरेक्समार्फत  भारतामध्ये युएसडीटी  विकत घेण्यासाठी , वापरकर्त्यानी त्यांची स्वतःची वझिरेक्स वर नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण झाल्या की, वापरकर्ते रक्कम जमा करु शकतात आणि  आयएनआरमध्ये युएसडीटी  विकत घेऊ शकतात

वझिरेक्स वर  भारतामध्ये युएसडीटी  कशी खरेदी करावी  त्याबद्दल ही एक तपशीलवार मार्गदर्शिका आहे.

पायरी 1 : तुमचे खाते उघडा 

  • वेबसाईटमार्फत किंवा  ॲप डाउनलोड करून वझिरेक्स वर साइन अप करा. 
  • तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि एक पासवर्ड योजा.
  • सेवेच्या अटींद्वारे चेकबॉक्सवर क्लिक करा आणि शेवटी साइन-अप बटनवर क्लिक करा. 
Create your account

पायरी 2:  तुमचा ईमेल पडताळा 

नंतर तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर एक पडताळणीची मेल पाठवली जाईल. पडताळणी केल्यानंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक संदेश येईल. 

Verify your email

पायरी 3 : सुरक्षा उपायांची योजना करा.

नंतर, तुम्हाला सेक्युरिटी सेटिंग्ज पानावर नेले जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव, 2-फॅक्टर-ऑथेंटिकेशन (2FA) गुगल ऑथेंटिकेटर ॲप डाउनलोड करून कार्यंवित करण्याची आणि तुमच्या खात्यास जोडण्याची शिफारस करण्यात येते.

Set up security measures

पायरी 4 : केवायसी(KYC) पडताळणी 

प्रथम तुमची केवायसी पडताळणी पूर्ण करण्यासाठी दिलेल्या यादीमधून तुमचा देश निवडा. नंतर तुम्ही तुमची केवायसी  पडताळणी करू शकता आणि प्रक्रिया पूर्ण करू शकता. 

KYC Verification

पायरी 5: तुमचे पैसे जमा करा

  • आयएनआर  जमा करणे

आयएनआर ठेवी तुमच्या बँकेच्या खात्यामधून तुमच्या वझिरेक्स खात्यामध्ये यूपीआय/आयएमपीएस/एनईएफटी/आरटीजीएस (UPI/IMPS/NEFT/RTGS) मार्फत जमा केल्या जाऊ शकतात. केवळ तुमचा बँकेचे नाव, खाते क्रमांक,आयएफएससी कोड (IFSC code) इत्यादी समाविष्ट असलेला तपशील प्रविष्ट करा आणि तुम्ही काम चालू करू शकता.

  • क्रिप्टोकरन्सी जमा करणे

क्रिप्टोकरन्सीज तुमच्या वॉलेटमधून किंवा इतर वॉलेट्समधून तुमच्या वझिरेक्स खात्यामध्ये हस्तांतरित करता येऊ शकतात. प्रथम तुमच्या वझिरेक्स वॉलेटमधून तुमचा डिपॉझिट पत्ता मिळवा. त्यानंतर तुमची क्रिप्टोकरन्सी हस्तांतरित करण्यासाठी हा पत्ता तुमच्या दुसऱ्या वॉलेटच्या ‘सेंड ॲड्रेस’ (‘Send Address’) मध्ये द्या.

पायरी 6: आयएनआरमध्ये युएसडीटी  खरेदी करा

अद्ययावत  युएसडीटी/आयएनआर(USDT/INR)  किमती पाहण्यासाठी वझिरेक्स ॲप किंवा वेबसाईटवर लॉग ऑन करा आणि नंतर युएसडीटी/आयएनआर(USDT/INR) प्राईस टिकरवर क्लिक करा. 

Buy USDT with INR

खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला बाय/सेल (BUY/SELL) बटन दिसेल. नंतर, आयएनआर(INR) रक्कम प्रविष्ट करा जी वापरून तुम्हाला युएसडीटी  विकत घ्यायचे आहे. तुमच्या वझिरेक्स खात्यामध्ये जमा झालेली आयएनआर शिल्लक ही ह्या रकमेइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. 

Graphical user interface, text, applicationDescription automatically generated

बाय युएसडीटी (BUY USDT) वर क्लिक करा. एकदा तुमची ऑर्डर पार पडली, की तुम्ही खरेदी केलेले युएसडीटी  तुमच्या वझिरेक्स वॉलेटमध्ये समाविष्ट होतात. 

तर अशा तर्हेने तुम्हीं भारतामध्ये काही सोप्या पायऱ्या वापरून INR नी युएसडीटी  खरेदी करू शकता. 
वझिरेक्स बद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी ,  येथे क्लिक करा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply