Skip to main content

तुमची क्रिप्टोकरन्सी रोख रकमेत कशी बदलावी? (How To Convert Your Cryptocurrency Into Cash?)

By एप्रिल 26, 2022मे 27th, 20223 minute read
How to convert your cryptocurrency into cash - WazirX

गुंतवणूकदार आणि आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये फियाट मनीचा लोकप्रिय पर्याय म्हणून क्रिप्टोकरन्सीने मोठ्या प्रमाणात स्वारस्य निर्माण केले आहे. मात्र, ब्लॉकचेन आधारित  डिजिटल करन्सीजच्या सिध्दांतास एक आव्हानपर समस्या आहे. नेहमीच्या फियाट करन्सीप्रमाणे ही करन्सी प्रत्यक्षात खर्च करणे अवघड आहे. पण त्यांच्या दैनंदिन वित्तासाठी अधिक मुख्य प्रवाहात  बिटकॉइन  आणि  इथेरियम  सारख्या  क्रिप्टोकरन्सीज  वापरण्यास लोकांना मदत करू शकतात असे मार्ग दृष्टीक्षेपात आहेत.  2022 मध्ये क्रिप्टोचे रोख रकमेमध्ये रूपांतर कसे करायचे हा क्रिप्टो वर्तुळामधला ज्वलंत प्रश्न आहे.

डिजिटल करंन्सीज प्रचंड अस्थिर असतात आणि त्यांच्या किमती नाट्यमयरित्या वरखाली जातात.. जोखीम न पत्करणारे गुंतवणूकदार त्यांच्या  डिजिटल करंन्सीजभोवती असणारी अनिश्चितता पाहून त्यांचा डिजिटल पैसा फियाट करन्सीत बदलण्याचा विचार करू शकतात. मात्र, क्रिप्टो रोख रकमेत बदलण्याच्या सर्व पद्धतींमध्ये मिळणाऱ्या लाभावर कर आकारणीचा समावेश असेल. या लेखामध्ये, 2022 मध्ये क्रिप्टो  रोख रकमेत कशी बदलावी ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ.

भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी रोख रकमेत कशी बदलावी या संबंधी मार्गदर्शिका

एका क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्ममार्फत

भारतात क्रिप्टो रोख रकमेत कशी बदलावी यावरील आमच्या मार्गदर्शिकेमधील पहिला मार्ग म्हणजे  वझिरएक्स सारख्या  क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे  . त्यानंतर, तुम्ही एखाद्या एक्सचेंज प्लॅटफॉर्म किंवा ब्रोकरमार्फत क्रिप्टोकरन्सी रोख रकमेत बदलू शकता. हे परदेशी विमानतळावरील करन्सी एक्सचेंज प्रणालीसारखेच आहे. 

  • तुम्हाला  तुमची क्रिप्टोकरन्सी वझिरएक्स सारख्या एक्सचेंजवर जमा करावी लागते.
  • मग  तुमच्या पसंतीच्या करन्सीमध्ये पैसे काढण्याची विनंती करणे आवश्यक असते. 
  • काही वेळाने पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील.

ही पद्धत सर्वात सुरक्षित समजली जाते पण काही वेळा पैसे तुमच्या खात्यामध्ये यायला 4-6 दिवस लागतात. या शिवाय, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस व्यवहार शुल्क आकारतात जे  एक्स्चेंज प्लॅटफॉर्मनुसार बदलतात..

Get WazirX News First

* indicates required

पिअर-टू- पिअर नेटवर्कमार्फत

नंतर आमच्या मार्गदर्शिकेमध्ये भारतामध्ये क्रिप्टो रोख रकमेत कशी बदलावी – तर हे पिअर-टू-पिअर प्लॅटफॉर्ममार्फत करावे. तुम्ही पिअर-टू- पिअर प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमची क्रिप्टोकरन्सी  रोख रकमेत केवळ विक्री करून बदलू शकता. ही पद्धत तुम्हाला वेगवान आणि जास्त निनावी पद्धतीने पैसे काढू देते. या पद्धती्त समाविष्ट इतर फायदे म्हणजे  कमी शुल्क आणि तृतीय पक्ष एक्सचेंज प्लॅटफॉर्मच्या तुलनेत चांगल्या विनिमय दराची शक्यता. 

  • प्रथम तुम्हाला पिअर-टू- पिअर एक्सचेंज प्लॅटफॉर्मसाठी साइन अप करणे आणि आदर्श खरेदीदार स्थान शोधणे आवश्यक आहे.
  • नंतर बाजारामध्ये खरेदीदार शोधा. बहुतेक पिअर-टू- पिअर प्लेटफ्रॉम्स एस्क्रो सेवा देतात. याचा अर्थ  तुम्हाला पैसे मिळाल्याची तुम्ही पुष्टी करेपर्यंत तुमच्या क्रिप्टोकरन्सीज खरेदीदारांना उपलब्ध नसतील.

पिअर-टू- पिअर विक्री पद्धत वापरताना आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांबाबत सावध राहणे महत्त्वाचे आहे. तुमची क्रिप्टोकरन्सी त्यांना देण्यापूर्वी खरेदीदाराच्या ओळखीची तुम्ही पडताळणी केलीच पाहिजे. खरेदीदाराने पैसे देईपर्यंत तुमच्या तुमच्या क्रिप्टो मालमत्ता बंदिस्त ठेवू देणाऱ्या पिअर-टू- पिअर प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची आग्रहाने शिफारस करण्यात येते..

क्रिप्टोकरन्सी बॅंकिंगसह तुमची क्रिप्टोकरन्सी फियाटसारखी वापरा.

क्रिप्टोकरन्सी बँकिंग  लोकांना त्यांच्या डिजिटल मालमत्ता ते पारंपरिक पद्धतीने पैसे जसे खर्च करतील तसेच खर्च करू देते. क्रिप्टो बँकिंग लोकांना त्यांची डिजिटल कॉईन्स डिजिटल वॉलेट्स मध्येही ठेवू देते. ह्या पद्धतीच्या बँकिंगमार्फत तुम्हाला क्रिप्टोकरन्सी डेबिट कार्ड्सचा ॲक्सेस उपलब्ध होतो. ही कार्ड्स तुम्हाला तुमची शिल्लक डिजिटल कॉईन्स तुमच्या दैनंदिन खरेदीसाठी किंवा गुंतवणूक म्हणून ठेवण्यापेक्षा पैसे म्हणून काढण्यासाठी इतर कोणतीही करन्सी तुम्ही जशी वापराल तशी वापरणे शक्य करतात.

क्रिप्टो डेबिट कार्ड्स  क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म्स देतात. ह्या कार्ड्समध्ये क्रिप्टोकरन्सी भरली जाऊ शकते आणि ऑनलाईन आणि दुकानांमध्ये जे व्यापारी  डिजिटल करन्सी स्वीकारत नाहीत अश्यांकडून खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

ही डेबिट कार्ड्स उपलब्ध होण्याआधी तुम्ही तुमची क्रिप्टोकरन्सी फक्त रिटेलर्सकडेच खर्च करू शकत होता ज्यांनी पैसे देण्याघेण्याची पद्धत म्हणून किंवा क्रिप्टो रोख रकमेत बदलण्याचा मार्ग म्हणून  क्रिप्टोकरन्सीज  स्वीकारणे निवडले होते. सद्यस्थितीमध्ये फिनटेक कंपन्या चार्टर्ड बॅंक्स आणि डेबिट कार्ड देणार्यांबरोबर भागीदारी करत आहेत जेणेकरून क्रिप्टो कार्ड्स देता येतील,तुमची क्रिप्टोकरन्सी आपोआप विकण्यासाठी त्यांच्या भागीदाराची लॉजिस्टिकल आणि नियामक फ्रेमवर्क वापरता येईल, तिचे रोख रकमेमध्ये रूपांतर करता येईल आणि रिटेलर्सना ती स्वीकारता येईल. याचा अर्थ क्रिप्टो बँकिंग मार्फत तुमची डिजिटल रक्कम जिथे पारंपरिक डेबिट कार्ड्स स्वीकारली जातात तिथे तुम्ही  वापरू शकाल.

 क्रिप्टो बँकिंग ही नव्याने उदयास येणारी संकल्पना असली तरी तिला पारंपरिक बँकांप्रमाणे लोकप्रिय व्हायला वेळ लागेल. म्हणून, भारतामध्ये  बिटकॉइनरूपांतर रोख रकमेत  कसे बदलायचे ह्याचा शोध सुरूच राहील .  ह्या लेखामध्ये तुम्हाला क्रिप्टो/बिटकॉइन रोख रकमेत कसे बदलावेत या बद्दल मार्गदर्शन करण्याच्या प्रयत्न केला आहे. पण, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की  क्रिप्टोकरन्सी बाजार  अस्थिर आहे. म्हणून क्रिप्टो वर्तुळामधल्या व्यापाराची जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. 

टीप: तुमच्या क्रिप्टोचे रोख रकमेमध्ये रूपांतर केवळ विश्वासू क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सवरूनच करा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply