Skip to main content

वझीरएक्सवर खाते कसे तयार करावे? (How to create an account on WazirX?)

By डिसेंबर 16, 2021मे 13th, 20224 minute read
Praveen R

वझिरएक्स खात्यासाठी साइन अप करणे ही अत्यंत साधी प्रक्रिया आहे.

तुम्ही करण्याची सर्वात पहिली गोष्ट म्हणजे साइन अप पृष्ठावर जाणे. तुमच्या स्क्रीनच्या वरच्या भागातील उजवीकडे साइन अप बटणावर क्लिक करून तुम्ही हे करू शकता.

या नंतर, तुम्हाला एका त्वरित 4 पायऱ्यांच्या प्रक्रियेचा परिचय करून दिला जाईल ज्याद्वारे तुम्ही एक लॉग इन तयार करू शकाल आणि तुमचे तपशील सत्यापनासाठी सादर करू शकाल.

पायरी 1- ईमेल आयडी व पासवर्ड

एक ईमेल पत्ता निवडणे आणि पासवर्ड सेट करणे ही साइन अप प्रक्रियेतील पहिली पायरी आहे.

 • ईमेल- तुमचा संपूर्ण ईमेल पत्ता प्रविष्ट करा. हा ईमेल पत्ता तुम्ही लॉग इन साठी वापराल अणि आमच्याकडून कोणताही पत्रव्यवहार तुम्हाला प्राप्त होईल. नंतर तुम्हाला तुमचा लॉग इन ईमेल पत्ता बदलता येत नाही.
 • पासवर्ड – तुमच्या लक्षात राहील असा मजबूत पासवर्ड प्रविष्ट करा. पासवर्ड कमीत कमी 6 वर्ण लांबीचा व जास्तीत जास्त 64 वर्ण असणारा हवा. 10 वर्णापेक्षा लांब असणारा पासवर्ड वापरण्याची आम्ही शिफारस करतो. इतर वेबसाइटवर आधीच वापरलेला पासवर्ड वापरू नका. कॅपिटलसह @#$%^&-*सारख्या विशिष्ट वर्णांचे व आकड्यांचे मिश्रण करण्याचा प्रयत्न करा व पासवर्ड तयार करा.

पायरी 2 – ईमेल सत्यापन

एकदा तुम्ही तुमचा ईमेल आणि पासवर्ड प्रविष्ट केले आणि साइन अपवर क्लिक केले की तुमच्या ईमेल पत्त्यावर तुम्हाला सत्यापन ईमेल प्राप्त होईल.

 • ईमेल मधील व्हेरिफाय ईमेल बटणावर क्लिक करा. तुम्हाला पुन्हा वझिरएक्स वेबसाइटवर नेण्यात येईल जिथे तुमच्या सत्यापनाची पुष्टी केली जाईल. सत्यापन ईमेल फक्त 15 मिनिटे वैध असेल याची नोंद घ्या. तुम्हा 15 मिनिटांत सत्यापित केले नाही तर तुमच्या वझिरएक्स खात्यात पुन्हा लॉग इन करा आणि रिसेन्ड व्हेरिफिकेशन ईमेल बटणावर क्लिक करा.

सामान्य प्रश्न:मला सत्यापन मेल का मिळालेली नाही?

काही बाबतीत, सत्यापन मेल येण्यास 10 मिनिटांपर्यंत लागू शकतात. कृपया संयम राखा. अजूनही ईमेल आलेली नसल्यास कृपया तुमचे स्पॅम/जंक/प्रमोशन्स फोल्डर तपासा. तुमच्या स्पॅम/जंक/प्रमोशन्स फोल्डरमध्ये तुम्हाला ईमेल दिसल्यास, ती स्पॅम/जंक नाही अशी मार्क करा.

ईमेल पुन्हा पाठवा – सत्यापन ईमेल पुन्हा पाठवा बटणावर क्लिक करून तुम्ही वझिरएक्सला ईमेल पुन्हा पाठवण्याची विनंती करू शकता.

पायरी 3 -2FA सेटअप

तुमची ईमेल सत्यापित केल्यानंतर, वाढीव सुरक्षिततेसाठी 2FA सेटअप करणे ही पुढील पायरी आहे.

 • अधिकृतीकारक 2FA (शिफारस करण्यात येते): द्वि-घटकीय अधिकृतीकरण (2FA) – सेटअप, बदल व पुनर्प्राप्ती
 • मोबाईल एसाएमएस – तुमचा 10 अंकी भारतीय मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. सुरुवातीस कंट्री कोड किंवा 0 टाकू नका. तुमच्या वझिरएक्स खात्यात लॉग इन करताना तुम्हाला मिळणारा ओटीपीदेखील याच क्रमांकावर येईल. एका एसएमएसद्वारे तुम्हाला एक ओटीपी मिळेल. सत्यापन बॉक्समध्ये ओटीपी प्रविष्ट करा आणि व्हेरिफायवर क्लिक करा.

सामान्य प्रश्न: मला ओटीपी (OTP) एसएमएस का नाही मिळाला?

काही बाबतीत, सत्यापन एसएमएस येण्यास 10 मिनिटांपर्यंत लागू शकतात. कृपया संयम राखा. तसेच, तुम्ही योग्य मोबाईल नंबर टाकला आहे हे पुन्हा तपासा.

ओटीपी (OTP) पुन्हा पाठवा – तुम्ही सत्यापन कोड पुन्हा पाठवा बटणावर क्लिक करून वझिरएक्सला सत्यापन ओटीपी पुन्हा पाठवण्याची विनंती करू शकता. 

पायरी 4 – केवायसी तपशील

ही पायरी तुमचे केवायसी पूर्ण करण्याचा पर्याय देते किंवा स्किप फॉर नाऊ बटणावर क्लिक करून तुम्ही ते सोडून देऊ शकता. तुम्ही ही पायरी सोडून दिली, तर तुमच्या खात्यात तुम्ही क्रिप्टोज फक्त जमा करू शकता आणि त्यांचा व्यापार करू शकता. खाते सेटिंग्ज मेन्यू अंतर्गत केवायसीचे सत्यापन करा पर्यायावर क्लिक करून तुमचे केवायसी तुम्ही नंतर पूर्ण करू शकता. परंतु, तुम्ही केवायसी आता पूर्ण करण्याचे निवडल्यास तुम्ही तुमचे क्रिप्टो जमा करणे किंवा काढणे, व्यापार आणि P2Pवापर करू शकता. ड्रॉपडाऊन यादीतून तुमचा देश निवडून आणि केवायसी पूर्ण करावर क्लिक केल्यानंतर, तुमचे तपशील प्रविष्ट करण्यासाठी आणि सत्यापन करण्यासाठी तुमची केवायसी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुढील पायरीवर नेण्यात येईल.

 • नाव – केवायसी कागदपत्रात तुमचे नाव जसे लिहिले आहे तसे प्रविष्ट करा. उदा – तुमच्या कागदपत्रावर राहुल तुकाराम शेट्टीगर असे नाव असेल तर कृपया फॉर्ममध्येसुद्धा राहुल तुकाराम शेट्टीगर असेच प्रविष्ट करा.

 • जन्मतारीख – तुमची जन्मतारीख DD/MM/YYYY स्वरुपात प्रविष्ट करा. उदा – तुमची जन्मतारीख 1 एप्रिल 1989 असेल तर 01/04/1989 प्रविष्ट करा. वझिरएक्स खात्यासाठी अर्ज करताना तुमचे वय 18 वर्षे आणि त्याहून अधिक असले पाहिजे.

 • पत्ता – केवायसी कागदपत्रात तुमचा पत्ता जसा लिहिला आहे तसा प्रविष्ट करा. या बॉक्समध्ये शहर, राज्य किंवा पिन प्रविष्ट करू नका कारण त्यासाठी वेगळी बॉक्सेस आहेत.

 • कागदपत्रे — तुम्ही निवडलेल्या देशावर अवलंबून, तुम्हाला केवायसी कागदपत्रांचा संच अपलोड करावा लागेल. संअबंधित फिल्डमध्ये तपशील काळजीपूर्वकपणे भरा आणि साइन अप फॉर्ममध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या केवायसी कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत किंवा फोटो आणि तुमची सेल्फी अपलोड करा.

सबमिटवर क्लिक करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्याही टायपिंग चुका केल्या नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी तुमचे सर्व तपशील पुन्हा तपासा. तुमची सत्यापन प्रक्रिया यामुळे वेगाने होईल.

सामान्य प्रश्न

माझे सत्यापन तपशील सादर केल्यानंतर काय होते?

एकदा तुम्ही सबमिटवर क्लिक केले की तुमचे तपशील आणि कागदपत्रे सत्यापनाकडे जातात. सत्यापन पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या खात्यास मंजुरी देणारी ईमेल आमच्याकडून तुम्हाला मिळेल. साइनअप संख्येवर अवलंबून सत्यापन प्रक्रियेस 72 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. परंतु शक्य तेवढ्या जलद गतीने ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

काही कारणासाठी तुमच्या खात्यास मंजुरी मिळाली नाही तर संभाव्य कारण ईमेल मध्ये नमूद केलेले असेल आणि तुम्हाला आवश्यक ते बदल करण्यास सांगितले जाईल ज्यानंतर आम्ही पुन्हा सत्यापित करू

माझे केवायसी का सत्यापित झाले नाही?

सत्यापित गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्याकडूनच वझिरएक्स प्लॅटफॉर्म वापरण्यात येतो याची खात्री करण्यासाठी आमच्या सत्यापन प्रक्रियेत आम्ही उच्च दर्जा टिकवतो. तुमचे केवायसी सत्यापन मंजूर न होण्याची 1 किंवा त्यापेक्षा धिक सर्वसामान्य कारणे असू शकतात.

 • तपशील न जुळणे: नाव व पत्ता, आयडी कार्ड नंबर, तुम्ही सादर केलेल्या केवायसी कागदपत्रांशी जुळत नाहीत. सादर करण्यापूर्वी सर्व तपशील नेहमीच पुन्हा तपासा.
 • डुप्लिकेट खाते — अन्य वझिरएक्स खात्यासाठी तुम्ही समान तपशील आधीच सादर केले आहेत. कोणत्याही व्यक्तीकडे 1 पेक्षा अधिक वझिरएक्स खाती असू शकत नाहीत.

आम्हाला Twitter(@wazirxindia) वर फॉलो करा आणि आणि नवीनतम अपडेट्स आणि वझिरएक्स संदर्भात घोषणांसाठी वझिरएक्स टेलिग्राम चॅनेल (https://t.me/wazirx) मध्ये सामील व्हा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply