Skip to main content

तुमच्या पहिल्या एनएफटीचे मिंटिंग करण्यापूर्वी तुम्हाला ठाऊक असल्या पाहिजेत अशा 5 गोष्टी (5 Things You Should Know before minting your first NFTs)

By डिसेंबर 19, 2021डिसेंबर 22nd, 20216 minute read
तुमच्या पहिल्या एनएफटीचे मिंटिंग करण्यापूर्वी तुम्हाला ठाऊक असल्या पाहिजेत अशा 5 गोष्टी (5 Things You Should Know before minting your first NFTs)

अलिकडीएल ब्लॉकचेन फॅड असलेल्या एनएफटी (नॉन-फन्जिबल टोकन) वर तुम्ही फिदा झाला आहात का? क्रिप्टोकिटी ते ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्से यांच्यापर्यंत, त्याच्या सर्वप्रथम स्वाक्षरीकृत ट्विटरच्या विक्रीपर्यंत, ब्लॉकचेनवर संपत्तीचे अस्तित्व नोंदवण्यापर्यंत एनएफटींनी लांबचा पल्ला गाठला आहे. कलाकृती डिजीटल पद्धतीने विकण्याचा त्वरित व सोपा मार्ग म्ह्णून एनएफटीच्या आकर्षक विश्वाबद्दल केव्हा ना केव्हा तरी, प्रत्येकाने ऐकलेले असणारच. एनएफटी काय आहे – हा प्रश्नदेखील पडला असेल? किंवा तुम्ही स्वत:च एखादे मिंट करू शकाल काय? किंवा एनएफटी कशा प्रकारे विकत घ्यायचे? 

हे करण्यापूर्वी, एका फंजिबल टोकनमध्ये तुम्ही डीआयवाय (स्वत:च करून पाहणे) करण्यापूर्वी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत अशा 5 गोष्टी येथे आहेत. 

#1 एनएफटी कोणते हक्क देऊ करते?

तुमचे पहिले एनएफटी मिंट करण्यापूर्वी, एनएफटी म्हणजे काय व एका एनएफटीची मालकी केल्याने तुम्हाला प्रत्यक्षात काय फायदा होतो हे जाणून घेणे शहाणपणाचे असेल. एका एनएफटीची मालकीमुळे त्याचे कॉपीराइट स्वाभाविकपणेत्याबरोबर येत नाहीत. याचा अर्थ एनएफटी म्हणजे मालकी हक्कांची केवळ फुशारकी असा आहे का? नाही, ऑस्कर गोन्झालेझ, एक सीएनईटी रिपोर्टर याचा उलगडा करतात, टोकनच्या मालकाकडे असते ते एक रेकॉर्ड व एक हॅश कोड, जो त्या विशिष्ट डिजीटल संपत्तीशी सांलग्न एकमेव टोकनची मालकी दाखवते.” सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे, इंटरनेटवरील कोणीही ते डाऊनलोड करू शकतात आणि कोणतेही कॉपीराईट उल्लंघन उद्भवू न देता त्यांच्या सोशल मीडियावर ते वापरतात परंतु फक्त मालकच एनएफटी विकू शकतात. 

न्यान कॅट, या एका एनिमेटएड जीआयएफचे उदाहरण घेऊया, जे नुकतेच $5,90,000 ला विकले गेले. न्यान कॅटच्या मालकाकडे, न्यान कॅट एनएफटीचे फक्त मालकी हक्क आहेत, आणखी काहीही नाही, आणि त्या बरोबरच बौद्धिक व सृजनात्मक हक्क अजूनही त्याची निर्मिती केलेल्या कलाकाराकडे आहेत. 

न्याय कॅट हे एक विशिष्ट उदाहरण आहे ज्यात त्या कलाकृतीची मालकी तो कलाकार स्वत:कडे टिकवून ठेवतो (एनएफटी नव्हे) व त्याबरोबरच एनएफटी संग्रहकाकडे मूळ (डिजीटल) प्रतीची मालकी असते. प्रत्येक एनएफटीकडे, ती मिंट केलेल्या व्यक्ती/कलाकाराद्वारे लिहिलेल्या स्वत:च्या अटी व मालकीच्या नियमांचा संच असू शकतो. येथे उल्लेख करणे उपयुक्त ठरेल की एनएफटीकडे, ती एका ब्लॉकचेनवर लिहिलेली असल्यामुळे, त्याच्या पुनर्विक्री इतिहासाच्या संपूर्ण नोंदी असतात. त्यामुळे, ज्या मूळ कलाकाराने एनएफटी मिंट केली त्याला, एनएफटीची पुनर्विक्री होते त्या प्रत्येक वेळेस, ऑटोमेटेड पुनर्विक्रीच्या रॉयल्टी प्राप्त होतात.

Get WazirX News First

* indicates required

#2 तुमची एनएफटी कोठे मिंट करायची व विकायचे?

एक टोकन जारी करून, एकाद्या वस्तूचे, मग ती कलावस्तू, जीआयएफ किंवा एखादा ’एकमेव क्षण’ असू शकतो, ब्लॉकचेनवर (मुख्यत्वे करून इथेरियम), अधिकृतीकरण केले जाते ती प्रक्रिया म्हणजे मिंटिंग. हे टोकन नॉन-फंजिबल असते, म्हणजेच त्याची पुनरावृत्ती काढता येत नाही आणि त्यात वस्तूची डिजीटल नोंद असते. समजण्यास बरेच साधे सोपे आहे नाही का? परंतु तुमची एनएफटी कोठे मिंट करायच्या? तुमच्या कामाचे मिंटिंग करण्यापूर्वी, याच्या निवडीबद्दल, तुम्ही तीन महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहे:

  • ब्लॉकचेन: तुमच्या एनएफटीच्या माइनिंग करता तुम्हाला भरावे लागणारे गॅस शुल्काचे निर्धारण, तुमची एनएफटी तुम्हाला मिंट करायची आहे त्या ब्लॉकचेनची निवड करते. बहुतेक प्लॅटफॉर्म इथेरियम नेटवर्कवर चालतात, जिथे नेटवर्क मागणी व प्रत्येक व्यवहार तपासण्यासाठी लागणारी ऊर्जा यावर अवलंबून ’गॅस शुल्का’त चढउतार होते. 
  • एनएफटी बाजारपेठ: बहुतेक प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मकडे आज एनएफटी निर्मात्यांसाठी पडताळणी प्रक्रिया अस्तित्वात आहे जिथे त्यांचे एनएफटी मिंट करण्यापूर्वी कलाकारांना एका ॲप्लिकेशन प्रक्रियेतून जावे लागते. रेरिबलफाऊंडेशन सारखे प्लॅटफॉर्म या मॉडेलवर काम करतात. कोणालाही परवानगी देणाऱ्या बाजारपेठांपेक्षा, एक विस्तृत पडताळणी प्रक्रिया असणारे प्लॅटफॉर्म अधिक गंभीर संग्रहकांना आकर्षित करतात हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. ओळख पडताळणी प्रक्रिया अस्तित्वात असणाऱ्या एनएफटी बाजारपेठा मिंटेड टोकनला अधिक उच्च स्तराचे अधिकृतीकरण प्रदान करतात. निफ्टी गेटवे, नोओरिजिन, सुपररएअर, इ., सारख्या काही बाजारपेठा अस्तित्वात असल्या तरीही त्या मदत आणि ’केवळ-निमंत्रण’ या स्वरूपाचा आहेत. 31 मे रोजी वझिरएक्सने भारतातील पहिल्याएनएफटी बाजारपेठेचे पदार्पण केले जी भारत व दक्षिण-पूर्व आशियातील कलाकार व निर्मात्यांसाठी ’केवळ-आमंत्रण’ या तत्वावर संचलन करते. वझिरएक्स ची पालक कंपनी असलेल्या बायनान्स ब्लॉकचेनवर मायनिंग प्रक्रिया चालते जी विश्लेषण करते आणि नंतर इथेरियम सारख्या इतर ब्लॉकचेनवर हस्तांतरित करता येते. तत्वत:, वझिरएक्स प्लॅटफॉर्मचे स्थानिक नाणे- वझिरएक्स टोकनद्वारे विक्री घडते. 
  • खर्च: तुमचीNFT कला मिंट करता येईल असा एक एनएफटी प्लॅटफॉर्म तुमच्या गरजेनुसार तुम्ही नि:शुल्क निवडू शकता परंतु एका संरचित पद्धतीने त्याकरिता खरेदीदारांकडून तो गॅस शुल्क आकारतो. मोठ्या संख्येत असणारे एनएफटी मिंट करू इच्छिणाऱ्या एखाद्या निर्मात्यासाठी अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म योग्य असू शकतो. परंतु, फक्त ’एकच (सिंगल)’ मास्टर कॉपी मिंट करण्यात निर्मात्याला स्वारस्य असते, व एकाच वेळेस सुरुवातीसच शुल्क आकारणारा प्लॅटफॉर्म त्यांना पसंत असू शकतो. 

एका विशिष्ट ब्लॉकचेन किंवा बाजारपेठेकडून मिळणारा आश्वस्त वावदेखील निर्मात्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. गॅस शुल्क किंवा खर्चात थोडीशी तुम्ही बचत करू शकला तरीही जर प्लॅटफॉर्म लोकप्रिय नसेल तर तुम्ही योग्य श्रोत्यांना मुकाल. 

#3 तुमची एनएफटी कशा प्रकारे सुरक्षित ठेवायची?

एनएफटीचा अवकाश, अजूनही बाल्यावस्थेत असल्यामुळे, डेटा गॅप, नक्कल, फसवेगिरी, परिचय चोरी इ. सारख्या काही समस्यांनी अजूनही ग्रस्त आहे. नफा कमावण्याच्या हेतूने दुष्ट व्यक्तींनी लहान कलाकारांच्या कलाकृतींची नक्कल केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पडताळणी प्रक्रिया अस्तित्वात असूनही हा धोका अजूनही जागृत आहे. एखाद्या सूचिबद्ध एनएफटीची नक्कल झाली तर करता येतील असे कोणतेही पारंपारिक उपाय आजवर अस्तित्वात नाही. तुमचे एनएफटी उतरवणे हे कठीण नव्हे अशक्य देखील असू शकते. तसेच, एखाद नक्कल होण्याच्या घटनेचा पाठपुरावा किंवा त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे कदाचित खूप कठीण व खर्चिक ठरू शकते. अशा प्रकरणात कोणता दिलासा उपलब्ध आहे? 

मोइश इ. पेल्ट्झ, मान्यवर, फाल्कन ॲन्ड रॅपापोर्ट ॲन्ड बर्कमन पीएलएलसीच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रॅक्टिस ग्रूपचे (बौद्धिक संपदा अभ्यास समूह) अध्यक्ष याचे उत्तर देतात, “उल्लंघन करणाऱ्याची तुम्ही ओळख पटवता तोवर तुमच्या कार्याच्या चौर्याचे निरसन करण्यासाठी, आयपी (बौद्धिक संपदा) नियम तुम्ही लावणे तरीही शक्य असते” कोणीतरी तुमच्या कार्याची चोरी करत आहे असे तुम्हाला सापडल्यानंतर लगेच ज्या प्लॅटफॉर्मवर एनएफटीची विक्री केली जात आहे त्याच्याशी ताबडतोब संपर्क करा. 

अधिक सुरक्षित असणाऱ्या हार्डवेअर वॉलेट किंवा बाह्य हार्ड ड्राइव्हमध्ये गुंतवणूक करणे इतर प्रतिबंधात्मक उपायांत समाविष्ट आहे. तुमचा वॉलेट पत्ता आणि सीड फ्रेज सुरक्षित ठेवा आणि क्रिप्टोकरन्सीचा व्यापार करताना व्हीपीएन वापरा. 

#4 एनएफटी अस्थिरतेचा सामना कसा करायचा?

एनएफटी हे अस्थिर संपत्ती वर्गात मोडतात आणि अजूनही त्यांच्या बाल्यावस्थेत आहेत. जेव्हा  $17 कोटी पलिकडे फेब्रुवारीमध्ये बाजारपेठेचा विस्फोट झाला तेव्हा एनएफटीच्या गगनभेदी उड्डाणात अस्थिरता नक्कीच सुस्पष्ट होती. तीन महिन्यांच्या आत, मे संपला तेव्हा फक्त $1.94 कोटीवर एनएफटी बाजारपेठ कोसळताना आपण पाहिली. त्या नंतर, खूप उच्च किंमतीवर एनएफटी विकत घेतलेल्या गुंतवणूकदारांच्या तिजोऱ्यांमध्ये खडखडाट झाला. म्हणूनच, एनएफटीचे मिंटिंग म्हणजे तुमची कला किंवा कामाचे केवळ डिजिटीकरण नव्हे. निर्मात्यांकडून हा सखोल विचार करून घेतलेला निर्णय असला पाहिजे. बाजारपेठेतील चढ-उतारापासून तुमचे एनएफटी सुरक्षित ठेवण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत.

  • एनएफटी मिंट केल्याने मिळणारा परतावा हा तुम्ही खर्च केलेला वेळ, कष्ट आणि त्यात गुंतवलेला पैसा यांच्या योग्य आहे का याचे विश्लेषण करण्यासाठी धोका ते मोबदला अनुपात यावर विचार करा. 
  •  तुमची वैयक्तिक आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी तुमच्या कृती विकत घेण्यात स्वारस्य असणारे श्रोते किंवा चाहत्यांबरोबर बळकट नातेसंबंध प्रस्थापित करा.
  • टिकून राहा आणि अल्प कालावधीत कोणतेही अचानक घबाड मिळून एनएफटींतून लाभ मिळण्यासाठी ती मिंट करण्याचा विचार करू नका. 

#5 व्यवसायावर एनएफटीचा कशा प्रकारे परिणाम होतो?

डिजीटल माल किंवा कलाकृती विकण्यासाठी भविष्यातील साधन म्हणून मालकी हक्कांचे परिवर्तन करण्याची क्षमता एनएफटी मध्ये आहे. उदाहरणार्थ टॉप शॉट, हे एनबीए संग्रहण, हे एनबीए खेळातील लक्षणीय ठळक वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्या चाहत्यांत तुफान लोकप्रिय आहेत. ए लेब्रॉन टॉप शॉट  $200,000! पेक्षा अधिक किंमतीत विकला गेला यात आश्चर्य नाही! तुम्ही एनएफटीमध्ये अक्षरश: काहीही मिंट करू शकता ज्यात प्रतिमा/चित्रे, फोटोज, संग्राह्य वस्तू, जीआयएफ, गाणी, आठवणी आणि तुमचा पाद देखील समाविष्ट आहे. हे झाले एनएफटीचे स्पष्टीकरण! 

भविष्यात अनेक आकर्षक शक्यतांसह एक संपूर्ण नवीन स्थान असणारी अशी ही एनएफटी बाजारपेठ आहे. नवीन मालकाकडे प्रत्यक्ष संपत्तीच्या ऑफ-चेन स्थलांतराचा विचार न करता, प्रत्यक्ष संपत्तीशी संलग्न राहून ऑन-चेन मालकीच्या हस्तांतरणाचा नवा मार्ग एनएफटी उपलब्ध करून देतात. कॉइनटेलिग्राफच्या उद्धरणाप्रमाणे, एनएफटी ‘मालकीचे टोकनायझेशन’  व “त्यांना सुरक्षित ठेवणे आणि अंतत: मोबदला, संग्रहण, कायदेसंगतता आणि संपत्तीची सुरक्षितता यात क्रांतीकारी बदल घडवून सुविधा प्रदान करतात.” 

यातील व्यवहार वैध करण्यासाठी आवश्यक संगणकीय सामर्थ्याची प्रचंड गरज पाहू जाता एनएफटी मिंटिंग ही तितकीशी पर्यावरण-अनुकूल प्रक्रिया नाही याचीदेखील नोंद घेणे योग्य ठरते. म्हणूनच, त्यांच्या कामाच्या डिजिटीकरणाने मागे सोडलेल्या कार्बन फूटप्रिंटचादेखील निर्मात्यांनी विचार केलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे सुजाण पर्याय निवडले पाहिजेत. कोणत्याही पद्धतीविना, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय किंवा कोणत्याही अंतर्भूत मूल्याशिवाय, एनएफटी मिंट केल्यामुळे कोणतेही लक्षणीय लाभ न होता पर्यावरण खर्चात भरच पडेल. 

तुमच्या निर्णय सुस्पष्ट करण्यात वरील मुद्द्यांच्या वाचनाने तुम्हाला मदत केली आहे अशी आमची आशा आहे. त्यांच्या पहिल्या एनएफटी मिंट करण्यापूर्वी निर्मात्यास इतर कोणत्या गोष्टी ज्ञात असल्या पाहिजेत असा तुमचा विश्वास आहे त्या इतर गोष्टींबद्दल खाली अभिप्राय द्या.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply