
नमस्कार मित्रांनो! 🙏
8 मार्च 2022 रोजी वझिरएक्स 4 वर्षाचा होत आहे. सन 2018 पासून आम्ही खूप दूरवर आलो आहोत आणि आम्हाला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल आणि भारताचा पहिल्या क्रमांकाचा एक्स्चेंज बनवल्याबद्दल तुमचे आभार मानू इच्छितो.
3 मार्चपासून, डब्ल्यूआरएक्स/WRX/आयएनआर–INR मार्केटमध्ये व्यापार करा आणि तुमच्या दैनंदिन व साप्ताहिक कामगिरीच्या आधारावर बक्षिसे जिंका. चला तर मग 9 मार्च 2022 च्या भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजे पर्यंत अविरत व्यापार करण्यास तयार व्हा. (आयएनआर=भारतीय रुपये)
आठवडाभर चालणार्या व्यापार मॅरॅथॉन पार्टीमध्ये आणि रु 4 कोटींपेक्षा अधिक भव्य बक्षिसे जिंकण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत ! आता व्यापार करा
मोहिमेचा अवधी
गुरुवार, 3 मार्च, रात्री, 9 वाजता- बुधवार, 9 मार्च, रात्री 9 वाजेपर्यंत.
सर्व सहाही दिवस तुम्ही भाग घेऊन जिंकू शकता.
बक्षिसे
दैनंदिन स्पर्धा
- गुरुवार, 3 मार्च, रात्री, 9 वाजता ते बुधवार, 9 मार्च, रात्री 9 वाजेपर्यंत डब्ल्युआरएक्स/आयएनआर मार्केट मध्ये व्यापार करा.
- दररोज, सहाही दिवस, प्रत्येक दिवशी एकूण रु. 68,97,000 मूल्याचे डब्ल्यूआरएक्स बक्षिसे वाटण्यासाठी आम्ही या संरचनेचे पालन करणार आहोत.
- दैनंदिन स्पर्धा भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून सुरु होते आणि रात्री 8:59:59 वाजता समाप्त होते.
- त्यांच्या व्यापाराच्या प्रमाणाच्या आधारे दररोज विजेते निवडले जातील (सर्व खरेदी व विक्री ऑर्डर्स समाविष्ट).
- याव्यतिरिक्त तीन यादृच्छिक/रॅंडम व्यापारी, दररोज रु. 5000 किंमतीचे डब्ल्यूआरएक्स जिंकतील.
मी कशा प्रकारे भाग घेऊ शकतो/शकते?
- संबंधित दैनंदिन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 100 डब्ल्यूआरएक्स टोकन्स असली पाहिजेत.
- दैनंदिन स्पर्धेदरम्यान तुम्ही किमान रु. 5,000 चा व्यापार करणे अनिवार्य आहे.
दैनंदिन बक्षिसे
Rank | WRX Worth |
1 | INR 5,72,360 |
2 | INR 4,27,552 |
3 | INR 3,44,800 |
4 – 10 | INR 1,72,400 |
11 – 20 | INR 1,10,295 |
21 – 30 | INR 34,480 |
31 – 40 | INR 30,342 |
41 – 50 | INR 23,446 |
51 – 100 | INR 9,999 |
101 – 150 | INR 8,999 |
151 – 200 | INR 7,999 |
201 – 250 | INR 4,200 |
251 – 350 | INR 3,400 |
350 – 400 | INR 2,500 |
या शिवाय, 100 व्यापार्यांना, या मोहिमेच्या अवधीदरम्यान एकूण व्यापाराच्या संख्येच्या आधारे पुरस्कृत केले जाईल.*.
साप्ताहिक स्पर्धा
- गुरुवार, दि. 3 मार्च, भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजेपासून बुधवार, 9 मार्च, रात्री 9 वाजेपर्यंत डब्ल्यूआरएक्स/आयएनआर मार्केटमध्ये व्यापार करा.
- या साप्ताहिक स्पर्धेदरम्यान एकूण रु 5,00,000 मूल्याची डब्ल्यूआरएक्स बक्षिसे देण्यासाठी आम्ही या संरचनेचे पालन करणार आहोत.
- व्यापाराच्या संख्येच्या आधारे विजेते जिंकले जातील.
मी कशा प्रकारे भाग घेऊ शकतो/शकते?
- स्पर्धेच्या सुरुवातीस तुमच्याकडे किमान 100 डब्ल्यूआरएक्स टोकन्स असली पाहिजेत.
- सप्ताहाच्या अखेरीस बक्षिसांसाठी पात्र होण्यास, तुम्ही किमान 1000 व्यापार केलेले असले पाहिजेत.
साप्ताहिक बक्षिसे
Rank | WRX Worth |
1 | INR 40,100 |
2 | INR 30,000 |
3 | INR 20,000 |
4 – 10 | INR 9,999 |
11 – 20 | INR 8,000 |
21 – 30 | INR 5,500 |
31 – 40 | INR 4,500 |
41 – 50 | INR 3,500 |
51 – 100 | INR 2,500 |
कॉंटेस्ट लीडरबोर्डचालाभ घ्या, हुशारीने व्यापार करा आणि जिंका! आता डब्ल्यूआरएक्स/आयएनआर मध्ये व्यापार करा!
अटी व शर्ती
- फक्त पूर्ण केलेल्या ऑर्डर्सवरच, “व्यापाराच्या संख्येसाठी” बक्षिसांची* गणना (कॅलक्युलेशन) केली जाईल.
- व्यापाराच्या आकारात खरेदी व विक्री अशा दोन्ही ऑर्डर्स मोजल्या जातील.
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी वझिरएक्सवर किमान 100 डब्ल्यूआरएक्स असणे अनिवार्य आहे.
- दि. 31 मार्च 2022 पर्यंत बक्षिसांचे वितरण केले जाईल.
- प्रत्येक दिवसाच्या अखेरीस, म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता असलेल्या डब्ल्यूआरएक्सच्या किंमतीच्या आधारावर डब्ल्यूआरएक्स बक्षिसांचे वितरण केले जाईल. उदा: रात्री 9 वाजता डब्ल्यूआरएक्स रु. 50 किंमतीचा असेल तर सर्वात उच्च आकाराचा (श्रेणी 1) व्यापारी 11447.2 डब्ल्यूआरएक्स टोकन्स प्राप्त करेल. (गणना: 572360/50)
- रु. 10,000 व अधिक असलेल्या बक्षिसांवर 30% टीडीएस लागू असेल.
- कोणत्याही बक्षिसाचे वितरण किंवा वापराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा कर भरण्याचे दायित्व वझिरएक्सकडे नाही.
- कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही संशयास्पद कृती सापडल्यास/ संशय आल्यास पैसा परत घेण्याचा वझिरएक्सकडे हक्क आहे.
- कायद्याने प्रतिबंधित किंवा निषेध केल्यास बक्षिसे रद्दबातल ठरतील.
- या स्पर्धेतील बक्षिसे झन्माई लॅब्स प्रा. लिमिटेड द्वारा प्रायोजित करण्यात आली आहेत.
- कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, बक्षिसाचे नियम बदलणे किंवा रद्द करण्याचा त्यांच्या निर्णयाचे आणि ते घोषित करण्याचे त्यांचे संपूर्ण हक्क वझिरएक्स राखून ठेवत आहे.
धोक्याचा इशारा: क्रिप्टो व्यापार हा उच्च मार्केट जोखमीच्या आधीन आहे. नवीन लिस्टिंग झालेल्या टोकन्सचा व्यापार करतांना तुम्ही पर्याप्त जोखीम मूल्यांकन केले आहे याची खात्री करून घ्या कारण ती उच्च मूल्य अस्थिरतेची असतात. उच्च-प्रतीची कॉइन्स निवडण्यासाठी वझिरएक्स पूर्ण प्रयत्न करेल परंतु तुमच्या व्यापारातील तोट्यांसाठी जबाबदार असणार नाही.
