Skip to main content

एनएफटी मिंटिंग म्हणजे काय? (What is NFT Minting?)

By एप्रिल 11, 2022जून 3rd, 20223 minute read
What is NFT Minting?

अलिकडील काही वर्षांत विशिष्ट कलाप्रेमी आणि गुंतवणूकदारांमध्ये एनएफटीची लोकप्रियता वाढली आहे. डिजिटल कला लक्षावधी डॉलर्सना विकली जात असल्याने जलद पैसा कमावण्याकरिता काही व्यापाऱ्यांनी एनएफटी विकत घेण्यासाठी धाव घेतली आहे. हे एक खूळ (फॅड) आहे की कायदेशीर गुंत व णूक प्रकार आहे या वर आजही वादविवाद होत आहेत. याउलट, एनएफटी ही कलाकार व कंटेंट निर्मात्यांसाठी एक आकर्षक घडामोड आहे. आता आपण तुमची पहिली एनएफटी निर्माण करण्याची प्रक्रिया पाहूया, याना एनएफटॊ मिंटिंग असेही म्हणतात.

एनएफटी: एक मूलभूत प्रस्तावना

नॉन-फंजिबल टोकन्स किंवा एनएफटी ही एकमेव प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे जिची देवाणघेवाण, खरेदी आणि विक्री करता येते. काही आभासी जगांसाठी, ते कलाकृतीचे रूप किंवा इन-गेम साहित्याचे रूप घेते. प्रत्येक एनएफटी अद्वितीय असेल याची हमी राहण्यासाठी, त्याचे मेटाडेटा कोड्स ब्लॉकचेनवर ठेवले जातात.

एनएफटी हे डिजिटल ट्रेडिंग कार्ड्ससारखे असतात; पण प्रत्येक एनएफटी अद्वितीय असतो. बिटकॉइनसारख्या इतर डिजिटल संपत्तीच्या तुलनेत याची संख्या फक्त एकच असते व याच्या नक्कल प्रती/डुप्लिकेट्स नसतात. अशा प्रकारे, हाती असलेल्या डिजिटल कंटेंटचे अद्वितीयपण राखले जाते.

एनएफटी मिंटिंग: एक आढावा

एनएफटींच्या संदर्भात, मिंटिंग ही डिजिटल मालमत्ता संपादन करण्याची व त्याला ब्लॉकचेन-आधारित डिजिटल मालमत्तेत परि वर्तित करण्याची प्रक्रिया आहे ज्यामुळे ती विकत घेण्याजोगी आणि विकण्याजोगी डिजिटल मालमत्ता बनते.

Get WazirX News First

* indicates required

वेगळ्या प्रकारे सांगायचे झाले तर डिजिटल मालमत्ता म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निर्माण केलेली कोणतीही फाईल. हे एखादे चित्र, वस्तू, व्हिडिओ किंवा इतर काहीही असू शकते. मिंटिंग म्हणजे एखादी डिजिटल मालमत्ता एका ब्लॉकचेनला, सहसा इथेरियमला जोडून त्याचे एनएफटीमध्ये रुपांतरण करणे.

ब्लॉकचेन हे एक विकेंद्रित डिजिटल लेजर आहे जे एकदा एक आयटम जोडल्यानंतर, सुधारता, बदलता किंवा नष्ट करता येत नाही. म्हणूनच, एकदा मिंट करण्यात व एनएफटी म्हणून सत्यापित केली की ती मालमत्ता एनएफटी मार्केटप्लेसमध्ये विकता येते.

एनएफटी मिंटिंग करण्याचे फायदे

असे करण्याची प्रेरणा प्रत्येक भावी एनएफटी मिंटरला असू शकली तरीही तुमच्या एनएफटीचे मिंटिंग करण्यापूर्वी तुम्ही ध्यानात घेण्याजोगे काही सामान्य फायदे आहेत.

मालकीचे लोकतांत्रिकीकरण: एनएफटी तयार करून अनेक पक्ष डिजिटल मालमत्तेच्या शेअरचे मालक बनू शकता.

अति विशिष्ट डिजिटल संपत्ती विका: मालमत्तेेतील शेअरची तुम्ही केवळ अदलाबदली, खरेदी, आणि विक्रीच करू शकता असे नाही तर कलाकारांना भविष्यात नफ्याची टक्केवारीदेखील मिळू शकते.

मूल्य संग्रहित व जतन करणे: मालमत्तेचे मूल्य भौतिक स्वरूपात संग्रहित करता येऊ शकते जे मौल्यवान धातूच्या विशिष्ट प्रमाणासह एक अस्सल नाण्याच्या उत्पादनाच्या समान असू शकते. यापुढे, ब्लॉकचेनची सुरक्षितता व एनएफटीची उपजत टंचाई यामुळे मालमत्तेचा डिजिटल स्वरूपात संग्रह करणे सामान्यत: सुरक्षित समजले जाते.

एनएफटी कशा प्रकारे मिंट करायची? – एक सामान्य प्रक्रिया

कोणती साधने वापरावे याच्या विश्वासार्ह पर्यायाची निवड तर भावी एनएफटी मिंटर्सनी केलीच पाहिजे पण एनएफटीच्या निर्मितीची मूळ प्रक्रिया सामान्यत: एकच असते.

पायरी 1- एक असाधारण मालमत्ता निर्माण करणे.

एनएफटीचे मिंटिंग करण्यातील पहिली पायरी म्हणजे तुम्ही निर्माण करू इच्छिता अशी एकमेव प्रकारची मालमत्ता निवडणे. त्यानंतर, इन-गेम साधने ते डिजिटल ट्रेडिंग कार्डस असे डिजिटल कंटेंटचे संपूर्ण विश्व उपलब्ध आहे.

समजा, डिजिटल कलाकृतीची एनएफटी तुम्ही निर्माण क्करू इच्छिता. तुम्हाला तुमच्या डिजिटल कलाकृतीचे परिवर्तन ब्लॉकचेन डेटामध्ये करा वे लागेल. एनएफटींसाठी, इथेरियम ब्लॉकचेन पसंतीची आहे.

पायरी 2- टोकन्सची खरेदी

तुम्हाला तुम्ही नि व डलेल्या ब्लॉकचेनशी अनुरूप असणारी क्रिप्टोकरन्सी खरेदी करावी लागेल. प्रत्यक्षात, तुम्ही निवडलेल्या वॉलेट सेवांवर आणि मार्केटप्लेसवर ब्लॉकचेनचा परिणाम होईल. तथापि, काही वॉलेट सेवा आणि मार्केटप्लेसेस फक्त काही विशिष्ट इतरांसाठीच काम करतात.

 इथेरियम वर व्यवहारांचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इतर एखादे इथर (ETH) संपादन करावे लागेल जे इथेरियमचे नेटिव्ह कॉइन आहे. याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे विश्वसनीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजकडे जाणे.

पायरी 3- तुमच्या नॉन-कस्टोडियल वॉलेटमध्ये क्रिप्टोकरन्सी जोडणे .

तुमच्या क्रिप्टोचा संग्रह करन्यासाठी, इंटरनेटशी जोडलेले हॉट वॉलेट तुमच्याकडे असायला हवेत. त्यांची अकाऊंट्स आणि बिटकॉइन नेटवर्कशी वापरणाऱ्यांना इंटरफेस करता येईल असे ॲप्लिकेशन म्हणजे क्रिप्टोकरन्सी वॉलेट.

एनएफटी मिंटिंग करताना, तुमच्या मालमत्तेवर संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी – त्रयस्थ पक्षाचा सहभाग नसताना- एक नॉन-कस्टोडियल वॉलेटची गरज आहे. तुमच्या वॉलेटच्या खाजगी की तुमच्या असतील.

या विरुद्ध, कस्टोडियल वॉलेट म्हणजे जे क्रिप्टो एक्स्चेंज तुम्हाला जारी करते. तुम्ही हॅंडलर असला तरीही, तुमच्या खासगी कींवर तुमचे नियंत्रण नसेल.

पायरी 4- तुमच्या पसंतीची मार्केटप्लेस निवडा आणि त्यामध्ये मालमत्ता जोडा.

उपलब्ध असणाऱ्या अनेक एनएफटी मार्केटप्लेसपैकी एक निवडणे ही पुढील पायरी आहे. ओपनसी (OpenSea), वझिरएक्स एनएफटी मार्केटप्लेस किंवा रेरिबल (Rarible) यासारखी मार्केट्स एनएफटी मायनर्ससाठी अनुरूप आहेत.

काही एक्स्चेंज ग्राहकांना मिंटिंग शुल्क आकारतात व अकाउंट तयार करणे, एनएफटीचे लिस्टिंग आणि प्लॅटफॉर्मवर व्यापार करणे यासाठी अतिरिक्त आकार असू शकतो. तुमची मार्केटप्लेस शहाणपणाने निवडा!

पायरी 5- तुमच्या एनएफटी संग्रहात तुमची डिजिटल कलाकृती अपलोड करा.

तुमच्या अकाउंटमधून एनएफटी निर्माण करण्यासाठी प्रत्येक मार्केटप्लेसची स्वत:च्या पायऱ्यांचा विशिष्ट क्रम असला तरीही मूळ तत्त्वे तशीच राहतात.

  • तुम्ही मिंट करू इच्छिता ती कलाकृती निवड करा.
  • काही माहिती भरा (संग्रहाचे नाव, वर्णन इ.) आणि
  • मिंटिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती मालमत्ता तुमच्या संग्रहात जोडा.

एकदा तुमच्या संग्रहात ते आले की मग तुम्ही तुमच्या एनएफटींच्या लिस्टिग, मार्केटिंग आणि विक्रीला प्रारंभ करू शकता.

अंतिम टिप्पणी

मिंटिंगची प्रक्रिया प्लॅटफॉर्मनुसार बरीच बदलते परंतु मूळ सिद्धांत तेच राहतात. तुम्हाला विशिष्ट डिजिटल मालमत्ता, टोकन्स, नॉन-कस्टोडियल हॉट वॉलेट आणि एक प्रसिद्ध व विश्वासपात्र एनएफटी यांची फक्त गरज आहे.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply