Table of Contents
नोंद: हा ब्लॉग बाह्य ब्लॉगरने लिहिलेला आहे. या पोस्टमध्ये व्यक्त केलेले दृष्टिकोन आणि मते केवळ लेखकाची आहेत.
इंटरनेटचा उदय ही इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीपैकी आहे. हे आपल्या सामाजिक संवादांवरून स्पष्ट होते, जसे की आपल्या उबर चालकाचे अचूक ठिकाण शोधणे शक्य होणे आणि ऑनलाईन तिकिट बुक करणे किंवा सोशल मीडियावर ट्रेंड होणारे नवीन मीम मित्राला पाठवणे. गेल्या 16 वर्षांमध्ये लोक याला वेब 2.0 म्हणत होते. आज, लाखो ऑनलाईन ग्रुप आहेत जिथे सोशल मीडिया अॅप्लिकेशनवरून उघडपणे जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, अगदी इंटरनेटच्या आद्यप्रवर्तकांनी आशा केली होती त्याप्रमाणेच.
त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे वेब 2.0 ने विकासकांसाठी दरवाजे खुले केले आहेत, त्या पायाभूत सुविधांवर कळस चढवून ज्याला वेब 3.0 म्हणतात त्याच्या आगमनाचा मार्ग सुकर केला आहे.
इंटरनेटची अनेक आयुष्ये
जेव्हा इंटरनेटचा किंवा “वर्ल्ड वाईड वेब (www)” चा विषय येतो, त्याच्या आरंभापासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. मात्र, सुरुवातीच्या दिवसांमधील तंत्रज्ञानाच्या तुलनेत आजचे तंत्रज्ञान फार भिन्न आहे.
सामान्यतः इंटरनेट विकासातील तीन महत्त्वाच्या टप्प्यांना वेब 1.0, वेब 2.0 आणि अंतिमतः वेब 3.0 असे म्हणतात.
वेब 1.0
वेब 1.0 ही इंटरनेटची पहिली आणि अतिशय प्राथमिक आवृत्ती होती. ती स्थिर असल्यामुळे, इंटरनेट वापरकर्त्यांना सर्च आणि वाचन करणे यासारख्या कामांसाठी वेब पेजेसचा वापर करता येत असे. तेवढेच. इंटरनेटवर “रीड-ओन्ली (केवळ वाचन)” होते.
सामग्री पुरवठ्यासाठी डेटाबेस वापरण्याऐवजी स्थिर फाईल सिस्टीम वापरली जात होती. वेबसाईटवर संवाद होत नव्हता. त्यामुळे आपल्याला वेब 2.0 फ्रेमवर्ककडे त्वरेने संक्रमण करता आले.
वेब 2.0
डॉट-कॉम बूम आणि फेसबुक व गुगलसारख्या डिजिटल टायटन्सचा उदय यांनी वेब 2.0 मध्ये प्रवेश केला. वेब 1.0 च्या तुलनेत वेब 2.0 ने लोकांना ऑनलाईन आढळलेल्या सामग्रीबरोबर संवाद साधण्याचे अधिक मार्ग देऊ केले.
लोकांना कमेंट लिहिता येणे, फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करणे, किंवा वेबसाईटवरून टेक्स्ट संदेश पाठवणे शक्य झाले. आपण आज पाहत असलेले आणि संवाद करत असलेले इंटरनेट हे वेब 2.0 आहे.
वेब 2.0 चे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे बिगर-विकासकांना वेबसाईटबरोबर संवाद करणे आणि सामग्री जोडणे (कंटेंट समाविष्ट करणे) शक्य झाले. तसेच याचवेळी लोकांना त्यांच्या सृजनशील क्रियांमधून पैसे मिळवण्यास सुरुवात करता आली.
अगणित फायदे असले तरी वेब 2.0 ला डेटा सुरक्षेच्या अभावामुळे फटका बसत होता. परिणामी, डेटा सुरक्षेचा मुद्दा हा चर्चेचा मुख्य विषय होता.
सुरुवातीला, उपभोक्त्यांनी इंटरनेट सेवेच्या विनामूल्य वापराच्या बदल्यात स्वतःची वैयक्तिक माहिती आनंदाने दिली. मात्र, मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांच्या माहितीचे प्रचंड डेटाबेस संकलित करण्यास आणि स्वतःच्या लाभासाठी ती माहिती विकण्यास सुरुवात केली तेव्हा समस्या उद्भवल्या. यामुळे मला मोठ्या फेसबुक डेटा घोटाळ्याची आठवण येते.
डेटा गळती आणि या अवाढव्य डेटाबेसवर इतर हल्ले कधीही होऊ शकतात. यासारख्या समस्यांनी वेब 3.0 च्या आगमानाचा मार्ग मोकळा करून दिला.
वेब 3.0
वेब 2.0 मध्ये उद्भवलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने भविष्यातील वेबसाईटची रचना केलेली असेल.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्रिप्टोकरन्सी इंटरनेटच्या पुढील पिढीला विकेंद्रिकरणाकडे नेत आहेत. वापरकर्त्यांच्या डेटाची मालकी आणि नियंत्रण स्वतः त्यांच्याकडेच असावे हा वेब 3.0 चा उद्देश आहे. मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या मोठ्या टेक व्यवसायांना दूर करणे हा याचा हेतू आहे, जेणेकरून व्यक्ती एकमेकांना सेवा प्रदान करू शकतील आणि ते वापरत असलेल्या इंटरनेट साधनसामग्रीची व्यवस्था पाहू शकतील.
वेब3 चे मूलभूत घटक कोणते आहेत?
आजचे इंटरनेट हे मुख्यतः आपल्याकडे 2010 मध्ये जे होते तेच आहे, त्यामध्ये काही नवीन वैशिष्ट्यांची भर पडली आहे. मात्र आपण इंटरनेटचा वापर कसा करतो आणि त्याच्याशी संवाद कसा साधतो त्या पद्धतीमध्ये वेब3 मुळे मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
आपण असा निष्कर्ष काढू शकतो की वेब3 हे विकेंद्रित इंटरनेटचे नवीन युग आहे, त्याचा अर्थ असा की, त्रयस्थ पक्ष इंटरनेट सेवा प्रदात्यांनी ग्राहकांच्या गोपनीयतेत हस्तक्षेप न करता किंवा त्यांच्या इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण न ठेवता ग्राहकांना कोणतीही इंटरनेट सेवा मिळू शकते.
आता आपण वेब3 च्या मूलभूत घटकांचे पुनरावलोकन करूया —
ब्लॉकचेन नेटवर्क्स
आपण आधीच पाहिल्याप्रमाणे वेब3 हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर उभारण्यात आले आहे. ब्लॉकचेन नेटवर्कवर डेटाचे विकेंद्रित असतो जेणेकरून लोकांचा डेटा त्यांच्या मालकीचा असेल आणि त्यावरील नियंत्रण गमावण्याच्या कोणत्याही भीतीविना ते त्याची देवाणघेवाण करू शकतील. कोणत्याही त्रयस्थ पक्षांचा सहभाग नसल्यामुळे डेटाचे उल्लंघन होण्याची शक्यता नाही, त्यामुळे वापरकर्त्यांना अनेक सेवांमध्ये सुरक्षितपणे लॉगऑन करता येईल.
त्याच्या जोडीला, ब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सींसाठी महत्त्वाचे आहेत, जो आणखी एक वेब3 घटक आहे. वेब3 व्यवहारांसाठी इंधन म्हणून काम करणारे एनएफटीदेखील ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता
वेब 2.0 मध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) काही वाटा असला तरी, अद्यापही त्याचा बहुतांश वापर मोठ्या आयटी कंपन्यांकडूनच केला जातो. वेब 3.0 च्या विक्रेंद्रीकरणात सहाय्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरली जाईल.
ऑगमेंटेड रिअॅलिटी / व्हर्च्युअल रिअॅलिटी (एआर/व्हीआर – AR/VR)
वेब3 च्या भविष्यासाठी महत्त्वाची असलेले मेटाव्हर्स एआर/व्हीआरवर उभारले जाईल, जो वेब3 चा महत्त्वाचा घटक आहे.
वेब3 त्याच्या पूर्ववर्तींपेक्षा वेगळे कशामुळे आहे?
वेब3 मध्ये नेटिव्ह बिल्ट-इन पेमेंटचे वैशिष्ट्य आहे आणि ते स्वयं-नियमित, स्टेटफुल (प्रक्रिया किंवा व्यवहाराची स्थिती राखण्यास सक्षम) आणि भक्कम आहे. त्यामध्ये खालील गुणधर्म आहेत:
विकेंद्रित
ब्लॉकचेन वापरून कोणत्याही एका प्रणालीला वेब3 मधील सर्व डेटाचा अॅक्सेस मिळणार नाही. तो विविध प्लॅटफॉर्ममधून विखुरलेला आहे. यामुळे (अॅक्सेस मिळवण्यास) अनेक वेळा अपयश येऊ शकते आणि त्यामुळे विक्रेंद्रित अॅक्सेसला समर्थन देते.
परवानगीहीन
वेब3 सह इंटरनेट वापरण्यासाठी वापरकर्त्यांना अधिकृत परवानगीची गरज नसते. वापरकर्त्यांना स्वतःबद्दल कोणतीही वैयक्तिक माहिती देण्याची गरज न पडता काही विशिष्ट सेवा उपलब्ध सेवा असतील. गोपनीयतेचा बळी देण्याची किंवा इतर कोणतीही माहिती देण्याची गरज नाही.
सुरक्षित
विकेंद्रीकरणामुळे विशिष्ट डेटाबेसना लक्ष्य करणे हॅकर्ससाठी अवघड होत असल्यामुळे, वेब 3.0 हे वेब 2.0 पेक्षा कितीतरी अधिक सुरक्षित आहे.
वेब3 सह मेटाव्हर्स: त्यांचा काय संबंध आहे?
मेटाव्हर्समधील 3डी व्हर्च्युअल वातावरणामुळे वापरकर्त्यांना एकमेकांशी जोडले जाणे, गेम्स खेळणे किंवा सक्रिय शिक्षणात सहभागी होणे शक्य होते. मेटाव्हर्स वेब3 मध्ये लक्षणीय भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे, जरी ते अद्याप बाल्यावस्थेत असले तरी.
मेटाव्हर्सची गरज नसलेले वेब3 अॅप्स तरीही अस्तित्वात राहतील. मात्र, हे अॅप्स आपल्या दैनंदिन दिनक्रमांशी कसा संवाद करतील यामध्ये मेटाव्हर्स महत्त्वाची भूमिका बजावेल अशी कल्पना केलेली आहे.
वेब3: भविष्यात कशाची अपेक्षा करावी?
वेब 2.0 च्या बहुसंख्य समस्या दूर करण्याची वेब3 मध्ये क्षमता आहे असे दिसत असले तरी, हे लक्षात ठेवले पाहिजे या आदर्श दृष्टी अद्याप सत्यात उतरलेल्या नाहीत. आपण जशी कल्पना केली आहे अगदी तसेच सर्व काही होईल अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे.
याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे की, बहुसंख्य आयटी कंपन्या आधीच वेब3 अॅप्सवर काम करत आहेत. परिणामी, कोणत्या तरी प्रकारच्या केंद्रीकरणाशिवाय त्यांच्या सहभागाचा अंदाज करणे अशक्य आहे. अनेक आयटी उद्योजक आणि बिझनेस एक्झिक्युटिव्ह्ज यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की आपण अपेक्षा करत आहोत तितके वेब3 विकेंद्रित नसेल.
परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे नाही; वेब3 च्या अंमलबजावणीसाठी काही वेळ लागेल. पुढे काय वाढून ठेवले आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय घडते ते पाहावे लागेल.
अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.