Skip to main content

अंदाजपत्रक 2022 – क्रिप्टो उद्योगासाठी महत्वाचे मुद्दे (Budget 2022 – Key highlights for the Crypto Industry)

By फेब्रुवारी 1, 2022फेब्रुवारी 16th, 20223 minute read

भारत क्रिप्टो क्षेत्रास कायदेसंमत करण्याच्या मार्गावर आहे हे सन 2022 च्या अंदाजपत्रकाने स्पष्टपणे सूचित केले आहे. ब्लॉकचेन-कार्यान्वित डिजिटल रुपया भारतात पदार्पण करणार आहे या बातमीने आपण सुरुवात करूया आणि ही नक्कीच बदल घडवणारी घटना आहे 

कायदेसंमती आणि करपात्रता या मुद्द्यांवर स्पष्टपणा यावा याची क्रिप्टो चाहते बर्‍याच काळापासून वाट पहात आहेत. या संदर्भात सन 2022 च्या आर्थिक पत्रकाने काही प्रश्नांचे उत्तर दिले आहे.

सन 2022 च्या अंदाजपत्रकातील क्रिप्टो-विशिष्ट काही ठळक मुद्दे असे आहेत.

 • व्याख्या:आभासी डिजिटल संपत्ती/Virtual Digital Asset या संज्ञेची स्पष्ट व्याख्या देण्यात आली आहे. आभासी डिजिटल संपत्ती: साध्या शब्दांत क्रिप्टो आणि नॉन-फंजिबल टोकन्स/ Crypto and Non-Fungible Tokens (NFT) ही आता विशेषत: आभासी डिजिटल संपत्ती म्हणून मान्यताप्राप्त होऊ शकतात! …” म्हणजेच अशी कोणतीही माहिती किंवा कोड किंवा संख्या किंवा टोकन (भारतीय किंवा विदेशी चलन नाही) जी क्रिप्टोग्राफिक किंवा अन्य पद्धतीने निर्मित आहे, जी कोणत्याही नावाने ओळखली जात असेल, जी कोणत्याही मोबदल्यासह किंवा मोबदल्याविना, अंतर्गत मूल्य असल्याची हमी किंवा प्रतिनिधित्व करते, किंवा जी एक स्टोअर मूल्य म्हणून काम करते किंवा एका खात्याचे एकक आहे ज्यात त्याचा आर्थिक व्यवहारासाठी किंवा गुंतवमुकीसाठी समावेश होतो परंतु गुंतवणूक योजनेपर्यंतच मर्यादित नाही आणि ज्याचे हस्तांतरण करता येते किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे संग्रहण करता येते अशा विनिमयाच्या मूल्याचे डिजिटल प्रतिनिधित्व ते करते…” 
 • वर्गीकरण: ’आभासी डिजिटल संपत्ती’ समाविष्ट करण्यासाठी आयकर अधिनियमाच्या कलम56 ची, पुन्हा व्याख्या करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की एखाद्या करदात्यास क्रिप्टो किंवा एनएफटीसारखी आभासी डिजिटल संपत्ती भेट म्हणून प्राप्त झाली तर प्राप्तकर्त्याच्या संदर्भात त्यावर “इतर स्त्रोतांपासून उत्पन्न” या कलमाखाली कर आकारला जाईल. भेटवस्तूंशी संलग्न 50,000 ची मर्यादा येथे देखील लागू होईल. 
 • करनिर्धारण: आभासी डिजिटल संपत्तीवर कर आकारण्यासाठी  कलम’115बीबीएच’ तयार करण्यात आला आहे. कोणत्याही आभासी डिजिटल संपत्तीच्या हस्तांतरणाद्वारे कमावलेल्या उत्पन्नावर करदात्यास 30% दराने कर द्यावा लागेल. याचा अर्थ असा:  
  • समजा, आभासी डिजिटल संपत्तीची विक्रीची किंमत 300 असेल आणि संलग्न खरेदी किंमत 200 असेल तर देय कराची आकारणी निव्वळ उत्पन्नावर केली जाईल :

विक्रीची किंमत: ₹300

(वजा)खरेदीची किंमत: ₹200

निव्वळ उत्पन्न: ₹100

देय कर: ₹30 (₹100*30%)

  • या उत्पनाच्या संदर्भात कोणत्याही खर्चाचा दावा करता येणार नाही. निव्वळ उत्पन्न ठरवण्यासाठी फक्त प्राप्त करण्याचा खर्च (खरेदी किंमत) विक्री कमाईतून वजा करता येईल.  
  • सेट-ऑफ आणि कॅरी-फॉरवर्ड तोटा मंजूर केला जात नाही.  
 • आभासी डिजिटल संपत्तीच्या हस्तांतरणावर कर: आभासी डिजिटल संपत्तीच्या हस्तांतरणाच्या प्रत्येक व्यवहाराशी संलग्न व्यवहारावर कलम 149एस अंतर्गत सरकाराकडे 1% कर भरावयाचा आहे. येथे हस्तांतरण करणारी व्यक्ती (खरेदीदार) कर भरण्यास जबाबदार असेल. परंतु, येथे काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत: 
  • कलम 194एसच्या तरतूदींच्या अंतर्गत पात्रतेसाठी मोबदला (रोख किंवा वस्तू) आवश्यक आहे.  
  • आभासी डिजिटल संपत्तीचा खरेदीदार कराच्या ऑडिटसाठी पात्र नसेल किंवा व्यवसाय आणि नोकरीद्वारा (उदा: पगारी व्यक्ती) त्यांचे उत्पन्न नसेल तर- त्या आर्थिक वर्षात मोबदल्याचे एकूण मूल्य 50,000 (रु पन्नास हजार) पेक्षा जास्त नसेल तर 1% कर कपात लागू नसेल. परंतु, व्यवसाय आणि नोकरीतील उत्पन्न करनिर्धारणासाठी विचारात घेतले तर 50,000 ची मर्यादा 10,000 इतकी कमी केली जाते.  
  • फॉर्म्स, कालमर्यादा आणि कर भरण्याची पद्धत या मुद्द्यांवर अधिक स्पष्टतेची प्रतिक्षा करत आहोत.  

भारतात क्रिप्टो पर्यावरण प्रणालीस अतिशय आवश्यक असलेल्या मान्यतेसाठी क्रिप्टो करनिर्धारणाबद्दलची ही स्पष्टता मोठ्या प्रमाणात मदत करेल. बॅंक्स आणि आर्थिक यंत्रणांत उपस्थित संदिग्धता या बातमीने दूर होईल आशी आमची आशा आहे ज्यामुळे या संस्था क्रिप्टो उद्योगास आर्थिक सेवा पुरवू शकतील. ही तर नुसती सुरुवातच आहे आणि भविष्यात अनेक सकारात्मक बदल होतील याची आम्ही आशा करतो.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply