Skip to main content

क्रिप्टो घोटाळे: ते कसे हेरायचे? (Crypto Scams: How to spot them?)

By डिसेंबर 21, 20215 minute read
क्रिप्टो घोटाळे: ते कसे हेरायचे? (Crypto Scams: How to spot them?)

आपल्या आयुष्यात कधी न कधी अशी वेळ येते, आपल्याला ठाऊकदेखील नसलेल्या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आपण लाखो डॉलर जिंकले आहेत असा दावा करणारी ईमेल आणि टेक्स्ट संदेश आपल्या सर्वांना मिळाले आहेत. सामान्यत:, ते वाचून आपण मनापासून हसतो आणि पुढे जातो कारण ते ईमेल किंवा संदेश फसवे आहेत हे आपण ताबडतोब ओळखू शकतो.

परंतु, क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत तुम्ही तेच करू शकाल असे तुम्हाला वाटते का? एका वैध प्रकपातून क्रिप्टो घोटाळा तुम्ही किती सहजपणे हेरू शकाल? तुम्हाला ज्ञात असले पाहिजे ते सर्व काही येथे देत आहोत.

क्रिप्टो घोटाळ्यांची संख्या वाढतच आहे

दिवसेंदिवस, क्रिप्टोकरन्सी उच्चांक गाठत आहे. संपूर्ण जगभरात व्यक्ती आणि संस्थांतील गुंतवणूकदारांचे लक्ष क्रिप्टो सतत आकर्षित करत आहेत आणि त्याचबरोबर लगेच श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या व्यक्तींचे शोषण व फसवणूक करून, सहज फायदा करू पाहणाऱ्या घोटाळेबाजांचे ते सोपे लक्ष्यदेखील झाले आहेत.

घोटाळेबाज सामान्यत: विश्वास ठेवण्यासारखी वचने देतात आणि इंटरनेटचा स्वत:साठी वापर करत स्वतःचे निनावीपण वापरून स्वत:च्या फायद्यासाठी ते क्रिप्टो अवकाशात एकरूप होतात. बहुतेकदा, ही वचने खरी असणे अशक्य असते आणि तरीही व्यक्ती त्यांच्या जाळ्यात सहजपणे पकडले जातात. असे घडण्याचे मूळ कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, लोकांचे क्रिप्टोकरन्सीबद्दलचे अज्ञान- काय कायदेशीर आहे आणि काय कपट आहे हे सांगणे त्यांच्यापैकी बहुतेकांना शक्य नसते. यात आणखी भर म्हणजे, क्रिप्टोकरन्सी म्हणजे अनेकांना समजणार नाही असे काहीतरी तंत्रज्ञान-संलग्न असल्याचा अनेकांचा विश्वास आहे. 

Get WazirX News First

* indicates required

म्हणूनच, क्रिप्टोकरन्सींचा वापर किंवा तुम्ही त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी, क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे काम करते आणि ती रोख किंवा इतर पेमेंट पद्धतींहून कशा प्रकारे वेगळी आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जाळ्यात अडकून तुमची सर्व बचत तुम्हाला गमावायची नसेल तर क्रिप्टोकरन्सी घोटाळे आणि हेराफेरी केलेली क्रिप्टो खाती कशी ओळखावी हे तुम्ही सुद्धा शिकले पाहिजे.

काही लोकप्रिय घोटाळे आणि आपण कशा प्रकारे ते ओळखू शकतो हे येथे देण्यात आले आहे. 

तोतया घोटाळेबाजी (Imposter scams)

तोतया घोटाळ्यात, सरकारी अधिकारी, कॉर्पोरेशन किंवा सुपरिचित व्यक्तींची नक्कल वारंंवार केली जाते. सध्या, नोंदवण्यात येणाऱ्या नुकसानापैकी साधारणत: फक्त 14% साठी क्रिप्टोक्रन्सी जबाबदार आहे. या पैकी प्रचंड मोठे घोटाळ्यांचे अपराध (जवळजवळ 86%) अधिकृत मान्यता असलेली रोख रक्कम वापरून केले जातात. परंतु क्रिप्टोकरन्सी तुफान वेगाने घोडेदौड करत असताना हे प्रमाण बदलणे अपेक्षित आहे. सध्याचा कल चालू राहिला तर, पुढील काही वर्षांत डिजीटल चलनाच्या तोट्याची टक्केवारी नि:संशय वाढेल. 

खरे तर, एफटीसी डेटानुसार, एकूण $8 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या तोट्याचा दावा करणाऱ्या 7000 हून अधिक ग्राहकांसह, सन 2020 पासून क्रिप्टो घोटाळ्यांचे आरोप वाढतच आहेत.

तोतया घोटाळ्यांची जोड सामान्यत: प्रलोभनांच्या घोटाळ्यांशी असते ज्यात तोतये त्यांना देण्यात आलेले क्रिप्टो दुप्पट करण्याचे किंवा तेवढेच देण्याचा प्रस्ताव ठेवतात. एखाद्या मोठ्या किंवा प्रभावशाली व्यक्तीचे वॉलेट आहे असा गैरसमज करून घेत घोटाळेबाजाच्या वॉलेटमध्ये क्रिप्टो पाठवल्याचे अनेक वापरकर्त्यांनी निवेदन केले आहे. उदा, गेल्या सहा महिन्यांत एलन मस्कच्या तोतयास क्रिप्टोकरन्सींमध्ये $20 लाखांपेक्षा अधिक पैसा हस्तांतरित केल्याचे वापरकर्त्यांनी निवेदन केले आहे.

वझिरएक्स ग्राहक सेवा, व्यवस्थापन किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर्मचारी आणि टेलिग्रॅम समूहात फसवी लिंक्स पोस्टद्वारा देखील घोटळेबाज तोतयागिरी करू शकतात. संपूर्ण इंटरनेटवर अशासारखी खोटी खाती सापडू शकतात. विशेषत: तसा परिणाम अशक्य आहे असे वाटत असल्यास, ट्विटर किंवा फेसबुकवरील तशा प्रस्तावांवर विश्वास ठेवू नका.

तोतयाचे खाते हेरण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यांचे मूल्यांकन करणे. एखादा क्रिप्टो प्रस्ताव अतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल तर तुम्हाला हवे असलेले लाल निशाण तेच आहे. ही अतिशयोक्ती वाटते कारण त्यात काहीच तथ्य नाही. 

नकली वेबसाइट (Clone websites)

घोटाळेबाजांकडून नेहमी वापरली जाणारी आणखी एक क्लृप्ती म्हणजे बोगस वेबसाइट. क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक किंवा मायनिंग करण्याची संधी देत आहेत असे वरकरणी वाटणाऱ्या परंतु प्रत्यक्षात बनावट असणाऱ्या वेबसाइटना भेट दिल्यामुळे अनेक गुंतवणूकदार फसवले गेले आहेत. या वेबसाइट सामान्यत: चांगल्या प्रकारे डिझाइन केलेल्या असतात आणि त्या वैध असल्यासारखे भासवू शकतात. यात व्यक्ती त्यांचे क्रिप्टो वेगाने आणि पुढेमागे न पाहता हस्तांतरित करू शकता्त.

सामान्यत:अशा वेबसाइटवर गुंतवणूकीचे अनेक स्तर असतात, जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा अधिक परतावा. या वेबसाइट विश्वासार्ह दिसण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे आणि क्रिप्टोकरन्सी भाषा यांत वापरण्यात येते परंतु विश्वास ठेवणे अशक्य असा आश्वस्त परतावा देण्याचे हे मोठे दावे पूर्णत: फसवे आहेत हे वापरकर्त्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुमचा पैसा वाढत आहे अशी छापदेखील या वेबसाइट पाडू शकतात. परंतु तुमचे आश्वस्त लाभ तुम्ही काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा आणखी क्रिप्टो हस्तांतरित करण्यास तुम्हाला सांगितले जाते- आणि सरतेशेवटी परतावा म्हणून तुमच्या हातात काहीच पडत नाही.

तुम्ही व्यवहार करत असलेली वेबसाइट वैध व कायदेसंमत आहे की नाही हे तुम्हाला सांगणाऱ्या अनेक खुणा आहेत. उदा: URL बार मध्ये लॉकची खूण नसेल तर ती वेबसाइट सुरक्षित नसल्याची ती एक खूण आहे. लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे पेमेंट करताना तुम्हाला एका साइटवरून दुसऱ्या साइटवर पाठवण्यात येते. ही रिडायरेक्ट लिंक वैध व कायदेसंमत साइट आहे असे भासू शकते परंतु त्या URLचे जवळून परिक्षण केल्यास असे दिसून येते की त्या नकली URL मध्ये ओ “o” या अक्षराऐवजी शून्य ही संख्या आहे. परिणामस्वरूप, तुमच्या ब्राऊझरमध्ये तुम्ही अचूक URL प्रविष्ट केला आहे याची खात्री करा आणि पुन्हा एकदा तपासा.

रोमान्स घोटाळे (Romance scams)

लोकांना क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांत लोकांना खेचण्यासाठी ऑनलाइन डेटिंगचा गैरफायदा घेणारा एक प्रकारचा घोटाळा म्हणजे रोमान्स घोटाळा. सामान्यत: डेटिंग ॲप आणि सोशल मीडियाद्वारे घोटाळेबाज शोषिताच्या संपर्कात येतात. त्यांचा विश्वास कमावण्यासाठी आणि त्यांचे नाते खरे आहे असा पाठपुरावा करण्यासाठी ते शोषिताच्या मनात भावी प्रेमाचे आकर्षण निर्माण करतात. शोषिताचा संपूर्ण विश्वास मिळवल्यानंतर, घोटाळेबाज क्रिप्टो पंडित म्हणून आव आणतात आणि त्यांना ती पाठवून क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक करण्यास ते शोषिताच्या मागे लागतात. एकदा शोषिताने गुंतवणूक केली की त्या बनावट खात्यातून लाभाची लहानशी रक्कम काढून घेण्यास देखील तो घोटाळेबाज शोषिताला मदत करतो.

यशस्वीपणे लाभ काढून घेतल्यानंतर पैशाची आणखी मोठी रक्कम खर्च करण्यास घोटाळेबाज शोषितास सांगतो आणि “लवकर कृती” करण्याचा शोषिताला आग्रह करतो. पुन्हा एकदा पैसे काढण्यास शोषित तयार होतो तेव्हा अडचणी सुरु होतात. पैसे का काढता येत नाहीत याची असंख्य कारणे घोटाळेबाज देतो आणि पैसे पाठवण्याचे शोषित थांबवतो तेव्हा हे आभासी नाते शेवटी संपुष्टात येते.

एफटीसीनुसार, आपण गुंतत गेलेल्या प्रियतमाने अत्यंत आकर्षक क्रिप्टो संधीबद्दल चर्चा करण्यास सुरुवात करेपर्यंत आपण दीर्घकालीन प्रेममय नातेसंबंधांत आहोत असा त्यांचा गैरसमज होता असे अनेक लोकांनी सांगोतले आहे. ऑक्टोबर 2020 पासून,  रोमान्स घोटाळ्यात गमावलेल्या अंदाजे 20% पैसा क्रिप्टोकरन्सीत हस्तांतरित करण्यात आला आहे यातील अनेक तक्रारी, आपण गुंतवणूक करत आहोत असे त्यांना वाटत असणाऱ्या व्यक्तींकडून आल्या आहेत.

अशा रोमान्स घोटाळ्यास बळी पडण्याचे टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते येथे देत आहोत. फक्त इंटरनेटवर भेट झाली आहे अशा व्यक्तीच्या सल्ल्याच्या आधारे कधीही पैसा पाठवू नका, व्यवहार करू नका आणि गुंतवणूक करू नका आणि अनोळखी लोकांशी तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलू नका. एकमेव गुंतवणूक संधी आहे असा दावा करणाऱ्या आणि लवकरात लवकर कृती करण्यास तुमच्यावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींच्या सापळ्यात तुम्ही अडकणार नाही याची खात्री करा. त्यांच्या वॉलेट मध्ये क्रिप्टोकरन्सी पाठवण्याची मागणी कोणत्याही कॉलरने, प्रियकराने, संस्थेने किंवा केल्यास तो घोटाळा आहे याची हमी तुम्ही देऊ शकता. तसेच, अनोळखी लोकांना इंटरनेटवर संवेदनशील किंवा वैयक्तिक माहिती देणे टाळा.

अखेरचे विचार

फिशिंग घोटाळे, पैसा देण्याचे घोटाळे, रोमान्स घोटाळे, रग-पुल/पळून जाण्याचे घोटाळे, पंप्स ॲन्ड डंप्स (चलन फुगवणे आणि दिशाभूल करणे) – तुम्ही हवे ती नावे द्या क्रिप्टो घोटाळे सगळीकडे आहेत. तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्ही ज्यासाठी कष्ट केले ते सर्व काही गमावून बसाल. 

क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, तुम्ही वाजवीपेक्षा अधिक खबरदार असल्याची खात्री करा आणि काहीतरी ठीक नाही किंवा तर्कसंगत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या अंतर्मनाचा कौल घ्या. क्रिप्टो वॉलेटमध्ये पैसे पाठवण्यास वझिरएक्स वापरकर्त्यांना कधीच विचारत नाही.वझिरएक्स एक्स्चेंज पाहण्यासाठी, येथे क्लिक करा. 

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply