Skip to main content

क्रिप्टो व बिटकॉइन आरओआय कॅल्क्युलेटर (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट-गुंतवणुकीवर परतावा संगणन यंत्र) (Crypto & Bitcoin ROI Calculator)

By डिसेंबर 22, 20212 minute read
क्रिप्टो व बिटकॉइन आरओआय कॅल्क्युलेटर (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट-गुंतवणुकीवर परतावा संगणन यंत्र) (Crypto & Bitcoin ROI Calculator)

प्रत्येक गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीवर परतावा (आरओआय) हा केंद्रबिंदू असतो. विविध गुंतवणुकींवर भाकित केलेल्या नफ्याचे मूल्यांकन करण्यासाठी विस्तृतपणे वापरण्यात येणारे आरओआय हे मानकीकृत मेट्रिक आहे. स्टॉक, कर्मचारी, क्रिप्टो आणि शेळ्यांच्या कुरणाचेदेखील मूल्यमापन करण्यासाठी हे मेट्रिक वापरता येते मूलत:, लाभ प्राप्त करण्याच्या क्षमेतेसह किंमत असलेल्या प्रत्येक गोष्टीस आरओआय संलग्न करता येते.

अशा गुंतवणुकींवरील परताव्याचे मूल्यांकन केल्यानंतरच एक सूज्ञ गुंतवणूक निर्णय घेता येतो. 

संभाव्य परतावा मोजण्यासाठी गुंतवणूकदार अनेक तंत्रांचा वापर करू शकतात. त्याचे मूल्यमापन करण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म कॅलक्युलेटर व तंत्रे देऊ करतात. पारंपारिक गुंतवणुकींसाठी भरपूर तंत्रे उपलब्ध असली तरीही क्रिप्टो बाजारपेठेपर्यंत ते पोहोचलेले नाहीत. बिटकॉइन, इथेरियम आणि इतर क्रिप्टोंची मागणी आजवरच्या अत्त्युच्च स्तरावर आहे आणि सुजाण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

वझिरएक्समध्ये आम्ही, नेहमीच गुंतवणुकीपूर्वी सखोल संशोधन करण्याचा आग्रह धरला आहे. आमचे गुंतवणूकदार आणि व्यापक स्तरावर समुदाय यांना मदत करण्यासाठी आमचा क्रिप्टो/बिटकॉइन आरओआय कॅल्क्युलेटर आम्ही सादर केला आहे.

तो येथे वापरून पाहा!

क्रिप्टो/बिटकॉइन आरओआय कॅलक्युलेटरच्या वापराने, तुम्ही हे करू शकता:

  • गुंतवणुकीच्या वारंवारतेच्या आधारे (मासिक किंवा एकहाती) तुमच्या क्रिप्टो गुंतवणुकीवरील परतावा मोजा. 
  • अनेक कालावधीसाठी परतावा मोजा. 
  • संभाव्य चलनवाढीचाही विचार करा.
  • तुमच्या आवडत्या क्रिप्टोच्या भूतकाळातील कामगिरीचे मूल्यांकन करा आणि गुंतवणुकीसाठी आदर्श दर ठरवा,
  • हिंडत फिरत निर्णय घ्या.

क्रिप्टो/बिटकॉइन आरओआय कॅलक्युलेटर कशा प्रकारे वापरायचा?

ही प्रक्रिया आम्ही शक्य तितकी सोपी केली आहे.

पायरी 1: कॅलक्युलेटरमध्ये सर्वप्रथम गुंतवणुकीची वारंवारता निवडा-मासिक की एक हाती

पायरी 2: गुंतवणुकीची रक्कम प्रविष्ट करा.

पायरी 3: परताव्याचा अपेक्षित दर जोडा. तुमच्या आवडत्या क्रिप्टोची मागील कामगिरीदेखील तुम्ही तपासू शकता.

पायरी 4: गुंतवणुकीची मुदत निवडा.

 पायरी 5: भाकित केलेला चलनवाढीचा दर जोडा (आवश्यक असल्यास). 6% डिफॉल्ट दर आपोआप लावला जातो.

पायरी 6: बस्स, एवढेच! अगदी तुमच्यासमोरच गुंतवणुकीची रक्कम आणि कमावलेली संभाव्य संपत्ती दिसून येईल.

वर उल्लेख केल्यानुसार, तुमच्या क्रिप्टो गुंतवणुकीचा संभाव्य लाभ/तोटा यांचे मूल्यांकन करण्यासाठी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (गुंतवणुकीवर परतावा)-(आरओआय) हे लोकप्रिय मापन आहे. तुमच्या संशोधनात जा आरओआय कॅल्क्युलेटर तुमची मदत करे अशी आम्ची आशा आहे. हे काम हुशारीने करा आणि तुमचा क्रिप्टो प्रवास आजच सुरू करा!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply