Skip to main content

वझिरएक्स एनएफटी मार्केटप्लेसवर खाते कसे तयार करायचे? (How to Create an Account on WazirX NFT Marketplace?)

By डिसेंबर 20, 2021डिसेंबर 21st, 20212 minute read
तुमच्या पहिल्या एनएफटीचे मिंटिंग करण्यापूर्वी तुम्हाला ठाऊक असल्या पाहिजेत अशा 5 गोष्टी (5 Things You Should Know before minting your first NFTs)

आमच्या एनएफटी मार्केटप्लेसवर तुम्ही जाल तेव्हा तुमच्या उजव्या बाजूच्या वरील कोपऱ्यात, तुम्हाला सामान्यत: साइन अप दिसते त्याऐवजी कनेक्ट बटन दिसेल. याचा अर्थ, तांत्रिकरित्या आमच्या प्लॅटफॉर्मशी तुमचे मेटामास्क वॉलेट तुम्ही कनेक्ट करत आहात. याचा अर्थ हा की वझिरएक्स एनएफटी मार्केटप्लेसवर खाते तयार करण्यासाठी मेटामास्क वॉलेट असणे ही पूर्वअट आहे.

म्हणून, एकदा तुमच्या क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राऊझरवर तुम्ही मेटामास्क वॉलेट जोडले की त्यानंतर तुम्ही ’कनेक्ट’ बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर, तुमच्या विविध खाते क्रमांकासह एक ड्रॉपडाऊन मेन्यू उघडेल. खाते क्रमांकांच्या यादीतून तुम्ही निवडू शकता. यानंतर नेक्स्टवर क्लिक करा जे पॉप-अप मधून तुम्हाला पुन्हा कनेक्ट बटन दाखवेल. यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल जो विचारेल की तुम्हाला या साइटला एक नवीन नेटवर्क जोडण्याची परवानगी द्यायची आहे का (जी या बाबतीत बीएससी आहे) कारण इथेरियम मेननेट हे मेटामास्कवर जुळलेले नेटवर्क आहे. परंतु, वझिरएक्सवर, बायनान्स स्मार्ट चेनला (बीएससी) सध्या सहाय्य मिळते जे मेटामास्कला मिळत नाही. 

Get WazirX News First

* indicates required

म्हणून, बीएससी नेटवर्कचे तपशील जोडणे गरजेचे आहे आणि मेटामास्कवर हे नवे नेटवर्क त्याला जोडू दिले पाहिजे. यानंतर ते मान्य करण्यासाठी तुम्ही क्लिक करणे आवश्यक आहे. पुढील गोष्ट ती विचारते ती म्हणजे तुम्हाला या साइटला नेटवर्क बदलू द्यायचेआहे का कारण तुम्ही इथेरियम मेननेटवरून बायनान्स स्मार्ट चेनवर स्विच करत आहात. एकदा तुम्ही मान्यता दिली की, आता तुम्ही ’साइन’वर क्लिक करायचे आहे जे तुमचे साइन-इन तपशील विचारेल. तुमचे वापरकर्ता नाव, प्रदर्शनाचे नाव आणि ईमेल आयडी जोडायची आहे.

एकदा तुम्ही रजिस्टरवर क्लिक केले की वझिरएक्स एनएफटी मार्केटप्लेसवर तुम्ही यशस्वीपणे खाते तयार केलेले असेल. उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात प्रोफाईलवर तुम्ही क्लिक केले की, तुमचे प्रोफाईल, तुमचे संग्रह, निर्मिती इ. तुम्ही पाहू शकता. एकदा तुम्ही एडिट प्रोफाईल वर गेलात की सर्व आवश्यक तपशील तुम्ही जोडू शकता. त्यात तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील तुम्ही एकीकृत करू शकाल.

पूर्ण व्हिडिओ येथे पाहा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply