
नमस्ते मित्रांनो! भारताचा सर्वात विश्वासपात्र क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज होणे ही सोपी गोष्ट नाही. WazirX मध्ये, स्वत:स ग्राहकाभिमुख कंपनी म्हणवून घेण्यास आम्हाला अभिमान वाटतो. नवीन वैशिष्ट्ये आणि उपक्रम निर्माण करताना आणि ती वापरात आणताना – आमचे लक्ष नेहमी आपल्यावर – आमच्या समुदायावर – केंद्रित असते. आमच्या वापरकर्त्यांकडून आम्हाला मिळणाऱ्या 5-स्टार विलक्षण अभिप्रायातून हे दिसून येते.
आपल्यापैकी अनेकजण अमच्या वेबसाइटवर ’लाईव्ह चॅटवर मदत’ सुरू करण्याचा आग्रह करत होते. आम्ही आपले ऐकले आणि 8 जून 2020 पासून आमच्या वेबसाइटवर आम्ही लाइव्ह चॅटवर मदत देण्यास सुरुवात केली. ती आता 100% तयार आहे आणि आपण आमच्या विलक्षण ग्राहक सेवा टीमशी आमच्या हेल्प अँड सपोर्ट पृष्ठावरून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत संपर्क साधू शकता. वीकेंडसाठीदेखील आम्ही लवकरच लाइव्ह चॅट आणत आहोत.
उत्पादन असो अथवा मार्केटिंग किंवा ग्राहक सेवा, सर्वोत्कृष्टता हे WazirX चे उद्दिष्ट आहे.
आमच्या चॅट टीमचा प्रथम प्रतिसाद अवधी फक्त 60 सेकंद आहे हे शेअर करण्यास आम्हाला अभिमान वाटतो! 8 जूनपासून आम्ही 12,000 पेक्षा अधिक शंकांचे उत्तर दिले आहे आणि आमचा समाधान गुण 85% पेक्षा अधिक आहे!
प्रथम प्रतिसाद वेळ: 60 सेकंद
समाधान गुण: 85%
आमच्या वापरकर्त्यांचे काही अभिप्राय विस्मयकारक आहेत:




आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही आपले सदैव आभारी आहोत. मित्रांनो, आणखी उत्तम गोष्टी तुमच्यासाठी येत आहेत.
