Skip to main content

WazirX ’प्राइस अलर्ट्स’/ किंमतीचेअलर्ट्स (Price Alerts on WazirX)

By एप्रिल 14, 2022एप्रिल 20th, 20221 minute read

नमस्ते मित्रांनो!

आमच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर आमच्या वापरकर्त्यांना सर्वोत्कृष्ट अनुभव देण्याच्या उद्देशाने वझिरएक्समधील आम्ही सर्वांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. म्हणूनच, वापरकर्त्यांच्या गरजा व पसंती मनात ठेवून, वझिरएक्स ॲपवरच तुमच्या आवडत्या कॉइन्स/टोकन्स साठी तुम्ही प्राइस अलर्ट्स/किंमतीचे अलर्ट्स’ सक्षम करू शकता! 

’प्राइस अलर्ट’ वैशिष्ट्य वझिरएक्सवर कशा प्रकारे काम करते? 

हे फक्त एकदाच करावे लागते! तुमच्या वझिरएक्स ॲपवर प्राइस अलर्ट्स सक्षम करण्यासाठी तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे: 

पायरी 1: वझिरएक्स ॲप उघडा आणि तुमच्या ’अकाऊंट सेटिंग्ज’ वर जा. 

Get WazirX News First

* indicates required

पायरी 2: नोटिफिकेशन्स वर क्लिक करा.

Graphical user interface, application, TeamsDescription automatically generated

पायरी 3: ’प्राइस अलर्ट्स’ विभागात तुम्हाला ज्या कॉइन्ससाठी प्राइस अलर्ट्स सक्षम करायची आहेत ती निवडा. तुम्ही ’आवडती कॉइन्स’ आणि/किंवा ’लोकप्रिय कॉइन्स’ निवडू शकता. 

येथे, ‘आवडती कॉइन्स’ म्हणजे अशी कॉइन्स जी तुमच्या आवडत्या यादीत स्वत: जोडली आहेत. तुमच्या पसंतीची क्रिप्टो (कोणत्याही मार्केटमधील) च्या बाजूला असलेल्या चिन्हावर टॅप करून तुम्ही हे करू शकता. लोकप्रिय कॉइन्स म्हणजे अशी जी वझिरएक्सने मार्केटच्या मागणीनुसार जोडली आहेत. 

पायरी 4 : अलर्टची फ्रिक्वेनसी/वारंवारता सेट करा. येथे तुम्हाला निवडण्याचे 3 पर्याय आहेत:

  • किंमतीत मोठे बदल
  • किंमतीत मध्यम बदल
  • किंमतीत लहान बदल

तुमच्या पसंतीनुसार, केव्हा अलर्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता 

Graphical user interface, application, TeamsDescription automatically generated

बस्स, एवढेच! तुमच्या निवडीच्या आधारे, तुमच्या आवडत्या क्रिप्टोच्या किंमतीतील फरकांबद्दल प्रत्यक्ष त्या वेळेवर (रियल-टाइम) तुम्हाला अलर्ट्स प्राप्त होतील. 

या वैशिष्ट्याचा तुम्ही पुरेपूर वापर कराल अशी आमची आशा आहे. खालील कॉमेंट्समध्ये तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कळवा. 

जय हिंद!🇮🇳

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply