Skip to main content

या घोडेदौडीतील आघाडीची 5 अल्टकॉइन (Top 5 Altcoins In This Bull Run)

By ऑक्टोबर 28, 2021डिसेंबर 21st, 20214 minute read
या घोडेदौडीतील आघाडीची 5 अल्टकॉइन (Top 5 Altcoins In This Bull Run)

अनेक महिन्यांच्या क्षैतिज एकत्रीकरणानंतर जागतिक क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉइन सध्याच्या घोडेदौडीत अग्रस्थानी आहे. सर्वात आघाडीच्या या क्रिप्टोकरन्सीने, एनवायएसइ (न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज) वर प्रोशेअरद्वारे सर्व-प्रथम बिटकॉइन प्रस्तुतीनंतर ऑक्टोबर 18 मध्ये $65000 टप्पा ओलांडला आहे. सध्याचे बाजार भांडवलीकरण आजपर्यंतच्या सर्वात उच्च स्थानावर $2.62 ट्रिलियन असताना.

बिटकॉइन व्यतिरिक्त असलेली कोणतीही क्रिप्टोकरन्सी ही अल्टकॉइन आहे. बिटकॉइन प्रचंड आश्वस्त वाढ देऊ करते, असे असले तरीही अनेक बाबतीत अल्टकॉइन बिटकॉइनपेक्षा अधिक चांगला परतावा देऊ करतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

अल्टकॉइन बाजारपेठ वेगाने पुढे प्रगती करत आहे, कारण ब्लॉकचेनची एकूण निर्मिती व विकेंद्रित ॲप्लिकेशन त्यांच्या स्कोपमध्ये खूप अधिक गुंतागुंतीचे झाली आहेत आणि आज ते समर्थन देत असलेल्या युज केसेस अधिक विस्तृत झाल्या आहेत. अनेक अल्टकॉइन सध्या दोन ते तीन आकडीदेखील टक्केवारी श्रेणीय वाढ अनुभवत आहेत. विश्लेषक व व्यापारी आतापासूनच एक नव्या ’अल्टकॉइन’ हंगामाच्या अपेक्षेत आहेत.

त्याचबरोबर, बिटकॉइन-अल्टकॉइन पारस्पारिक संबंधात सावकाशपणे शुष्कतेचा अनुभव होत आहे. क्लिष्टता आणि उपयोग यांच्या बाबतीत बिटकॉइनच्या तुलनेत प्रचंड उत्तम असणाऱ्या अभूतपूर्व युज केसेस अल्टकॉइन बाजारपेठ पहात आहे. बिटकॉइनचे वर्चस्व 60% वरून सध्या 44% वर प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरले आहे. 

Get WazirX News First

* indicates required

याच्या तुलनेत आपल्याकडे – डिजीटल अवकाशाचे भविष्य – असणारी DApps आहेत जी पेमेंट, मालकी, टोकनायझेशन, गेमिंग आणि मेटाव्हर्ससारख्या क्षेत्रात हळूहळू शिरकाव करत आहेत. या प्लॅटफॉर्मना ताकद देणारी ही अल्टकॉइन व इतर क्रांतीकारी प्रकल्प आहेत. 

त्याचा प्लॅटफॉर्म उपयोगात आला त्या युज केसेसच्या संख्येच्या थेट प्रमाणात क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेत सुसंगता कमावते. सध्याचे अल्टकॉइनचे प्रकार एकमेव प्लॅटफॉर्म व युज केसेसचे समर्थन करतात आणि म्हणून गुंतवणूकदार आणि व्यापारी समुदायास आपल्याकडे हळूहळू खेचत आहेत. या घोडेदौडीत सर्वोच्च 5 जागांसाठी अनेक अल्टकॉइन निभाव लागणारे प्रतिस्पर्धक बनू शकतात.आम्हाल असे वाटते!

#1 Ethereum (ETH)

सन 2015साली प्रथम प्रस्तुती

बाजारपेठ भांडवलीकरणाच्या बाबतीत सर्वोच्च बिटकॉइन, त्याच्या प्रथम प्रस्तुतीपासून इथेरियम हे प्रोग्रॅम विकसकांचे आवडते बनून राहिले आहे आणि ती आता विस्फोट होण्यास तयार आहे. याचे ब्लॉकचेन सध्या, डीएओ (विकेंद्रित स्वायत्त प्लॅटफॉर्म) आणि डीइएफआय (विकेंद्रित वित्त) प्लॅटफॉर्मसारख्या हजारो डिॲपना संचलित करते. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि पियर-टु-पियर कर्ज देणे यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ही प्रोग्रॅमेबल ब्लॉकचेन एनएफटींद्वारे डिजीटल टोकनायझेशनच्या सिद्धांतामध्ये प्राण फुंकते. तशीही, इटीएच स्थिर उच्च वाढ अनुभवत आहे कारण त्याच्या युज केस सतत वाढत आहेत. फक्त 5 वर्षांत, त्याची किंमत किरकोळ $11 पासून जवळजवळ $3000 इतकी वाढली आहे. हे आकडे किंमतीत प्रचंड 27000% वाढ दर्शवतात!

ऑगस्ट मध्ये, इटीएचमध्ये खूप दिवस प्रतिक्षेत असलेली लंडन हार्ड फोर्क अद्ययावत करण्यात आली – ऊर्जा-प्रधान पीओडब्ल्यु (प्रुफ ऑफ वर्क) कन्सेन्सस यंत्रणेपासून ऊर्जा-कार्यक्षम पीओएस कन्सेन्सस यंत्रणेवर जाण्याचे हे पहिले पाऊल होते. या नोंद घेण्याजोग्या मुद्द्यांव्यतिरिक्त, कॉइनला अधिक वाव आणि प्रसार देत फ्युचर व ऑप्शन सारख्या डेरिव्हेटिव्हद्वारेदेखील इटीएचचा व्यापार करण्यात आला. 

इथेरियमचे सद्य बाजार भांडवलीकरण $49300 कोटी ($493 अब्ज)  इतके आहे. 

#2 Cardano (ADA)

सन 201त7 साली प्रथम प्रस्तुती

इथेरियमचा प्रतिस्पर्धक आणि पीओएस यंत्रणेचा सुरुवातीचा स्वीकार करणारा म्हणून कार्डानोला ओळखले जाते. व्यवहाराचा अवधी आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी ते पीओएस यंत्रणा वापरते. इटीएच प्रमाणेच ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचे समर्थन करते आणि विकेंद्रित ॲप्लिकेशनशी त्याची ब्लॉकचेन संपूर्णत: सानुकूल आहे. सध्या, बाजार भांडवलीकरणात तिसऱ्या सर्वात मोठ्या स्थानी असलेले, कार्डानो निश्चित वरच्या दिशेने जात आहे आणि हे डेफी बाजारपेठेसाठी खूप आहे.

कार्डानोच्या (एडा) किंमतीने एका महिन्यात, 1 ऑगस्ट रोजी $1.32 वरून 2 सप्टेंबर 2021, रोजी $2.32 वर 134.85 % ने उडी मारली, तेव्हा या टोकनने अनेक मैलाचे दगड ओलांडले. त्याने $3.10 ची सर्वोच्च उंची गाठली. एडाच्या वरच्या दिशेने उड्डाणासाठी तीन मुख्य प्रवर्तकांचा उल्लेख क्रिप्टो विश्लेषक करतात.

  • पहिला म्हणजे, क्रिप्टो बाजारपेठेत ढोबळ प्रमाणातील सद्य सुधारणा. 
  • दुसरा प्रवर्तक म्हणजे गेल्या महिन्यात केलेली नेटवर्क सुधारणा आणि
  • तिसरा म्हणजे बिटकॉइनसारख्यांच्या तुलनेत ’हरित’ क्रिप्टोकरन्सी म्हणून त्याची ख्याती. 

एडाचे सद्य बाजार भांडवलीकरण $7200 कोटी ($72.2 अब्ज)  इतके आहे.

#3 Polkadot (DOT)

Launched in 2017

सन 2017 साली प्रथम प्रस्तुती

फोर्ब्सकडून इथेरियम मारक म्हणून नामकरण झालेले पोल्काडॉट, एकत्र काम करण्यात सक्षम करण्यासाठी, विविध ब्लॉकचेनना जोडणाऱ्या अनेक ब्लॉकचेनना एकाच क्रिप्टोकरन्सी नेटवर्कमध्ये एकीकृत करण्याचे उद्दिष्ट ठेवते. पोल्काडॉट, त्याच्या निर्मितीमागील आघाडीचा प्रवर्तक बनण्याची इच्छा लक्षात घेता, भविष्यात क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे व्यवस्थापित होतात ते बदलण्याची क्षमता धारण करते. जुन्या क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि वेगवान व्यवहार सेवा देणारी ब्लॉकचेन म्हणून हा प्रकल्प स्विस रिसर्च फाऊंडेशनने सादर केला.  

सप्टेंबर 2020 आणि सप्टेंबर 30, 2021 दरम्यान, पोल्काडॉटच्या किंमती 872% नी- $2.93 ते $25.61 इतक्या वाढल्या. 

त्याचे सद्य बाजार भांडवलीकरण $4380 कोटी ($43.8 अब्ज) इतके आहे. 

#4 Solana (SOL) 

सन 2020 साली प्रथम प्रस्तुती

इथेरियमचा पर्याय म्हणून स्वत:ची स्थिती निश्चित केल्यानंतर, त्याची स्केलेबिलिटी, वेग आणि व्यवहारांचा आर्थिक किफायतशीरपणा यांमुळे सोलाना विकसकांचे लक्ष आकर्षित करत आहे. त्याची ब्लॉकचेन एका एकमेव प्रोटोकॉलवर चालते- एक संकरित प्रुफ-ऑफ-स्टेक आणि प्रुफ-ऑफ-हिस्टरी यंत्रणा डीॲपसाठी सर्वात वेगवान सिंगल लेयर निरसन विकसित करण्याच्या अंतिम हेतूने सोलाना ब्लॉकचेन बनवण्यात आली होती. 

दोन्ही विकेंद्रित एक्सचेंज असणारी – सिरम व आंबा बाजारपेठेसारख्या 300 पेक्षा अधिक ॲप्लिकेशनचे हा प्लॅटफॉर्म आधीपासूनच समर्थन करतो. एसओलच्या लोकप्रियतेतील अचानक वाढ हे गुंतवणूकदारांच्या वाढत्या स्वारस्याचे दुसरे कारण म्हणता येईल. अलिकडेच सर्व एसओएल डीइएफआय प्रकल्पांची टोटल व्हॅल्यू लॉक्ड (टीव्हीएल) $241 कोटी/$2.41 अब्ज वर पोहोचली यात आश्चर्य नाही. 

चिनी स्थावर मिळकत दिग्गज एव्हरग्रँडेच्या स्टॉकची किंमत गडगडल्यामुळे, सप्टेंबरमध्ये क्रिप्टो बाजारात घट झाली होती. परंतु, ऑक्टोबरमध्ये सर्व काही परत रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. या अल्टकॉइनसाठी हा महत्त्वाचा महिना ठरू शकतो.

बाजारपेठ भांडवलीकरणाच्या दृष्टीने सोलाना हे चौथे सर्वात मोठे अल्टकॉइन आहे जे आज $696 कोटी/$69.66 अब्जा वर आहे.

#5 Avalanche ( AVAX)

सन 2019 साली प्रथम प्रस्तुती

क्रिप्टो बाजारपेठेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अल्टकॉइनपैकी एक असणारे ॲव्हलँच हे इथेरियम 2.0 पेक्षा अधिक चांगले आहे असा विकसकांचा दृष्टीकोन बऱ्याचदा राहिला आहे. एव्हीएएक्स एका सेकंदापेक्षा कमी वेळात आणि इटीएच पेक्षा कमी शुल्कात व्यवहार पूर्ण करू शकते. व्यवहार अधिक सोपा, वापरकर्त्यासाठी अनुकूल आणि एव्हीएएक्स नेटवर्कवर संघटित असला पाहिजे असे या अल्टकॉइनच्या विकसकांचे उद्दिष्ट आहे. ॲव्हलॅंच पर्यावरण प्रणालीची स्थानिक पेमेंट पद्धत म्हणजे एव्हीएएक्स कॉइन आहे. निष्क्रिय उत्पन्न कमावण्यासाठी गुंतवणूकदार त्यांची एव्हीएएक्स टोकन स्टेक करू शकतात. 

बीटीसीने त्याचा सुधारणेचा पुनर्लाभ मार्ग पुन्हा आखला तेव्हापासून एव्हीएएक्स टोकनने 400% वाढ नोंदवली. तसेच, अलिकडील ॲव्हलॅंच रश कार्यक्रमाने त्याच्या वाढत्या लिक्विडिटी आणि क्रिप्टोकरन्सीच्या मागणीत भर घातली. हे टोकन जसजसे अधिक चेनवर उपलब्ध होऊ लागेल तसतशा किंमती आणखी उडी घेतील अशी अपेक्षा आहे. सन 2021च्या अखेरीस, एव्हीएएक्स $45.72 पर्यंत वाढेल असे भाकित मॉडेल सांगते.

एडाचे सद्य बाजार भांडवलीकरण $156.5 billion कोटी ($15.65 billion) इतके आहे.

तुम्हाला अल्टकॉइनमध्ये गुंतवणूक करायची असेल तर वझिरएक्स (WazirX), भारताच्या सर्वात विश्वसनीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवर जा. तुमच्या व्यापारातून सर्वात उत्तम आणि एक विस्मयकारक युएक्स मिळवा!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply