Skip to main content

2022 मध्ये भारतात विकत घेण्यासाठी 8 शीर्ष अल्टकॉइन्स (Top 8 Altcoins To Buy In India In 2022)

By फेब्रुवारी 25, 2022मार्च 17th, 20224 minute read

जर आपण आपल्या क्रिप्टो प्रवासाची नवीनच सुरुवात केली असेल तर, आपण कदाचित स्वत: ला बिटकॉइन या सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सीपुरते मर्यादित ठेवण्याचा मोह केला असेल. बिटकॉइन ही एक जास्त फायदा देणारी गुंतवणूक आहे ज्यात त्याच्या व्यापक उपलब्धतेमुळे गुंतवणुकीस कमी अडथळे आहेत, परंतु हेदेखील एक उच्च-जोखीम स्वीकारण्यासारखे आहे. क्रिप्टो बाजारामधील अत्यंत अस्थिरता व निरंतर चढाओढ पाहता, आपली सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी करण्याऐवजी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे नेहमीच चांगली कल्पना आहे. 

या ठिकाणी अल्टकॉइन्स येतात. अल्टकॉइन्स हा शब्द इतर क्रिप्टोकरन्सी सूचित करतो जे बिटकॉइन नाही. त्यांचे नाव बिटकॉइनसाठी “पर्यायी” नाणी आहेत, यावरून प्राप्त झाले. यात जराही दुमत नाही की, बिटकॉइन हे बाजारातील मार्केट लीडर आहे आणि मार्केट कॅपनुसार सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे, परंतु बऱ्याच अल्टकॉइनमध्ये बिटकॉइनपेक्षा जास्त वापर संभाव्यता आणि वाढ होण्याची क्षमता आहे. 

याचे उदाहरण , 1 जानेवारी 2021 रोजी बिटकॉइनची किंमत 20203.64 डॉलरवरून 58.02% वाढली आणि 25 डिसेंबर 2021 रोजी 50888.72 डॉलर झाली, इथेरियमची किंमत, मार्केट कॅपद्वारे दुसऱ्या क्रमांकाचा क्रिप्टो, त्याच काळात 423.30% वाढून 774.90 डॉलरवरून 5555.12 डॉलरवर आला. 2021 च्या सुरूवातीस सोलानाची किंमत फक्त 1.837 डॉलर होती, 25 डिसेंबर 2021 रोजी त्याचे मूल्य 193.127 डॉलर होते, ज्यात 10413.2% वाढ झाली.

भारतात 2022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 8 शीर्ष अल्टकॉइन्स

BTC वर्चस्वात, किंवा उर्वरित क्रिप्टोकरन्सी मार्केटशी बिटकॉइनच्या मार्केट कॅपचे गुणोत्तर, जे वर्षाच्या सुरूवातीस 70% पेक्षा जास्त होते, सन 2021 च्या अखेरीस जवळपास 40% अर्ध्यापर्यंत खाली आला होता. स्पष्टपणे, जे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ शोधत आहेत त्यांच्यासाठी, अल्टकॉइन्स हा सर्वोत्तम उपाय आहे. 20222022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम अल्टकॉइन्स वर एक नजर टाकूया.

#1. इथेरियम

बाजार भांडवलाद्वारे सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी आणि दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी, इथेरियम (ETH) ने 2021 मध्ये बिटकॉइनला नाट्यमयरित्या मागे टाकले आणि तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की हा ट्रेंड 2022 पर्यंत कायम राहील. इथेरियमच्या मूल्यातील वाढीचे श्रेय मुख्यत्वे DeFi (विकेंद्रित वित्त) बाजारपेठेच्या वाढीमुळे आणि NFT च्या (नॉन-फंजिबल टोकन) व्यापक लोकप्रियतेला दिले जाऊ शकते.

हे लिहित असताना, इथेरियम प्रति टोकन 3,130.36 डॉलर्स दराने वर ट्रेड करीत आहे आणि त्याचे मार्केट कॅप 370 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 2022 मध्ये ETH 2.0 च्या आगमनामुळे, जेव्हा इथेरियम प्रूफ-ऑफ-वर्क (PoW) पासून प्रूफ-ऑफ-स्टेक (PoS) मॉडेलमध्ये रूपांतरित होते, तेव्हा किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इथेरियमला 10 हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडता येईल. 

Get WazirX News First

* indicates required

#2. टिथर 

बाजारामध्ये भांडवलानुसार तिसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, टिथर एक स्टेबल कॉइन आहे जे डॉलरशी जोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे; म्हणूनच त्याचे मूल्य नेहमीच $1 वर राहील. कारण त्याचे मूल्य अमेरिकन डॉलरवर निश्चित केले गेले आहे, टिथरला कमी चढ-उतारांचा अनुभव येतो, ज्यामुळे तो बिटकॉइनचा एक उत्तम पर्याय बनला आहे. टिथर सर्वात स्थिर क्रिप्टोकरन्सीं पैकी एक आहे, क्रिप्टो बाजारामधील अत्यंत अस्थिरतेबद्दल चिंता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा नक्कीच एक श्रेष्ठ गुंतवणूकीचा पर्याय आहे.

#3. सोलाना

यात काही शंका नाही, सोलाना (SOL) ने 2021 मध्ये सर्वात जास्त फायदा कमावला, वर्षाच्या सुरुवातीस केवळ $1 वरून $200 पर्यंत वर जाणे, 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम अल्टकॉइन्स पैकी एक आहे. सध्या सोलाना 136.08 डॉलरवर व्यापार करते आणि बाजार भांडवलानुसार सातव्या क्रमांकाची क्रिप्टो आहे.

सोलानाच्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात त्याच्या अद्वितीय ब्लॉकचेन तंत्रज्ञानास दिले जाऊ शकते, जेथे ‘प्रूफ-ऑफ-स्टेक’ तंत्रज्ञान सोलानाच्या ‘प्रूफ-ऑफ-हिस्टरी’ सह एकत्र केले गेले आहे.’ यामुळे सोलानावरील व्यवहार जलद आणि स्वस्त होतात आणि ते थेट इथेरियमच्या स्पर्धेत ठेवतात. coinpriceforecast.com च्या अंदाजानुसार, 2022 च्या अखेरीस सोलानाच्या किंमती 300 डॉलर होण्याची अपेक्षा आहे.

#4. कार्डानो

 कार्डानो (ADA) सध्या पाचव्या क्रमांकाचे क्रिप्टोक्यरन्सी आहे आणि $1.50 वर ट्रेड करतो. ही सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी देखील आहे. सन 2021 च्या सुरूवातीस केवळ 0.177 डॉलर किंमतीचे कार्डानो 25 डिसेंबर 2021 पर्यंत 689.26% वाढून 1.397 डॉलरवर गेले. 2017 मध्ये लाँच,कार्डानो हा एक प्रूफ-ऑफ-स्टेक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे आणि त्याची क्रिप्टोकरन्सी एडीए म्हणून ओळखली जाते. पूर्वानुमानानुसार, 2022 च्या सुरूवातीस कार्डानोच्या किंमती $ 2 पासून सुरू होतील आणि वर्षाच्या अखेरीस 4 डॉलरपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे.

#5. लाइटकॉइन

लाइटकॉइन मार्केट कॅपद्वारे शीर्ष 10 क्रिप्टो नसला तरी, हे अद्याप एक मौल्यवान नाणे आहे ज्याने गुंतवणूकदारांची लक्षणीय आवड आकर्षित केली आहे. कारण त्याच्या क्रिप्टो नेटवर्कने बिटकॉइनपेक्षा चारपट वेगाने व्यवहार अंमलात आणण्याचे सिद्ध केले आहे, मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी लाइटकॉइन हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, लाइटकॉइनचा अवलंब जसजसा वाढत जाईल, तसतसे ते बाजार भांडवलही वाढेल. coinpriceforecast.com च्यानुसार लाइटकॉइन सध्या 140.59 डॉलरवर ट्रेड करत असून, त्याचे मार्केट कॅप 97,63,022,000 डॉलर आहे. 2022 च्या अखेरीस लाइटकॉइन २०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. 

#6. एव्हलांच

ज्या गुंतवणूकदारांनी 2021 च्या सुरूवातीस एव्हलांच (AVAX) खरेदी केले होते, ते निश्चितच मोठ्या नशीबवान होते. वर्षाच्या सुरुवातीला 3.207 डॉलर किंमत असलेल्या एव्हीएएक्सची किंमत डिसेंबर 2021 मध्ये प्रति टोकन 103.60 डॉलर होती, ज्यात 3130.43% वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना वर्षभरात 34 पट परतावा दिला, 2022 मध्ये एव्हलांच आणखी वाढेल असा तज्ञांचा अंदाज आहे आणि किंमती 200 डॉलर्सच्या पुढे जातील. आपण 2022 मध्ये स्फोट होण्यासाठी पुढील मोठ्या क्रिप्टोकरन्सी शोधत असल्यास, एव्हलांच निवड करा, 2021 च्या सुरूवातीस तुलनेने अज्ञात क्रिप्टोकरन्सी जी आता सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी बनली आहे, ज्याचे बाजार भांडवल 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. AVAX ची सध्याची किंमत 84.98 डॉलरच्या आसपास आहे.

#7. रिप्पल

तुम्ही तुलनेने कमी जोखमीची गुंतवणूक शोधत आहात का, ज्यात अधिक बक्षिसे मिळण्याची शक्यता आहे? रिप्पल (XRP) हे त्याचे उत्तर आहे. रिप्पल एक ब्लॉकचेन-आधारित डिजिटल पेमेंट नेटवर्क व प्रोटोकॉल आहे आणि XRP ही त्याची मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. सध्या बाजार भांडवलानुसार 8 व्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी, रिप्पल 2022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम अल्टकॉइनपैकी एक आहे. लिहित असताना, 2021 च्या सुरूवातीस 0.221 डॉलर वरून 270% पेक्षा जास्त वाढ झाल्याने रिप्पलचा व्यापार $ 0.7444 वर झाला. तज्ज्ञांच्या मते, 2022 मध्ये रिप्पलच्या किंमती 3 ते 5 डॉलर दरम्यान असण्याची शक्यता आहे. 

#8. पोल्काडॉट 

मार्केट कॅपिटलायझेशननुसार 10 वी सर्वात मोठी क्रिप्टो, एक मुक्त-स्रोत ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आणि क्रिप्टोकरन्सी जी वितरित संगणनाला अनुमती देते आणि DOT हे त्याचे मूळ टोकन आहे. पोल्काडॉटची किंमत सध्या 24.78 डॉलर असून त्याचे मार्केट कॅप 24 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. पोल्काडोटला योग्य गुंतवणूक समजण्याचे एक मुख्य कारण म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या डेटा किंवा मालमत्तेचे क्रॉस-ब्लॉकचेन हस्तांतरण सुलभ करू शकते. याव्यतिरिक्त, स्केलेबिलिटी आणि वेगवान व्यवहार पोलकाडोटच्या कार्यक्षमतेत आणखी भर घालतात. 2022 च्या अखेरीस DOT किंमती $ 50 च्या वर चढणे अपेक्षित आहे.

आजच WazirX सोबत सुरुवात करा

समोरील मोठी क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी ठिकाण शोधत आहात? भारतातील अग्रगण्य आणि सर्वात विश्वासार्ह क्रिप्टो एक्सचेंज WazirX पेक्षा पुढे पाहू नका. सुपर फास्ट KYC प्रक्रिया, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये, वीज-द्रुत व्यवहार आणि बरेच काही यासह, WazirX देखील भारतातील सर्वात वेगाने वाढणारी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. सुरुवात करण्यासाठी येथे क्लिक करा.

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply