Skip to main content

नवीन फीचर अद्यतन: ट्रेड्रिंगव्ह्यू (TradingView) चार्ट अँड्रॉईड आणि iOS वर लाइव्ह आहे (New Feature Update: TradingView Charts are live on Android and iOS)

By डिसेंबर 22, 20211 minute read

नमस्कार मित्रांनो!

अद्यतन तपशील: ट्रेडिंगव्ह्यू (TradingView) चार्ट आता अँड्रॉईड आणि iOS अॅपवर लाईव्ह आहे. आमचा विश्वास आहे की आमच्या वापरकर्त्यांना ते अतिशय आवडेल. हे सर्वाधिक विनंती केले जाणारे फीचरदेखील आहे.

ट्रेडिंगव्ह्यू (TradingView) फीचर आमच्या वापरकर्त्यांना कशी मदत करणार आहे?

सामान्य/नियमित वापरकर्त्यांसाठी: ते आमच्या डिफॉल्ट लाईन चार्टला साधेपणा आणि स्पष्टता आणते आणि तसेच वास्तव वेळेत अद्ययावतही करते.

प्रो ट्रेडरसाठी: तुम्ही चार्टवर रेषा काढू शकता. त् जोडीला, विविध प्रकारचे चार्ट उपलब्ध असतात जे तुम्हाला तुमच्या पुढील व्यापारी चाल ठरवण्यात मदत करू शकतात.

अँड्रॉईड (Android)

iOS

या अत्याधुनिक सोल्यूशनचे श्रेय अद्वितीय सोल्यूशन घेऊन येणाऱ्या आमच्या वेब आणि मोबाईल टीमला जाते. यासाठी बऱ्याच वेळा चर्चा आणि शोधाशोध झाली ज्यामुळे आम्हाला अॅपचा एकंदर आकार यशस्वीपणे कमी करता आला, आणि त्यामुळे ट्रेडिंग व्ह्यू चार्ट लोड होण्यासाठी लागणारा वेळ या श्रेणीत सर्वोत्तम आहे. 

आमच्याकडे कोणत्याही वेळेला बॅकएन्डकडून सर्व वापरकर्त्यांसाठी ट्रेडिंग व्ह्यू चार्ट अद्ययावत करण्याची लवचिकताही आहे. हे नक्कीच मोबाईल आणि वेबदरम्यानच्या विलक्षण सहकार्याचे लक्षण आहे.

ट्रेडिंगव्ह्यू (TradingView) फीचर कसे शोधायचे?

तुम्ही केवळ 3 सर्वोत्तम शक्य पायऱ्यांमध्ये या फिचरचा लाभ घेऊ शकता!

पायरी1: तुमच्या वझिरएक्स अॅपवर, ‘एक्सचेंज’ निवडा.

पायरी 2: तुम्हाला ज्या क्रिप्टोचे ट्रेडिंगव्ह्यू बघायचे असेल त्यावर क्लिक करा.

पायरी 3: प्रथम खाली दिलेल्या प्रतिमेमधील आयकॉनवर क्लिक करून चार्टचा प्रकार निवडा.

आणि झाले! तुम्हाला तुमच्या पुढील पायऱ्या ठरवण्यासाठी तुमच्या पसंतीच्या स्टाईलमध्ये चार्ट उपलब्ध आहेत!

आनंदाने ट्रेडिंग करा!

अस्वीकरण: क्रिप्टोकरन्सी हे कायदेसंमत चलन नाही आणि सध्या ते अनियंत्रित आहे. त्यास उच्च मूल्य अस्थिरता नेहमी बाधित करत असल्याने क्रिप्टोचलनात व्यापार/व्यवहार करत असतांना तुम्ही पुरेसे जोखिम मूल्यमापन केले आहे याची कृपया खात्री करा. या विभागात देण्यात आलेली माहिती कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा WazirX ची अधिकृत स्थिती यांचे प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय केव्हाही आणि कोणत्याही कारणासाठी हे ब्लॉग पोस्ट सुधारण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा संपूर्ण निर्णयाधीन हक्क WazirX राखून ठेवत आहे.

Leave a Reply